नमस्कार!!!
पहिल्यांदा आई झालेल्या एका मैत्रिणीने मला विचारले ' तुला बडबड गीते येतात का गं?'
आठवायचा प्रयत्न केला तर आठवली तशी चार पाच गाणी. पण मग मनात विचार आला ही माहितीतली सगळी गाणी एकत्र केली तर..
माझ्या बऱ्याच नव्याने आई झालेल्या मैत्रीणींना याचा फायदा होईल, आणि दुसर्याँदा आई झालेल्या मैत्रीणींना ही.. :)
यातली गाणी ही काही आठवणीतली तर काही जमा केलेली. तुम्हालाही या व्यतिरिक्त गाणी ठाऊक असतील तर नक्की सांगा.. या मालिकेतील हे पहिले बडबड गीत कविवर्य मंगेश पाडगावकरांचे..
चांदोमामा, चांदोमामा
भागलास काय ?
घरचा अभ्यास
केलास काय ?
चांदोमामा, चांदोमामा
लपलास काय ?
पुस्तक हरवून
बसलास काय ?
चांदोमामा, चांदोमामा
रुसलास काय ?
गणितात भोपळा
घेतलास काय ?
कवी - मंगेश पाडगावकर
No comments:
Post a Comment