मराठी नाटक - या घर आपलंच आहे
डायरेक्टर - प्रकाश भालेकर कथा - मधुसूदन कालेलकर
कलाकार - अतुल परचुरे, प्रसाद ओक, मैथिली वारंग, हेमांगी वेलणकर, सुरेश डाके.
गौतम आणि नाथ या दोन चुलत भावांचे हे एक करमणूकप्रधान नाटक. उच्च शिक्षणासाठी ते दोघ मुंबईला येतात. काकासाहेब बारामतीकर (नाथचे वडील) यांना या बाबतीत या दोघांचे हेतू माहित नसतात. हे दोघे काकासाहेबांची एक दूरची नातेवाईक निर्मलाताई यांच्याकडे राहतात. इकडे गौतम चंचलच्या तर नाथ सुगंधाच्या प्रेमात पडतो. ते दोघे गुपचूप लग्न करतात आणि काकासाहेबंपासून ही गोष्ट लपवतात. चंचल आणि सुगंधाचे पालक काकासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतात आणि त्यांची ही सगळी अळी मिळी गुपचिळी संकटात येते.
आता गौतम आणि नाथ काय करतील? काकासाहेब त्यांची लग्न मान्य करतील? जाणून घेण्यासाठी आवर्जून पहा हे तुफान विनोदी नाटक...
या घर आपलंच आहे - भाग १
या घर आपलंच आहे - भाग २
No comments:
Post a Comment