Friday, April 22, 2011

Shivlilamrut - Adhyay 1

अध्याय पहिला
॥ श्रीगणेशाय नम: ॥
॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥॥ श्री गुरुभ्यो नम: ॥॥ श्री सांबसदाशिवाय नम: ॥


ॐ नमोजी शिवा अपरिमिता ॥ आदि अनादि मायातीता ॥ पूर्णब्रह्मानंदा शाश्वता ॥ हेरंबताता जगद्गुरो ॥१॥
ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा ॥ अनादिसिध्दा आनंदवनविलासा ॥ मायाचक्रचालका अविनाशा ॥ अनंतवेषा जगत्पते ॥२॥
जय जय विरूपाक्षा पंचवदना ॥ कर्माध्यक्षा शुध्द्चैतन्या ॥ विश्वंभरा कर्ममोचकगहना ॥ मनोजदहना मनमोहन जो ॥३॥
भक्तवल्लभ तूं हिमनगजामात ॥ भाललोचन नीलग्रीव उमानाथ ॥ मस्तकीं स्वर्धुनी विराजित ॥ जातिसुमनहारवत जी ॥४॥
पक्षिरथप्रिय त्रिपुरांतक ॥ यक्षपतिमित्र प्रतापार्क ॥ दक्षमखविध्वंसक मृगांक ॥ निष्कलंक तव मस्तकीं ॥५॥
विशाळ भाळ कर्पूरगौरवर्ण ॥ काकोलभक्षक निजभक्तरक्षण ॥ विश्वासाक्षी भस्मलेपन ॥ भयमोचन भवहारक जो ॥६॥
जो सर्गस्थित्यंतकारण ॥ त्रिशूलपाणी शार्दुलचर्मवसन ॥ स्कंदतात सुहास्यवदन ॥ मायाविपिनदहन जो ॥७॥
जो सच्चिदानंद निर्मळ॥ शिव शांत ज्ञानघन अचळ ॥ जो भानुकोटितेज अढळ ॥ सर्वकाळ व्यापक जो ॥८॥
सकलकलिमलदहन कल्मषमोचन ॥ अनंतब्रह्मांडनायक जगरक्षण ॥ पद्मजतातमनरंजन ॥ जननमरणनाशक जो ॥९॥
कमलोद्भव कमलाकर ॥ दशशतमुख दशशतकर ॥ दशशतनेत्र सुर भूसुर ॥ अहोरात्र ध्याती जया ॥१०॥

भव भवांतक भवानीवर ॥ स्मशानवासी गिरां अगोचर ॥ जो स्वर्धुनीतीरविहार ॥ विश्वेश्वर काशीराज जो ॥११॥
व्योमहरण व्यालभूषण ॥ जो गजदमन अंधकमर्दन ॥ ॐकारमहाबलेश्वर आनंदघन ॥ मदगर्वभंजन अज अजित जो ॥१२॥
अमितगर्भ निगमागमनुत ॥ जो दिगंबर अवयवरहित ॥ उज्जयिनी महाकाल कालातीत ॥ स्मरणे कृतांतभय नाशी ॥१३॥
दुरितकाननवैश्वानर ॥ जो निजजनचित्तचकोर चंद्र ॥ वेणुनृपवरमहत्पापहर ॥ घुष्णेश्वर सनातन जो ॥१४॥
जो उमाहृदयपंजकीर ॥ जो निजजनहृदयाब्जभ्रमर ॥ तो सोमनाथ शशिशेखर ॥ सौराष्ट्रदेशविहारी जो ॥१५॥
कैरवलोचन करुणासमुद्र ॥ रुद्राक्षभूषण रुद्रावतार ॥ भीम भयानक भीमाशंकर ॥ तपा पार नाहीं ज्याच्या ॥१६॥
नागदमन नागभूषण ॥ नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान ॥ ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण ॥ नागाननजनक जो ॥१७॥
वृत्रारिशत्रुजनकवरदायक ॥ बाणवल्लभ पंचबाणांतक ॥ भवरोगवैद्य त्रिपुरहारक ॥ वैजनाथ अत्यद्भुत जो ॥१८॥
त्रिनयन त्रिगुणातीत ॥ त्रितापशमन त्रिविधभेदरहित ॥ त्र्यंबकराज त्रिदोषानलशांत ॥ करूणाकर बलाहक जो ॥१९॥
कामसिंधुरविदारककंठीरव॥ जगदानंदकंद कृपार्णव ॥ हिमनगवासी हैमवतीधव ॥ हिमकेदार अभिनव जो ॥२०॥

पंचमुकुट मायामलहरण ॥ निशिदिन गाती आम्नाय गुण ॥ नाहीं जया आदि मध्य अवसान ॥ मल्लिकार्जुन श्रीशैलवास ॥२१॥
जो शक्रारिजनकांतकप्रियकर ॥ भूजासंतापहरण जोडोनि कर ॥ जेथे तिष्ठत अहोरात्र ॥ रामेश्वर जगद्गुरु ॥२२॥
ऐसिया शिवा सर्वोत्तमा ॥ अज अजित ब्रह्मानंदधामा ॥ तुझा वर्णावया महिमा ॥ निगमागमां अतर्क्य ॥२३॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ॥ तव गुणार्णव अगाध थोर ॥ तेथें बुध्दि चित्त तर्क पोहणार ॥ न पावती पार तत्वतां ॥२४॥
कनकाद्रिसहित मेदिनीचें वजन ॥ करावया ताजवा आणूं कोठून ॥ व्योम सांठवे संपूर्ण ॥ ऐसें सांठवण कोठून आणूं ॥२५॥
मेदिनीवसनाचें जळ आणि सिकता ॥ कोणत्या मार्पे मोजूं आतां ॥ प्रकाशावया आदित्या ॥ दीप सरता केवीं होय ॥२६॥
धरित्रीचें करूनि पत्र ॥ कुधर कज्जल जलधि मषीपात्र ॥ सुरद्रुम लेखणी विचित्र ॥ करूनि लिहीत कंजकन्या ॥२७॥
तेही तेथें राहिली तटस्थ ॥ तरी आतां केवीं करूं ग्रंथ ॥ जरी तूं मनीं धरिसी यथार्थ ॥ तरी काय एक न होय ॥२८॥
द्वितीयेचा किशोर इंदु ॥ त्यासी जीर्णदशी वाहती दीनबंधु ॥ तैसे तुझे गुण करुणासिंधु ॥ वर्णीतसें अल्पमती ॥२९॥
सत्यवतीहृदयरत्नमराळ ॥ भेदीत गेला तव गुणनिराळ ॥ अंत नकळेचि समूळ ॥ तोही तटस्थ राहिला ॥३०॥

तेथें मी मंदमति किंकर ॥ केवीं क्रमूं शकें महीमांबर ॥ पर आत्मसार्थक करावया साचार ॥ तव गुणार्णवीं मीन झालों ॥३१॥
ऐसे शब्द ऐकतां साचार ॥ तोषला दाक्षायणीवर ॥ म्हणे शिवलिलामृत ग्रंथ परिकर ॥ आरंभी रस भरीन मी ॥३२॥
जैसा घरूनि शिशूचा हात ॥ अक्षरें लिहवी पंडित ॥ तैसे तव मुखें मम गुण समस्त ॥ सुरस अत्यंत बोलवीन मी ॥ ३३॥
श्रोतीं व्हावें सावधचित्त ॥ स्कंद्पुराणीं बोलिला श्रीशुकतात ॥ अगाध शिवलीलामृत ग्रंथ ॥ ब्रह्मोत्तरखंड जें ॥३४॥
नैमिषारण्यीं शौनकादिक सुमती ॥ सूताप्रति प्रश्न करिती ॥ तूं चिदाकाशींचा रोहिणीपति ॥ करीं तृप्ति श्रवणचकोरां ॥३५॥
तुवां बहुत पुराणें सुरस ॥ श्रीविष्णुलीला वर्णिल्या विशेष ॥ अगाध महिमा आसपास ॥ दशावतार वर्णिले ॥३६॥
भारत रामायण भागवत ॥ ऐकतां श्रवण झाले तृप्त ॥ परी शिवलीलामृत अद्भुत ॥ श्रवणद्वारें प्राशन करूं ॥३७॥
यावरी वेदव्यासशिष्य सूत ॥ म्हणे ऐका आतां देऊनि चित्त ॥ शिवचरित्र परमाद्भुत ॥ श्रवणें पातकपर्वत जळती ॥३८॥
आयुरारोग्य ऐश्वर्य अपार ॥ संतति संपत्ति ज्ञानविचार ॥ श्रवणमात्रें देणार ॥ श्रीशंकर निजांगे ॥३९॥
सकळ तीर्थव्रतांचे फळ ॥ महामखांचे श्रेय केवळ ॥ देणार शिवचरित्र निर्मळ ॥ श्रवणें कलिमल नासती ॥४०॥

सकल यज्ञामाजी जपयज्ञ थोर ॥ म्हणाल जपावा कोणता मंत्र ॥ तरी मंत्रराज शिवषडक्षर ॥ बीजसहित जपावा ॥४१॥
दुजा मंत्र शिवपंचाक्षर ॥ दोहींचे फळ एकचि साचार ॥ उतरती संसारार्णवपार ॥ ब्रह्मादिसुरऋषी हाचि जपती ॥४२॥
दारिद्र दु:ख भय शोक ॥ काम क्रोध द्वंद्व पातक ॥ इतुक्यांसही संहारक ॥ शिवतारक मंत्र जो ॥४३॥
तुष्टीपुष्टीधृतिकारण ॥ मुनिनिर्जरांसी हाचि कल्याण ॥ कर्ता मंत्रराज संपुर्ण ॥ अगाध महिमा न वर्णवे ॥४४॥
नवग्रहांत वासरमणि थोर ॥ तैसा मंत्रात शिवपंचाक्षर ॥ कमलोद्भव कमलावर ॥ अहोरात्र हाचि जपती ॥४५॥
शास्त्रांमाजी वेदांत ॥ तीर्थामाजी प्रयाग अद्भुत ॥ महास्मशान क्षेत्रांत ॥ मंत्रराज तैसा हा ॥४६॥
शास्त्रांमाजी पाशुपत ॥ देवांमाजी कैलासनाथ ॥ कनकादे जैसा पर्वतांत ॥ मंत्र पंचाक्षरी तेवीं हा ॥४७॥
केवळ परमतत्व चिन्मात्र ॥ परब्रह्म हेंचि तारक मंत्र ॥ तीर्थव्रतांचे संभार ॥ ओवाळूनि टाकावे ॥४८॥
हा मंत्र आत्म प्राप्ताची खाणी ॥ कैवल्यमार्गीचा प्रकाशतरणी ॥ अविद्याकाननदाहक ब्रह्माग्नी ॥ सनकादिक ज्ञानि हाचि जपती ॥४९॥
स्त्री शूद्र आदिकरूनी ॥ हाचि जप मुख्य चहूं वर्णी ॥ गृहस्थ ब्रह्मचारी आदिकरूनी ॥ दिवसरजनीं जपावा ॥५०॥

जाग्रुतीं स्वप्नी येतां जातां ॥ उभें असतां निद्रा करितां ॥ कार्या जातां बोलतां भांडता ॥ सर्वदाही जपावा ॥५१॥
शिवमंत्रध्वनिपंचानन ॥ कर्णी आकर्णितां दोषावारण ॥ उभेचि सांडती प्राण ॥ न लागतां क्षण भस्म होती ॥५२॥
न्यास मातृकाविधि आसन ॥ न लागे जपावा प्रीतीकरून ॥ शिव शिव उच्चारितां पूर्ण ॥ शंकर येऊनि पुढें उभा ॥५३॥
अखंड जपती जे हा मंत्र ॥ त्यांसी निजांगे रक्षी त्रिनेत्र ॥ आपुल्या अंगाची साउली करी पंचचक्र ॥ अहोरात्र रक्षी तयां ॥५४॥
मंत्र जपकांलागुनी ॥ शिव म्हणे मी तुमचा ऋणी ॥ परी तो मंत्र गुरुमुखेंकरूनी ॥ घेइंजे आधीं विधीने ॥५५॥
गुरु करावा मुख्यवर्ण ॥ भक्तिवैराग्यदिव्यज्ञान ॥ सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण ॥ या चिन्हेकरून मंडित जो ॥५६॥
मितभाषणी शांत दांत ॥ अंगी अमानित्व अदंभित्व ॥ अहिंसक अतिविरिक्त ॥ तोचि गुरु करावा ॥५७॥
वर्णानां ब्राह्मणो गुरु: ॥ हीं वेदवचनें निर्धारु ॥ हा त्यापासोनि मंत्रोच्चारु ॥ करूनि घ्यावा प्रीतीनें ॥५८॥
जरी आपणासी ठाउका मंत्र ॥ तरी गुरुमुखें घ्यावा निर्धार ॥ उगाचि जपे तो अविचार ॥ तरी निष्फळ जाणिजे ॥५९॥
कामक्रोधमदयुक्त ॥ जे कां प्राणी गुरुविरहित ॥ त्यानी ज्ञान कथिलें बहुत ॥ परी त्यांचे मुख न पहावें ॥६०॥

वेदशास्त्रं शोधून ॥ जरी झालें अपरोक्षज्ञान ॥ करी संतांशीं चर्चा पूर्ण ॥ तरी गुरुविण तरेना ॥६१॥
एक म्हणती स्वप्नी आम्हांते ॥ मंत्र सांगितला भगवंतें ॥ आदरें सांगे लोकांते ॥ परी तो गुरूविण तरेना ॥६२॥
प्रत्यक्ष येऊनियां देव सांगितला जरी गुह्यभाव ॥ तरी तो न तरेचि स्वयमेव ॥ गुरूसी शरण न रिघतां ॥६३॥
मौजीबंधनाविण गायत्रीमंत्र ॥ जपे तो भ्रष्ट अपवित्र ॥ वराविण वर्हाडी समग्र ॥ काय व्यर्थ मिळोनी ॥६४॥
तो वाचक झाला बहुवस ॥ परी त्याचे न चुकती गर्भवास ॥ म्हणोनि सांप्रदाययुक्त गुरूस ॥ शरण जावें निर्धारे ॥६५॥
जरी गुरु केला भलता एक ॥ परी पूर्वसंप्रदाय नसे ठाऊक ॥ जैसे गर्भांधासी सम्यम ॥ वर्णव्यक्त स्वरूप न कळेचि ॥६६॥
असो त्या मंत्राचे पुरश्चरण ॥ उत्तम क्षेत्री करावें पूर्ण ॥ काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य ॥ गोकर्णक्षेत्र आदिकरुनि ॥६७॥
शिवविष्णुक्षेत्र सुगम ॥ पवित्र स्थळीं जपावा सप्रेम ॥ तरी येचिविषयीं पुरातन उत्तम ॥ कथा सांगेन ते ऐका ॥६८॥
श्रवणी पठणीं निजध्यास ॥ आदरें धरावा दिवसेंदिवस ॥ आनुमोदन देता कथेस ॥ सर्व पापास क्षय होय ॥६९॥
श्रवणीं पठणीं निजध्यास ॥ आदरें धरावा दिवसेंदिवस ॥ अनुमोदन देतां कथेस ॥ सर्व पापास क्षय होय ॥७०॥

तरी मथुरानाम नगर ॥ यादववंशी परमपवित्र ॥ दाशार्हनामें राजेंद्र ॥ अति उदार सुलक्षणी ॥७१॥
सर्व राजे देती करभार ॥ कर जोडोनि नमिती वारंवार ॥ त्यांच्या मुकुटरत्नकिरणें साचार ॥ प्रपदें ज्याचीं उजळलीं ॥७२॥
मुकटघर्षणेंकरूनी ॥ किरणें पडलीं दिसती चरणीं ॥ जेणें सत्तावसन पसरूनी ॥ पालाणिली कुंभिनी हे ॥७३॥
उभारिला यशोध्वज ॥ जेवीं शरत्काळींचा द्विजराज ॥ सकल प्रजा आणि द्विज ॥ चिंतिती कल्याण जयाचें ॥७४॥
जैसा शुध्दद्वितीयेचा हिमांश ॥ तेवीं ऐश्वर्य चढे विशेष ॥ जो दुर्बुध्दि दासीस ॥ स्पर्श न करी कालत्रयीं ॥७५॥
सद् बुद्धिधर्मपत्नींसीं रत ॥ स्वरूपासीं तुळिजे रमानाथ ॥ दानशस्त्रें समस्त ॥ याचकांचे दारिद्र्य निवटिलें ॥७६॥
भूभुजांवरी जामदग्न्य ॥ समरांगणी जेवीं प्रळयाग्न ॥ ठाण न चळे रणींहून ॥ कुठारघायें भूरुह जैसा ॥७७॥
चतुर्दश विद्या चौसष्टी कळा ॥ आकळी जेवीं करतळींचा आंवळा ॥ जेणें दानमेघें निवटिला ॥ दारिद्यधुरोळा याचकांचा ॥७८॥
बोलणें अति मधुर ॥ मेघ गजें जेवीं गंभीर ॥ प्रजाजनांचे चित्तमयूर ॥ नृत्य करिती स्वानंदे ॥७९॥
ज्याचा सेनासिंधु देखोनि अद्भुत ॥ जलसिंधु होय भयभीत ॥ निश्चळ अंबरींचा ध्रुव सत्य ॥ वचन तेवीं न चळेचि ॥८०॥

त्याची कांता रूपवती सती ॥ काशीराजकुमारी नाम कलावती ॥ जिचें स्वरूप वर्णी सरस्वती ॥ विश्ववदनेंकरूनियां ॥८१॥
ते लावण्यसागरींची लहरी ॥ खंजनाक्षी बिंबाधरी ॥ मृदुभाषिणी पिकस्वरी ॥ हंसगमना हरिमध्या ॥८२॥
शशिवदना भुजंगवेणी ॥ अलंकारां शोभा जिची तनु आणी ॥ दशन झळकती जेवीं हिरेखाणी ॥ बोलतां सदनी प्रकाश पडें ॥८३॥
सकलकलानिपुण ॥ यालागी कलावती नाम पूर्ण ॥ जें सौदर्यवैरागरींचे रत्न ॥ जें निधान चातुर्यभूमीचें ॥८४॥
अंगीचा सुवास न माये सदनांत ॥ जिचें मुखाब्ज देखतां नृपनाथ ॥ नेत्रमिलिंद रुंजी घालित ॥ धणी पाहतां न पुरेचि ॥८५॥
नूतन आणिली पर्णून ॥ मनसिजें आकर्षिले रायाचें मन ॥ बोलावूं पाठविलें प्रीतीकरून ॥ परी ते न येचि प्रार्थितां ॥८६॥
स्वरूपश्रुंगारजाळें पसरून ॥ आकर्षिला नृपमानसमीन ॥ यालागीं दशार्हराजा उठोन ॥ आपणचि गेला तिजपाशीं ॥८७॥
म्हणे श्रुंगारवल्ली शुभांगी ॥ मम तनुवृक्षासी आलिंगीं ॥ उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगीं ॥ अत्यानंदे सर्वांदेखतां ॥८८॥
तंव ते श्रुंगारसरोवरमराळीं ॥बोले सुहास्यवदना वेल्हाळी ॥ म्हणे म्यां उपासिला शशिमौळी ॥ सर्वकाळ व्रतस्थ असें ॥८९॥
जे स्री रोगिष्ट अत्यंत ॥ गर्भिणी किंवा ऋतुस्नात ॥ अभुक्त अथवा व्रतस्थ ॥ वृध्द अशक्त न भोगावी ॥९०॥

स्त्रीपुरूषें हर्षयुक्तं ॥ असावीं तरुण रूपवंत ॥ अष्टभोगेंकरूनि युक्त ॥ चिंताग्रस्त नसावीं ॥९१॥
पर्वकाळ व्रतदिन निरसून ॥ उत्तमकाळी षड्रस अन्नें भक्षून ॥ मग ललना भोगावी प्रीतीकरून ॥ राजलक्षण सत्य हें ॥९२॥
राव काममदें मत्त प्रचंड ॥ रतिभरें पसरोनि दोर्दंड ॥ अलिंगन देतां बळें प्रचंड ॥ शरीर त्याचे पोळलें ॥९३॥
लोहार्गला तप्त अत्यंत ॥ तैसी कलावतीची तनू पोळत ॥ नृप वेगळा होऊनि पुसत ॥ कैसा वृत्तांत सांग हा ॥९४॥
श्रृंगरसदनाविलासिनी ॥ मम हृदयानंदवर्धिनी ॥ सकळ संशय टाकुनी ॥ मुळींहूनी गोष्टी सांग ॥९५॥
म्हणे हे राजचक्रमुकुटावतंस ॥ क्रोधें भरों नेदीं मानस ॥ माझा गुरु स्वामी दुर्वास ॥ अनुसूयात्मज महाराज ॥९६॥
त्या गुरुने परम पवित्र ॥ मज दीधला शिवपंचाक्षरी मंत्र ॥ तो जपतां अहोरात्र ॥ परमपावन पुनीत मी ॥९७॥
ममांग शीतळ अत्यंत ॥ तव कलेवर पापसंयुक्त ॥ अगम्यागमन केलें विचाररहित ॥ अभक्ष्य तितुकें भक्षिलें ॥९८॥
मज श्रीगुरुदयेंकरून ॥ राजेंद्रा आहें त्रिकाळज्ञान ॥ तुज जप तप शिवार्चन ॥ घडलें नाहीं सर्वथा ॥९९॥
घडलें नाहीं गुरुसेवन ॥ पुढें राज्यांतीं नरक दारूण ॥ ऐकतां राव अनुतापेंकरून ॥ सद्गदित जाहला ॥१००॥

म्हणे कलावती गुणगंभीरे ॥ तो शिवमंत्र मज देई आदरें ॥ ज्याचेनि जपें सर्वत्रं ॥ महत्पापें भस्म होती ॥१॥
ती म्हणे हे भूभुजेंद्र ॥ मज सांगावया नाहीं अधिकार ॥ मी वल्लभा तूं प्राणेश्वर ॥ गुरु निर्धारें तूं माझा ॥२॥
तरी यादवकुळीं गुरु वसिष्ठ ॥ गर्गमुनि महाज श्रेष्ठ ॥ जो ज्ञानियांमाजी दिव्यमुकुट ॥ विद्या वरिष्ठ तयाची ॥३॥
जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी ॥ तैसाच महाराज गर्गमुनी ॥ त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी ॥ शिवदीक्षा घेइंजे ॥४॥
मग कलावतीसहित भूपाळ ॥ गर्गाश्रमीं पातला तत्काळ ॥ साष्टांग नमूनि करकमळ ॥ जोडूनि उभा ठाकला ॥५॥
अष्टभावें दाटूनि हृदयीं ॥ म्हणे शिवदीक्षा मज देईं ॥ म्हणूनि पुढती लागे पायीं ॥ मिती नाहीं भावार्था ॥६॥
यावरी तो गर्गमुनी ॥ कृतांतभगिनीतीरा येऊनी ॥ पुण्यवृक्षातळीं बैसोनी ॥ स्नान करवी यमुनेचें ॥७॥
उभयतांनीं करूनि स्नान ॥ यथासांग केलें शिवपूजन ॥ यावरी दिव्य रत्नें आणून ॥ अभिषेक केला गुरूसी ॥८॥
दिव्याभरणें दिव्य वस्त्रें ॥ गुरु पुजिला नृपें आदरें ॥ गुरुदक्षिणेसी भांडारेें ॥ दाशार्हरायें समर्पिलीं ॥९॥
तनुमनधनेंंसीं उदार ॥ गर्गचरणीं लागे नृपवर ॥ असोनि गुरूसी वंचिती जे पामर ॥ ते दारुण निरय भोगिती ॥११०॥

श्रीगुरुचे घरीं आपदा ॥ आपण भोगी सर्व संपदा ॥ कैचें ज्ञान त्या मतिमंदा ॥ गुरुब्रह्मानंदा न भजे जो ॥११॥
एक म्हणती तनुमनधन ॥ नाशिवंत गुरुसी काय अर्पून ॥ परम चांडाळ त्याचें शठज्ञान ॥ कदा वदन न पहावें ॥१२॥
धिक् विद्या धिक् ज्ञान ॥ धिक् वैराग्य साधन ॥ चतुर्वेद शास्त्रें आला पढून ॥ धिक् पठण तयाचें ॥१३॥
जैसा खरपृष्ठीवरी चंदन ॥ षड्रसीं दर्वी व्यर्थ फिरून ॥ जेवीं मापें तंदुल मोजून ॥ इकडून तिकडे टाकिती ॥१४॥
घाणा इक्षुरस गाळी ॥ इतर सेविती रसनव्हाळी ॥ कीं पात्रांत शर्करा सांठविली ॥ परी गोडी न कळे तया ॥१५॥
असो ते अभाविक खळ ॥ तैसा नव्हे तो दाशार्हनृपाळ ॥ षोडशोपचारें निर्मळ ॥ पूजन केलें गुरूचें ॥१६॥
उभा ठाकला कर जोडून ॥ मग तो गर्गें हृदयीं धरून ॥ मस्तकीं हस्त ठेवून ॥ शिवपंचाक्षर मंत्र सांगे ॥१७॥
हृदयआकाश भुवनीं ॥ उगवला निजबोधतरणी ॥ अज्ञानतम तेच क्षणी ॥ निरसूनि नवल जाहलें ॥१८॥
अद्भुत मंत्राचें महिमान ॥ रायाचिया शरीरामधून ॥ कोट्यवधि काक निघोन ॥ पळते झाले तेधवां ॥१९॥
किती एकांचे पक्ष जळाले ॥ चरफडितचि बाहेर आले ॥ अवघेचि भस्म होऊनि गेले ॥ संख्या नाहीं तयांते ॥१२०॥

जैसा किंचित पडता कृशान ॥ दग्ध होय कंटकवन ॥ तैसे काक गेले जळोन ॥ देखोनि राव नवल करी ॥२१॥
गुरूसी नमूनि पुसे नृप ॥ काक कैंचे निघाले अमूप ॥ माझें झालें दिव्य रूप ॥ निर्जराहूनि आगळें ॥२२॥
गुरु म्हणे ऐक साक्षेपें ॥ अनंत जन्मींची महापापे ॥ बाहेर निघालीं काकारूपें ॥ शिवमंत्रप्रतापें भस्म झालीं ॥२३॥
निष्पाप झाला नृपवर ॥ गुरुस्तवन करी वारंवार ॥ धन्य पंचाक्षरी मंत्र ॥ तूं धन्य गुरु पंचाक्षरी ॥२४॥
पंचभुतांची झाडणी करून ॥ सावध केलें मजलागून ॥ चारी देह निरसून ॥ केलें पावन गुरुराया ॥२५॥
पंचवीस तत्वांचा मेळ ॥ त्यांत सांपडलों बहुत काळ ॥ क्रोध महिषासुर सबळ ॥ कामवेताळ धुसधुसी ॥२६॥
आशा मनशा तृष्णा कल्पना ॥ भ्रांति भुली इच्छा वासना ॥ या जखिणी यक्षिणी नाना ॥ विटंबीत मज होत्या ॥२७॥
ऐसा हा अवघा मायामेळ ॥ तुवां निरसिला तत्काळ ॥ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ ॥ गुरु दयाळ धन्य तूं ॥२८॥
सहस्त्रजन्मपर्यंत ॥ मज ज्ञान झालें समस्त ॥ पापें जळालीं असंख्यात ॥ काकरूपें देखिलीं म्यां ॥२९॥
सुवर्णस्तेय अभक्ष्यभक्षक ॥ सुरापान गुरूतल्पक ॥ परदारागमन गुरुनिंदक ॥ ऐसीं नाना महत्पापें ॥१३०॥

गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक ॥ स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक ॥ परनिंदा पशुहिंसक ॥ वृत्तिहारक अगम्यस्त्रीगमन ॥३१॥
मित्रद्रोही गुरुद्रोही ॥ विश्वदोही वेदद्रोही ॥ प्रासादभेद लिंगभेद पाहीं ॥ पंक्तिभेद हरिहरभेद ॥३२॥
ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षिघातक ॥ पाखांडमति मिथ्यावादक ॥ भेदबुध्दि भ्रष्टमार्गस्थापक ॥ स्त्रीलंपट दुराचारी ॥३३॥
कृतघ्न परद्रव्यापहारक ॥ कर्मभ्रष्ट तीर्थमहिमाउच्छेदक ॥ बकध्यानी गुरुछळक ॥ मातृहतक पितृहत्यारा ॥३४॥
दुर्बलघातक कर्ममार्गघ्न ॥ दीनहत्यारी पाहती पैशून्य ॥ तृणदाहक पीडिती सज्जन ॥ गोत्रवध भगिनीवध ॥३५॥
कन्याविक्रय गोविक्रय ॥ हयविक्रय रसविक्रय ॥ ग्रामदाहक आत्महत्या पाहें ॥ भ्रूणहत्या महापापें ॥३६॥
हीं महापापें सांगितलीं ॥ क्षुद्रपापें नाहीं गणिलीं ॥ इतुकीं काकरूपें निघालीं ॥ भस्म झालीं प्रत्यक्ष ॥३७॥
कांही गांठी पुण्य होतें परम ॥ म्हणोनि नरदेह पावलों उत्तम ॥ गुरुप्रतापें तरलों नि:सीम ॥ काय महिमा बोलूं आतां ॥३८॥
गुरुस्तवन करूनि अपार ॥ ग्रामासी आला दाशार्ह नृपवर ॥ सवें कलावती परमचतुर ॥ केला उध्दार रायाचा ॥३९॥
जपतां शिवमंत्र निर्मळ ॥ राज्य वर्धमान झालें सकळ ॥ अवर्षणदोष दुष्काळ ॥ देशांतूनि पळाले ॥१४०॥

वैधव्य आणि रोग मृत्य ॥ नाहींच कोठें देशांत ॥ आलिंगितां कलावतीसी नृपनाथ ॥ शशीऐसी शीतल वाटे ॥४१॥
शिवभजनीं लाविलेें सकळ जन ॥ घरोघरीं होत शिवकीर्तन ॥ रुद्राभिषेक शिवपूजन ॥ ब्राह्मणभोजन यथाविधि ॥४२॥
दाशार्हरायाचें आख्यान ॥ जे लिहिती ऐकती करिती पठण ॥ प्रीतीकरूनि ग्रंथरक्षण ॥ अनुमोदन देती जे ॥४३॥
सुफळ त्यांचा संसार ॥ त्यांसी निजांगे रक्षी श्रीशंकर ॥ धन्य धन्य तेचि नर ॥ शिवमहिमा वर्णिती जे ॥४४॥
पुढें कथा सुरस सार ॥ अमृताहूनि रसिक फार ॥ ऐकोत पंडित चतुर ॥ गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे ॥४५॥
पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी ॥ श्रीधरमुख निमित्त करूनी ॥ तोचि बोलवीत विचारोनी ॥ पहावें मनीं निर्धारें ॥४६॥
श्रीधरवरद पांडुरंग ॥ तेणें शिरी धरिलें शिवलिंग ॥ पूर्णब्रह्मानंद अभंग ॥ नव्हे विरंग कालत्रयी ॥४७॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ प्रथमोध्याय गोड हा ॥१४८॥
इतिश्री प्रथमोध्याय: समाप्त॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

Tuesday, April 19, 2011

Shivlilamrut - Parayan

'Shivalilamrut' is one of the great epic in Marathi and written by 'Shridhar Swami'. Today on the occassion of 'Shridhar swami Punyatithee', we take a pleasure to present this Grantha to our readers. Shivalilamrut is basically translation of 'Bramha-Uttar' (also known as Bramhottar) khanda of 'Skanda Purana'. Our best effort to list all the 'Shivalilamrut Adhyay' here, to make these available to all people who believe in Lord Shiva.

भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे। या पोथीचे परायण करण्याच्या अनेक पद्धती आहेत त्या खालिलप्रमाणे.

एक दिवसीय पारायण

सोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे। स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करावे. मद्य, मांस भक्षण करू नये। पारायण चालू असता सात अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घ्यावी। त्या अवधीत देह धर्म आवरावे. दूध, फळे भक्षण करावीत. हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आसनस्थ व्हावे आणि पाठ पूर्ण करावा। पारायणानंतर ॐ नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा १०८ वेळा रुद्रमालेवर जप करावा।
फल म्हणजे - इष्ट कामना पूर्ण होतील।

सप्ताह-पारायण पध्दति
सोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे। रोज एक पारायण याप्रमाणे ७ दिवस ७ पारायणे करावीत।
नियम - वरील प्रमाणे।
फल - सर्व इष्ट कामना पूर्ण होवून गंडांतरे, रोग, मृत्यु, पाप, ऋण, दारिद्र्य, संकटे, कोडासारखे असाध्य रोग, बंधन इ. टळतील। आयुष्य, धन, संतती वाढेल, तुष्टी पुष्टी मिळेल. हे सर्व मिळून शेवटी शिव-सायुज्यता मिळेल।

सप्ताह-पारायण पध्दति
कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन ” मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे.” अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.

सोमवार – अध्याय १ व अध्याय २
मंगळवार – अध्याय ३ व अध्याय ४
बुधवार – अध्याय ५ व अध्याय ६
गुरुवार – अध्याय ७ व अध्याय ८
शुक्रवार – अध्याय ९ व अध्याय १०
शनिवार – अध्याय ११ व अध्याय १२
रविवार – अध्याय १३ व अध्याय १४
रविवारी रात्री १५ वा अध्याय वाचला तरी चालेल न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे. पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा 'ॐ नम: शिवाय' या मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा )।

अकरावा अध्याय वाचन
फक्त अकरावा अध्याय रोज तीनदा वाचावा। नियम प्रथम पद्धतीत दिल्याप्रमाणे ।
फल - आयुष्य संतती लाभेल। अभक्ष्यभक्षण, मद्यपान, ब्रह्महत्यादी महापापे नष्ट होतील। एक सहस्त्र कपिला गायी दान केल्याचे पुण्य मिळेल.

अकरावा अध्याय श्रवण
अकराव्या अध्यायाच्या केवळ श्रवणानेही एकादश रूद्र प्रसन्न होतात आणि रुद्रपाठाचे पुण्य मिळते.

बेचाळिस ओव्या पठण
ग्रंथाच्या शेवटी दिलेल्या बेचाळिस ओव्यांचे नित्य पठण केले जाते। ज्यांना वेळेअभावी वा इतर काही कारणांमुळे ग्रंथ पठण करता येत नाही त्यांच्यासाठी ह्या ओव्या कामी येतात. रोज सकाली स्नान करून ह्या ४२ ओव्या वाचाव्यात।
फल - सर्व ग्रंथांचे पठण केल्याचे पुण्य मिळते.

या सर्व उपासनेत नित्य नियम पाहिजे। दुर्जनांचा संग टाळावा। चित्त शांत असावे। विकल्प धरु नये। श्रद्धा ठेवावी. संकल्प करून पठणास प्रारंभ करावा । येत नसल्यास गुरुजींकडून संकल्प करून घ्यावा. शास्त्रोक्त पद्धतीने शिवलिंगाची वा शिवप्रतिमेची पूजा करावी. सर्व उपासना गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली व व्रतस्थ राहून करावी.
शिवरात्रीचा उपवास, शिव पूजन, शिव दर्शन, त्या दिवशी शिव मंत्रजाप, शिवलीलामृत पारायण यांनी सर्व इहपर कामनापुर्ती होते व शिवसायुज्य मिळते अशी परम्परागत फलश्रुती प्रसिद्ध आहे।

बेलाची पाने, पांढरी फुले, दूध, शुद्ध जल, दही-भाताचा नैवेद्य ह्या साऱ्या गोष्टी शंकराला प्रिय मानल्या जातात. त्यामुळे यांचे शिवपुजेत फार महत्त्व आहे.

Visit again for the Shivlilamrut granth adhyay one by one.

Thursday, April 7, 2011

Geetai - Adhyay 18

Chapter - XVIII : Grace of God.

After the sermon in the fifteenth chapter, no new concepts are introduced. Sixteenth and Seventeenth chapter details the inner fight and the programme for the seeker. In this chapter, whatever we have learnt is being concluded.

First thing we learnt in Gita is that we have to act - keep on acting but surrender the fruit of our actions to God. These actions are of three types Satvic - which bring noble fruit, Rajasic - which gives mixed fruit of pleasure and pain, and Tamasic or fruitless activity / activity which bears painful fruit. Out of this, Shri Krishna advises that fruitless activity should be totally curbed and mixed fruit activity to be progressively purified by surrendering its fruit to God.

Resultant Satvic activity has also some defects, but this should not be given up. As inward purity grows, the effort in the action becomes less. From effort to gentleness, from gentleness to subtlety, from subtlety to nothingness, the activity tends to zero and action towards infinity.

After having said this, Sri Krishna tells Arjuna, You have heard with attention, all that I have been saying. Consider my words fully and do what you think right'. Thus Shri Krishna generously sets Arjuna free. In the same breath, in the next verse he says, 'Arjuna, give up everything and take refuge in Me'.
What does this mean? It means as long as there is Ego, there is danger in becoming free; let not any desire of your own arise in your heart. Be an observer of all the waves of desire. 'Not my, but HIS Will' - 'Not my but His Will'. "I" am not, "He" is. As you learn to subdue your ego thus, your 'Rajsik action ill become pure and what will be left will be infinite action without the 'doer'. Every action coming from God - making one a vehicle of His 'divine will' No 'I', No 'My' - all His. Starting with 'I' and frustration leading to no activity in the first chapter to destroying the illusion of 'I' in the second chapter, Gita progresses to the way of action, inward action to support outward action, leading to state of egoless activity in fifth chapter. Rest of the chapters mention the tools of concentration, devotion, surrender, cosmic vision etc. to support egoless activity, and last comes total surrender to obtain His Grace which is the final tool. 'His grace having been established, no effort is needed to remain pure. Purity becomes not only our second nature, but it becomes our first nature, our nature itself. This is the aim and end of Bhagvat-Gita.

गीताई अध्याय १८

[५५]

अर्जुन म्हणाला

संन्यासाचे कसे तत्त्व त्यागाचे हि कसे असे ।
मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती ।
फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग बोलती ॥ २ ॥

दोष-रूप चि ही कर्मे सोडावी म्हणती कुणी ।
न सोडावी चि म्हणती यज्ञ-दान-तपे कुणी ॥ ३ ॥

तरी ह्याविषयी ऐक माझा निश्चित निर्णय ।
त्याग जो म्हणती तो हि तिहेरी भेदला असे ॥ ४ ॥

यज्ञ-दान-तपे नित्य करणीय अवश्यक ।
न सोडावी चि ती होती ज्ञानवंतास पावक ॥ ५ ॥

परी ही पुण्य-कर्मे हि ममत्व फळ सोडुनी ।
करणे योग्य हा माझा जाण उत्तम निर्णय ॥ ६ ॥

नेमिले कार्य जे त्याचा संन्यास न जुळे चि तो ।
केला तसा जरी मोहे त्याग तामस बोलिला ॥ ७ ॥

कष्टामुळे चि जे कर्म सोडणे आंग राखुनी ।
त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ ॥ ८ ॥

करणे नेमिले कर्म कर्तव्य चि म्हणूनिया ।
ममत्व फळ सोडूनि त्याग तो मान्य सात्त्विक ॥ ९ ॥

कर्मी शुभाशुभी जेंव्हा राग-द्वेष न राखतो ।
सत्त्वांत मुरला त्यागी ज्ञने छेदूनि संशय ॥ १० ॥

अशक्य देहवंतास सर्वथा कर्म सोडणे ।
म्हणूनि जो फल-त्यागी तो त्यागी बोलिला असे ॥ ११ ॥

तिहेरी फळ कर्माचे बरे वाईट मिश्रित ।
त्याग-हीनास ते लाभे संन्यासी मुक्त त्यांतुनी ॥ १२ ॥

[५६]

ऐक तू मजपासूनि ज्ञात्यांचा कर्म-निर्णय ।
परभारे चि हे कर्म करिती पांच कारणे ॥ १३ ॥

अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने ।
वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे ॥ १४ ॥

काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी ।
धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे ॥ १५ ॥

तेथ जो शुद्ध आत्म्यास कर्ता मानूनि बैसला ।
संस्कार-हीन तो मूढ तत्त्व नेणे चि दुर्मति ॥ १६ ॥

नसे ज्यास अहंभाव नसे बुद्धीत लिप्तता ।
मारी विश्व जरी सारे न मारी चि न बांधिला ॥ १७ ॥

[५७]

ज्ञाता ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी कर्म-बीज हे ।
क्रिया करण कर्तृत्व कर्मांगे तीन त्यांतुनी ॥ १८ ॥

ज्ञाना-कर्मांत कर्त्यांत त्रिगुणी तीन भेद जे ।
रचिले ते कसे ऐक गुण-तत्त्वज्ञ वर्णिती ॥ १९ ॥

भूत-मात्रांत जे पाहे भाव एक सनातन ।
अभिन्न भेदलेल्यांत जाण ते ज्ञान सात्त्विक ॥ २० ॥

भेद-बुद्धीस पोषूनि सर्व भूतांत पाहते ।
वेगळे वेगळे भाव जाण ते ज्ञान राजस ॥ २१ ॥

एका देहांत सर्वस्व मानुनी गुंतले वृथा ।
भावार्थ-हीन जे क्षुद्र जाण ते ज्ञान तामस ॥ २२ ॥

नेमिले जे न गुंतूनि राग-द्वेष न राखतां ।
केले निष्काम-वृत्तीने कर्म ते होय सात्त्विक ॥ २३ ॥

धरूनि कामना चित्ती जे अहंकार-पूर्वक ।
केले महा खटाटोपे कर्म ते होय राजस ॥ २४ ॥

विनाश वेंच निष्पत्ति सामर्थ्य हि न पाहता ।
आरंभिले चि जे मोहे कर्म ते होय तामस ॥ २५ ॥

निःसंग निरहंकार उत्साही धैर्य-मंडित ।
फळो जळो चळे ना तो कर्ता सात्त्विक बोलिला ॥ २६ ॥

फल-कामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक ।
मारिता हर्ष-शोके तो कर्ता राजस बोलिला ॥ २७ ॥

स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी ।
दीर्घ-सूत्री सदा खिन्न कर्ता तामस बोलिला ॥ २८ ॥

बुद्धीचे भेद जे तीन धृतीचे हि तसे चि जे ।
गुणानुसार ते सारे सांगतो वेगवेगळे ॥ २९ ॥

अकर्तव्ये बंध-भय कर्तव्ये मोक्ष निर्भय ।
जाणे सोडू धरू त्यांस बुद्धि सात्त्विक ओळख ॥ ३० ॥

कार्याकार्य कसे काय काय धर्म अधर्म तो ।
जी जाणू न शके चोख बुद्धि राजस ओळख ॥ ३१ ॥

धर्म मानी अधर्मास अंधारे भरली असे ।
अर्थ जी उलटा देखे बुद्धि तामस ओळख ॥ ३२ ॥

जी इंद्रिये मन प्राण ह्यांचे व्यापर चालवी ।
समत्वे स्थिर राहूनि धृति सात्त्विक जाण ती ॥ ३३ ॥

धर्मार्थकाम सारे चि चालवी सोय पाहुनी ।
बुडवी जी फलाशेत धृति राजस जाण ती ॥ ३४ ॥

निद्रा भय न जी सोडी शोक खेद तसा मद ।
घाली झांपड बुद्धीस धृति तामस जाण ती ॥ ३५ ॥

तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐक ते ॥ ३६ ॥

अभ्यासे गोड जे होय दुःखाचा अंत दाखवी ।
जे कडू विख आरंभी अंती अमृत-तुल्य चि ।
आत्म्यांत शुद्ध बुद्धीस लाभले सुख सात्त्विक ॥ ३७ ॥

आरंभी गोडसे वाटे अंती मारक जे विख ।
भासे विषय-संयोगे इंद्रिया सुख राजस ॥ ३८ ॥

निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी ।
आरंभी परिणामी हि गुंगवी सुख तामस ॥ ३९ ॥

इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवादिकांत हि ।
काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणांतुनी ॥ ४० ॥

[५८]

ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली ।
स्वभाव-सिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरूनिया ॥ ४१ ॥

शांति क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह ।
ऋजुता आणि पावित्र्य ब्रह्म-कर्म स्वभावता ॥ ४२ ॥

शौर्य धैर्य प्रजा-रक्षा युद्धी हि अ-पलायन ।
दातृत्व दक्षता तेज क्षात्र-कर्म स्वभावता ॥ ४३॥

शेती व्यापार गो-रक्षा वैश्य-कर्म स्वभावता ।
करणे पडिली सेवा शूद्र-कर्म स्वभावता ॥ ४४ ॥

आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी ।
ऐक लाभे कसा मोक्ष स्व-कर्मी लक्ष लावुनी ॥ ४५ ॥

जो प्रेरी भूत-मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे ।
स्व-कर्म-कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो ॥ ४६ ॥

उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ ॥

सहज-प्राप्त ते कर्म न सोडावे सदोष हि ।
दोष सर्व चि कर्मांत राहे अग्नींत धूर तो ॥ ४८ ॥

राखे कुठे न आसक्ति जिंकूनि मन निःस्पृह ।
तो नैष्कर्म्य महा-सिद्धि पावे संन्यास साधुनी ॥ ४९ ॥

सिद्धीस लाभला ब्रह्म गांठी कोण्यापरी मग ।
ज्ञानाची थोर ती निष्ठा ऐक थोडयांत सांगतो ॥ ५० ॥

बुद्धि सात्त्विक जोडूनि धृतीचा दोर खेचुनी ।
शब्दादि-स्पर्श टाळूनि राग-द्वेषांस जिंकुनी ॥ ५१ ॥

चित्त वाचा तनू नेमी एकांती अल्प सेवुनी ।
गढला ध्यान-योगात दृढ वैराग्य लेउनी ॥ ५२ ॥

बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह ।
ममत्वासह सोडूनि शांतीने ब्रह्म आकळी ॥ ५३ ॥

ब्रह्म झाला प्रसन्नत्वे न करी शोक कामना ।
पावे माझी परा भक्ति देखे सर्वत्र साम्य जी ॥ ५४ ॥

भक्तीने तत्त्वता जाणे कोण मी केवढा असे ।
ह्यापरी मज जाणूनि माझ्यात मिसळे मग ॥ ५५ ॥

करूनि हि सदा कर्मे सगळी मज सेवुनी ।
पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत ॥ ५६ ॥

मज मत्पर-वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी ।
समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेव तू ॥ ५७ ॥

मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू ।
मीपणे हे न मानूनि पावशील विनाश चि ॥ ५८ ॥

म्हणसी मी न झुंजे चि हे जे मीपण घेउनी ।
तो निश्चय तुझा व्यर्थ स्वभाव करवील चि ॥ ५९ ॥

स्वभाव-सिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू ।
जे टाळू पाहसी मोहे अवश्य करिशील ते ॥ ६० ॥

राहिला सर्व भूतांच्या हृदयी परमेश्वर ।
मायेने चाळवी त्यांस जणू यंत्रांत घालुनी ॥ ६१ ॥

त्याते चि सर्व-भावे तू जाई शरण पावसी ।
त्याच्या कृपा-बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत ॥ ६२ ॥

असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज ।
ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ॥ ६३ ॥

सर्व गूढांतले गूढ पुन्हा उतम वाक्य हे ।
हितार्थ सांगतो ऐक फार आवडसी मज ॥ ६४ ॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज ।
प्रिय तू मिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्य ही ॥ ६५ ॥

सगळे धर्म सोडूनि एका शरण ये मज ।
जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू नको ॥ ६६ ॥

[६०]

न कथी हे कधी त्यास तपो-हीन अभक्त जो ।
श्रवणेच्छा नसे ज्यास माझा मत्सर जो करी ॥ ६७ ॥

सांगेल गूज हे थोर माझ्या भक्त-गणांत जो ।
तो त्या परम भक्तीने मिळेल मज निश्चित ॥ ६८ ॥

कोणी अधिक त्याहूनि माझे प्रिय करी चि ना ।
जगी आवडता कोणी न होय मज त्याहुनी ॥ ६९ ॥

हा धर्म-रूप संवाद जो अभ्यासील आमुचा ।
मी मानी मज तो पूजी ज्ञान-यज्ञ करूनिया ॥ ७० ॥

हे ऐकेल हि जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडुनी ।
पावेल कर्म-पूतांची तो हि निर्वेध सद्-गति ॥ ७१ ॥

तू हे एकाग्र चित्ताने अर्जुना ऐकिलेस की ।
अज्ञान-रूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा ॥ ७२ ॥

अर्जुन म्हणाला

मोह मेला चि तो देवा कृपेने स्मृति लाभली ।
झालो निःशंक मी आता करीन म्हणसी तसे ॥ ७३ ॥

संजय म्हणाला

असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत ।
थोरांचा ऐकिला तो मी नाचवी रोम रोम जो ॥ ७४ ॥

व्यास-देवे कृपा केली थोर योग-रहस्य हे ।
मी योगेश्वर कृष्णाच्या मुखे प्रत्यक्ष ऐकिले ॥ ७५ ॥

हा कृष्णार्जुन-संवाद राया अद्भुत पावन ।
आठवूनि मनी फार हर्षतो हर्षतो चि मी ॥ ७६ ॥

स्मरूनि बहु ते रूप हरीचे अति अद्भुत ।
राया विस्मित होऊनि नाचतो नाचतो चि मी ॥ ७७ ॥

योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर ।
तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव ॥ ७८ ॥

अध्याय अठरावा संपूर्ण

Tuesday, April 5, 2011

आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...

शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची आय पी एल टीम आली. आता २०११ च्या खेळात ही टीम सहभागी सुद्धा होणार आहे पुणे वोरीअर्स नावाने.
एक भविष्यातले पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही पुणेरी पाट्या लागोलाग तयार करुन ठेवत आहोत पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.

ह्या पाट्या आहेत त्या मैदानावरच्या
. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.
. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
. मैदानात विकत मिळणार्या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.
१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !
११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह !
१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.
१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.
१४.
सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.
१५.
सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे 'फोटु काढुन मिळणार नाहीत' किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.
१६.
सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.
१७.
हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नये. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.
१८.
पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.
१९.
परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?
२०.
राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.
२१.
वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.

ह्या पाट्या आहेत त्या आयपीएल पुणे संघाच्या कार्यालयातल्या
. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी १-३ असा विश्रांतीचा वेळ राखुन ठेवावा लागेल.
. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थीत रात्री ८ वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसर्या दिवशी खेळता येईल.
. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.
४.
सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की "आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) " ही आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन "मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र" ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही. त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेच त्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.
५.
हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडुंची चौकशी अथवा मागणी करु नये.
६.
क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.
७.
देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्त प्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.
८.
आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.
९.
आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.
१०.
आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही
११.
आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स, ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणा करु नये



Geetai - Adhyay 17

Chapter - XVII : Programme for the Seeker

Vinoba says that only when our life proceeds within bounds and in a accepted, disciplined way that the mind can be free. The Sun is free and independent. He is regular. It is in this regularity that the essence of his freedom lies. Hence in this chapter Shri Krishna sets down a programme of action.

The programme of Yagna (Regeneration), Dana (Sharing with society) & Tapa (purification of body and mind) is described as the debt to the nature. Nature is pure and it is polluted by human beings; hence we have to regenerate by yagna (Regeneration). Regeneration is to replenish loss, and to purify things. Society has supported a part of our existence; we have to repay the debt. Dana (Charity) for various social purposes is repaying the debt. Rays of Sun in summer destroy a plenty of morbid matter on the earth and purify saline water of the sea to provide sweet water through rain. This is tapa which is also yagna or regeneration by removing or destroying impurities.

In fact three orders of nature, society and the body are not distinct. Society is not outside creation and not so the body. The creative effort we make, charity we give and japas we perform, all these can be called Yagna in the comprehensive sense. There is no question of receiving any fruit because we have already received this. What we have taken, we must now return. Through yagna (regeneration), we maintain equilibrium in nature, through dana (charity) in society and tapa (purification) in the body. Again Yagna, Dana and Tapa are divided into 'Satvik', Rajasik and Tamasik. If there is expectation of fruit in Yagna it is Rajavik; if it is fruitless it is Tamasik. Disorderly actions become lifeless. Into such actions Tamas enters. Through it, no noble thing can be created. From it no fruit will grow. Even though there is no desire for fruit in
performing 'yagna', it ought to yield noble fruit.

In this way, fruitful action purifies our mind and heart, same classification applies to Dana (charity) and Tapa (purity). When it is fruitful, it leads to Beauty & Grace which is the result of purity.


गीताई - अध्याय १७


अर्जुन म्हणाला

जे शास्त्र-मार्ग सोडूनि श्रद्धा-पूर्वक पूजिती ।
त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी ।
ऐक सात्त्विक ती होय तशी राजस तामस ॥ २ ॥

जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे ।
श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसा चि तो ॥ ३ ॥

सत्त्व-स्थ पूजिती देव यक्ष-राक्षस राजस ।
प्रेते आणि भुते-खेते पूजिती लोक तामस ॥ ४ ॥

शास्त्रे निषेधिले घोर दंभे आचरिती तप ।
अभिमानास पेटूनि काम-रागे बळावले ॥ ५ ॥

देह-धातूंस शोषूनि मज आत्म्यास पीडिती ।
विवेक-हीन जे त्यांची निष्ठा ती जाण आसुरी ॥ ६ ॥

[५३]

आहारांत हि सर्वांच्या तीन भेद यथा-रुचि ।
तसे यज्ञी तपी दानी सांगतो भेद ऐक ते ॥ ७ ॥

सत्त्व प्रीति सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी ।
रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्त्विक ॥ ८ ॥

खारे रूक्ष कडू तीख अम्ल अतुष्ण दाहक ।
दुःख-शोक-द आहार रोग-वर्धक राजस ॥ ९ ॥

रस-हीन निवालेले शिळे दुर्गंध-युक्त जे ।
निषिद्ध आणि उष्टे हि तामस-प्रिय भोजन ॥ १० ॥

फलाभिलाष सोडूनि कर्तव्य चि म्हणूनिया ।
विधीने मन लावूनि होय तो यज्ञ सात्त्विक ॥ ११ ॥

फळाचे अनुसंधान राखुनी दंभ-पूर्वक ।
लोकांत यजिला जाय जाण तो यज्ञ राजस ॥ १२ ॥

नसे विधि नसे मंत्र अन्नोत्पत्ति नसे जिथे ।
नसे श्रद्धा नसे त्याग बोलिला यज्ञ तामस ॥ १३ ॥

गुरू-देवादिकी पूजा स्वच्छता वीर्य-संग्रह ।
अहिंसा ऋजुता अंगी देहाचे तप बोलिले ॥ १४ ॥

हितार्थ बोलणे सत्य प्रेमाने न खुपेलसे ।
स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले ॥ १५ ॥

प्रसन्न-वृत्ति सौम्यत्व आत्म-चिंतन संयम ।
भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले ॥ १६ ॥

तिहेरी तप ते सारे श्रद्धा उत्कट जोडुनी ।
समत्वे फळ सोडूनि घडले जाण सात्त्विक ॥ १७ ॥

सत्कारादिक इच्छूनि केले जे दंभ राखुनी ।
ते चंचळ इथे जाण तप राजस अस्थिर ॥ १८ ॥

दुराग्रहे चि जे होय अंतरात्म्यास पीडुनी ।
किंवा जे पर-घातार्थ जाण तामस ते तप ॥ १९ ॥

देशी काळी तसे पात्री उपकार न इच्छिता ।
धर्म-भावे चि जे देणे जाण ते दान सात्त्विक ॥ २० ॥

उपकार अपेक्षूनि अथवा फळ वांछुनी ।
क्लेश-पूर्वक जे देणे जाण ते दान राजस ॥ २१ ॥

करूनि भावना तुच्छ देशादिक न पाहता ।
अनादरे चि जे देणे जाण ते दान तामस ॥ २२ ॥

[५४]

ॐ-तत्-सत् ह्यापरी ब्रह्म तिहेरी स्मरले असे ।
त्यांतूनि निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक ॥ २३ ॥

म्हणूनि आधी ॐकार उच्चारूनि उपासक ।
यज्ञ-दान-तपे उक्त निरंतर अनुष्ठिती ॥ २४ ॥

तत्-कार-स्मरणे सर्व तोडूनि फल-वासना ।
नाना यज्ञ तपे दाने करिती मोक्ष लक्षुनी ॥ २५ ॥

सत्-कार-स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता ।
तशी सुंदरता कर्मी सत्-कारे बोलिली असे ॥ २६ ॥

यज्ञ-दान-तपे किंवा कर्मे जी त्यांस साधक ।
वागणे ह्यापरी त्यांत सत्-कार-फळ बोलिले ॥ २७ ॥

यज्ञ दाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली ।
बोलिली सर्व ती मिथ्या दोन्ही लोकांत निष्फळ ॥ २८ ॥

अध्याय सतरावा संपूर्ण

Sunday, April 3, 2011

Geetai - Adhyay 16

Chapter - XVI: The conflict between Divine and Demon.

Fifteenth chapter completes the purpose of Gita i.e., how to come out of human weaknesses, establish firm support by worshiping ashtadeva or Purushottama and that by offering ever changing ever new modes of worship. However, before the sun rises, light starts spreading, similarly a little before the seeker starts on the path the dawn of good qualities starts shining.

This chapter describes the qualities needed to be perfected in the life of accomplished seeker and also describes the darkness with which seeker has to fight before getting established. In essence it describes the conflict between the divine and the demonic qualities. Kurukshetra is both outside us and within us. When we observe it carefully, it is the battle raging within that we see assuming shape in the world without. To speak the truth, the battle is only within ourselves.

As there are good qualities on one side and bad qualities on the other, both the armies are well arranged. Commander of good qualities is 'abhaya' or fearlessness. Fearlessness has been given first place in a long list of twenty-six qualities. This is not an accident. In a atmosphere charged with fear, good qualities cannot grow. While in front fearlessness stands alert, humility guards the rear. This is an excellent arrangement. If we have first twenty five qualities mentioned in this chapter but no humility, 'ahamkar' or Ego principle will attack the army from the back and destroy it. In the absence of humility, there is no knowing when victory will turn into defeat, other qualities between fearlessness and humility are compassion, tenderness, forgiveness, serenity, patience, non- violence, loyalty etc.

On the other side, there is an army of ignorance, vanity, power and wealth. Under the effect of these negative qualities, one says that 'I am the only person fit to hold all the wealth of the world. The whole world should come under my control'. Desire, anger and greed are the sources from where negative qualities multiply. Way out is the control of the senses. This is the path laid down by 'Shashtras'. 'Shashtras' are made up of the experience of the saints gained through their efforts. Hence to overcome negativities, 'Self-control' as advised by 'Shashtras' is inevitable.

Waging this incessant war between divine and demonic qualities, there may be temporary defeats in the battle but in the end, war is won by the divine qualities. Hence doing good to the world is to show the man-kind the pure and beautiful path of virtue. Thus demonstrating victory of divine over the evil forces.

गीताई - अध्याय १६

श्री भगवान् म्हणाले

निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानी सुनिश्चय ।
यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥

अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।
अ-लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥ २ ॥

पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता ।
हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ति घेउनी ॥ ३ ॥

दंभ मीपण अज्ञान क्रोध दर्प कठोरता ।
लाभती गुण हे त्यास ज्याची संपत्ति आसुरी ॥ ४ ॥

सुटका करिते दैवी आसुरी बंध घालिते ।
भिऊ नको चि आलास दैवी संपत्ति जोडुनी ॥ ५ ॥

[५०]

भूत-सृष्टि जगी दोन दैवी आणिक आसुरी ।
विस्तारे वर्णिली दैवी आसुरी ऐक सांगतो ॥ ६ ॥

कृत्याकृत्य कसे काय नेणती आसुरी जन ।
न स्वच्छता न आचार जाणती ते न सत्य हि ॥ ७ ॥

म्हणती लटिके विश्व निराधार निरीश्वर ।
काम-मूलक हे सारे कोठले सह-कार्य ते ॥ ८ ॥

स्वीकारूनि अशी दृष्टि नष्टात्मे ज्ञान-हीन ते ।
जगताच्या क्षयासाठी निघाले रिपु हिंसक ॥ ९ ॥

काम दुर्भर सेवूनि मानी दांभिक माजले ।
दुराग्रह-बळे मूढ करिती पाप निश्चये ॥ १० ॥

अपार धरिती चिंता जी मेल्या हि सरे चि ना ।
गढले काम-भोगात जणू सर्वस्व मानुनी ॥ ११ ॥

आशेचे लेइले फांस काम-क्रोधांत तत्पर ।
भोगासाठी अधर्माने इच्छिती धन-संचय ॥ १२ ॥

हे आज लाभले आता तो जोडीन मनोरथ ।
हे आहे ते हि होईल माझे चि सगळे धन ॥ १३ ॥

मी मारिला चि तो शत्रु मारीन दुसरे हि जे ।
मी स्वामी आणि मी भोक्ता सुखी मी सिद्ध मी बळी ॥ १४ ॥

कुलीन मी चि संपन्न माझी जोडी कुठे असे ।
यज्ञ-दान-विलासी मी जल्पती अज्ञ मोहित ॥ १५ ॥

भ्रमले चित्त भेदूनि मोह-जालांत गुंतले ।
पडती विषयासक्त नरकांत अमंगळ ॥ १६ ॥

स्वयं-पूजित गर्विष्ठ धने माने मदांध ते ।
नावाचे करिती यज्ञ दंभाने अव्यवस्थित ॥ १७ ॥

अहंकारे बळे दर्पे काम-क्रोधे भरूनिया ।
माझा स्व-पर-देहांत करिती द्वेष मत्सरी ॥ १८ ॥

द्वेषी क्रूर असे पापी संसारी हीन जे जन ।
त्यांस मी टकितो नित्य तशा योनीत आसुरी ॥ १९ ॥

जोडूनि आसुरी योनि जन्मजन्मांतरी मग ।
माते न मिळता जाती उत्तरोत्तर खालती ॥ २० ॥

[५१]

काम क्रोध तसा लोभ आत्म-नाशास कारण ।
तीन ही नरक-द्वारे टाळावी चि म्हणूनिया ॥ २१ ॥

तमाची ही तिन्ही द्वारे टाळूनि सुटला मग ।
कल्याण-मार्ग सेवूनि पावे उत्तम तो गति ॥ २२ ॥

जो शास्त्र-मार्ग सोडूनि करितो स्वैर वर्तन ।
न सिद्धि लाभते त्यास न वा सुख न सद्-गति ॥ २३ ॥

म्हणूनि आदरी शास्त्र कार्याकार्य कळावया ।
शास्त्राचे वाक्य जाणूनि इथे तू कर्म आचरी ॥ २४ ॥

अध्याय सोळावा संपूर्ण

Friday, April 1, 2011

Geetai - Adhyay 15

Chapter - XV : Completeness of Vision.

In this chapter, all the ideas of the Gita find their fulfilment. Shri Krishna calls
this particular Chapter 'Shashtra '- a scripture because in this chapter science and philosophy of life that have been taught till now find completion. The function of Vedas is to awaken in man awareness of his own power to know everything, guide everything. This is called 'Parmartha : Because this is done in this chapter it has been called 'Yedasaara' the essence of the Veda

In the last chapter, Shri Krishna says that for Self-realisation, Bhakti is the ultimate tool; without it realisation is not possible. This chapter starts with the description of the world as mighty tree with huge branches nourished by three 'gunas'. This tree is to be cut with the axe of desirelessness and detachment. With Bhakti or devotion this effort becomes easy. This devotion is a blend of action, love, and knowledge. All difficulties on the path of realisation get converted to pleasure with the touch of this devotion.

Differentiated concept of Purushottama - the Supreme Self which Sri Krishna is, the individual self which is non-perishable and has to be realised and tools of Bhakti or devotion which are perishable are dealt with here. There is deep significance in the perishable nature of the tools. This is not the fault of the creation; it is its glory. Because of this, creation is ever new. Yesterday's flowers will not do for to-day's worship. New flowers are required and are available. In the same way new bodies will be provided every now and then to give freshness and life to the worship. Because the body is transient, it is beautiful. Because the instruments are ever new, the enthusiasm for worship grows; the habit of service develops. This is the essence of 'Bhakti ' or devotion.

This conceptual reality of Purushottama or Supreme Self to whom our ego can surrender so that purusha or self within us can awaken and ultimately be realised. The ever new, ever changing tool of worship is a necessity from the beginning to the end of the path. However worship does not mean only offering flowers and consecrated rice or Vermillion (Kumkum). This is there but it is to be supported by our day-to-day actions. To keep house-hold utensils clean and polished is a worship. To clean a lamp is also a worship. To whet the scythe and make it ready for reaping is a worship. To lubricate the rusty hinge of the door, this is worship too. All our actions from morning to evening - all are worship of the God. To a king of scriptures like Gita, a daily half our worship or puja yields no satisfaction. Its keen desire is that the whole of life should be filled with the Lord and be a form worship. And this worship is to surrender our 'I' at the feet of Supreme reality 'Purshottama ' so that we ultimately transform ourselves from perishable to imperishable 'Self- the 'Purusha'.


गीताई - अध्याय १५

श्री भगवान् म्हणाले

खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला ।
ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥

वरी हि शाखा फुटल्या तयास ।
ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ॥
खाली हि मूळे निघती नवीन ।
दृढावली कर्म-बळे नृ-लोकी ॥ २ ॥

ह्याचे तसे रूप दिसे न येथे ।
भासे न शेंडा बुडखा न खांदा ॥
घेऊनि वैराग्य अभंग शस्त्र ।
तोडूनिया हा दृढ-मूल वृक्ष ॥ ३ ॥

घ्यावा पुढे शोध तया पदाचा ।
जेथूनि मागे फिरणे नसे चि ॥
द्यावी बुडी त्या परमात्म-तत्त्वी ।
प्रवृत्ति जेथे स्पुरली अनादी ॥ ४ ॥

जो मान-मोहांस संग-दोष ।
जाळूनि निर्वासन आत्म-निष्ठ ॥
द्वंद्वे न घेती सुख-दुःख-मूळ ।
ते प्राज्ञ त्या नित्य पदी प्रविष्ट ॥ ५ ॥

न त्यास उजळी सूर्य कायसे अग्नि-चंद्र हे ।
जेथ गेला न परते माझे अंतिम धाम ते ॥ ६ ॥

[४६]

माझा चि अंश संसारी झाला जीव सनातन ।
पंचेंद्रिये मनोयुक्त प्रकृतींतूनि खेचितो ॥ ७ ॥

पुष्पादिकांतुनी वारा गंध खेचूनि घेतसे ।
तशी घेऊनि ही सर्व देह सोडी धरी प्रभु ॥ ८ ॥

श्रोत्र जिह्वा त्वचा चक्षु घ्राण आणिक ते मन ।
ह्या सर्वांस अधिष्ठूनि ते ते विषय सेवितो ॥ ९ ॥

सोडितो धरितो देह भोगितो गुण-युक्त हा ।
परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती ॥ १० ॥

योगी यत्न-बळे ह्यास पाहती हृदयी स्थित ।
चित्त-हीन अशुद्धात्मे प्रयत्ने हि न पाहती ॥ ११ ॥

[४७]

सूर्यात जळते तेज जे विश्व उजळीतसे ।
तसे चंद्रात अग्नीत जाण माझे चि तेज ते ॥ १२ ॥

आकर्षण-बळे भूते धरा-रूपे धरीतसे ।
वनस्पतींस मी सोम पोषितो भरिला रसे ॥ १३ ॥

मी वैश्वानर-रूपाने प्राणि-देहांत राहुनी ।
अन्ने ती पचवी चारी प्राणापानांस फुंकुनी ॥ १४ ॥

सर्वांतरी मी करितो निवास ।
देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा ॥
समग्र वेदांस हि मी चि वेद्य ।
वेद-ज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता ॥ १५ ॥

[४८]

लोकी पुरूष ते दोन क्षर आणिक अक्षर ।
क्षर सर्व चि ही भूते स्थिर अक्षर बोलिला ॥ १६ ॥

म्हणती परमात्मा तो तिजा पुरूष उत्तम ।
विश्व-पोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय ॥ १७ ॥

मी क्षरा-अक्षराहूनि वेगळा आणि उत्तम ।
वेद लोक म्हणे माते म्हणूनि पुरूषोत्तम ॥ १८ ॥

मोह सारूनि जो दूर जाणे मी पुरूषोत्तम ।
सर्व-ज्ञ तो सर्व-भावे सर्व-रूपी भजे मज ॥ १९ ॥

अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुज बोलिलो ।
हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृत-कृत्य चि ॥ २०॥

अध्याय पंधरावा संपूर्ण