Namaskar!!! Internetchya mahitijaalatil tumha aamha sarvani kuthetari kevhatari vachalela marathitala theva ekatra swaroopat punha tumachyasrakhya marathi premi lokansamor sadar karnyahca ek prayatna... Tumha sarvana awadel ashi aasha aahe, ani awadlyas punha ya ha!!
Monday, April 1, 2013
Monday, March 18, 2013
Tuesday, April 12, 2011
Sunday, March 20, 2011
Pune Poem
आहो आपण म्हणतो पुणे तिथ काय उणे…..बरोबर आहे ........
इथ जागेंचे भाव झालेत १००० X कित्तिक पट गुणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे
चौपाटी नसताना महाग झाले "Z Bridge" चे चणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे
भर-रस्त्यात इथ खून मारामारी दंगा जाहीरपणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे
इथ आईटी न वाढलय प्रमाण पार्टी, मग त्यात आले पिणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे
जागेचा प्रश्न,पाण्याचा प्रश्न,त्वरित कामपूर्ति साठी मग मलई खाणे
अणि आपल एकच पुणे तिथे काय उणे
मोकळी जागा विकायची म्हणाल की हजर पवार किंवा राणे
अणि आपल एकच पुणे तिथे काय उणे
एकमेकांच्या गरजा अफाट , त्याने झाले महाग खिशातले आणे
आणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे
इथ परप्रांतीय येउन मराठी माणसा-साठी मोठा खड्डा खणे
आणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे
अहो इथे कुणाल (पार्क) जवळचे व्यापारी विकतील मोहरी सांगुन धणे
आणि आपल काय तर पुणे तिथे काय उणे
मटका गांजा रेव-पार्टी यांना पोलिसच करतात मदत उघडपणे
आणि आपल काय तर पुणे तिथे काय उणे
इथ संस्कृति,शिक्षण आणि हुशारीचा चुराडा होतोय अगदी शांतपणे
अणि आपण अजुनही म्हणतोय पुणे तिथ काय उणे
पण काही असो इथल्या मातीत रंगते पंडित भीमसेन जोशी चे गाणे
अणि म्हणूनच की काय पुणे तिथे काय उणे
अत्यंत साध्या पण भेदक शब्दात आहे संदीप,सलील चे लिहिणे/गाणे
आणि म्हणूनच की काय पुणे तिथे काय उणे
काय सांगू मित्रांनो काहीही झाले तरी कवी प्रणव चे तर पक्के आहे इथेच रहाणे
शेवटी एक महत्वाचे........ पुणे तिथे खरच काय उणे !!!!!!!!!
कवी - प्रणव कुलकर्णी
(भिलवडी) जिल्हा-सांगली, महाराष्ट्र (सध्या मुक्काम पुणे)
इंटरनेटच्या माहिती महाजाळातून साभार....
Tuesday, March 15, 2011
Puneri Patya - 2
While talking about the Puneri Suchana... just think if this conquers the McDonald's... This is just an imagination and somebody's creative thinking.. this has nothing to offense Pune or McDonald's in anyway. Have a sporting spirit and enjoy...
'पुणेरी पाट्या' संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर....
1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)
3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.
5. टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
6. टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)
8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
11. विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.
12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)
16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
Thursday, March 10, 2011
Irsaal Pune
उदा .
शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बँकेत होता. त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश, समोरच आणखी एक सहकारी बँक होती . तिथलाच " चेक " घेऊन आपल्यामहाराष्ट्र बँकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक महाशय आले. नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी विचारलं, " कॅश कधी होईल ?"
अप्पा म्हणाला, " उद्या बँकेला सुट्टी आहे , परवा होईल ."
ग्राहाकानं विचारलं, " का पण ? समोरच्या बँकेचा तर चेक आहे. वेळ लागतोच कसा ?"
" अहो. उद्या सुट्टी आहे ..." अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता !
" पण समोरच तर बँक आहे ...." ग्राहक हेका सोडेना.
मग खट्याळ अप्पाला राहवेना . तो म्हणाला , " काका, काय आहे, केवळ रस्ता ओलांडल्यावरच्या बँकेचा चेक आहे म्हणुन लगेचच कॅश होतो असं नसतं. प्रोसिजर असते... असं बघा.."
" काही सांगु नका , प्रोसिजर - बिसिजर !"
" ऐका तर काका ... वैकुंठ, स्मशानभुमीच्या दारातच.. समजा तुम्ही गेलात म्हणजे मेलात तर दारातच गेले म्हणुन सरणावर चढवतील का ? आधी ससुनला नेतील... चेक करतील.. घरी नेतील.. हार घालतील.. मृत्यु पास काढतील.. मग...
वैकुंठकडे..!!"
" कळलं ..!" फणकारत ग्राहक महाशय निघुन गेले. अशा इरसाल प्रश्नोत्तरामुळे किंवा " न " विचारता केलेल्या - नोंदविलेल्या प्रक्रियेमुळेच पुण्याचा जिवंतपणा टिकुन आहे... पूणं कधी ' डल ' होत नाही..!
Tuesday, March 1, 2011
Puneri Instructions (Suchana)
पुणेकरांकडून पुणेकरांसाठी...
Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks.
.............. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये.
Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls.
.......... ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही.
Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first.
................ ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल ..
Please don't use the same elevator in case the same is being used by an associate along with client.
............... ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही.
Avoid speaking in regional languages within the office premises.
.............. गावच्या गप्पा घरी !
Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette butts only into ash pans provided for
............... ही जागा तुम* तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडीचा वापर करत असाल तर तिचे बूड विझवायला विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत. गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही.
When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office
............. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.
Please keep a check on the noise levels in the pantries
............ संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसं आहोत.
Saturday, February 26, 2011
Puneri Patya
Have a look at the Pune's Specialty in Sign boards.
लोक पुणेरी पाट्यांबद्दल जरा जास्तच बोलतात असे मला आधी वाटायचे. पण लग्न होवून पुण्यात गेल्यावर मलाही कळली ह्या पाट्यांमागची गंमत. कुठे अतिशयोक्ती तर कुठे शालजोडीतला फटका....
वाचून पहा तुम्हालाही आवडेल.....
देवळाबाहेरची नम्र सूचना :-


गिर्हाइकाला मारलेला फटका अर्थात शालजोडीतला हं..

इंग्रजी सूचनेचे मराठीकरण...
पार्सल काय मिळणार म्हणालात???
लिफ्टचा वापर करणाऱ्यांना संयमी सुचना
तुम्ही सवयी बदला अन्यथा आमच्या सवयींचे परिणाम भोगा...
पुणेकरांची कृतज्ञता व्यक्त ....
अनोखी जाहिरातबाजी :-
काय बंद राहणार आहे????
Wednesday, December 1, 2010
Puneri Fun
पुण्यात वावरताना सगळीकडे फार गमतीशीर पाट्या / बोर्ड वाचायला मिळतात। त्यातले हे काही नमुने।































