Showing posts with label Marathi Fun. Show all posts
Showing posts with label Marathi Fun. Show all posts

Sunday, February 28, 2021

Majeshir Anupras Alankar


मराठी भाषा सौंदर्याने नटलेली आहे. तिला अनेक अलंकार प्राप्त आहेत. त्यापैकी अनुप्रास हा एक शब्दालंकार. 
एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणामध्ये जेव्हा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्या चरणाला नादयुक्त सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार आहे असे म्हणतात. अनुप्रासात विशिष्ट वर्णांची पुनरावृत्ती केली जाते आणि ती साधण्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात.
आज आपण अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणे जाणून घेणार आहोत. 

कडकडा फोड नभ, उढव उडुमक्षिका

खडखडवी दिग्गजां, तुडव रविमालिका

मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका 

खवळवी चहुंकडे या समुद्रा

- कविवर्य भा. रा. तांबे 

या ओळींत ‘ड्’ ‌या वर्णाची पुनरावृत्ती आहे.


वंशी नादनटी तिला कटितटीं खोवोनी पोटीं पटीं।

 कक्षे वामपुटीं स्वशृंगनिकटीं वेताटिही गोमटी।।

 जेवी नीरतटीं तरू तळवटीं श्रीश्यामदेहीं उटी।

 दाटी व्योमघटीं सुरां सुखलुटी घेती जटी धूर्जटी।।

- कवी वामन पंडित 

या रचनेतील ‘ट्’ या वर्णाची पुनरावृत्ती आहे.


पुढे दिलेले समर्थ रामदासस्वामीकृत 'नृसिंह पंचक स्तोत्र' हे लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे. :

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें।।

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी। लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी। हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी। कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।

कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं। घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं। तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं। धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।

भरभरित भरारी भर्भराटे भरारी। थरथरित थरारी थर्रथराटे थरारी। तरतरित तरारी तर्तराटे तरारी। चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।

रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी। गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी। न धरित जन मानें लोक गेलें निदानें। हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।

- श्रीसमर्थ रामदासस्वामी



अशीच एक बा. भ. बोरकरांची कविता. खाली दिलेली ह्या कवितेतील काही चरणांमधे छान अनुप्रास अलंकार साधला गेला आहे. 


            गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

            शीतलतनु चपलचरण अनिल गण निघाले

                     दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरि 

                    पद्मरागवृष्टि  होय माड भव्य न्हाले 

                    गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

            धुंद सजल हसित दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा 

            तृप्तीचे धन घनांत बघुनि मन निवालें 

            गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

                    उतट बघुनि हरिकरुणा, हरित धरा हो गहना 

                    मंदाकिनी वरुनि धवल विहगवृंद डोले 

                    गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

            रजतनील, ताम्रनील स्थिर पल जल, पल सलील 

            हिरव्या तटिं नावांचा कृष्ण मेळ खेळे 

            गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

                    मीन चमकुनी उसळें, जलवलयीं रव मिसळें 

                    नवथर रसरंग गहन करिति नयन ओले 

                    गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

            धूसर हो क्षितिज त्वरित, ढोर पथी अचल चकित 

            तृण विसरुनि जवळील ते खिळवि गगनीं डोळे 

            गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले 

                    टप टप टप पडती थेंब मनी वनिंचे विझती डोंब 

                    वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले 

                    गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले  


अनुप्रास अलंकाराचा एक मोठा परिच्छेद मध्यंतरी वाचनात आला.  प्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन परिच्छेद लिहिला आहे. हा नुसता परिच्छेद नाही, तर एक छोटीशी पूर्ण कथा आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल? मराठी भाषेचे सामर्थ्य खालील परिच्छेदात पहा. 


"केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले. 
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’ करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. 
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. 
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता’! 

कथासार - क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन, कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे... !!!"

Wednesday, January 14, 2015

मराठ्यांचे योगदान



मित्रांनो आजच्याच दिवशी, १४ जानेवारी रोजी १७६१ साली पानिपतची लढाई झाली. लाख मराठी बांगड्या फुटल्या, दोन मोती गळाले, २७ मोहरा लुप्त झाले, आणि चिल्लरखुर्द्याचा हिशोब नाही अशाप्रकारे याचा उल्लेख केला जातो.

पण, इतिहास अभ्यासक श्री पांडुरंग बलकवडे यांनी पानिपत मोहिमेचे एक इतिहासजमा झालेले कागद शोधून त्यातला एक अकथित पैलू जगासमोर आणला आहे.

मराठ्यांनी भारताच्या रक्षणासाठी ९२ लक्ष रुपये खर्च केले. तेव्हाचे ९२ लाख म्हणजे आजचे ७०० कोटी!!!
पानिपत मोहिमेच्या वेळी झालेला खर्च आणि त्याच्या तालेबंद हिशोबाचे हे कागद असून, यातून मराठ्यांच्या बाबतीत बऱ्याच नविन गोष्टी जगासमोर आल्या आहेत.

उदा:
-पानिपत येथील अत्यंत हलाखीच्या अस्वस्थेत सुद्धा भाऊंनी देवळे आणि दर्गांची वर्षासने तशीच चालू राहू दिली.
-पानिपत येथे तोफा-बंदुकांसाठी दारू बनवण्याकरिता विकत घेतलेले जिन्नस आणि त्यांच्या किमती.
-दिल्लीची चांदीची छत गाळून किती रुपये मिळाले, त्याचं हिशेब.
-शेट्यांकडून घेतलेले कर्ज आणि त्यांची परतफेड.

हे पूर्ण दस्ताऐवज तुम्हाला Solstice at Panipat या पुस्तकात वाचावयास भेटेल. तसेच, पहिल्या सात ओळींचे लिप्यंतर येणेप्रमाणे:

तालेबंद जमाखर्च बकी पोते परभारे स्वारी
राजश्री भाऊ सु|| इहीदे सितैन मया
वं अलफे ई|| छ १ साबन सन सितैन तगा
ईत छ ६ ज||खर सन मजकुर मुकाम पानपत
मुदत माहे १००५ येकुण आकार अज
मासे स्मरणाने जमा -- रुये
७७,६३,२३९ |||= ई|| छ १ साबन त|| छ ३ जौवल पर्यंत येकंदर

टीप:
सु|| इहीदे सितैन मया वं अलफे = इसवी १७६१.
छ = तारीख दर्शवण्यासाठी.
साबन = शाबान, हिजरी ८वा महिना.
ज||खर = जमादिलाखर, ६वा महिना.
जौवल = जमादिलावल, ५वा महिना.
रुये = रुपये

साभार: श्री पांडुरंगजी बलकवडे आणि श्री उदय कुलकर्णी (लेखक: Solstice at Panipat).

Thursday, April 10, 2014

savarkaranche kisse

When Savarkar was studying law at the University College of London, there was a professor, whose last name was Peters, who felt animosity for Savarkar, and because never lowered his head towards him, their "arguments" were very common.
One day, Mr. Peters was having lunch at the dining room of the University and Savarkar came along with his tray and sat next to the professor. The professor, in his arrogance, said, "Mr Savarkar: you do not understand... a pig and a bird do not sit together to eat ", to which Savarkar replies, "You do not worry professor, I'll fly away ", and he went and sat at another table.
Mr. Peters, green of rage, decides to take revenge on the next test, but Savarkar responds brilliantly to all questions. Then, Mr. Peters asked him the following question, "Mr Savarkar, if you are walking down the street and find a package, and within it there is a bag of wisdom and another bag with a lot of money; which one will you take?"
Without hesitating, Savarkar responded, "the one with the money, of course".
Mr. Peters, smiling, said, "I, in your place, would have taken the wisdom,don't you think?"
"Each one take what one doesn't have", responded Savarkar indifferently.
Mr. Peters, already hysteric, writes on the exam sheet the word "idiot" and gives it to Savarkar. Savarkar takes the exam sheet and sits down. A few minutes later, Savarkar goes to the professor and says, "Mr. Peters, you signed the sheet, but you did not give me the grade."
-----------------------
Salute to the great son of our motherland VD Savarkar.
PRABODHAK

Wednesday, August 28, 2013

महाराष्ट्रीयन मुलांचे खेळ - 1

आखाडी :-

कोकणातल्या दशावतारी खेळासारखा एक प्रकर. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात याचा प्रचार आहे. शेतीचा हंगाम संपल्यावर आखाडीला सुरुवात होते आणि पुन्हा पावसाळा सुरु होईपर्यंत हे खेळ चालतात. यात सगळ्या जातीचे लोक भाग घेतात. ग्रामीण लोक आखाडीत निरनिराळ्या देवांची सोंगे आणून नाचतात . एखाद्या घराण्यात काही सोंगे वंशपरंपरागत चालू अस्तात. आखाडीतले सोंग मिळणे हा मान समजला जातो . या खेळाला बोहाडा असेही नाव आहे. बोहाडा नाशिक, धुळे भागात खेळला जातो .

ओका बोका :-

लहान मुलांचा एक खेळ. यात दहा-पाच मुले जमिनीवर बसून आपल्या दोन्ही हातांची दाही बोटे जमिनीवर उभी टेकवतात. मग त्या समुदायातला एक मुलगा प्रत्येकाच्या हाताला स्पर्श करीत पुढील गाणे म्हणतो

ओका बोका तीन तडोका ।
लडवा लाठी चंदन काठी ।।
बागमे बगडवा डोले ।
सावनमे करइली फुले ।।
ओ करइली के नांव का ?
इजइल बिजइल,
पानवा फुलवा ढोढिया पचक ।।

हे त्याचे गाणे ठेक्यात चालते. प्रत्येक ठेक्याला तो मुलांच्या एकेका हातावर बोट ठेवीत जातो आणि पाचक शब्द येताच त्या मुलाच्या हातावर मुठ मारून तो हात जमिनी सरपट करतो.


खांब-खांबोळ्या :-

मुलांचा एक खेळ. पुष्कळ खांब असलेल्या जागी हा खेळ खेलतात. या खेळत जितके खांब असतील त्यापेक्षा एक गाडी जास्त घेतात. मग मुले खांब पकडायला धावतात. ज्याला खांब मिळत नाही, त्याच्यावर राज्य येते. मग इतर मुले पळून खांबांची अदलाबदल करीत रह्तात. तसे ते करीत असताना राज्य घेतलेला मुलगा शिताफी करून एखाद्याचा खांब पकडतो. मग, ज्याचा खांब धरला असेल त्याच्यावर राज्य येते.राज्य आलेला मुलगा खांबाला उद्देशून 'खांब-खांबोळ्या, दे रे आंबोळ्या' असे म्हणत राहतो व खेळ सुरु राहतो.


Monday, August 26, 2013

महाराष्ट्रीयन मुलींचे खेळ - 1

कोंबडा :-

कोंबड्याचा खेळ म्हणून मुली एक खेळ खेळतात. यात मुली डाव्या पायाच्या गुडघ्यावर उजवा पाय चढवून उकिडव्या बसतात. दोन्ही तळात जुळवून गुडघ्यावर ठेवतात व कोंबड्यासारख्या उड्या मारता मारता गाणे म्हणतात.
सईबाईचा कोंबडा आला माझ्या दरी,
घालीन चारा, पाजीन पाणी,
हाकालीन वारा बिलमोगरा,
बिलाचे काटे सागर गोटे सासरच्या वाटे कुचकुच काटे,
माहेरच्या वाटे हरिख दाटे.


किकीचे पान :-

महाराष्ट्रातील लहान मुलींचा हा एक खेळ आहे. यात खेळणाऱ्या मुली एकमेकींपासून समान अंतरावर उभ्या रह्तात. नंतर सर्वजणी टाळी वाजवून दोन्ही हातांच्या टिचा कानाच्या बाजूंना लाव्तत. तसे करून त्या पाच किंवा सहा हात पुढे जातात व पुन्हा तितक्याच मागे येतात. हा खेळ खेळताना मुली जे गाणे म्हणतात ते असे-

किकीचे पान बाई की की
सागर मासा सू सू
आल्या ग बाई गुजरणी
कापुस घ्या ग पिंजरणी

केतकीचे पान बाई की की असाही एक दुसऱ्या प्रकारचा खेळ आहे. यात दोन मुली समोरासमोर एक हात डोक्यावर व दुसरा हात कमरेवर ठेवून उभ्या रह्तात. नंतर गिरकी घेवून आपल्या जागांची अदलाबदल करतात. एक बसते व दुसरी उभी रहते. त्या वेळी त्या 'केतकीचे पान बाई की की' हे गाणे म्हणतात.

आंधळी कोशिंबीर :-

लहान  मुला-मुलींचा हा एक खेळ आहे. फार पूर्वी हा खेळ केवळ मुलीच खेळत. आता मुले, मुली एकत्र किंवा वेगळे ही हा खेळ खेळतात.
यात कमीत कमी दहा खेळाडूंची आवश्यकता असते. खेळाडू प्रथम चकतात व एकावर राज्य देतत. राज्य आलेल्या मुलाचे डोळे बांधतात आणि इतर मुले त्याच्या अवतीभोवती पळतात. डोळे बांधून आंधळा झालेला मुलगा ज्याला शिवेल त्याच्यावर राज्य येते. मग त्याचे डोळे बांधून त्याला आंधळा केले जते. पहिल्या डोळे बांधलेल्या मुलाचे डोळे सोडले जातात व तो मुलगा बाकीच्या खेळाडूंप्रमाणे या नव्या आंधळ्या मुलाच्या भोवती पळू लागतो. पळताना कुणालाही मैदानाबाहेर जाता येत नाही, असा नियम असतो.

आपडी थापडी :-

महाराष्ट्रातील लहान मुलींचा हा एक खेळ आहे. मुले एकमेकिंच्या मांडीला मांडी लावून वाटोळी बसतात  आणि हातावर हात उलथे पालथे करीत व डावी उजवीकडे झुलत पुढील गाणे म्हणतात -

आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू
तेलंगीच एकच पान
दोन्ही हाती धरले कान / धर ग बिब्बे हाच कान .

शेवटची ओळ म्हणताच मुले एकदम बाजूच्या मुलीचा कान धरून खूप हसतात. दुसऱ्या कोणी आपला कान पकडू नये म्हणून मुले खूप खबरदारी घेतात .

Tuesday, April 5, 2011

आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...

शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची आय पी एल टीम आली. आता २०११ च्या खेळात ही टीम सहभागी सुद्धा होणार आहे पुणे वोरीअर्स नावाने.
एक भविष्यातले पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही पुणेरी पाट्या लागोलाग तयार करुन ठेवत आहोत पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.

ह्या पाट्या आहेत त्या मैदानावरच्या
. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.
. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
. मैदानात विकत मिळणार्या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.
१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !
११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह !
१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.
१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.
१४.
सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.
१५.
सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे 'फोटु काढुन मिळणार नाहीत' किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.
१६.
सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.
१७.
हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नये. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.
१८.
पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.
१९.
परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?
२०.
राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.
२१.
वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.

ह्या पाट्या आहेत त्या आयपीएल पुणे संघाच्या कार्यालयातल्या
. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी १-३ असा विश्रांतीचा वेळ राखुन ठेवावा लागेल.
. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थीत रात्री ८ वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसर्या दिवशी खेळता येईल.
. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.
४.
सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की "आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) " ही आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन "मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र" ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही. त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेच त्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.
५.
हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडुंची चौकशी अथवा मागणी करु नये.
६.
क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.
७.
देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्त प्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.
८.
आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.
९.
आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.
१०.
आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही
११.
आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स, ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणा करु नये