सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे हे एक गमतीदार बालगीत.
मी जर झालो एक दिवस राजा
सारेजण हुकुम मानतील माझा
सर्वांना माझा एवढा वाटेल धाक
ऐकतील निमूट मुठीत धरून नाक!
आईला म्हणेन, जेवण नको वाढू
उघड सारे दबे, काढ चिवडा-लाडू!
ताईला म्हणेन, आरशात नको पाहू
उटसूट सिनेमातली गाणी नको गाऊ!
दादाला म्हणेन, घोळवीत शीळ
मिशीला उगीच भारू नको पीळ!
बाबांना म्हणेन, बाजारात जाउन
माझ्यासाठी छानसा स्कूटर या घेउन!
मुलांना म्हणेन तुम्ही पतंग उडवा
गुरूजींना म्हणेन, तुम्ही गणित सोडवा!
मी जर झालो एक दिवस राजा
खरे सांग बारे, किती येइल मजा!
- शांता शेळके
Binaca Geet Mala - 1953 Finals!!!
10 years ago