ई.
सन १७९० च्या आसपास मल्हारी नावाचा दक्षिणेतील एक मराठा शाहीर मुंबईत आला.
मुंबईचे वैभव पाहून याच्या कवीमनावर फार परिणाम झाला, आणि याने दख्खनी
बोलीत चार कडव्यांची एक सुंदर लावणी तयार केली.
या लावणीचं कवन खुद्द गवर्नर साहेबांसमोर करण्यात आलं. मुंबईचं इतकं सुंदर आणि विस्तृत वर्णन ऐकून त्यांनी मल्हारी शाहीरास ३०० रु बक्षीस म्हणून दिले. पण देताना शाहीरास परत आपल्या गावी जाण्यास सांगितले. हेतू असा होता की हे विस्तृत वर्णन इंग्रजांच्या शत्रूंच्या, म्हणजेच फ्रेंच आणि मराठे यांच्या, कानी पडू नये.
आपल्यासाठी यां लावणीतील आरमाराच्या वर्णनाचा उतारा इथे देत आहे.
बावडीकुं बंब बांधकर पाणी भेजवता जहाजोमें ||
हजारो आरमार खडी देखत तमासा बंदरमें ||
कांटेसे तोफा चढाकर उतार लेते किल्लेमें ||
पहाडसारिखे जहाज बनाते कारखाना गोदीमें ||
सो हत्तीसें काम ना हुवे सो एक आदमीने करना ||
उसमेंसें जहाज निकल कर बडे पानीमे ले जाना ||२||
मुंबई शहर गुलजार मुंबादेवी है ठिकाणा ||
इंग्रजकी साहेबी चलता उप्पर किल्ला नमुना ||
अजब तऱ्होंका टापु मुंबई जरा है दखनमें ||
शिव शंकर पैगंबर देव रहेते है ते बसतीमें ||
- मुंबईचा पोवाडा. शाहीर मल्हारी. लेखन साल अंदाजे ई. सन १७९०

No comments:
Post a Comment