आजच्या मराठी भाषादिनी वाचलेली ही कविता.. मराठी भाषेचे लावण्य, वैभव ह्यात खूप सुंदरतेने वर्णिले आहे.
कवी - अज्ञात
अनुस्वारी शुभकुंकुम ते
भाळी सौदामिनी |
प्रश्नचिन्ही डुलती झुमके
सुंदर तव कानी |
नाकावरती स्वल्पविरामी
शोभे तव नथनी |
काना-काना गुंफुनी माला
खुलवी तुज मानिनी |
वेलांटीचा पदर शोभे
तुझीया माथ्याला |
मात्रांचा मग सूवर्णचाफा
वेणीवर माळला |
उद्गाराचा तो गे छल्ला
लटके कमरेला |
अवतरणांच्या बटा
मनोहर भावती चेहर्याला |
उकाराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरी |
पूर्णविरामी तिलोत्तम तो
शोभे गालावरी ॥
भाळी सौदामिनी |
प्रश्नचिन्ही डुलती झुमके
सुंदर तव कानी |
नाकावरती स्वल्पविरामी
शोभे तव नथनी |
काना-काना गुंफुनी माला
खुलवी तुज मानिनी |
वेलांटीचा पदर शोभे
तुझीया माथ्याला |
मात्रांचा मग सूवर्णचाफा
वेणीवर माळला |
उद्गाराचा तो गे छल्ला
लटके कमरेला |
अवतरणांच्या बटा
मनोहर भावती चेहर्याला |
उकाराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरी |
पूर्णविरामी तिलोत्तम तो
शोभे गालावरी ॥
No comments:
Post a Comment