Showing posts with label Marathi Natak. Show all posts
Showing posts with label Marathi Natak. Show all posts

Monday, January 31, 2011

Kusum Manohar Lele

Marathi Natak - Kusum Manohar Lele
Director - Vinay Apte
Writer - Ashok Samel
Starring - Shubhangi Joshi, Bal Karve, Manda Desai, Sukanya Kulkarni, Girish Oak, Sanjay Mone.

Kusum Manohar Lele is based on a true story that happened in Pune in 1986. It takes a look at the dilemma of a woman whose husband claims their child is only his, not hers. Women have always been victims of a male dominated society. Exploited in every manner, this hard-hitting reality cannot be ignored. A story of love, deceit, betrayal and more, but told with just enough humor and humanity that it will surely move you. It takes a look at the dilemma of Sujata who weds a married man, Manohar Lele. Manohar’s first wife Kusum is childless and just for the sake of their own biological child; they plot a counterfeit marriage of Manohar and Sujata. When Sujata gives birth to her child, Manohar divulges his plan, seizes her child and tosses her out of his life. Sujata is totally crestfallen. Will Sujata get back her child? Will anyone help her?

कुसुम मनोहर लेले हे १९८६ मधे पुण्यात घडलेल्या सत्य कथेवर आधारलेले नाटक. पुरुषी अत्याचारावर नेहमी बळी जाणाऱ्या स्त्रिया कुणी कितीही नाकारले तरी हे सत्य अबाधित आहे. प्रेम, लबाडी, फसवणूक आणि एका स्त्रीच्या संपूर्ण आयुष्याची बरबादी या नाटकात मांडली आहे. पुरेसा विनोद जो कथेला भारी होणार नाही आणि औषधाधापुरती येणारी माणुसकी तुम्हाला नक्कीच अंतर्बाह्य ढवळून टाकेल. सुजाता ह्या पुण्यात राहणाऱ्या नोकरी करणाऱ्या सुशिक्षित मुलीची ही कथा. सुजाता बळी पडते मनोहर लेले ह्या पेशाने इन्जीनीअर असलेल्या आणि लाघवी बोलणाऱ्या परंतु विवाहित माणसाला. मनोहरची पहिली पत्नी कुसुम ही कधीही आई न होवू शकणारी स्त्री, पण मनोहरचे तिच्यावर आणि तिचेही मनोहरवर प्रचंड प्रेम. या प्रेमासाठी आणि स्वतःच्या रक्ताचे मुल हवे म्हणून हे पती पत्नी डाव रचतात तो मनोहर सुजाताच्या फसव्या लग्नाचा. आपला डाव यशस्वी व्हावा म्हणून सर्वतोपरी खबरदारी हे जोडपे घेते. कागदोपत्री कुठेही नोंद सुजाता मनोहरच्या लग्नाची आणि त्यांच्या बाळाची केली जात नाही. बाळ तीन महिन्याचे झाल्यावर मनोहर त्याचा डाव सुजाताला निर्लज्जपणे सांगतो, तिचे बाळ हिसकावून घेतो आणि तिला आपल्या आयुष्यातून बेदखल करतो. सुजाता पूर्णपणे कोसळते. सुजाताला हे बाळ परत मिळेल? कोणी तरी येईल का तिच्या मदतीला? पहा एक गाजलेले नाटक कुसुम मनोहर लेले.





आजही ही खरीखुरी पुण्याची सुजाता वर्ध्याच्या आश्रमात आहे. तिचे बाळ चांगले मोठे झालेले आहे. मोठे म्हणजे २४/२५ वर्षांचा घोडाच म्हणा ना.. त्याचे आई वडील आजही समाजात सन्मानाने मिरवत आहेत. तो मुलगा आता सुजाण नागरिक आहे पण त्याची ही सुजाणता कधीतरी जागी होईल का? त्याला त्याचा भूतकाळ त्याच्या आई वडीलांनी सांगितलेला नसावा.. तोंड तरी हवे ना सांगायला... hmmmm त्यांचा आत्मा कधीचा तळमळला नसेल त्या आईला दुसऱ्याचे मातृत्व हिरावल्याची जाणीव कधीच झाली नसेल, इतके ते आंधळे झाले होते अपत्य प्राप्तीसाठी.. त्या अपत्याला पाहून आपण याचे फसवणूक करतो आहोत असे त्या जोडप्याच्या मनात कधीही आले नसेल???? एका ना धड हजारो प्रश्न मनात येतात. ते विवाह मंडळ चालवणारे जोडपे तरी भेटले का पुन्हा कधी सुजाताला? त्यांना माहीत आहे का हे लेले कुटुंब कुठे आहे ते?? ते सांगू शकले का किंवा सांगू शकतील का त्या मुलाला की तुझी आई आजही भ्रमिष्टावस्थेत तुझ्या साठी झुरते आहे????
सारेच प्रश्न अनुत्तरीत....एक वेडा विचार मनात येतो - देव करो आणि त्या मुलाला सत्य समजो, त्याने ह्या आई वडीलांनाही तसेच लाथ मारून बेदखल करावे आणि आपल्या आईला परत आणावे.... होईल का हो असे?????

Thursday, January 20, 2011

Purush

Marathi Natak - Purush
Director - Jayant Savarkar, Writer - Jaywant Dalvi,
Starring - Chandrakant Gokhale, Mohan Joshi, Usha Nadkarni, Manjusha Godse, Abhay Godse, Sanyogita Bhave, Santosh Gaavkar.

The play PURUSH (The Male) starts in a middle class maharashtrian brahmin home (Mumbai). The old man is a school master, retired , who talks a lot of the greatness of the likes of Mahatma Gandhi, etc. His drawing room has huge pictures of martyrs. He is a simple soul, who falls for all the sweet talk and simple acts of garlanding him.
Daughter Ambika wants to eradicate the caste system and believes in equality for which she strives through morchas (demonstrations), etc. To prove her point she wants to marry a lowcaste who is busy fighting for the rights of harijans and who frequents Ambika’s home and takes her help in furthering his cause.
The play takes a serious turn when a politician comes into their life with all the sweetness of the wolf in Little Red Riding Hood. He beats up her father and rapes her, when she goes to his place for the help promised by him for her school.
Then starts her trauma, ridicule in court, loss confidence in her school and society. Her mother dies of shock and shame, unable to bear her daughter’s plight. Ambika’s father is a shattered man who has lost faith in high ideals and the high and mighty politicians. Even the man she loved lets her down, saying he cannot fight for the injustice done to her, since he is a harijan (A low caste, untouchable). Now, it is time Ambika took her life and matters in her own hands... She then plans her moves and HOW ?! See the play for its shocking turn of events.

मराठी नाटक - पुरुष
डायरेक्टर - जयंत सावरकर लेखक - जयवंत दळवी
कलाकार - चंद्रकांत गोखले, मोहन जोशी, उषा नाडकर्णी, मंजुषा गोडसे, अभय गोडसे, संयोगिता भावे, संतोष गावकर.

पुरुष ही कथा आहे एका स्त्रीच्या विजयाची पुरुषांच्या अंधभक्तीवर. अंबिका ह्या शालेय शिक्षिकेवर समाजातील प्रबळ आणि वजनदार व्यक्तिमत्त्व स्थानिक राजकारणी गुलाबराव जाधव हे बलात्कार करतात. ह्या भयानक कृत्याचा जाब विचारण्यासाठी अंबिका उभी राहते. ह्या एका घटनेने तिचे अख्खे कुटुंब ढवळून निघते. तिच्या गुन्हेगारावर दाखल केलेली केस ती कोर्टात हरते, तिची आई धक्क्याने आत्महत्या करते आणि तिचे बाबा नामुष्कीने मोडकळीस येतात. अंबिका बदला घेवू शकेल का? पुढे काय होते पहा 'पुरुष'.

पुरुष - भाग १


पुरुष - भाग


पुरुष - भाग

Sunday, January 16, 2011

Kachecha Chandra

Marathi Natak - Kachecha Chandra
Director - Jayant Sawarkar, Writer - Suresh Khare

Starring - Sharad Ponkshe, Harshada Khanwilkar, Jayant Sawarkar, Sudhakar Bhanushe, Anil Kulkarni, Ramakant Mirlekar, Milind Fatak, Subhash Ganguly.

Kachecha Chandra is a story about an ambitious girl, Shakuntala, who wishes to complete her education and then find a suitable job for herself. She has also reached an age where her parents want her to get married and settle down.

Shakuntala's life changes when she gets an irresistible offer to act in a movie as a lead heroine. She accepts the offer and within few years she becomes a well-known face in the film industry.

Her step brother, Baburao, manages her career. He is so possessive about her that he takes all the decisions on behalf of her, right from selecting the film to finalizing the hero.

Will she able to handle the uncertainties in her life? Can she escape from clutches of Baburao and start a new fresh life for herself? Watch 'Kachecha Chandra'.



मराठी नाटक - काचेचा चंद्र
डायरेक्टर - जयंत सावरकर लेखक - सुरेश खरे
कलाकार - शरद पोंक्षे, हर्षदा खानविलकर, जयंत सावरकर, सुधाकर भानुशे, अनिल कुलकर्णी, रमाकांत मिर्लेकर, मिलिंद फाटक, सुभाष गांगुली.
काचेचा चंद्र ही कथा आहे शकुंतला ह्या लग्नाच्या वयाच्या एका सरळ साध्या मुलीची. विश्वनाथ कर्वे हे लेखक महाशय तिला लग्नाची मागणी घालतात पण नेमकी त्याच वेळेला तिला एका चित्रपटासाठी प्रमुख भूमिकाही सांगून येते. थोड्या कालावधीतच शकुंतला ही चित्रपट सृष्टीतली एक प्रसिद्ध तारका बनते. तिचा सावत्र भाऊ बाबुराव हा एक कावेबाज माणूस. तो तिच्या गरीब स्वभावाचा गैरफायदा घेतो आणि तिला पूर्णतः स्वतःच्या मुठीत ठेवतो आर्थिक आणि शारीरिक बाबीनेही. बाबुराव इतका झपाटलेला असतो शकुंतलेमागे की तिच्या प्रेमात असणाऱ्या दोन सुयोग्य वरांनाही तो यमसदन दाखवतो. बाबुरावच्या तावडीतून शकुंतलेची सुटका होईल का? तिला तिचे आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करता येईल का? जाणून घेण्यासाठी अवश्य पहा 'काचेचा चंद्र'.

काचेचा चंद्र - भाग १




काचेचा चंद्र - भाग

Thursday, January 13, 2011

Toh Mee Navhech..

Hello Friends,

Sad News - Renowned Theatre Actor Prabhakar Panshikar is No More....


Born on March 14, 1931, Panshikar, in a career spanning over 50 tireless years, acted in over 8,000 shows of plays in Marathi, Gujarati and Kannada languages. Few of the Many famous plays which he has acted are 'Bhatala Dili Osari', To Mee Navech, Ithe Oshalla Mrutyu, Ashrunchi Jhali Phule, 'Thank You Mr Glad' and 'Jevha Gavtala Bhale Phuttat'. Some of the plays produced by him include 'Sangeet Madanachi Manjiri', 'Sangeet Suvarna Tula', 'Katyar Kaljat Ghusli', 'Andhar Maza Sobati', 'Kimayagar' and 'Putrakameshti'.

In 1962, Panshikar got the lead role in a new play called 'To Mee Navech'. The character of 'Lakhoba Lokhande' gave him immense fame and recognition among critics. He was known latter by the same name in Marathi Play industry. The play went on to earn tremendous acclaim for the next four decades. 'To Mee Navech' is probably the first play in the world where the same actor had to do five completely different roles, not to merely add to novelty value or as a stunt, but because the story demanded it. The play used 'a revolving stage' for the first time in Marathi theatre. At the age of 31 Panshikar started playing lakhoba Lokhande and it went on till he was 72 even though he had a bypass surgery.

He was honored by many awards, also 'Maharashtra Bhushan' puraskaar and
First Jeevan Gaurav Puraskar of State Govt., Maharashtra, later this award was named Prabhakar Panshikar award.

Whole Marathi Rangabhumi is going to miss this great actor, he has created a void and that corner will always remain empty.
We will miss you Sir... and as you have wished may god send you back for all of us again.....


Aai Shivay Ghar Nahi

Marathi Natak - Aai Shivay Ghar Nahi
Director - Pradeep Kabre Writer - S.V.Dalvi

Starring - Vilas Raj, Kshama Raj, Neel Raj, Aakanksha Vanmali, Mandar Sawant, Abhijeet Raut, Priya Kajrolkar.
Synopsis - Vicky Deshpande is a misguided youth with a generous heart. He is the only son of an extremely rich and uncaring father Mr.Avirash Deshpande and a social activist mother, Ashwini Deshpande. Mr. and Mrs. Deshpande are too busy to pay any attention towards Vicky and an unhappy Vicky turns towards drugs for solace and is hooked on to it. Vickys parents learn about his addiction and request Swapna to look after his him. Swapna is Ashwinis younger sister. She dons the role of a mother, a perfect one, but cant help Vicky quit the drugs. A frustrated Swapna consumes drugs to know what pleasure Vicky derives from it. Swapna however gradually falls for the drugs and succumbs to death. Vicky blames himself for Swapnas death.


आई शिवाय घर नाही
डायरेक्टर - प्रदीप कबरे लेखक - एस. व्ही. दळवी
कलाकार - विलास राज, क्षमा राज, नील राज, आकांक्षा वनमाळी, मंदार सावंत, अभिजीत राऊत, प्रिया काजरोळकर.
विकी देशपांडे हा एक भरकटलेला तरुण. एका अत्यंत श्रीमंत आणि बेफिकीर बापाचा (अरविंद देशपांडे) आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून वावरणाऱ्या आईचा (अश्विनी देशपांडे) हा मुलगा. देशपांडे जोडप्याला विकीकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो परिणामास्तव विकी हा ड्रगच्या जाळ्यात ओढला जातो आणि त्यात गुरफटतो सुद्धा. विकीच्या पालकांना विकीच्या व्यसनाबद्दल समजते आणि ते स्वप्ना ह्या त्यांच्या लहान मुलीला विकीची काळजी घ्यायला सांगतात. ती आईची भूमिका उत्तमरीतीने पार पाडते पण विकीला व्यसनातून सोडवू शकत नाही. त्यामुळे वैतागलेली स्वप्ना स्वतः ड्रग घेवून बघते. तिला पाहायचे असते कि यातून विकीला असा कोणता आनंद मिळतो. कालांतराने स्वप्ना देखील व्यसनाधीन होते आणि त्यातच तिचा मृत्यू होतो. विकी स्वप्नाच्या मृत्यूसाठी स्वतःला दोषी समजतो. पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी अवश्य पहा आईशिवाय घर नाही.


आईशिवाय घर नाही - भाग १





आईशिवाय
घर नाही - भाग २

Sunday, December 12, 2010

Hasnyasathi Janm Aapula - Part 1

हसण्यासाठी जन्म आपुला या मालिकेतील आणखी एक विनोदी नाटक.
तसदीबद्दल क्षमा असावी
कथा - जयवंत दळवी
कलाकार - राजा गोसावी, विजय कदम, अलका कानडे.

ही कथा आहे मि. रांगणेकरांची. रांगणेकर कुठल्या तरी मानसिक आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी मामा हा शब्द ऐकला कि त्यांना त्रास होतो आणि त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. ह्या एकाएकी झालेल्या बदलाबद्दल डॉक्टर त्यांच्या पत्नीला विचारतात आणि मग मिसेस रांगणेकर मिस्टरांच्या आजारापणामागची सर्व कहाणी डॉक्टरांना सांगतात। रांगणेकरांच्या आजारपणामागचे कारण अणि रांगणेकरांचे पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी आवर्जून पहा हे धम्माल विनोदी नाटक।

तसदीबद्दल क्षमा असावी भाग १




तसदीबद्दल क्षमा असावी भाग २


Friday, December 10, 2010

Ya Ghar Aapalach Ahe

मराठी नाटक - या घर आपलंच आहे
डायरेक्टर - प्रकाश भालेकर कथा - मधुसूदन कालेलकर
कलाकार - अतुल परचुरे, प्रसाद ओक, मैथिली वारंग, हेमांगी वेलणकर, सुरेश डाके.

गौतम आणि नाथ या दोन चुलत भावांचे हे एक करमणूकप्रधान नाटक. उच्च शिक्षणासाठी ते दोघ मुंबईला येतात. काकासाहेब बारामतीकर (नाथचे वडील) यांना या बाबतीत या दोघांचे हेतू माहित नसतात. हे दोघे काकासाहेबांची एक दूरची नातेवाईक निर्मलाताई यांच्याकडे राहतात. इकडे गौतम चंचलच्या तर नाथ सुगंधाच्या प्रेमात पडतो. ते दोघे गुपचूप लग्न करतात आणि काकासाहेबंपासून ही गोष्ट लपवतात. चंचल आणि सुगंधाचे पालक काकासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतात आणि त्यांची ही सगळी अळी मिळी गुपचिळी संकटात येते.

आता गौतम आणि नाथ काय करतील? काकासाहेब त्यांची लग्न मान्य करतील? जाणून घेण्यासाठी आवर्जून पहा हे तुफान विनोदी नाटक...

या घर आपलंच आहे - भाग १





या घर आपलंच आहे - भाग २


Thursday, December 9, 2010

Hasnyasathi Janm Aapula - Part 2

मराठी नाटक - हसण्यासाठी जन्म आपुला
डायरेक्टर - गिरीश घाणेकर.

कथा - फ्रीज
कथा - शं. ना. नवरे.
कलाकार - दिलीप प्रभावळकर, नयनतारा, किशोर नंदल्साकर, मनोरमा वागळे, रवींद्र बेर्डे.

गणपतराव ह्या साध्या सरळ माणसाची ही कथा. मध्यम वर्गातले हे गणपतराव आपल्या पत्नीसोबत चालेत राहतात. नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढ मिळाल्याने गणपतराव हरखून जातात. त्यांचा एक चांगला शुभचिंतक मित्र त्यांना सल्ला देतो ही बातमी बायकोपासून लपवण्याचा. पण अती आनंदाच्या भरात गणपतराव घरी जातात आणि बायकोला आपल्याला प्रमोशन मिळाल्याचे सांगतात. गणपतरावांनी कल्पना केल्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. पुढे काय होते बघा या निखळ विनोदी नाटकामध्ये...

फ्रीज भाग १



फ्रीज भाग २

Wednesday, December 8, 2010

Godigulabi


मराठी नाटक - गोडीगुलाबी
डायरेक्टर - दिलीप कोल्हटकर. लेखक - पी. एल. मयेकर.
मोहन जोशी आणि रीमा लागू या कसलेल्या कलाकारांचे आणखी एक पारितोषिक विजेते नाटक. महाराष्ट्रभरात प्रचंड लोकप्रिय झालेले आणि २००६ सालचा मा. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्राप्त झालेले हे नाटक आवर्जून पहा.

गोडीगुलाबी भाग १



गोडीगुलाबी भाग २

Saturday, December 4, 2010

Aasu Ani Hasu

आसू आणि हसू!!! डायरेक्टर - दिलीप कोल्हटकर. कलाकार - मोहन जोशी, रीमा लागू, विद्याधर जोशी आणि त्रीग्वेदी म्हात्रे.
आसू आणि हसू हा एक प्रयत्न आहे एकच कथा, डॉ हेमंत - मोहन जोशी आणि त्यांची पत्नी वर्षा - रीमा लागू यांची कथा, दोन दृष्टीकोनातून बघण्याचा. वर्षा ही संशयी स्वभावाचे असून ती नवरयावर कायम संशय घेते त्याचे विवाह बाह्य संबंध एका विद्यार्थीनीशी असल्याचा। रोजच्या जीवनातील वादविवादाला कंटाळून पहिल्या प्रवेशा अंती हे जोडपे विलग होते.

दुसरा प्रयोग सुरु होतो हीच कथा, हेच पात्र आणि हीच नावे घेऊन। फक्त बदल होतो तो वर्षाच्या प्रवृत्तीमध्ये. डॉ हेमंत हे निष्णात डॉक्टर पण बाहेरख्याली वृत्तीचे. वर्षा जाणून असते त्यांच्या ह्या स्वभावाबद्दल, पण ती दुर्लक्ष करत असते. हेमंतला राग येतो तो तिच्या शांत स्वभावाचा आणि ती त्यांच्याशी भांडत नाही याचा. पण मग याही परिस्थितीत ते वेगळे होतील का???

आस्वाद घ्या ह्या सुंदर नाटकाचा...

आसू अणि हसू - भाग १



आसू अणि हसू - भाग २