Showing posts with label BadBad Geete. Show all posts
Showing posts with label BadBad Geete. Show all posts

Thursday, August 18, 2011

मी जर झालो..

सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे हे एक गमतीदार बालगीत.

मी जर झालो एक दिवस राजा
सारेजण हुकुम मानतील माझा
सर्वांना माझा एवढा वाटेल धाक
ऐकतील निमूट मुठीत धरून नाक!

आईला म्हणेन, जेवण नको वाढू
उघड सारे दबे, काढ चिवडा-लाडू!

ताईला म्हणेन, आरशात नको पाहू
उटसूट सिनेमातली गाणी नको गाऊ!

दादाला म्हणेन, घोळवीत शीळ
मिशीला उगीच भारू नको पीळ!

बाबांना म्हणेन, बाजारात जाउन
माझ्यासाठी छानसा स्कूटर या घेउन!

मुलांना म्हणेन तुम्ही पतंग उडवा
गुरूजींना म्हणेन, तुम्ही गणित सोडवा!

मी जर झालो एक दिवस राजा
खरे सांग बारे, किती येइल मजा!

- शांता शेळके

Friday, March 11, 2011

Themba Themba Thamb Thamb

Tarabai modak, honoured with Padmabhushan, was a pioneer to start pre-primary education in India. She developed the concept of 'Anganwadi' and introduced Montessori concepts so that the education can reach to the children if they cant come to education. She wrote many books to educate teachers for pre-primary schools and also for the children.
The following rhyme about rain is also written by Tarabai.

पद्मभूषण विजेत्या ताराबाई मोडक यांनी लिहीलेले पावसावरचे बालगीत आज मी येथे सादर करत आहे. भारतामध्ये ताराबाई ह्यांनी 'अंगणवाडी' ही संकल्पना आणली. प्री-प्रायमरी शिक्षण पद्धती त्यांनी सुरु केली. मुलांना शाळेत येता येत नसेल तर शाळा त्यांच्यापर्यंत जाईल हे त्यांनी रुजविले. अंगणवाडी शिक्षकांसाठी आणि मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. आजचे त्यांचे हे पावसावरचे गाणे आपणा सर्वांना नक्की आवडेल अशी आशा आहे.


थेंबा थेंबा थांब थांब
दोरी तुझी लांब लांब

आकाशात पोहोचली
तिथे कशी खोचली ?

सर सर सर सर धावतोस
सरीवर सरी गुंफतोस

सरी तुझ्या मोत्यांच्या
रुप्याच्या की सोन्याच्या ?

सरी तुझ्या ओल्या
गंगेत जाऊन न्हाल्या...

कवयित्री - ताराबाई मोडक

Sunday, March 6, 2011

Adgul Madgul - 2

Hello Friends,
I had posted the rhyme of adgul madgul before. One of my friend posted me the another form of this same song which I am posting here today. This is longer version though, but easy to by heart :)

नमस्कार
पूर्वी मी अडगुल मडगुल हे गाणे पोस्ट केले होते. हे तसे पिढ्यांपिढ्या चालत आलेले गाणे, त्यामुळे ह्या गाण्याची मूळप्रत कोणती वा कशी असावी हे सांगणे जरा कठीण आहे. माझ्या एक मैत्रीणीने मला ह्या गाण्याची दूसरी एक आवृत्ती मेल केली. आज आपणा सर्वांसाठी ती इथे सादर करत आहे. तशी ही ज़रा लांबलचक आहे पण पाठ करायला सोपी आहे...
बघा तुम्हाला हे गाणे कसे वाटते ते....

अडगुल मडगुल सोन्याचं कड्गुल
अडगुल मडगुल सोन्याचं कड्गुल ॥ ध्रु ॥

खुळ खुळ खुळ रुप्याचा वाळा
खुळ खुळ खुळ रुप्याचा वाळा

तान्ह्या बाळा तीट टिळा
तान्ह्या बाळा तीट टिळा ॥ १ ॥

इवल इवल नाक गुबारे गाल, सायीचे ओठ मऊ मऊ लाल
इवल इवल नाक गुबारे गाल, सायीचे ओठ मऊ मऊ लाल

मोठे मोठे डोळे काजळ काळे, तान्हुले बाळ खुदकन हसले
मोठे मोठे डोळे काजळ काळे, तान्हुले बाळ खुदकन हसले ॥ २ ॥

अडगुल मडगुल सोन्याचं कड्गुल
अडगुल मडगुल सोन्याचं कड्गुल

Thursday, February 24, 2011

Ek hote khobre

This is a Marathi childrens song written by famous poetess Shanta Shelke. Poetess has explained the method to make Khirapat - a sweet snack (usually served as Prasad) in a very kid friendly manner.

ह्या बडबड गीतामध्ये प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी खिरापत कशी करतात हे फार सोप्या पण गमतीशीर भाषेत सांगितले आहे. हे गाणे वाचल्यावर माझीसुद्धा खिरापत करण्याची आणि खाण्याची सुद्धा इच्छा झाली बरे का...... हे गाणे तुमच्या चिमुरड्यांना नक्की आवडेल अशी आशा आहे.

एक होते खोबरे
गाल काळे गोबरे

ताईला ते दिसले
तिने त्याला किसले

त्यात घातली साखर
वेलची अन् केशर

छान केली खिरापत
अशी तिची करामत

कवयित्री - शांता शेळके

Friday, February 18, 2011

Ghas ghe re Tanhya Bala

Hello Friends,
Today's song has a situation we all parents face day to day - feeding a meal to the baby. :)
This song is to entertain the child and is easy to sing for parents, sung and also composed by Rani Varma.

घास घे रे तान्ह्या बाळा
पायी रुणझुण घुंघुर वाळा ॥ ध्रु ॥

तिकडून आली चिऊ चिऊ, तिकडून आला काऊ काऊ
बाळा चा घास कोणाला देऊ? ॥ १ ॥

एक घास गाईचा, एक घास ताईची
बाळाचा घास दूध आणि साईचा ॥ २ ॥


Tuesday, January 11, 2011

Aapdi Thapdi

बाळ थोड़े मोठे झाले की त्याला काही बैठे खेळ शिकवतात। त्यापैकी हा एक.

आपडी थापडी
गुळाची पापडी

धम्मक लाडू
तेल काढू

तेलंगीचे एकच पान
दोन्ही हाती धरले कान

चाऊ म्याऊ बिबळ्या काऊ
पितळीतले पाणी पिऊ

हंडा पाणी गडप
गुळाची पापडी हडप ॥



Monday, January 10, 2011

Karangali Marangali

आपल्या बाळराजाला अवयवांची ओळख करून देण्यासाठी रचलेले हे मधुर गीत...

करंगळी मरंगळी
मधलं बोट चाफेकळी

तळहात- मळहात
मनगट- कोपर
खांदा-गळगुट-हनुवटी ॥

भाताचं बोळकं
वासाचं नळकं

काजळाच्या डब्या
देवाजीचा पाट

देवाजीच्या पाटावर
चिमण्यांचा किलबिलाट ॥



Thursday, January 6, 2011

Talya Pitu Talya

टाळ्या पिटू टाळ्या
पुरणाच्या पोळ्या

एक पोळी करपली
दुधामधे कुस्करली

दूध झाले कडू
बाळाला आले रडू ....

Yere Yere Pavasa

आजचे हे बडबड गीत आपण सर्वांनी लहानपणी गायलेले.. पाऊस यावा म्हणून पावसाला पैशाचे आमिष दाखवायचे आणि पाऊस आल्यावर तय पैशाला खोटे ही करायचे॥ :)

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा...

ये ग ये ग सरी
माझं मडकं भरी

सर आली धावून
मडके गेले वाहून...

Wednesday, January 5, 2011

Adgul Madgul

आपणा सर्वांच्या आईने, आजीने, मावशीने वा काकुने आपल्यासाठी म्हटलेले हे बडबड गीत.

अडगुलं मडगुलं
सोन्याचं कडगुलं

रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा

तीट लावू ....





Monday, December 27, 2010

Aaji Mhanate

आजी म्हणते, ’विठुराजा’
गावात झाल्या तिन्‌सांजा

आजी म्हणते, ’हरी हरी’
लामणदिवे घरी घरी

आजी म्हणते, ’रख्‌माराणी’
घमघमली रे धूपदाणी

आजी लावते मागिलदार
दिव्या दिव्या दीपोत्कार

कवी - आरती प्रभु.

Saturday, December 25, 2010

Aplam Chaplam

बाळाला झोपवताना आईला फार कसरत करावी लागते। राजा मंगळवेढेकर यांचे हे बाळ झोपवताना म्हणण्याजोगे गीत...

अपलम् चपलम्
चम् चम् चम्

गुलाबाचे अत्‍तर
घम् घम्‌ घम्

इवलेसे फूल
डुलु डुलु डुलु

इवलासा थेंब
टुळु टुळु टुळु

इवलीशी कुपी
छान छान छुक्

बाळ गेला झोपी
बोलू नका, शुक्

कवी - राजा मंगळवेढेकर

Friday, December 24, 2010

Nhau Bala Nhau

बाळाला आंघोळ घालताना ही आईला त्याची करमणुक करावी लागते। आंघोळीच्या वेळेस म्हणता येईल असे हे मंगेश पाडगावकरांचे आणखी एक बडबड गीत.

न्हाऊ बाळा न्हाऊ,
आंघोळीला जाऊ !

बशू बाई बशू,
पाटावरती बशू !

बुडु बुडु बुडू,
गोल गोल गडू !

फेस पहा फेस,
ओले ओले केस !

घुशु घुशु घुशू,
ओले अंग पुशू !

कवी - मंगेश पाडगावकर

Thursday, December 23, 2010

Chandomama Chandomama

नमस्कार!!!
पहिल्यांदा आई झालेल्या एका मैत्रिणीने मला विचारले ' तुला बडबड गीते येतात का गं?'
आठवायचा प्रयत्न केला तर आठवली तशी चार पाच गाणी. पण मग मनात विचार आला ही माहितीतली सगळी गाणी एकत्र केली तर..
माझ्या बऱ्याच नव्याने आई झालेल्या मैत्रीणींना याचा फायदा होईल, आणि दुसर्याँदा आई झालेल्या मैत्रीणींना ही.. :)
यातली गाणी ही काही आठवणीतली तर काही जमा केलेली. तुम्हालाही या व्यतिरिक्त गाणी ठाऊक असतील तर नक्की सांगा.. या मालिकेतील हे पहिले बडबड गीत कविवर्य मंगेश पाडगावकरांचे..

चांदोमामा, चांदोमामा
भागलास काय ?
घरचा अभ्यास
केलास काय ?
चांदोमामा, चांदोमामा
लपलास काय ?
पुस्तक हरवून
बसलास काय ?
चांदोमामा, चांदोमामा
रुसलास काय ?
गणितात भोपळा
घेतलास काय ?

कवी - मंगेश पाडगावकर