शांता शेळके - मराठीतील एक अग्रगण्य कवयित्री.
परवा १२ ऑक्टोबरला रेडिओ ऐकत होते तर विविधभारती वर शांत शेळके यांची गाणी लागली होती निमित्त होते शांताबाईंच्या जयंतीचे. सहज म्हणून बघितले तर ह्या नामवंत कवयित्रीची साधी जन्म तारीख सुद्धा बहुतेक साईटवर वेगवेगळी आहे. विकिपीडिया :- १९ ऑक्टोबर मनसे :- २१ ऑक्टोबर
हा आपला दुर्दैवविलास म्हणावा कि..
असो. त्या निमित्ताने ही शांता बाईंची ही कविता.
मिळणार तशी ना शोधूनी दुसर्या लाख
किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले
हासती केस ते सुंदर काळे कुरळे
झाकती उघडती निळे हासरे डोळे
अन ओठ जसे की आत्ताच खुदकन हसले
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फुल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्याजवळी
पण तीच सोनुली फार मला आवडली
मी गेले तीजसह माळावर खेळाया
मी लपून म्हणते साई सुट्ट्या हो या या
किती शोध शोधली परी कुठे न ती दिसली
परतले घरी मी होउन हिरमुसलेली
स्वप्नात तीने मम रोज एकदा यावे
हलवून मला हळु माळावरती न्यावे
वाटते सारखे जावे त्याच ठिकणी
शोधुनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण संतत पाउस धार
खल मुळी न तिजला वारा झोंबे फर
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला
पाहूनी दशा ती रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपर्या रंगही गेला उडून
परी आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली होती माझी म्हणुनी
- शांता शेळके
परवा १२ ऑक्टोबरला रेडिओ ऐकत होते तर विविधभारती वर शांत शेळके यांची गाणी लागली होती निमित्त होते शांताबाईंच्या जयंतीचे. सहज म्हणून बघितले तर ह्या नामवंत कवयित्रीची साधी जन्म तारीख सुद्धा बहुतेक साईटवर वेगवेगळी आहे. विकिपीडिया :- १९ ऑक्टोबर मनसे :- २१ ऑक्टोबर
हा आपला दुर्दैवविलास म्हणावा कि..
असो. त्या निमित्ताने ही शांता बाईंची ही कविता.
लाडकी बाहुली
लाडकी बाहुली होती माझी एकमिळणार तशी ना शोधूनी दुसर्या लाख
किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले
हासती केस ते सुंदर काळे कुरळे
झाकती उघडती निळे हासरे डोळे
अन ओठ जसे की आत्ताच खुदकन हसले
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फुल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्याजवळी
पण तीच सोनुली फार मला आवडली
मी गेले तीजसह माळावर खेळाया
मी लपून म्हणते साई सुट्ट्या हो या या
किती शोध शोधली परी कुठे न ती दिसली
परतले घरी मी होउन हिरमुसलेली
स्वप्नात तीने मम रोज एकदा यावे
हलवून मला हळु माळावरती न्यावे
वाटते सारखे जावे त्याच ठिकणी
शोधुनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण संतत पाउस धार
खल मुळी न तिजला वारा झोंबे फर
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला
पाहूनी दशा ती रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपर्या रंगही गेला उडून
परी आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली होती माझी म्हणुनी
- शांता शेळके
No comments:
Post a Comment