सासरी नांदत असलेल्या मुलीला सणासुदीच्या निमित्ताने माहेरी जायची परवानगी मिळत असे.
खालील गाण्यात वडील मुलीला माहेरी नेण्यासाठी येतात आणि आनंदलेली मुलगी लगेच तयारही होते पण सासरच्या मंडळींची परवानगी हवी ना… आणि ती परवानगी लगेच मिळायची नाही, कधी कधी जायलाही मिळायचे नाही. सासरच्या मंडळींना ही घराची घडी विस्कळू नये म्हणून काळजी घायची असायची; त्यामुळे भीत - भीत परवानगी मागणारी सून आणि नाकारणारी सासरची मंडळी खालील गाण्यांमध्ये अधोरेखित होतात.
सासूबाई, सासूबाई मला आलं मूळ
जाऊ का मी आपुल्या माहेरा माहेरा ॥ ध्रु.॥

कार्ल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥
कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥
कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥
कार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥
कार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥
कार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥
आपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
माझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥
=========================================

सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण
तिथं आमच्या सासुबाई कुंकु लावीत होत्या
सासुबाई सासुबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपल्या सासर्याला, सासर्याला ॥१॥
तिथं आमच्या सासुबाई कुंकु लावीत होत्या
सासुबाई सासुबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपल्या सासर्याला, सासर्याला ॥१॥
सोन्याची दऊत बाई मोत्याची लेखणी
तिथं आमचे मामंजी लिहीत होते
मामंजी मामंजी मला आल मुळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपल्या जावेला, जावेला ॥२॥
तिथं आमचे मामंजी लिहीत होते
मामंजी मामंजी मला आल मुळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपल्या जावेला, जावेला ॥२॥
सोन्याचा डेरा बाई मोत्याची रवी
तिथं आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या
जाऊबाई जाऊबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरिच दिसतीस
पुस जा आपल्या दीराला, दीराला ॥३॥
तिथं आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या
जाऊबाई जाऊबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरिच दिसतीस
पुस जा आपल्या दीराला, दीराला ॥३॥
सोन्याची विटी आणि मोत्याचा चेंडू
तिथं आमचे भाऊजी खेळत होते
भावोजी भावोजी मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपुल्या नणंदेला, नणंदेला ॥४॥
तिथं आमचे भाऊजी खेळत होते
भावोजी भावोजी मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपुल्या नणंदेला, नणंदेला ॥४॥
सोन्याची सुपली बाई मोत्यांनी गुंफीली
तिथं आमच्या वन्स पाखडत होत्या
वन्सबाई वन्सबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस ज्या आपुल्या पतीला, पतीला ॥५॥
तिथं आमच्या वन्स पाखडत होत्या
वन्सबाई वन्सबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस ज्या आपुल्या पतीला, पतीला ॥५॥
सोन्याच पलंग बाई मोत्याचे खूर
तिथं आमचे पतिराज झोपले होते
पतिराज पतिराज मला आलं मूळ
आणा फणी घाला वेणी जाऊ दे राणी माहेरा
जाती तशी जाऊ दे, निळ्या घोडीवर बसु दे
निळी घोडी हसली, सखुबाई सुंदर दिसली ॥६॥
तिथं आमचे पतिराज झोपले होते
पतिराज पतिराज मला आलं मूळ
आणा फणी घाला वेणी जाऊ दे राणी माहेरा
जाती तशी जाऊ दे, निळ्या घोडीवर बसु दे
निळी घोडी हसली, सखुबाई सुंदर दिसली ॥६॥
No comments:
Post a Comment