अध्याय ३ :- आत्मद्वैत
Atmadvaita - Self in All and All in the Self Ashtavakra is delighted for Janaka but sees inconsistencies. He fires off a series of confrontational verses about attachment to worldly pleasure.
॥ अष्टावक्र उवाच ॥
अविनाशिनमात्मानं एकं विज्ञाय तत्त्वतः ।
तवात्मज्ञानस्य धीरस्य कथमर्थार्जने रतिः ॥१॥
अष्टावक्र म्हणाला अष्टावक्रानें जनकाला विचारलें कीं, आत्म्याला तत्त्वतः एक आणि अविनाशी जाणूनही तुझ्यासारख्या आत्मज्ञानी आणि धैर्यवंताला अजूनही धन कमावण्यांत रुचि आहे का ? ॥१॥
Ashtavakra said:
1. Knowing yourself as truly one and indestructible, how could a wise man like you- one possessing self-knowledge- feel any pleasure in acquiring wealth?
आत्माज्ञानादहो प्रीतिर्विषयभ्रमगोचरे ।
शुक्तेरज्ञानतो लोभो यथा रजतविभ्रमे ॥२॥
आश्चर्य आहे कीं, शिंपल्याच्या अज्ञानानें चांदी आहे असा भ्रम निर्माण होतो, तसाच आत्म्याच्या अज्ञानामुळें विषयभ्रम झाल्यानें लोभ निर्माण होतो. ॥२॥ 2. Truly, when one does not know oneself, one takes pleasure in the objects of mistaken perception, just as greed for its seeming silver arises in one who does not know mother-of-pearl for what it is.
विश्वं स्फुरति यत्रेदं तरङ्गा इव सागरे ।
सोऽहमस्मीति विज्ञाय किं दीन इव धावसि ॥३॥
ज्या आत्मरुपी सागरावर हा संसार तरंगाप्रमाणें स्फुरित होत असतो तो आत्मा मी आहें हें जाणूनही तूं दीनवाणा कां पळत आहेस ? ॥३॥ 3. All this wells up like waves in the sea. Recognising, I am That, why run around like someone in need?
श्रुत्वापि शुद्धचैतन्य आत्मानमतिसुन्दरं ।
उपस्थेऽत्यन्तसंसक्तो मालिन्यमधिगच्छति ॥४॥
अत्यंत सुंदर आणि शुद्ध चैतन्यरुप आत्म्याबद्दल एवढें जाणूनही कोण कसा इंद्रियांच्या विषयांत अत्यंत आसक्त होऊन मलिनतेला प्राप्त होतो ते ध्यानांत घे. ॥४॥ 4. After hearing of oneself as pure consciousness and the supremely beautiful, is one to go on lusting after sordid sensual objects?
सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
मुनेर्जानत आश्चर्यं ममत्वमनुवर्तते ॥५॥
सर्व भूतांत आत्मा आहे आणि सर्व भूतें आत्म्यांत आहेत असें ज्ञान असूनही मुनीला माया-ममता निर्माण होते हें आश्चर्यकारक आहे. ॥५॥ 5. When the sage has realised that one is oneself is in all beings, and all beings are in oneself, it is astonishing that the sense of individuality should be able to continue.
आस्थितः परमाद्वैतं मोक्षार्थेऽपि व्यवस्थितः ।
आश्चर्यं कामवशगो विकलः केलिशिक्षया ॥६॥
परम अद्वैतांत आश्रय घेतलेला आणि मोक्षांकरितां उद्युक्त झालेला पुरुषही कामातुर होऊन कामक्रीडेच्या विचारानें व्याकुळ होत असतो हें मोठें आश्चर्य आहे. ॥६॥ 6. It is astonishing that a person who has reached the supreme non-dual state and is intent on the benefits of liberation should still be subject to lust and be held back by the desire to copulate.
उद्भूतं ज्ञानदुर्मित्रमवधार्यातिदुर्बलः ।
आश्चर्यं काममाकाङ्क्षेत् कालमन्तमनुश्रितः ॥७॥
काम हा ज्ञानाचा शत्रु आहे हें माहीत असूनही एखादा अतिदुर्बल आणि मरण जवळ आलेला पुरुषही कामभोगाची इच्छा करतो हेंच मोठें आश्चर्य आहे. ॥७॥ 7. It is astonishing that one already very debilitated, and knowing very well that sensual arousal is the enemy of knowledge should still eagerly hanker after concupiscence, even when approaching one's last days.
इहामुत्र विरक्तस्य नित्यानित्यविवेकिनः ।
आश्चर्यं मोक्षकामस्य मोक्षाद् एव विभीषिका ॥८॥
जनका, जो इहलोकांतील व परलोकांतील भोगांबद्दल विरक्त आहे आणि जो नित्य व अनित्याचा विवेक ठेवतो व जो मोक्षाची इच्छा करणारा आहेअ तोही मोक्षाचें, मरणाचें भय बाळगतो हें एक आश्चर्यच आहे. ॥८॥ 8. It is astonishing that one who is unattached to the things of this world or the next, who discriminates between the permanent and the impermanent, and who longs for liberation, should still feel fear for liberation.
धीरस्तु भोज्यमानोऽपि पीड्यमानोऽपि सर्वदा ।
आत्मानं केवलं पश्यन् न तुष्यति न कुप्यति ॥९॥
ज्ञानाला उपलब्ध झालेला धीर पुरुष भोग भोगतांना किंवा दुःख सहन करतांनाही नित्य केवल आत्म्याला पाहात असल्यानें प्रसन्नही होत नाहीं वा रागावतही नाहीं.॥९॥ 9. Whether feted or tormented, the wise person is always aware of the supreme self-nature and is neither expectant nor disappointed.
चेष्टमानं शरीरं स्वं पश्यत्यन्यशरीरवत् ।
संस्तवे चापि निन्दायां कथं क्षुभ्येत् महाशयः ॥१०॥
जो आपल्या कार्यमग्न शरीराला, तें दुसर्याचें शरीर आहे अशा तटस्थ भावनेनें पाहातो, तो महाआशय असलेला पुरुष स्तुति अथवा निंदा यामुळें क्षोभाला कसा प्राप्त होईल ? ॥१०॥ 10. The great souled person sees even one's own body in action as if it were someone else's, so how then be disturbed by praise or blame?
मायामात्रमिदं विश्वं पश्यन् विगतकौतुकः ।
अपि सन्निहिते मृत्यौ कथं त्रस्यति धीरधीः ॥११॥
जो या विश्वाला मायामात्र पाहातो आणि ज्याच्या मनांत आताम कसलेंही कुतूहल शिल्लक नाहीं-शंका-नाहीं-तो धीर पुरुष मरण आल्यावर भयभीत कां होईल ? ॥११॥ 11. Seeing this world as pure illusion, and devoid of any interest in it, how should the strong-minded person feel fear, even at the approach of death?
निःस्पृहं मानसं यस्य नैराश्येऽपि महात्मनः ।
तस्यात्मज्ञानतृप्तस्य तुलना केन जायते ॥१२॥
जो महात्मा मनांत मोक्षाचीही इच्छा करीत नाहीं व जो आत्मज्ञानानें तृप्त आहे, त्याची तुलना कोणाबरोबर करतां येईल ? ॥१२॥ 12. Who is to be compared to the great-souled person whose mind is free of desire, free of expectation and disappointment, and who has found satisfaction in self-knowledge?
स्वभावाद् एव जानानो दृश्यमेतन्न किंचन ।
इदं ग्राह्यमिदं त्याज्यं स किं पश्यति धीरधीः ॥१३॥
जो खराखुरा धैर्यवान व शांत झाला आणि ज्यानें हें जाणलें कीं, दिसणारा हा संसार वस्तुतः नाहींच, त्याच्या मनांत मग हें घ्यावें व तें टाकावें, अशी वासनाच निर्माण होत नाहीं. ॥१३॥ 13. How should a strong-minded person who knows that whatever is seen is by its very nature nothing, how then consider one thing to be grasped and another to be rejected?
अंतस्त्यक्तकषायस्य निर्द्वन्द्वस्य निराशिषः ।
यदृच्छयागतो भोगो न दुःखाय न तुष्टये ॥१४॥
ज्यानें अंतःकरणांतील कामक्रोधादि विषयांचा त्याग केला, ज्यानें साक्षी होऊन पाहिलें कीं, हे राग-लोभ माझे नाहींत, मी फक्त प्रकाश आहें आणि भेदबुद्धिरहित व आशारहित जो झाल आहे त्या पुरुषाला दैवयोगानें आलेल्या भोगांचा----सुखाचें सुख व दुःखाचें दुःख वाटत नाहीं. ॥१४॥ 14. For someone who has eliminated attachment, and who is free from dualism and from desire and from repulsion, for such a one an object that comes of itself is neither painful nor pleasurable.
No comments:
Post a Comment