अध्याय ४ :-सर्वात्मा
Sarvamatma - Knower and the Non-knower of the SelfJanaka asserts that the Lord of the Universe can do as he pleases.
॥ अष्टावक्र उवाच ॥
हन्तात्मज्ञानस्य धीरस्य खेलतो भोगलीलया ।
न हि संसारवाहीकैर्मूढैः सह समानता ॥१॥
जनक म्हणाला ज्यांच्या आंत मी-अहंकार-शिल्लक उरला नाहीं, सहज वाटयाला आलेले सुखदुःखाचे भोग भोगणार्या आत्मज्ञानी धीर पुरुषांची बरोबरी संसाराचें ओझें डोक्यावर घेणार्या मूढ पुरुषांना कधींही करतां येणार नाहीं. ॥१॥
Ashtavakra said:
1. Certainly the wise person of self-knowledge, playing the game of worldly life, bears no resemblance whatever to the world's bewildered beasts of burden.
यत् पदं प्रेप्सवो दीनाः शक्राद्याः सर्वदेवताः ।
अहो तत्र स्थितो योगी न हर्षमुपगच्छति ॥२॥
ज्या पदाच्या प्राप्तीच्या इच्छेनें सर्व देवताच काय पण इंद्रही दीनवाणा होतो, त्या पदावर, त्या परमोच्च पदावर पोहोंचूनही-त्या सिंहासनावर बसूनही-योगी हर्ष करीत नाहीं--तेथेंही तो साक्षी बनून राहातो. ॥२॥ 2. Truly the one centered in mystic union feels no excitement even at being established in that state which all the gods from Indra down yearn for disconsolately.
तज्ज्ञस्य पुण्यपापाभ्यां स्पर्शो ह्यन्तर्न जायते ।
न ह्याकाशस्य धूमेन दृश्यमानापि सङ्गतिः ॥३॥
जसा आकाशाशीं संबंध आहे असें भासवणार्या धुराशीं आकाशाचा संबंध नसतो, तसाच पापपुण्याचा त्या पदावर आरुढ झालेल्या पुरुषाच्या अंतःकरणाशीं संबंध नसतो. ॥३॥ 3. He who has known That is untouched within by good deeds or bad, just as the sky is not touched by smoke, however much it may appear to be.
आत्मैवेदं जगत्सर्वं ज्ञातं येन महात्मना ।
यदृच्छया वर्तमानं तं निषेद्धुं क्षमेत कः ॥४॥
ज्या महात्म्यानें या सर्व जगाला स्वतःच्या आत्म्याप्रमाणेंच जाणलें, त्या वर्तमान क्षणाच्या साक्षी बनलेल्या महात्म्याला जसें स्फुरेल तसें वागण्यापासून कोण रोखूं शकेल ? ॥४॥ 4. Who can prevent the great-souled person who has known this whole world as oneself from living as one pleases?
आब्रह्मस्तंबपर्यन्ते भूतग्रामे चतुर्विधे ।
विज्ञस्यैव हि सामर्थ्यमिच्छानिच्छाविवर्जने ॥५॥
ब्रह्यापासून मुंगीपर्यंतच्या चार प्रकारच्या जीवांच्या समूहापैकीं ज्ञान्यालाच इच्छा व अनिच्छा थांबण्याचें निश्चित सामर्थ्य आहे. तो दोन्हीपासून मुक्त आहे. ॥५॥ 5. Of all the four categories of beings, from Brahma down to the driest clump of grass, only the person of knowledge is capable of eliminating desire and aversion.
आत्मानमद्वयं कश्चिज्जानाति जगदीश्वरं ।
यद् वेत्ति तत्स कुरुते न भयं तस्य कुत्रचित् ॥६॥
कधीं कुणी विरळाच आत्म्याला अद्वय आणि जगदीश्वररुपांत जाणत असतो-एकरुप होतो. मग त्याची मर्जी राहात नाहीं-मग तो तेंच करतो जें प्रभु करवून घेतो आणि मग विश्वाशीं एकरुप झालेल्या अशा अद्वय पुरुषाला कशाचें भय वाटणार ? कारण भय वाटायला त्याला पर कोणीच नाहीं.॥६॥ 6. Rare is the person who knows oneself as the undivided Lord of the world; no fear occurs to one who lives the truth.
No comments:
Post a Comment