Thursday, May 1, 2014

Marathi Language

मराठी आणि मराठी अभिमान गीत


मराठी - महाराष्ट्राची राज्यभाषा जगातल्या नऊ कोटि लोकांची मातृभाषा. संस्कृतातुन प्राकृत अणि प्राकृतातुन मरहट्ट्यांची मरहाट्टी म्हणजेच आजची मराठी जन्माला आली.
इंग्रजीला वाघिणीचे दूध संबोधल्यावर तर अत्र्यांनी मराठीला आईचे दूध म्हटले ते साहजिकच श्रेष्ठ ठरविले आणि ते आहेच. अत्रे म्हणाले होते, "ज्याला मराठीत बोलायची, आपल्या मातृभाषेत बोलायची लाज वाटते, त्याला आपल्या आईच्या दुधाची देखिल लाज वाटत असली पाहिजे."

बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर म्हणाले होते..

माज्या मराठीची बोलू कौतुके।

परी अमृतातेही पैजा जिंके।

ऐसी अक्षरे रसिके मेळविन॥फादर स्टीफन्स या परदेशी धर्मोपदेशकाने थोडक्या काळात मराठी भाषेत नैपुण्य मिळविले सहजसुंदर, ओवीबद्ध अशी काव्यरचना केली। तो केवळ मराठी अभ्यासकच नव्हता तर मराठीवर त्याचे प्रेमही होते हे त्याच्या खालील ओव्यांतिल मराठी भाषेच्या प्रशंसेवारून कळून येईल॥
जैसी हरळांमाजी रत्नकिळा
कि रत्नांमाजी हिरा निळा
तैसी भासांमाजी चोखळा
भासा मराठी
जैसी पुस्पांमाजी पुस्पमोगरी
की परिमळांमाजी कस्तुरी
तैसी भासांमाजी साजिरी मराठीया
पखियांमधे मयोरू
वृखियांमध्ये कल्पतरु
भासांमध्ये मानु थौरु
मराठीयेसी


मराठीवरिल सुरेश भटांची ही एक प्रसिद्ध कविता :-

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी


येथल्या वनावनांत गूंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभांमधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कित्तिक खेल पाहते मराठी
शेवटी मदांध तख़्त फोडते मराठी।.. 


सुरेश भटांची ही रचना - मराठी अभिमान गीत - आजचे आघाडीचे संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केली आहे  अनेक नामवंत मराठी गायक गायिकांच्या आवाजात …. 


 

No comments:

Post a Comment