Showing posts with label Geetai. Show all posts
Showing posts with label Geetai. Show all posts

Tuesday, July 17, 2012

गीताई विषयी आणखी थोडे

नित्यनूतन गीताई   
हा अग्रलेख लोकसत्तेत छापून आला होता. गीताई आणि प्रामुख्याने तिच्या रचियेत्यावर प्रकाश टाकणारा हा लेख तुम्हा सर्वांना आवडेल अशी आशा आहे.

साभार : लोकसत्ता, शनिवार, १४ जुलै २०१२
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीत दोन महान ग्रंथ निर्माण झाले. १९१४मध्ये लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यलढय़ाला अनुकूल असा गीतेचा आविष्कार लोकांसमोर आला. तरुण वयापासून असलेले गीतेचे अखंड अनुसंधान आणि सामाजिक कार्यातून आलेले अफाट अनुभव यातून लोकमान्यांचे हे चिंतन उभे राहिले.
सह्य़ाद्रीच्या कडय़ासारखे लोकमान्यांचे व्यक्तिमत्त्व आहे असे ब्रिटिश खासदार हेन्री नेव्हिन्सन याने म्हटले होते. गीतारहस्य हेही सह्य़कडय़ाप्रमाणेच आहे. तत्त्वज्ञानाचा भव्य, बळकट तरीही सुंदर असा आविष्कार आपण पाहात आहोत अशी भावना गीतारहस्य वाचताना होते. अर्थात यासाठी तत्त्वज्ञानाची किमान आवड असावी लागते. आयुष्यातील समस्यांना तोंड देण्यासाठी गीतारहस्यात तात्त्विक आधार सापडतो.
तथापि, तात्त्विक आधाराने माणसाचे समाधान होत नाही. त्याला आत्मीय आधार हवा असतो. समाजाची ती चिरंतर गरज असते. तत्त्वज्ञान शुष्क असण्याची गरज नाही हे ज्ञानदेवांनी दाखवून दिले. नाद-रूपाबरोबर स्वाद व स्पर्श यांच्याही संवेदना देणाऱ्या सर्वेद्रियस्पर्शी शब्दकळेच्या साह्याने गीतेच्या तत्त्वज्ञानाची ‘सुखेसीं सुखाडिजे, सुखाचिमाजी’ अशी अलौकिक अनुभूती ज्ञानदेवांनी करून दिली. त्याचाच विसाव्या शतकातील उन्मेष म्हणजे विनोबांची ‘गीताई’. गीतेच्या तत्त्वज्ञानाच्या गूढ अंतरंगात ती वात्सल्याने घेऊन जाते. आपल्या लहानग्याशी आईचा संवाद जितका सहज, तीच सहजता गीताईची. गीतारहस्यानंतर २० वर्षांनी गीताई वाचकांच्या हाती आली आणि बुद्धीला वात्सल्याचे रूपडे चढले. त्या घटनेला आज ८० वर्षे पूर्ण होत आहेत.
असे घडले कारण आईचे नि:स्वार्थ प्रेम ही गीताईची मुख्य प्रेरणा होती. विनोबांवर आईचा खोल प्रभाव होता. त्यांची आई फार शिकलेली नसली तरी बुद्धिमान व सहृदय होती. भारतीय तत्त्वचिंतनाचा खोल अर्थ जाणत होती. विनोबांशी झालेल्या तिच्या लहान लहान संवादातून याची प्रचीती येते. गीतेचे अनुवाद तिने वाचले होते, पण सरळसोपे मराठी तिला हवे होते. ‘विन्या तूच का नाही माझ्यासाठी सोपा अनुवाद करीत, तू हे करू शकतोस’ या आईच्या उद्गाराचा विनोबांवर खोल परिणाम झाला. पुढे हीच अपेक्षा स्वातंत्र्यलढय़ातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कारण टिळकांपाठोपाठ महात्मा गांधींनीही सामाजिक कार्यासाठी गीतेचा आधार घेतला होता. त्याचा प्रभावी आविष्कार आजूबाजूला दिसत असल्याने असंख्य कार्यकर्ते गीतेकडे आकृष्ट होत होते. विनोबा गांधींना भेटले १९१६ साली. या तरुणाचे आध्यात्मिक चिंतन खूप खोल आहे हे माणसे जोखण्यात वाकबगार असलेल्या गांधींना पहिल्याच भेटीत जाणवले. त्यानंतर दोघांमध्ये अनेक वर्षे संवाद होत राहिला. गीतेतील सिद्धान्तांच्या गहनगूढ अरण्यात दोघेही शिरत. मात्र ती केवळ बौद्धिक सफर नसे. जाणलेले आचरणात आणण्याचे विविध प्रयोग लगेच होत. शास्त्र व कला यांचा मनोहारी संगम असलेले गीता हे आचरणशास्त्र आहे असे स्पष्ट दर्शन या दोघांना झाले होते. गांधींनी सत्याग्रहींसाठी तयार केलेले एकादशव्रत ही या दर्शनाची निर्मिती होती.
कार्यकर्त्यांचा आग्रह, आईची प्रेरणा आणि बापूंचे सान्निध्य यांच्या संगमातून गीताईची निर्मिती झाली. कर्म आणि अकर्म यांचा परस्परसंबंध हे गीतेतील एक गूढ कोडे आहे. गीतेचा सखोल अभ्यास असला तरी हे कोडे सुटेपर्यंत गीतेवर काही बोलण्यास विनोबांची तयारी नव्हती. पूर्ण कर्मयोग हा संन्यास तर पूर्ण संन्यास हा पूर्ण कर्मयोग या कर्माच्या दुहेरी स्वरूपाबाबत नि:संदिग्धता आल्यावर पाचव्या अध्यायापासून गीतेच्या भाषांतरास सुरुवात झाली. गीतेचे नित्यनूतन तत्त्वज्ञान मधुर मराठीत पुन्हा सामान्य लोकांच्या अंगणात आले. तत्त्वज्ञानात रस नसेल तरी मराठीच्या माधुर्याचा अनुभव घेण्यासाठी गीताई चाळावी. साधेसोपे शब्द किती खोलवर घेऊन जातात ते पाहावे. गीतेचे तत्त्वज्ञान अजिबात क्लिष्ट नाही, उलट अगदी आजच्या परिस्थितीतही ते कसे मार्ग दाखविते याचे स्पष्ट दर्शन आपल्याला गीताईमध्ये मिळते. ‘अपार धरिती चिंता जी मेल्या हि सरे चि ना, गढले काम-भोगांत जणूं सर्वस्व मानुनी! ’ किंवा ‘आशेचे लेइले फांस काम-क्रोधात तत्पर, भोगासाठी अधर्माने इच्छिती धन-संचय! ’ हे आजच्या जीवनाचे किती सहज वर्णन? या परिस्थितीचे कारणही गीतेने मार्मिकपणे सांगितले आहे. ते सोप्या मराठीत विनोबा असे सांगतात.. ‘हे आज लाभलें आता तो जोडीन मनोरथ, हें आहे तें हि होईल माझे चि सगळें धन! ’ संपत्ती, सत्तेच्या चाकांवर धावणाऱ्या मनोरथाने आसुरी वृत्ती पोसली जाऊन ऐहिक जीवन नरकप्राय होऊन जाते असे विनोबांनी म्हटले आहे.
गीताई हे भाषांतर असले तरी त्यामध्ये विनोबांच्या व गांधींच्या विचारांचे सार आले आहे. गीताईची भारतीय संस्कृतीवर अपार श्रद्धा आहे, पण ती बुद्धीच्या ठाशीव पायावर उभी आहे. म्हणूनच आजच्या काळाला अनुकूल असे स्थितप्रज्ञ दर्शन विनोबांनी गीताईतून पुढे आणले. हा काळ बुद्धीचा आहे. बुद्धीची अचाट कार्ये आजूबाजूला चालू आहेत. पण भारतीय तत्त्वज्ञानानुसार बुद्धी हे जडतत्त्व असल्यामुळे ती सात्त्विक, राजस व तामस अशी असू शकते. सध्या सर्वत्र तामस व राजसी बुद्धीचे प्रदर्शन होते. अगदी आध्यात्मिक क्षेत्रातही पैसा, पारितोषिके व संख्येचे होणारे प्रदर्शन हे राजस बुद्धीचे प्रताप आहेत. समाजातील बुद्धी सात्त्विक व्हावी ही संतांची धडपड होती. गीताई, त्यापाठोपाठ आलेली गीता प्रवचने आणि त्यानंतर आलेले स्थितप्रज्ञ दर्शन या तिन्हीमध्ये विनोबांनी बुद्धीच्या सात्त्विकतेवर भर दिलेला आहे. बुद्धीला सात्त्विकता व्रतामधून येते. ही व्रते पूर्वी व्यक्तिगत असत. जशी चातुर्मासात घेतली जाणारी व्रते. पण गांधींनी व्रतांना सामाजिक केले. कारण गांधींना फक्त भारताचे स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते तर त्यांना चारित्र्यवान राष्ट्र निर्माण करायचे होते. त्यासाठी आदर्श पुरुषविशेषाची गरज होती. गांधींना ती स्थितप्रज्ञाच्या वर्णनात सापडली. ‘स्थितप्रज्ञ’ हा गीतेचा खास शब्द आहे. तो अन्य कोणत्याच ग्रंथात सापडत नाही. ती गीतेची आदर्शमूर्ती आहे. दुसऱ्या अध्यायात त्याचे वर्णन येते. गांधींनी रोजच्या प्रार्थनेत त्याचा समावेश केला. ‘घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये..’ ही स्थितप्रज्ञाच्या व्रतसाधनेची सुरुवात असून ‘स्वामित्वे विषयी वर्ते, त्यास लाभे प्रसन्नता’ हे मुक्कामाचे ठिकाण आहे.
ही प्रसन्नता साधण्यासाठी बुद्धीला कर्मयोगाची जोड अनिवार्य होती. विनोबांनी ती दिली. म्हणूनच पहिला सत्याग्रही म्हणून गांधींनी विनोबांची निवड केली. विनोबांचे चिंतन व्यक्तिगत असले तरी व्रतसाधना सामाजिक राहिली. मनुष्याचे रोजचे सर्व व्यवहार हे सामाजिकच असतात असा त्यांचा विश्वास होता. म्हणून गीताई परंपरानिष्ठ, धर्माध झाली नाही. ते मानवतेचे तत्त्वज्ञान झाले कारण गीतेची मूळ निर्मिती ही मानवासाठी होती. ही स्पष्टता आल्यामुळेच गीताई लिहूनही विनोबा कर्मकांडी झाले नाहीत. उलट सुरगावचे भंगीकाम, कांचनमुक्ती, ग्रामसेवा मंडळ असे अनेक क्रांतिकारी प्रयोग करू लागले. फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनाचे त्यांनी नियोजन केले. स्वातंत्र्यानंतर भूदान यज्ञाचा महान प्रयोग एकटय़ाच्या जिवावर केला. आत्मज्ञानही पूर्ण नसल्याने विज्ञानाप्रमाणे त्यातही कायम प्रयोग झाले पाहिजेत असे विनोबा म्हणत. विज्ञानयुगात व्यापक व कठीण समस्या वारंवार निर्माण होतील आणि त्यावर त्वरित निर्णय घेण्याची गरज असेल. यासाठी सात्त्विक निर्णयशक्ती विकसित व्हायला हवी. तेथे विज्ञानाला अध्यात्माची मदत होईल, असे त्यांचे प्रतिपादन होते. व्यवहारात गीता कशी उपयोगी पडते याचे रोकडे दर्शन टिळक, गांधी व विनोबा यांच्या जीवनात होते. अगदी व्यवहारी विचार केला तरी कत्तल व कायदा न वापरता भूदान यात्रेत गरिबांसाठी विनोबांनी रोज तीनशे एकर जमीन सरकारकडे जमा केली. याची किंमत टीकाकारांनी काढावी. ‘गीताई’च्या २६१ आवृत्त्या निघाल्या असून एकूण ४० लाख प्रतींची विक्री झाली आहे. विनोबांची अन्य पुस्तकेही जाहिरातीविना लाखोंनी खपतात. केवळ गीताईच्या स्वामित्वधनावर विनोबा कोटय़धीश झाले असते. पण हा आचार्य ‘कांचनमुक्त’ होता. कारण तो गीता आचरणात आणत होता.

Thursday, April 7, 2011

Geetai - Adhyay 18

Chapter - XVIII : Grace of God.

After the sermon in the fifteenth chapter, no new concepts are introduced. Sixteenth and Seventeenth chapter details the inner fight and the programme for the seeker. In this chapter, whatever we have learnt is being concluded.

First thing we learnt in Gita is that we have to act - keep on acting but surrender the fruit of our actions to God. These actions are of three types Satvic - which bring noble fruit, Rajasic - which gives mixed fruit of pleasure and pain, and Tamasic or fruitless activity / activity which bears painful fruit. Out of this, Shri Krishna advises that fruitless activity should be totally curbed and mixed fruit activity to be progressively purified by surrendering its fruit to God.

Resultant Satvic activity has also some defects, but this should not be given up. As inward purity grows, the effort in the action becomes less. From effort to gentleness, from gentleness to subtlety, from subtlety to nothingness, the activity tends to zero and action towards infinity.

After having said this, Sri Krishna tells Arjuna, You have heard with attention, all that I have been saying. Consider my words fully and do what you think right'. Thus Shri Krishna generously sets Arjuna free. In the same breath, in the next verse he says, 'Arjuna, give up everything and take refuge in Me'.
What does this mean? It means as long as there is Ego, there is danger in becoming free; let not any desire of your own arise in your heart. Be an observer of all the waves of desire. 'Not my, but HIS Will' - 'Not my but His Will'. "I" am not, "He" is. As you learn to subdue your ego thus, your 'Rajsik action ill become pure and what will be left will be infinite action without the 'doer'. Every action coming from God - making one a vehicle of His 'divine will' No 'I', No 'My' - all His. Starting with 'I' and frustration leading to no activity in the first chapter to destroying the illusion of 'I' in the second chapter, Gita progresses to the way of action, inward action to support outward action, leading to state of egoless activity in fifth chapter. Rest of the chapters mention the tools of concentration, devotion, surrender, cosmic vision etc. to support egoless activity, and last comes total surrender to obtain His Grace which is the final tool. 'His grace having been established, no effort is needed to remain pure. Purity becomes not only our second nature, but it becomes our first nature, our nature itself. This is the aim and end of Bhagvat-Gita.

गीताई अध्याय १८

[५५]

अर्जुन म्हणाला

संन्यासाचे कसे तत्त्व त्यागाचे हि कसे असे ।
मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती ।
फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग बोलती ॥ २ ॥

दोष-रूप चि ही कर्मे सोडावी म्हणती कुणी ।
न सोडावी चि म्हणती यज्ञ-दान-तपे कुणी ॥ ३ ॥

तरी ह्याविषयी ऐक माझा निश्चित निर्णय ।
त्याग जो म्हणती तो हि तिहेरी भेदला असे ॥ ४ ॥

यज्ञ-दान-तपे नित्य करणीय अवश्यक ।
न सोडावी चि ती होती ज्ञानवंतास पावक ॥ ५ ॥

परी ही पुण्य-कर्मे हि ममत्व फळ सोडुनी ।
करणे योग्य हा माझा जाण उत्तम निर्णय ॥ ६ ॥

नेमिले कार्य जे त्याचा संन्यास न जुळे चि तो ।
केला तसा जरी मोहे त्याग तामस बोलिला ॥ ७ ॥

कष्टामुळे चि जे कर्म सोडणे आंग राखुनी ।
त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ ॥ ८ ॥

करणे नेमिले कर्म कर्तव्य चि म्हणूनिया ।
ममत्व फळ सोडूनि त्याग तो मान्य सात्त्विक ॥ ९ ॥

कर्मी शुभाशुभी जेंव्हा राग-द्वेष न राखतो ।
सत्त्वांत मुरला त्यागी ज्ञने छेदूनि संशय ॥ १० ॥

अशक्य देहवंतास सर्वथा कर्म सोडणे ।
म्हणूनि जो फल-त्यागी तो त्यागी बोलिला असे ॥ ११ ॥

तिहेरी फळ कर्माचे बरे वाईट मिश्रित ।
त्याग-हीनास ते लाभे संन्यासी मुक्त त्यांतुनी ॥ १२ ॥

[५६]

ऐक तू मजपासूनि ज्ञात्यांचा कर्म-निर्णय ।
परभारे चि हे कर्म करिती पांच कारणे ॥ १३ ॥

अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने ।
वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे ॥ १४ ॥

काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी ।
धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे ॥ १५ ॥

तेथ जो शुद्ध आत्म्यास कर्ता मानूनि बैसला ।
संस्कार-हीन तो मूढ तत्त्व नेणे चि दुर्मति ॥ १६ ॥

नसे ज्यास अहंभाव नसे बुद्धीत लिप्तता ।
मारी विश्व जरी सारे न मारी चि न बांधिला ॥ १७ ॥

[५७]

ज्ञाता ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी कर्म-बीज हे ।
क्रिया करण कर्तृत्व कर्मांगे तीन त्यांतुनी ॥ १८ ॥

ज्ञाना-कर्मांत कर्त्यांत त्रिगुणी तीन भेद जे ।
रचिले ते कसे ऐक गुण-तत्त्वज्ञ वर्णिती ॥ १९ ॥

भूत-मात्रांत जे पाहे भाव एक सनातन ।
अभिन्न भेदलेल्यांत जाण ते ज्ञान सात्त्विक ॥ २० ॥

भेद-बुद्धीस पोषूनि सर्व भूतांत पाहते ।
वेगळे वेगळे भाव जाण ते ज्ञान राजस ॥ २१ ॥

एका देहांत सर्वस्व मानुनी गुंतले वृथा ।
भावार्थ-हीन जे क्षुद्र जाण ते ज्ञान तामस ॥ २२ ॥

नेमिले जे न गुंतूनि राग-द्वेष न राखतां ।
केले निष्काम-वृत्तीने कर्म ते होय सात्त्विक ॥ २३ ॥

धरूनि कामना चित्ती जे अहंकार-पूर्वक ।
केले महा खटाटोपे कर्म ते होय राजस ॥ २४ ॥

विनाश वेंच निष्पत्ति सामर्थ्य हि न पाहता ।
आरंभिले चि जे मोहे कर्म ते होय तामस ॥ २५ ॥

निःसंग निरहंकार उत्साही धैर्य-मंडित ।
फळो जळो चळे ना तो कर्ता सात्त्विक बोलिला ॥ २६ ॥

फल-कामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक ।
मारिता हर्ष-शोके तो कर्ता राजस बोलिला ॥ २७ ॥

स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी ।
दीर्घ-सूत्री सदा खिन्न कर्ता तामस बोलिला ॥ २८ ॥

बुद्धीचे भेद जे तीन धृतीचे हि तसे चि जे ।
गुणानुसार ते सारे सांगतो वेगवेगळे ॥ २९ ॥

अकर्तव्ये बंध-भय कर्तव्ये मोक्ष निर्भय ।
जाणे सोडू धरू त्यांस बुद्धि सात्त्विक ओळख ॥ ३० ॥

कार्याकार्य कसे काय काय धर्म अधर्म तो ।
जी जाणू न शके चोख बुद्धि राजस ओळख ॥ ३१ ॥

धर्म मानी अधर्मास अंधारे भरली असे ।
अर्थ जी उलटा देखे बुद्धि तामस ओळख ॥ ३२ ॥

जी इंद्रिये मन प्राण ह्यांचे व्यापर चालवी ।
समत्वे स्थिर राहूनि धृति सात्त्विक जाण ती ॥ ३३ ॥

धर्मार्थकाम सारे चि चालवी सोय पाहुनी ।
बुडवी जी फलाशेत धृति राजस जाण ती ॥ ३४ ॥

निद्रा भय न जी सोडी शोक खेद तसा मद ।
घाली झांपड बुद्धीस धृति तामस जाण ती ॥ ३५ ॥

तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐक ते ॥ ३६ ॥

अभ्यासे गोड जे होय दुःखाचा अंत दाखवी ।
जे कडू विख आरंभी अंती अमृत-तुल्य चि ।
आत्म्यांत शुद्ध बुद्धीस लाभले सुख सात्त्विक ॥ ३७ ॥

आरंभी गोडसे वाटे अंती मारक जे विख ।
भासे विषय-संयोगे इंद्रिया सुख राजस ॥ ३८ ॥

निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी ।
आरंभी परिणामी हि गुंगवी सुख तामस ॥ ३९ ॥

इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवादिकांत हि ।
काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणांतुनी ॥ ४० ॥

[५८]

ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली ।
स्वभाव-सिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरूनिया ॥ ४१ ॥

शांति क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह ।
ऋजुता आणि पावित्र्य ब्रह्म-कर्म स्वभावता ॥ ४२ ॥

शौर्य धैर्य प्रजा-रक्षा युद्धी हि अ-पलायन ।
दातृत्व दक्षता तेज क्षात्र-कर्म स्वभावता ॥ ४३॥

शेती व्यापार गो-रक्षा वैश्य-कर्म स्वभावता ।
करणे पडिली सेवा शूद्र-कर्म स्वभावता ॥ ४४ ॥

आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी ।
ऐक लाभे कसा मोक्ष स्व-कर्मी लक्ष लावुनी ॥ ४५ ॥

जो प्रेरी भूत-मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे ।
स्व-कर्म-कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो ॥ ४६ ॥

उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ ॥

सहज-प्राप्त ते कर्म न सोडावे सदोष हि ।
दोष सर्व चि कर्मांत राहे अग्नींत धूर तो ॥ ४८ ॥

राखे कुठे न आसक्ति जिंकूनि मन निःस्पृह ।
तो नैष्कर्म्य महा-सिद्धि पावे संन्यास साधुनी ॥ ४९ ॥

सिद्धीस लाभला ब्रह्म गांठी कोण्यापरी मग ।
ज्ञानाची थोर ती निष्ठा ऐक थोडयांत सांगतो ॥ ५० ॥

बुद्धि सात्त्विक जोडूनि धृतीचा दोर खेचुनी ।
शब्दादि-स्पर्श टाळूनि राग-द्वेषांस जिंकुनी ॥ ५१ ॥

चित्त वाचा तनू नेमी एकांती अल्प सेवुनी ।
गढला ध्यान-योगात दृढ वैराग्य लेउनी ॥ ५२ ॥

बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह ।
ममत्वासह सोडूनि शांतीने ब्रह्म आकळी ॥ ५३ ॥

ब्रह्म झाला प्रसन्नत्वे न करी शोक कामना ।
पावे माझी परा भक्ति देखे सर्वत्र साम्य जी ॥ ५४ ॥

भक्तीने तत्त्वता जाणे कोण मी केवढा असे ।
ह्यापरी मज जाणूनि माझ्यात मिसळे मग ॥ ५५ ॥

करूनि हि सदा कर्मे सगळी मज सेवुनी ।
पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत ॥ ५६ ॥

मज मत्पर-वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी ।
समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेव तू ॥ ५७ ॥

मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू ।
मीपणे हे न मानूनि पावशील विनाश चि ॥ ५८ ॥

म्हणसी मी न झुंजे चि हे जे मीपण घेउनी ।
तो निश्चय तुझा व्यर्थ स्वभाव करवील चि ॥ ५९ ॥

स्वभाव-सिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू ।
जे टाळू पाहसी मोहे अवश्य करिशील ते ॥ ६० ॥

राहिला सर्व भूतांच्या हृदयी परमेश्वर ।
मायेने चाळवी त्यांस जणू यंत्रांत घालुनी ॥ ६१ ॥

त्याते चि सर्व-भावे तू जाई शरण पावसी ।
त्याच्या कृपा-बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत ॥ ६२ ॥

असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज ।
ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ॥ ६३ ॥

सर्व गूढांतले गूढ पुन्हा उतम वाक्य हे ।
हितार्थ सांगतो ऐक फार आवडसी मज ॥ ६४ ॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज ।
प्रिय तू मिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्य ही ॥ ६५ ॥

सगळे धर्म सोडूनि एका शरण ये मज ।
जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू नको ॥ ६६ ॥

[६०]

न कथी हे कधी त्यास तपो-हीन अभक्त जो ।
श्रवणेच्छा नसे ज्यास माझा मत्सर जो करी ॥ ६७ ॥

सांगेल गूज हे थोर माझ्या भक्त-गणांत जो ।
तो त्या परम भक्तीने मिळेल मज निश्चित ॥ ६८ ॥

कोणी अधिक त्याहूनि माझे प्रिय करी चि ना ।
जगी आवडता कोणी न होय मज त्याहुनी ॥ ६९ ॥

हा धर्म-रूप संवाद जो अभ्यासील आमुचा ।
मी मानी मज तो पूजी ज्ञान-यज्ञ करूनिया ॥ ७० ॥

हे ऐकेल हि जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडुनी ।
पावेल कर्म-पूतांची तो हि निर्वेध सद्-गति ॥ ७१ ॥

तू हे एकाग्र चित्ताने अर्जुना ऐकिलेस की ।
अज्ञान-रूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा ॥ ७२ ॥

अर्जुन म्हणाला

मोह मेला चि तो देवा कृपेने स्मृति लाभली ।
झालो निःशंक मी आता करीन म्हणसी तसे ॥ ७३ ॥

संजय म्हणाला

असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत ।
थोरांचा ऐकिला तो मी नाचवी रोम रोम जो ॥ ७४ ॥

व्यास-देवे कृपा केली थोर योग-रहस्य हे ।
मी योगेश्वर कृष्णाच्या मुखे प्रत्यक्ष ऐकिले ॥ ७५ ॥

हा कृष्णार्जुन-संवाद राया अद्भुत पावन ।
आठवूनि मनी फार हर्षतो हर्षतो चि मी ॥ ७६ ॥

स्मरूनि बहु ते रूप हरीचे अति अद्भुत ।
राया विस्मित होऊनि नाचतो नाचतो चि मी ॥ ७७ ॥

योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर ।
तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव ॥ ७८ ॥

अध्याय अठरावा संपूर्ण

Tuesday, April 5, 2011

Geetai - Adhyay 17

Chapter - XVII : Programme for the Seeker

Vinoba says that only when our life proceeds within bounds and in a accepted, disciplined way that the mind can be free. The Sun is free and independent. He is regular. It is in this regularity that the essence of his freedom lies. Hence in this chapter Shri Krishna sets down a programme of action.

The programme of Yagna (Regeneration), Dana (Sharing with society) & Tapa (purification of body and mind) is described as the debt to the nature. Nature is pure and it is polluted by human beings; hence we have to regenerate by yagna (Regeneration). Regeneration is to replenish loss, and to purify things. Society has supported a part of our existence; we have to repay the debt. Dana (Charity) for various social purposes is repaying the debt. Rays of Sun in summer destroy a plenty of morbid matter on the earth and purify saline water of the sea to provide sweet water through rain. This is tapa which is also yagna or regeneration by removing or destroying impurities.

In fact three orders of nature, society and the body are not distinct. Society is not outside creation and not so the body. The creative effort we make, charity we give and japas we perform, all these can be called Yagna in the comprehensive sense. There is no question of receiving any fruit because we have already received this. What we have taken, we must now return. Through yagna (regeneration), we maintain equilibrium in nature, through dana (charity) in society and tapa (purification) in the body. Again Yagna, Dana and Tapa are divided into 'Satvik', Rajasik and Tamasik. If there is expectation of fruit in Yagna it is Rajavik; if it is fruitless it is Tamasik. Disorderly actions become lifeless. Into such actions Tamas enters. Through it, no noble thing can be created. From it no fruit will grow. Even though there is no desire for fruit in
performing 'yagna', it ought to yield noble fruit.

In this way, fruitful action purifies our mind and heart, same classification applies to Dana (charity) and Tapa (purity). When it is fruitful, it leads to Beauty & Grace which is the result of purity.


गीताई - अध्याय १७


अर्जुन म्हणाला

जे शास्त्र-मार्ग सोडूनि श्रद्धा-पूर्वक पूजिती ।
त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी ।
ऐक सात्त्विक ती होय तशी राजस तामस ॥ २ ॥

जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे ।
श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसा चि तो ॥ ३ ॥

सत्त्व-स्थ पूजिती देव यक्ष-राक्षस राजस ।
प्रेते आणि भुते-खेते पूजिती लोक तामस ॥ ४ ॥

शास्त्रे निषेधिले घोर दंभे आचरिती तप ।
अभिमानास पेटूनि काम-रागे बळावले ॥ ५ ॥

देह-धातूंस शोषूनि मज आत्म्यास पीडिती ।
विवेक-हीन जे त्यांची निष्ठा ती जाण आसुरी ॥ ६ ॥

[५३]

आहारांत हि सर्वांच्या तीन भेद यथा-रुचि ।
तसे यज्ञी तपी दानी सांगतो भेद ऐक ते ॥ ७ ॥

सत्त्व प्रीति सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी ।
रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्त्विक ॥ ८ ॥

खारे रूक्ष कडू तीख अम्ल अतुष्ण दाहक ।
दुःख-शोक-द आहार रोग-वर्धक राजस ॥ ९ ॥

रस-हीन निवालेले शिळे दुर्गंध-युक्त जे ।
निषिद्ध आणि उष्टे हि तामस-प्रिय भोजन ॥ १० ॥

फलाभिलाष सोडूनि कर्तव्य चि म्हणूनिया ।
विधीने मन लावूनि होय तो यज्ञ सात्त्विक ॥ ११ ॥

फळाचे अनुसंधान राखुनी दंभ-पूर्वक ।
लोकांत यजिला जाय जाण तो यज्ञ राजस ॥ १२ ॥

नसे विधि नसे मंत्र अन्नोत्पत्ति नसे जिथे ।
नसे श्रद्धा नसे त्याग बोलिला यज्ञ तामस ॥ १३ ॥

गुरू-देवादिकी पूजा स्वच्छता वीर्य-संग्रह ।
अहिंसा ऋजुता अंगी देहाचे तप बोलिले ॥ १४ ॥

हितार्थ बोलणे सत्य प्रेमाने न खुपेलसे ।
स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले ॥ १५ ॥

प्रसन्न-वृत्ति सौम्यत्व आत्म-चिंतन संयम ।
भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले ॥ १६ ॥

तिहेरी तप ते सारे श्रद्धा उत्कट जोडुनी ।
समत्वे फळ सोडूनि घडले जाण सात्त्विक ॥ १७ ॥

सत्कारादिक इच्छूनि केले जे दंभ राखुनी ।
ते चंचळ इथे जाण तप राजस अस्थिर ॥ १८ ॥

दुराग्रहे चि जे होय अंतरात्म्यास पीडुनी ।
किंवा जे पर-घातार्थ जाण तामस ते तप ॥ १९ ॥

देशी काळी तसे पात्री उपकार न इच्छिता ।
धर्म-भावे चि जे देणे जाण ते दान सात्त्विक ॥ २० ॥

उपकार अपेक्षूनि अथवा फळ वांछुनी ।
क्लेश-पूर्वक जे देणे जाण ते दान राजस ॥ २१ ॥

करूनि भावना तुच्छ देशादिक न पाहता ।
अनादरे चि जे देणे जाण ते दान तामस ॥ २२ ॥

[५४]

ॐ-तत्-सत् ह्यापरी ब्रह्म तिहेरी स्मरले असे ।
त्यांतूनि निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक ॥ २३ ॥

म्हणूनि आधी ॐकार उच्चारूनि उपासक ।
यज्ञ-दान-तपे उक्त निरंतर अनुष्ठिती ॥ २४ ॥

तत्-कार-स्मरणे सर्व तोडूनि फल-वासना ।
नाना यज्ञ तपे दाने करिती मोक्ष लक्षुनी ॥ २५ ॥

सत्-कार-स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता ।
तशी सुंदरता कर्मी सत्-कारे बोलिली असे ॥ २६ ॥

यज्ञ-दान-तपे किंवा कर्मे जी त्यांस साधक ।
वागणे ह्यापरी त्यांत सत्-कार-फळ बोलिले ॥ २७ ॥

यज्ञ दाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली ।
बोलिली सर्व ती मिथ्या दोन्ही लोकांत निष्फळ ॥ २८ ॥

अध्याय सतरावा संपूर्ण

Sunday, April 3, 2011

Geetai - Adhyay 16

Chapter - XVI: The conflict between Divine and Demon.

Fifteenth chapter completes the purpose of Gita i.e., how to come out of human weaknesses, establish firm support by worshiping ashtadeva or Purushottama and that by offering ever changing ever new modes of worship. However, before the sun rises, light starts spreading, similarly a little before the seeker starts on the path the dawn of good qualities starts shining.

This chapter describes the qualities needed to be perfected in the life of accomplished seeker and also describes the darkness with which seeker has to fight before getting established. In essence it describes the conflict between the divine and the demonic qualities. Kurukshetra is both outside us and within us. When we observe it carefully, it is the battle raging within that we see assuming shape in the world without. To speak the truth, the battle is only within ourselves.

As there are good qualities on one side and bad qualities on the other, both the armies are well arranged. Commander of good qualities is 'abhaya' or fearlessness. Fearlessness has been given first place in a long list of twenty-six qualities. This is not an accident. In a atmosphere charged with fear, good qualities cannot grow. While in front fearlessness stands alert, humility guards the rear. This is an excellent arrangement. If we have first twenty five qualities mentioned in this chapter but no humility, 'ahamkar' or Ego principle will attack the army from the back and destroy it. In the absence of humility, there is no knowing when victory will turn into defeat, other qualities between fearlessness and humility are compassion, tenderness, forgiveness, serenity, patience, non- violence, loyalty etc.

On the other side, there is an army of ignorance, vanity, power and wealth. Under the effect of these negative qualities, one says that 'I am the only person fit to hold all the wealth of the world. The whole world should come under my control'. Desire, anger and greed are the sources from where negative qualities multiply. Way out is the control of the senses. This is the path laid down by 'Shashtras'. 'Shashtras' are made up of the experience of the saints gained through their efforts. Hence to overcome negativities, 'Self-control' as advised by 'Shashtras' is inevitable.

Waging this incessant war between divine and demonic qualities, there may be temporary defeats in the battle but in the end, war is won by the divine qualities. Hence doing good to the world is to show the man-kind the pure and beautiful path of virtue. Thus demonstrating victory of divine over the evil forces.

गीताई - अध्याय १६

श्री भगवान् म्हणाले

निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानी सुनिश्चय ।
यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥

अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।
अ-लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥ २ ॥

पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता ।
हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ति घेउनी ॥ ३ ॥

दंभ मीपण अज्ञान क्रोध दर्प कठोरता ।
लाभती गुण हे त्यास ज्याची संपत्ति आसुरी ॥ ४ ॥

सुटका करिते दैवी आसुरी बंध घालिते ।
भिऊ नको चि आलास दैवी संपत्ति जोडुनी ॥ ५ ॥

[५०]

भूत-सृष्टि जगी दोन दैवी आणिक आसुरी ।
विस्तारे वर्णिली दैवी आसुरी ऐक सांगतो ॥ ६ ॥

कृत्याकृत्य कसे काय नेणती आसुरी जन ।
न स्वच्छता न आचार जाणती ते न सत्य हि ॥ ७ ॥

म्हणती लटिके विश्व निराधार निरीश्वर ।
काम-मूलक हे सारे कोठले सह-कार्य ते ॥ ८ ॥

स्वीकारूनि अशी दृष्टि नष्टात्मे ज्ञान-हीन ते ।
जगताच्या क्षयासाठी निघाले रिपु हिंसक ॥ ९ ॥

काम दुर्भर सेवूनि मानी दांभिक माजले ।
दुराग्रह-बळे मूढ करिती पाप निश्चये ॥ १० ॥

अपार धरिती चिंता जी मेल्या हि सरे चि ना ।
गढले काम-भोगात जणू सर्वस्व मानुनी ॥ ११ ॥

आशेचे लेइले फांस काम-क्रोधांत तत्पर ।
भोगासाठी अधर्माने इच्छिती धन-संचय ॥ १२ ॥

हे आज लाभले आता तो जोडीन मनोरथ ।
हे आहे ते हि होईल माझे चि सगळे धन ॥ १३ ॥

मी मारिला चि तो शत्रु मारीन दुसरे हि जे ।
मी स्वामी आणि मी भोक्ता सुखी मी सिद्ध मी बळी ॥ १४ ॥

कुलीन मी चि संपन्न माझी जोडी कुठे असे ।
यज्ञ-दान-विलासी मी जल्पती अज्ञ मोहित ॥ १५ ॥

भ्रमले चित्त भेदूनि मोह-जालांत गुंतले ।
पडती विषयासक्त नरकांत अमंगळ ॥ १६ ॥

स्वयं-पूजित गर्विष्ठ धने माने मदांध ते ।
नावाचे करिती यज्ञ दंभाने अव्यवस्थित ॥ १७ ॥

अहंकारे बळे दर्पे काम-क्रोधे भरूनिया ।
माझा स्व-पर-देहांत करिती द्वेष मत्सरी ॥ १८ ॥

द्वेषी क्रूर असे पापी संसारी हीन जे जन ।
त्यांस मी टकितो नित्य तशा योनीत आसुरी ॥ १९ ॥

जोडूनि आसुरी योनि जन्मजन्मांतरी मग ।
माते न मिळता जाती उत्तरोत्तर खालती ॥ २० ॥

[५१]

काम क्रोध तसा लोभ आत्म-नाशास कारण ।
तीन ही नरक-द्वारे टाळावी चि म्हणूनिया ॥ २१ ॥

तमाची ही तिन्ही द्वारे टाळूनि सुटला मग ।
कल्याण-मार्ग सेवूनि पावे उत्तम तो गति ॥ २२ ॥

जो शास्त्र-मार्ग सोडूनि करितो स्वैर वर्तन ।
न सिद्धि लाभते त्यास न वा सुख न सद्-गति ॥ २३ ॥

म्हणूनि आदरी शास्त्र कार्याकार्य कळावया ।
शास्त्राचे वाक्य जाणूनि इथे तू कर्म आचरी ॥ २४ ॥

अध्याय सोळावा संपूर्ण

Friday, April 1, 2011

Geetai - Adhyay 15

Chapter - XV : Completeness of Vision.

In this chapter, all the ideas of the Gita find their fulfilment. Shri Krishna calls
this particular Chapter 'Shashtra '- a scripture because in this chapter science and philosophy of life that have been taught till now find completion. The function of Vedas is to awaken in man awareness of his own power to know everything, guide everything. This is called 'Parmartha : Because this is done in this chapter it has been called 'Yedasaara' the essence of the Veda

In the last chapter, Shri Krishna says that for Self-realisation, Bhakti is the ultimate tool; without it realisation is not possible. This chapter starts with the description of the world as mighty tree with huge branches nourished by three 'gunas'. This tree is to be cut with the axe of desirelessness and detachment. With Bhakti or devotion this effort becomes easy. This devotion is a blend of action, love, and knowledge. All difficulties on the path of realisation get converted to pleasure with the touch of this devotion.

Differentiated concept of Purushottama - the Supreme Self which Sri Krishna is, the individual self which is non-perishable and has to be realised and tools of Bhakti or devotion which are perishable are dealt with here. There is deep significance in the perishable nature of the tools. This is not the fault of the creation; it is its glory. Because of this, creation is ever new. Yesterday's flowers will not do for to-day's worship. New flowers are required and are available. In the same way new bodies will be provided every now and then to give freshness and life to the worship. Because the body is transient, it is beautiful. Because the instruments are ever new, the enthusiasm for worship grows; the habit of service develops. This is the essence of 'Bhakti ' or devotion.

This conceptual reality of Purushottama or Supreme Self to whom our ego can surrender so that purusha or self within us can awaken and ultimately be realised. The ever new, ever changing tool of worship is a necessity from the beginning to the end of the path. However worship does not mean only offering flowers and consecrated rice or Vermillion (Kumkum). This is there but it is to be supported by our day-to-day actions. To keep house-hold utensils clean and polished is a worship. To clean a lamp is also a worship. To whet the scythe and make it ready for reaping is a worship. To lubricate the rusty hinge of the door, this is worship too. All our actions from morning to evening - all are worship of the God. To a king of scriptures like Gita, a daily half our worship or puja yields no satisfaction. Its keen desire is that the whole of life should be filled with the Lord and be a form worship. And this worship is to surrender our 'I' at the feet of Supreme reality 'Purshottama ' so that we ultimately transform ourselves from perishable to imperishable 'Self- the 'Purusha'.


गीताई - अध्याय १५

श्री भगवान् म्हणाले

खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला ।
ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥

वरी हि शाखा फुटल्या तयास ।
ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ॥
खाली हि मूळे निघती नवीन ।
दृढावली कर्म-बळे नृ-लोकी ॥ २ ॥

ह्याचे तसे रूप दिसे न येथे ।
भासे न शेंडा बुडखा न खांदा ॥
घेऊनि वैराग्य अभंग शस्त्र ।
तोडूनिया हा दृढ-मूल वृक्ष ॥ ३ ॥

घ्यावा पुढे शोध तया पदाचा ।
जेथूनि मागे फिरणे नसे चि ॥
द्यावी बुडी त्या परमात्म-तत्त्वी ।
प्रवृत्ति जेथे स्पुरली अनादी ॥ ४ ॥

जो मान-मोहांस संग-दोष ।
जाळूनि निर्वासन आत्म-निष्ठ ॥
द्वंद्वे न घेती सुख-दुःख-मूळ ।
ते प्राज्ञ त्या नित्य पदी प्रविष्ट ॥ ५ ॥

न त्यास उजळी सूर्य कायसे अग्नि-चंद्र हे ।
जेथ गेला न परते माझे अंतिम धाम ते ॥ ६ ॥

[४६]

माझा चि अंश संसारी झाला जीव सनातन ।
पंचेंद्रिये मनोयुक्त प्रकृतींतूनि खेचितो ॥ ७ ॥

पुष्पादिकांतुनी वारा गंध खेचूनि घेतसे ।
तशी घेऊनि ही सर्व देह सोडी धरी प्रभु ॥ ८ ॥

श्रोत्र जिह्वा त्वचा चक्षु घ्राण आणिक ते मन ।
ह्या सर्वांस अधिष्ठूनि ते ते विषय सेवितो ॥ ९ ॥

सोडितो धरितो देह भोगितो गुण-युक्त हा ।
परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती ॥ १० ॥

योगी यत्न-बळे ह्यास पाहती हृदयी स्थित ।
चित्त-हीन अशुद्धात्मे प्रयत्ने हि न पाहती ॥ ११ ॥

[४७]

सूर्यात जळते तेज जे विश्व उजळीतसे ।
तसे चंद्रात अग्नीत जाण माझे चि तेज ते ॥ १२ ॥

आकर्षण-बळे भूते धरा-रूपे धरीतसे ।
वनस्पतींस मी सोम पोषितो भरिला रसे ॥ १३ ॥

मी वैश्वानर-रूपाने प्राणि-देहांत राहुनी ।
अन्ने ती पचवी चारी प्राणापानांस फुंकुनी ॥ १४ ॥

सर्वांतरी मी करितो निवास ।
देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा ॥
समग्र वेदांस हि मी चि वेद्य ।
वेद-ज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता ॥ १५ ॥

[४८]

लोकी पुरूष ते दोन क्षर आणिक अक्षर ।
क्षर सर्व चि ही भूते स्थिर अक्षर बोलिला ॥ १६ ॥

म्हणती परमात्मा तो तिजा पुरूष उत्तम ।
विश्व-पोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय ॥ १७ ॥

मी क्षरा-अक्षराहूनि वेगळा आणि उत्तम ।
वेद लोक म्हणे माते म्हणूनि पुरूषोत्तम ॥ १८ ॥

मोह सारूनि जो दूर जाणे मी पुरूषोत्तम ।
सर्व-ज्ञ तो सर्व-भावे सर्व-रूपी भजे मज ॥ १९ ॥

अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुज बोलिलो ।
हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृत-कृत्य चि ॥ २०॥

अध्याय पंधरावा संपूर्ण

Wednesday, March 30, 2011

Geetai - Adhyay 14

Chapter - XIV : Building-up and Breaking-down.

This chapter is essentially a supplement to thirteenth, Self and the Non-self. Here, there is an analysis of non-self. Entire material body including mind- intellect consciousness and ego-system consists of subtle particles and electrical charges broadly divided into Gross called Tamas. Subtle called - Rajas and subtler one called sattva or pure manifestation. These three modes of nature are called Gunas.

Chief characteristic of Tamas is Laziness - inability to do anything fruitful. It is an enemy which destroys peace and happiness of individual and society. It corrupts every one from the lowest to the highest. When the body is lazy, the mind and the intellect are lazy too. Under the effect of Tamas (Laziness), men grow rusty and useless; the limbs and senses of the rich are eaten with rust because they are never used.

Educated and intelligent men become victims of various diseases because under the effect of Tamas, they never do any physical work To shake off laziness, one must perform bodily labour. This is the only way to conquer laziness. If we fail to do this, we cannot but receive due punishment from Nature. We have to endure it in the form of sickness and other miseries. The time spent on the bodily labour is not wasted. It does yield result. We have sound health. Our minds become bright and keen and pure This is one of the methods to overcome the Tamas or Laziness.

Chief characteristic of Rajas or hyper-activity is desire to do all sorts of things - a limitless desire for action with all consuming greed. As a result, we are unable to control the rush of our instincts and passions. Another sign of Rajas is absence of steadiness. The man of Rajas is ever busy taking up and abandoning things. All actions under its effect are restless and uncertain. The way to come out of restlessness is to combine action with inward effort. This results in inner purity. Keep on acting constantly and surrender the fruit of action to God. Acting this way, slowly Rajas is destroyed. It is necessary to destroy this demon of every rising greed and desires. This is the Karma-yoga of Gita.

If these two are conquered, we are left with Satva or a pure state of our existence - peaceful and bright, full of creative energy. However, even this is to be conquered not by killing but by wounding. Constantly making an effort to remain in this state, it becomes our nature to remain pure. Pride of purity slowly goes away. Any negligence by the seeker due to pride in this state, is likely to drag him down to the state of hyper-activity and further down to laziness. Constant vigilance till it becomes our nature to remain pure is an absolute necessity of this state.

Thereafter, the seeker tries to cross-over the material self consisting of all these three modifications. The tool here is to seek His grace with all the heart. It does come. Having reached this state, no further effort is required to remain pure.

गीताई - अध्याय १४
श्री भगवान् म्हणाले

सर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।
जे जाणूनि इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥

ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे ।
जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥

माझे प्रकृति हे क्षेत्र तिथे मी बीज पेरितो ।
त्यांतूनि सर्व भूतांची उत्पत्ति मग होतसे ॥ ३ ॥

सर्व योनींमधे मूर्ति जितुक्या जन्म पावती ।
माता प्रकृति ही त्यांस पिता मी बीज पेरिता ॥ ४ ॥

प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व-रजस्-तम ।
ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती ॥ ५ ॥

त्यांत निर्मळ ते सत्त्व ज्ञान आरोग्य वाढवी ।
मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी ॥ ६ ॥

रज ते वासना-रूप तृष्णा आसक्ति वाढवी ।
आत्म्यास कर्म-संगाने टाकिते जखडूनि ते ॥ ७ ॥

गुंगवी तम सर्वांस अज्ञान चि विरूढले ।
झोप आळस दुर्लक्ष ह्यांनी घेरूनि बांधिते ॥ ८ ॥

सुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते ।
ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम ॥ ९ ॥

अन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ ।
असे चढे कधी सत्त्व कधी रज कधी तम ॥ १० ॥

प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे ।
देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ ११ ॥

प्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता ।
ही देही उठती तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १२ ॥

अंधार मोह दुर्लक्ष अपप्रवृत्ति चहूकडे ।
देहांत माजली तेंव्हा जाणावे तम वाढले ॥ १३ ॥

वाढले असता सत्त्व जाय जो देह सोडुनी ।
जन्मतो शुभ लोकांत तो ज्ञात्यांच्या समागमी ॥ १४ ॥

रजांत लीन झाला तो कर्मासक्तांत जन्मतो ।
तमी बुडूनि गेला तो मूढ-योनीत जन्मतो ॥ १५ ॥

फळ सात्त्विक कर्माचे पुण्य निर्मळ बोलिले ।
रजाचे फळ ते दुःख तमाचे ज्ञान-शून्यता ॥ १६ ॥

सत्त्वांतूनि निघे ज्ञान निघे लोभ रजांतुनी ।
अज्ञान मोह दुर्लक्ष निघती ही तमांतुनी ॥ १७ ॥

सत्त्व-स्थ चढती उंच मध्ये राजस राहती ।
हीन-वृत्तीत वागूनि जाती तामस खालती ॥ १८ ॥

गुणांविण नसे कर्ता आत्मा तो त्यांपलीकडे ।
देखणा ओळखे हे जो होय माझे चि रूप तो ॥ १९ ॥

देह-कारण हे तीन गुण जाय तरूनि जो ।
जन्म-मृत्यु-जरा-दुःखी सोडिला मोक्ष गांठतो ॥ २० ॥

[४४]

अर्जुन म्हणाला

त्रिगुणातीत जो देवा त्याचे लक्षण काय ते ।
वागणूक कशी त्याची कसा तो गुण निस्तरे ॥ २१ ॥

श्री भगवान् म्हणाले

प्रकाश मोह उद्योग गुण-कार्ये निसर्गता ।
पावतां न करी खेद न धरी आस लोपतां ॥ २२ ॥

राहे जसा उदासीन गुणांनी जो न चाळवे ।
त्यांचा चि खेळ जाणूनि न डोले लेश-मात्र हि ॥ २३ ॥

आत्मत्वे सम जो पाहे सोने पाषाण मृत्तिका ।
धैर्यवंत सुखे दुःखे स्तुति-निंदा प्रियाप्रिय ॥ २४ ॥

मानापमान जो नेणे नेणे जो शत्रु-मित्र हि ।
आरंभ सोडिले ज्याने तो गुणातीत बोलिला ॥ २५ ॥

जो एक-निष्ठ भक्तीने अखंड मज सेवितो ।
तो ह्या गुणांस लंघूनि शके ब्रह्मत्व आकळू ॥ २६ ॥

ब्रह्मास मी चि आधार अवीट अमृतास मी ।
मी चि शाश्वत धर्मास आत्यंतिक सुखास मी ॥ २७ ॥

अध्याय चौदावा संपूर्ण

Friday, March 25, 2011

Geetai - Adhyay 13

Chapter - XIII : The Self and the Non-self.

Here the most important aid to Swadharma - a discriminating insight - to separate the bran from the wheat or smelting gold from the ore - is discussed and the steps are shown how to get the gold and remove the impurities. For this Vinoba gives the example of Coconut where the hard exterior shell is to be broken to reach and taste the pulp. Similarly to taste the sweet juicy pulp of jack-fruit, the rough sharp exterior has to be carefully removed.

There is a clear message here for inward journey. One must understand that 'I' am altogether distinct from the body, separate entirely beautiful, bright, holy and free from even a trace of imperfection. As we proceed inward the self illuminates the body and puts joy, power, fearlessness self-control etc. As we move inwards, attachment to the body slowly decreases, one experiences genuine freedom and power. No true safety is possible so long as there is attachment to body and consequent fear.

In this inward journey, we progressively experience God - first as an impartial witness. When the life of morality begins, He encourages us when good things take place through us. During further inward journey. When the devotee discovers that his own efforts are inadequate to cleanse the subtle impurities of his mind, when he is on the point of break-down, He becomes the Helper of the helpless and rushes to his aid. After that we see that He also is the enjoyer of the fruit of action. His presence only makes us experience the sweetness of the fruit. From this point we start experiencing our divinity. When our ego surrenders totally to the inner self- the inner master - we reach the ultimate goal. During this long, arduous, at times risky and dangerous inner journey, the tools which are helpful and therefore essential are action and devotion ultimately blending into action with devotion.

Vinoba says to achieve this firm foundation of morality is indispensable. We should discriminate between essential and non-essential and hold fast to the essential. This discriminating experience which is called 'jnana' or realisation should pervade every fibre of our body. It should flow through one's heart. It should express itself through the hands and the feet, the eyes and the ears. One should attain a state when all the organs of perception and action work with this consciousness. Out symptoms of this realisation have been narrated by twenty virtues like humility, sincerity, non-violence, straightforwardness, forgiveness etc. The substance is that we should make our lives grow more and more by distinguishing the body from the spirit and thus feel ourselves with the
presence of God within.

गीताई - अध्याय १३

[४०]

श्री भगवान् म्हणाले

अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते ।
जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र-ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥

क्षेत्र-ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे ।
क्षेत्र-क्षेत्रज्ञ-भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे ॥ २ ॥

क्षेत्र कोण कसे त्यात विकार कुठले कसे ।
क्षेत्र-ज्ञ तो कसा कोण ऐक थोड्यांत सांगतो ॥ ३ ॥

ऋषींनी भिन्न मंत्रांत गाईले हे परोपरी ।
वर्णिले ब्रह्म-वाक्यांत सप्रमाण सुनिश्चित ॥ ४ ॥

पंच भूते अहंकार बुद्धि अव्यक्त मूळ जे ।
इंद्रिये अकरा त्यांस खेचिते अर्थ-पंचक ॥ ५ ॥

इच्छा द्वेष सुखे दुःखे धृति संघात चेतना ।
विकार-युक्त हे क्षेत्र थोड्यांत तुज बोलिलो ॥ ६ ॥

नम्रता दंभ-शून्यत्व अहिंसा ऋजुता क्षमा ।
पावित्र्य गुरू-शुश्रूषा स्थिरता आत्म-संयम ॥ ७ ॥

निरहंकारता चित्ती विषयांत विरक्तता ।
जन्म-मृत्यु-जरा-रोग-दुःख-दोष-विचारणा ॥ ८ ॥

निःसंग-वृत्ति कर्मात पुत्रादींत अलिप्तता ।
प्रिय-अप्रिय लाभांत अखंड सम-चित्तता ॥ ९ ॥

माझ्या ठाई अनन्यत्वे भक्ति निष्काम निश्चळ ।
एकांताविषयी प्रीती जन-संगांत नावड ॥ १० ॥

आत्म-ज्ञानी स्थिर श्रद्धा तत्त्वता ज्ञेय-दर्शन ।
हे ज्ञान बोलिले सारे अज्ञान विपरीत जे ॥ ११ ॥

ज्ञेय ते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्व चि ।
अनादि जे पर-ब्रह्म आहे नाही न बोलवे ॥ १२ ॥

सर्वत्र दिसती ज्यास हात पाय शिरे मुखे ।
कान डोळे हि सर्वत्र सर्व झाकूनि जे उरे ॥ १३ ॥

असूनि इंद्रियांतीत त्यांचे व्यापार भासवी ।
न स्पर्शता धरी सर्व गुण भोगूनि निर्गुण ॥ १४ ॥

जे एक आंत-बाहेर जे एक चि चराचर ।
असूनि जवळी दूर सूक्ष्मत्वे नेणवे चि जे ॥ १५ ॥

भूत-मात्री न भेदूनि राहिले भेदल्यापरी ।
भूतांस जन्म दे पाळी गिळी जे शेवटी स्वये ॥ १६ ॥

जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले ।
ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे ॥ १७ ॥

संक्षेपे वर्णिले क्षेत्र ज्ञान ज्ञेय तसे चि हे ।
जाणूनि भक्त जो माझा माझे सायुज्य मेळवी ॥ १८ ॥

[४१]

प्रकृती-पुरूषाची ही जोडी जाण अनादि तू ।
प्रकृतीपासुनी होती विकार गुण सर्व हि ॥ १९ ॥

देहेंद्रियांचे कर्तृत्व बोलिले प्रकृतीकडे ।
दुःखा-सुखाचे भोक्तृत्व बोलिले पुरूषाकडे ॥ २० ॥

बांधिला प्रकृतीने तो तिचे ते गुण भोगितो ।
गुण-संगामुळे ह्यास घेणे जन्म शुभाशुभ ॥ २१ ॥

सर्व-साक्षी अनु-ज्ञाता भर्ता भोक्ता महेश्वर ।
म्हणती परमात्मा हि देही पुरूष तो पर ॥ २२ ॥

पुरूषाचे असे रूप प्रकृतीचे गुणात्मक ।
जाणे कसा हि तो राहो न पुन्हा जन्म पावतो ॥ २३ ॥

ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी ।
सांख्य-योगे तसे कोणी कर्म-योगे हि आणिक ॥ २४ ॥

स्वये नेणूनिया कोणी थोरांपासूनि ऐकिती ।
तरती ते हि मृत्यूस श्रद्धेने वर्तुनी तसे ॥ २५ ॥

[४२]

उत्पन्न होतसे लोकी जे जे स्थावर-जंगम ।
क्षेत्र-क्षेत्रज्ञ-संयोगे घडिले जाण सर्व ते ॥ २६ ॥

समान सर्व भूतांत राहिला परमेश्वर ।
अनाशी नाशवंतांत जो पाहे तो चि पाहतो ॥ २७ ॥

जो पाहे प्रभु सर्वत्र भरला सम तो स्वये ।
आत्म्याची न करी हिंसा गति उत्तम मेळवी ॥ २८ ॥

प्रकृतीच्या चि तंत्राने कर्मे होतात सर्व हि ।
आत्मा तो न करी काही हे पाहे तो चि पाहतो ॥ २९ ॥

एकत्वी जोडिले पाहे भूतांचे वेगळेपण ।
त्यामधूनि चि विस्तार तेंव्हा ब्रह्मत्व लाभले ॥ ३० ॥

परमात्मा न वेचे चि की निर्गुण अनादि हा ।
राहे देही परी काही न करी न मळे चि तो ॥ ३१ ॥

सर्व व्यापूनि आकाश सूक्ष्मत्वे न मळे जसे ।
सर्वत्र भरला देही आत्मा तो न मळे तसा ॥ ३२ ॥

एकला चि जसा सूर्य उजळी भुवन-त्रय ।
तसा क्षेत्रज्ञ तो क्षेत्र संपूर्ण उजळीतसे ॥ ३३ ॥

पाहती ज्ञान-दृष्टीने क्षेत्र-क्षेत्रज्ञ-भेद हा ।
भूत-प्रकृति लंघूनि ते ब्रह्म-पद पावती ॥ ३४ ॥

अध्याय तेरावा संपूर्ण

Thursday, March 24, 2011

Geetai - Adhyay 12

Chapter - XII : Devotion with and without Form.

In this chapter, Arjuna asks the question that there are two types of devotees - one who worship the image to grasp and experience spiritual thought and the other grasp the thought directly and act accordingly in search of an experience. Which of the two is better? Vinobaji says that question of Arjuna is similar to asking the mother - which of your two sons are dearer to you? What can the poor mother reply? If at all a reply is pressed for, she would say the younger son because he needs the presence of mother more than the elder one. Similar answer is given by Shri Krishna that if at all answer is needed, one with form is closer to me.

Vinobaji has illustrated this answer by referring to the famous epic 'Ramayana'. When Rama is going to the forest for fourteen years, his younger brother Laxman pleads that he too wants to accompany him. When Rama disuades him not to do so by an argument, Laxmana puts stop to the argument like this 'O Rama I have grown up nourished by your love. I am only a child. I cannot bear the burden of living here without you.' He accompanies Rama for 14 years. This is worship with form or image.

However, Tulsidasji describes that when Rama left for forest, Bharat his other younger brother was not in Ayodhya. When he reached home, his father had died and Royal Guru Vashishtha advises him to assume the rule of the state. But Bharata answers that 'first I must see Rama before I decide this question. He makes arrangements for running the administration. His line of thinking is 'Kingdom belongs to Rama. To arrange for the administration is like doing Rama's work. Devotion to Rama means carrying out his work; else what good is the devotion? This is the devotion without form.

This classical example of Formless Devotion ends with following dialogue between the brothers Bharat says, 'Rama my Lord, I shall humbly do your bidding. Whatever you say, r shall not doubt or question. But as he prepares to leave, he turns to Rama and says, Sir, my heart is yet unreconciled. I feel as if I have lost something. 'Rama at once understood his yearning and gave him one of his personal effects as symbol in place of Rama. Though Bharata was firm in his loyalty to duty and principle, he too needed the living warmth of the symbol. This is Devotion without Form.

The chapter ends with following words from Shree Krishna 'Arjuna, it does not matter whether you are devotee with or without form. More important is to become a devotee with all your heart.

गीताई - अध्याय १२

[३७]

अर्जुन म्हणाला

असे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती ।
कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

रोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।
श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥ २ ॥

परी अचिंत्य अव्यक्त सर्व-व्यापी खुणेविण ।
नित्य निश्चळ निर्लिप्त जे अक्षर उपासती ॥ ३ ॥

रोधिती इंद्रिये पूर्ण सर्वत्र सम जाणुनी ।
माझ्या कडे चि ते येती ज्ञानी विश्व-हिती रत ॥ ४ ॥

अव्यक्ती गोविती चित्त क्लेश त्यांस विशेष चि ।
देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडे चि ना ॥ ५ ॥

परी जे सगळी कर्मे मज अर्पूनि मत्पर ।
अनन्य भक्ति-योगाने भजती चिंतुनी मज ॥ ६ ॥

माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्र चि मी स्वये ।
संसार-सागरांतूनि काढितो मृत्यु मारुनी ॥ ७ ॥

[३८]

मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू ।
म्हणजे मग निःशंक मी चि होशील तू स्वये ॥ ८ ॥

जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर ।
तरी अभ्यास-योगाने इच्छूनि मज मेळवी ॥ ९ ॥

अभ्यास हि नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी ।
मिळेल तुज ती सिद्धि मत्कर्म हि करूनिया ॥ १० ॥

न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी ।
तरी सर्व चि कर्माचे प्रयत्ने फळ सोड तू ॥ ११ ॥

प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे ।
मग पूर्ण फल-त्याग शीघ्र जो शांति देतसे ॥ १२ ॥

कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी ।
मी माझे न म्हणे सोशी सुख-दुःखे क्षमा-बळे ॥ १३ ॥

सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ-निश्चयी ।
अर्पी मज मनो-बुद्धि भक्त तो आवडे मज ॥ १४ ॥

जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते ।
हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज ॥ १५ ॥

नेणे व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निःस्पृह ।
सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज ॥ १६ ॥

न उल्लासे न संतापे न मागे न झुरे चि जो ।
बरे वाईट सोडूनि भजे तो आवडे मज॥ १७ ॥

सम देखे सखे वैरी तसे मानापमान हि ।
शीत उष्ण सुखे दुःखे करूनि सम मोकळा ॥ १८ ॥

निंदा स्तुति न घे मौनी मिळे ते गोड मानितो ।
स्थिर-बुद्धि निराधार भक्त तो आवडे मज ॥ १९ ॥

जे धर्म-सार हे नित्य श्रद्धेने मी चि लक्षुनी ।
सेविती ते तसे भक्त फार आवडती मज ॥ २० ॥

अध्याय बारावा संपूर्ण

Tuesday, March 22, 2011

Geetai - Adhyay 11

Chapter - XI : The Vision of the Cosmic Form.

In this chapter the Lord reveals His visible form and so His Grace. Arjuna said "Lord, I wish behold with these eyes your complete form, the form in which is manifest all the power of your glory, what he really prayed for was the vision of cosmic form was to see all at once the Omnipresent Lord, who pervaded all time past, present and future and all space here, above, below and everywhere.

Vinoba says verses describing the cosmic form of God cannot be commented. We can only recite the verses describing it and cleanse the mind of sin, purify it only at one point Lords tells Arjuna that this cosmic form cannot be grasped permanently until you dissolve the Ego and become the instrument in the hands of God for all your actions. To achieve this, the qualifying characteristics are : "He who bears enmity towards none, he who stands impartial and is free from attachment, and serves me selflessly, he who dedicates to me all that he does, he who is filled with devotion to me, all enduring, free of passion and desire, full of love, such a devotee becomes an instrument in the hands of the Lord, This is the essence of Gita's teaching."

गीताई - अध्याय ११
[३३]

अर्जुन म्हणाला

करूनि करूणा माझी बोलिलास रहस्य जे ।
त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥

उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर ।
कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥

तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे ।
ते चि मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरूषोत्तमा ॥ ३ ॥

तू जरी मानिसी शक्य मज ते रूप पाहणे ।
तरी योगेश्वरा देवा दाखवी ते चि शाश्वत ॥ ४ ॥

श्री भगवान् म्हणाले

पहा दिव्य तशी माझी रूपे शत-सहस्र तू ।
नाना प्रकार आकार वर्ण ज्यात विचित्र चि ॥ ५ ॥

वसु वायु पहा रुद्र तसे आदित्य अश्विनी ।
पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी न पाहिली ॥ ६ ॥

इथे आज पहा सारे विश्व तू सचराचर ।
माझ्या देहांत एकत्र इच्छा-दर्शन हे तुज ॥ ७ ॥

परी तू चर्म-चक्षूने पाहू न शकसी मज ।
घे दिव्य दृष्टि ही माझा ईश्वरी योग तू पहा ॥ ८ ॥

संजय म्हणाला

महा-योगेश्वरे कृष्णे राया बोलूनि ह्यापरी ।
दाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी ॥ ९ ॥

बहु डोळे मुखे ज्यांत दर्शने बहु अद्भुत ।
बहु दिव्य अलंकार सज्ज दिव्यायुधे बहु ॥ १० ॥

दिव्य वस्त्रे फुले गंध लेउनी सर्वतोपरी ।
आश्चर्ये भरला देव विश्व-व्यापी अनंत तो ॥ ११ ॥

प्रभा सहस्र-सूर्यांची नभी एकवटे जरी ।
तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळे चि ती ॥ १२ ॥

सारे जगांतले भेद तेंव्हा कालवले जसे ।
देहांत देव-देवाच्या देखिले तेथ अर्जुने ॥ १३ ॥

मग विस्मित तो झाला अंगी रोमांच दाटले ।
प्रभूस हात जोडूनि बोलिला नत-मस्तक ॥ १४ ॥

[३४]

अर्जुन म्हणाला

देखे प्रभो देव तुझ्या शरीरी ।
कोंदाटले सर्व चि भूत-संघ ॥
पद्मासनी ध्यान धरी विधाता ।
ऋषींसवे खेळत दिव्य सर्प ॥ १५ ॥

लेऊनि डोळे मुख हात पोट ।
जिथे तिथे तू चि अनंत-मूर्ते ॥
विश्वेश्वरा शेवट मध्य मूळ ।
तुझ्या न मी देखत विश्व-रूपी ॥ १६ ॥

प्रभो गदा-चक्र-किरीट-धारी ।
प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड ॥
डोळे न पाहू शकती अपार ।
ज्यांतूनि हे पेटत अग्नि-सूर्य ॥ १७ ॥

तू थोर ते अक्षर जाणण्याचे ।
तुझा चि आधार जगास अंती ॥
तू राखिसी शाश्वत-धर्म नित्य ।
मी मानितो तू परमात्म-तत्त्व ॥ १८ ॥

किती भुजा वीर्य किती पसारा ।
डोळे कसे उज्ज्वल चंद्र-सूर्य ॥
हा पेटला अग्नि तुझ्या मुखात ।
तू ताविसी सर्व चिआत्म-तेजे ॥ १९ ॥

दाही दिशा विस्तृत अंतराळ ।
व्यापूनि तू एक चि राहिलासी ॥
पाहूनि हे अद्भूत उग्र रूप ।
तिन्ही जगे व्याकुळली उदारा ॥ २० ॥

हे देव सारे रिघती तुझ्यांत ।
कोणी भये प्रार्थित बद्ध-हस्त ॥
मांगल्य-गीते तुज सिद्ध संत ।
परोपरी आळविती समस्त ॥ २१ ॥

आदित्य विश्वे वसु रुद्र साध्य ।
कुमार दोघे पितृ-देव वायु ॥
गंधर्व दैत्यांसह यक्ष सिद्ध ।
सारे कसे विस्मित पाहताती ॥ २२ ॥

अफाट हे रूप असंख्य डोळे ।
मुखे भुजा ऊरू असंख्य पाय ॥
असंख्य पोटे विकराळ दाढा ।
ह्या दर्शने व्याकुळ लोक मी हि ॥ २३ ॥

भेदूनि आकाश भरूनि रंगी ।
फाडूनि डोळे उघडूनि तोंडे ॥
तू पेटलासी बघ जीव माझा ।
भ्याला न देखे शम आणि धीर ॥ २४ ॥

कराळ दाढा विकराळ तोंडे ।
कल्पांत-अग्नीसम देखतां चि ॥
दिङ्-मूढ झालो सुख ते पळाले ।
प्रसन्न हो की जग हे तुझे चि ॥ २५ ॥

अहा कसे हे धृतराष्ट्र-पुत्र ।
घेऊनिया राज-समूह सारे ॥
हे भीष्म हे द्रोण तसा चि कर्ण ।
हे आमुचे वीर हि मुख्य मुख्य ॥ २६ ॥

जाती त्वरेने चि तुझ्या मुखांत ।
भयाण जी भ्यासुर ज्यांत दाढा ॥
दातांत काही शिरली शिरे जी ।
त्यांचे जसे पीठ चि पाहतो मी ॥ २७ ॥

जसे नद्यांचे सगळे प्रवाह ।
वेगे समुद्रांत चि धाव घेती ॥
तसे तुझ्या हे जळत्या मुखांत ।
धावूनि जाती नर-वीर सारे ॥ २८ ॥

भरूनिया वेग जसे पतंग ।
घेती उड्या अग्नि-मुखी मराया ॥
तसे चि हे लोक तुझ्या मुखांत ।
घेती उड्या वेग-भरे मराया ॥ २९ ॥

समस्त लोकांस गिळूनि ओठ ।
तू चाटितोसी जळत्या जिभांनी ॥
वेढूनि विश्वास समग्र तेजे ।
भाजे प्रभो उग्र तुझी प्रभा ही ॥ ३० ॥

सांगा असा कोण तुम्ही भयाण ।
नमूं तुम्हां देव-वरा न कोपा ॥
जाणावया उत्सुक आदि-देवा ।
ध्यानी न ये की करणी कशी ही ॥ ३१ ॥

श्री भगवान् म्हणाले

मी काळ लोकांतक वाढलेला ।
भक्षावया सिद्ध इथे जनांस ॥
हे नष्ट होतील तुझ्या विना हि ।
झाले उभे जे उभयत्र वीर ॥ ३२ ॥

म्हणूनि तू ऊठ मिळीव कीर्ति ।
जिंकूनि निष्कंटक राज्य भोगी ॥
मी मारिले हे सगळे चि आधी ।
निमित्त हो केवळ सव्य-साची ॥ ३३ ॥

द्रोणास भीष्मास जयद्रथास ।
कर्णादि वीरांस रणांगणात ॥
मी मारिलेल्यांस फिरूनि मारी ।
निःशंक झुंजे जय तो तुझा चि ॥ ३४ ॥

[३५]

संजय म्हणाला

ऐकूनि हे अर्जुन कृष्ण-वाक्य ।
भ्याला जसा कापत हात जोडी ॥
कृष्णास वंदूनि पुनश्च बोले ।
लवूनिया तेथ गळा भरूनि ॥ ३५ ॥

अर्जुन म्हणाला

जगी तुझ्या युक्त चि कीर्तनाने ।
आनंद लोटे अनुराग दाटे ॥
भ्याले कसे राक्षस धाव घेती ।
हे वंदिती सिद्ध-समूह सारे ॥ ३६ ॥

प्रभो न का हे तुज वंदितील ।
कर्त्यास कर्ता गुरू तू गुरूस ॥
आधार तू अक्षर तू अनंता ।
आहेस नाहीस पलीकडे तू ॥ ३७ ॥

देवादि तू तू चि पुराण आत्मा ।
जगास ह्या अंतिम आसरा तू ॥
तू जाणतोसी तुज मोक्ष-धामा ।
विस्तारिसी विश्व अनंत-रूपा ॥ ३८ ॥

तू अग्नि तू वायु समस्त देव ।
प्रजापते तू चि पिता वडील ॥
असो नमस्कार सहस्र वार ।
पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा ॥ ३९ ॥

समोर मागे सगळीकडे चि ।
असो नमस्कार जिथे जिथे तू ॥
उत्साह सामर्थ्य तुझे अनंत ।
तू सर्व की सर्व तुझ्या चि पोटी ॥ ४० ॥

समान मानी अविनीत-भावे ।
कृष्णा गड्या हाक अशी चि मारी ॥
न जाणता हा महिमा तुझा मी ।
प्रेमे प्रमादे बहु बोल बोले ॥ ४१ ॥

खेळे निजे स्वैर चि खात बैसे ।
चेष्टा करी सर्व तुझ्या समोर ॥
जनी मनी वा तुज तुच्छ लेखे ।
क्षमा करी भान तुझे कुणास ॥ ४२ ॥

आहेस तू बाप चराचरास ।
आहेस मोठी गुरू-देवता तू ॥
तुझी न जोडी तुज कोण मोडी ।
तिन्ही जगी ह्या उपमा चि थोडी ॥ ४३ ॥

म्हणूनि लोटांगण घालितो मी ।
प्रसन्न होई स्तवनीय-मूर्ते ॥
क्षमा करी बा मज लेकराते ।
सखा सख्याते प्रिय तू प्रियाते ॥ ४४ ॥

अपूर्व पाहूनि अपार धालो ।
परी मनी व्याकुळता न जाय ॥
पुन्हा बघू दे मज ते चि रूप ।
प्रसन्न होई जगदीश्वरा तू ॥ ४५ ॥

घेई गदा चक्र किरीट घाली ।
तसे चि पाहू तुज इच्छितो मी ॥
अनंत बाहूंस गिळूनि पोटी ।
चहू भुजांचा नट विश्व-मूर्ते ॥ ४६ ॥

[३६]

श्री भगवान् म्हणाले

प्रसन्न होऊनि रचूनि योग ।
हे दाविले मी तुज विश्व-रूप ॥
अनंत तेजोमय आद्य थोर ।
जे पाहिले आजवरी न कोणी ॥ ४७ ॥

घोकूनिया वेद करूनि कर्मे ।
यजूनि वा उग्र तपे तपूनि ॥
देऊनि दाने जगती न शक्य ।
तुझ्याविना दर्शन हे कुणास ॥ ४८ ॥

होऊ नको व्याकुळ मूढ-भावे ।
पाहूनि हे रूप भयाण माझे ॥
प्रसन्न-चित्ते भय सोडुनी तू ।
पहा पुन्हा ते प्रिय पूर्व-रूप ॥ ४९ ॥

संजय म्हणाला

बोलूनि ऐसे मग वासुदेवे ।
पार्थास ते दाखविले स्वरूप ॥
भ्याल्यास आश्वासन द्यावया तो ।
झाला पुन्हा सौम्य उदार देव ॥ ५० ॥

अर्जुन म्हणाला

पाहूनि हे तुझे सौम्य मानुषी रुप माधवा ।
झालो प्रसन्न मी आता आळो भानावरी पुन्हा ॥ ५१ ॥

श्री भगवान् म्हणाले

हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन ।
आशा चि राखुनी ज्याची झुरती नित्य देव हि ॥ ५२ ॥

यज्ञ-दान-तपे केली वेदाभ्यास हि साधिला ।
तरी दर्शन हे माझे नलाभे लाभले तुज ॥ ५३ ॥

लाभे अनन्य-भक्तीने माझे हे ज्ञान-दर्शन ।
दर्शने होय माझ्यांत प्रवेश मग तत्त्वतां ॥ ५४ ॥

माझ्या कर्मांत जो मग्न भक्तीने भरला असे ।
जगी निःसंग निर्वैर मिळे तो मज मत्पर ॥ ५५ ॥

अध्याय अकरावा संपूर्ण

Monday, March 21, 2011

Geetai - Adhyay 10

Chapter - X : Looking for God.

Life as it is today, our best brains are busy in creating food for all because many lack even food. In such strange times, something as simple as dedication to the Lord becomes difficult. In this situation, Vinoba takes the example of child learning alphabet - Big letters first and as the practice develops make the same letters small and recognise them. Alternatively easy letters first and complex
after a little practice.

The immense being which we see in the ocean is also present in the little drop of water. God who is in 'Rama' is also in 'Ravana', what is found in the gross is present in the subtle. What is found in the simple, is also in the complex. This vast creation is God's book. In this book of creation, God is written down everywhere in beautiful letters. But we do not understand it. It is this sick mind that stands as an obstacle to our seeing God. It is essential to get rid of this state of mind.

Hence because our minds are sick, let us experience God in our father, mother, Guru, a saint, pure children like Dhruva and Prahalada. After one learns to see God in serene and holy human forms, then we turn our eyes to sublime and beautiful aspects of nature. Beauty of sunrise and sunset, this art divine - lovely and majestic waters of Ganges which carries away in her course all the uncleanliness of our mind and body, wind the messenger of God whispering in our heart, fire which burns our impurities etc. We now look to God in creatures, cow full of tenderness and love, the swiftness of horse, majesty of lion, cleanliness of serpent.

Now turn to couples - love of father and son, mother and child, love of brothers, love of husband and wife, love between Rama and monkeys 'Nara and Vanara'. Then the birds majestic peacock with thousand eyes and many coloured brightness in its feather, sweet melodious voice of cuckoo and great municipal service of nature in crow. We just think of fables of Aesop based on child's lively interest in objects of creation. In it, foxes, dogs, crows, deer, hares, tortoise, snakes, worms all talk and laugh.
The truth of the matter is that God is present in all the forms of creation. As holy rivers, mighty mountains, the majestic ocean, the tender-hearted cow, the noble steed, the magnificent lion, the sweet voiced cuckoo, the beautiful peacock, the pure hermit snake, the crow flapping its wings, the restless flame, the still stars - in all this; He is present. Gross and subtle, pure and mixed simple and complex - learn all this and realise in the end that there is no place where God is not. In every atom, He alone is present. From the ant to the universe, He spreads. The Lord who cares equally for all, the compassionate one who is all knowledge, tenderness, skill, holiness and beauty - He stands on all sides everywhere.

गीताई - अध्याय १०

श्री भगवान् म्हणाले

फिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज ।
राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥

न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि ।
सर्वथा मी चि देवांचे महर्षींचे हि मूळ की ॥ २ ॥

ओळखे जो अ-जन्मा मी स्वयं-भू विश्व-चालक ।
निर्मोह तो मनुष्यांत सुटला पातकांतुनी ॥ ३ ॥

बुद्धि निर्मोहता ज्ञान सत्यता शम निग्रह ।
जन्म नाश सुखे दुःखे लाभालाभ भयाभय ॥ ४ ॥

तप दातृत्व संतोष अहिंसा समता क्षमा ।
माझ्या चि पासुनी भूती भाव हे वेगवेगळे ॥ ५ ॥

महर्षि सात पूर्वीचे चौघे मनु तसे चि ते ।
माझे संकल्पिले भाव ज्यांची लोकात ही प्रजा ॥ ६ ॥

हा योग-युक्त विचार माझा जो नीट ओळखे ।
त्यास निष्कंप तो योग लाभे ह्यांत न संशय ॥ ७ ॥

सर्वांचे मूळ माझ्यात प्रेरणा मजपासुनी ।
हे ओळखूनि भक्तीने जाणते भजती मज ॥ ८ ॥

चित्ते प्राणे जसे मी चि एकमेकांस बोधिती ।
भरूनि कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती ॥ ९ ॥

असे जे रंगले नित्य भजती प्रीती-पूर्वक ।
त्यांस मी भेटवी माते देउनी बुद्धि-योग तो ॥ १० ॥

करूनि करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये।
तेजस्वी ज्ञान-दीपाने अज्ञान-तम घालवी ॥ ११ ॥

[३२]

अर्जुन म्हणाला

पवित्र तू पर-ब्रह्म थोर ते मोक्ष-धाम तू ।
आत्मा नित्य अ-जन्मा तू विभु देवादि दिव्य तू ॥ १२ ॥

ऋषि एक-मुखे गाती तसे असित देवल ।
व्यास नारद देवर्षि तू हि आपण सांगसी ॥ १३ ॥

मानितो सत्य हे सारे स्वये जे सांगसी मज ।
देव दानव कोणी हि तुझे रूप न जाणती ॥ १४ ॥

जाणसी ते तुझे तू चि प्रत्यक्ष पुरुषोत्तमा ।
देव-देवा जगन्नाथा भूतेशा भूत-भावना ॥ १५ ॥

विभूति आपुल्या दिव्य मज निःशेष सांग तू ।
ज्यांनी हे विश्व तू सारे राहिलास भरूनिया ॥ १६ ॥

योगेश्वरा कसे जाणू चिंतनी चिंतनी तुज ।
कोण्या कोण्या स्वरूपात करावे ध्यान मी तुझे ॥ १७ ॥

त्या विभूती तसा योग आपुला तो सविस्तर ।
पुन्हा सांग नव्हे तृप्ति सेविता वचनामृत ॥ १८ ॥

श्री भगवान् म्हणाले

बरे मी सांगतो दिव्य मुख्य मुख्य चि त्या तुज ।
माझा विभूति-विस्तार न संपे चि कुठे कधी ॥ १९ ॥

राहतो आत्मरूपाने सर्वांच्या हृदयात मी ।
भूत-मात्रास मी मूळ मध्य मी मी चि शेवट ॥ २० ॥

आदित्यांत महा-विष्णु ज्यातिष्मंतांत सूर्य मी ।
मरीचि मुख्य वाञंत मी नक्षत्रांत चंद्रमा ॥ २१ ॥

मी साम-वेद वेदांत असे देवांत इंद्र मी ।
चेतना मी चि भूतांत मन ते इ.द्रियांत मी ॥ २२ ॥

कुबेर यक्ष-रक्षांत मी रुद्रांत सदाशिव ।
वसूंत मी असे अग्नि असे उंचांत मेरू मी ॥ २३ ॥

पुरोहितांत तू जाण मुख्य तो मी बृहस्पति ।
सेनानींत तसा स्कंद जल-राशींत सागर ॥ २४ ॥

मी एकाक्षर वाणींत महर्षींत असे भृगु ।
जप मी सर्व यज्ञांत मी स्थिरांत हिमालय ॥ २५ ॥

सर्व वृक्षांत अश्वत्थ मी देवर्षींत नारद ।
मी चित्ररथ गंधर्वीं सिद्धि कपिल मी मुनि ॥ २६ ॥

अश्वीं उचैःश्रवा जो मी निघालो अमृतांतुनि ।
ऐरावत गजेंद्रांत मी नरांत नराधिप ॥ २७ ॥

मी काम-धेनु गाईंत आयुधीं वज्र मी असे ।
उत्पत्ति-हेतु मी काम मी सर्पोत्तम वासुकि ॥ २८ ॥

नागांत शेष मी थोर जळी वरुण-देवता ।
पितरीं अर्यमा तो मी ओढणारांत मी यम ॥ २९ ॥

असे दैत्यांत प्रल्हाद मोजणारांत काळ मी ।
श्वापदांत असे सिंह पक्षांत खग-राज मी ॥ ३० ॥

वेगवंतांत मी वायु शस्त्र-वीरांत राम मी ।
मत्स्यांत मी असे नक्र नदी गंगा नद्यांत मी ॥ ३१ ॥

सृष्टीचे मी असे मूळ मुख मी ओघ तो हि मी ।
विद्यांत आत्म-विद्या मी वक्तांचा तत्त्व-वाद मी ॥ ३२ ॥

समासांत असे द्वंद्व अक्षरांत अकार मी ।
मी चि अक्षय तो काळ विश्व-कर्ता विराट् स्वये ॥ ३३ ॥

सर्व-नाशक मी मृत्यु होणारा जन्म मी असे ।
वाणी श्री कीर्ति नारींत क्षमा मेधा धृति स्मृति ॥ ३४ ॥

सामांत मी बृहत्-साम गायत्री मंत्र-सार मी ।
मी मार्गशीर्ष मासांत ऋतूंत फुलला ऋतु ॥ ३५ ॥

द्यूत मी छळणारांचे तेजस्यांतील तेज मी ।
सत्त्व मी सात्त्विकांतील जय मी आणि निश्चय ॥ ३६ ॥

मी वासुदेव वृष्णींत पांडवांत धनंजय ।
मुनींत मुनि मी व्यास कवींत उशना कवि ॥ ३७ ॥

दंड मी दमवंतांचा विजयेच्छूंस धर्म मी ।
गूढांत मौन मी थोर ज्ञात्यांचे ज्ञान मी असे ॥ ३८ ॥

माझ्या विण नसे काही लेश-मात्र चराचरी ।
तसे चि सर्व भूतांचे बीज जे ते हि जाण मी ॥ ३९ ॥

माझ्या दिव्य विभूतींस नसे अंत कुठे चि तो ॥ ४० ॥
तरी विभूति-विस्तार हा मी थोड्यांत बोलिलो ।

विभूति-युक्त जी वस्तु लक्ष्मीवंत उदात्त वा ।
माझ्या चि किरणातूनि निघाली जाण ती असे ॥ ४१ ॥

अथवा काय हे फार जाणूनि करिशील तू ।
एकांशे विश्व हे सारे व्यापूनि उरलो चि मी ॥ ४२ ॥

अध्याय दहावा संपूर्ण

Friday, March 18, 2011

Geetai - Adhyay 9

Chapter - IX : The Yoga of Dedication.

In this chapter is described the rare power of the name of God. There is an art in chanting this name and experience gained thereby is beyond words and that is why it is sweet. Though this knowledge is a hidden secret, Lord Krishna opens it out for all to understand with ease.

The Gita is the twice-distilled essence of the Vedic Dharma and the name of the Lord is the essence of the Vedas. It is certain that through 'Ramnama ' one can attain 'moksha ' which means that moksha becomes easy for women, children, the rustic and the poor, the weak, sick, lame and indeed for everyone. In whatever action, the man is engaged, through that natural action alone he is able to reach supreme by considering every human form as manifestation of God - such is this method. Another aspect is to dedicate whatever we do to him. Relate to him every act of yours.

There is no question of fitness - no pre-qualification. Any body who does this with pure heart gets the result. When learned men who say 'I'.'I' are left behind, innocent and devout women go forward. When the mind is pure and heart full of simplicity and holiness, moksha or liberation is not difficult to attain. If the action is filled with pure 'bhavana ', with the attitude of service, it becomes 'yagna'-dedication.

The essence of practice is to dissolve our Ego at the feet of the Lord by dedicating our base tendencies like lust, greed, anger etc. with sincere heart and we become pure as a result. Our senses are no longer our enemies. Their power for good is boundless. Therefore the best and the noblest way to use every one of the senses with the intellect surrendered to the Lord. This is called 'Raja-Yoga'.

How pure and holy the food will be when it is cooked with the 'bhavana' of pleasing the Lord. The moments of our daily life may appear commonplace, but in reality they are not so, they carry enormous significance. Life is dark, ugly and ill of sorrow. But just for a while, let the mind consider that all our actions are for the sake of the Lord. Then we will realise how full of beauty and value our lives become. Do not say what good can the word 'Rama' do. Just try saying it and see what happens.

Creation is but a mirror. What you are and what you bring to this mirror, the image of this, you see in this world. Therefore approach all creation with the feeling that it is good - that it is pure. Carry the same 'attitude' to all your ordinary actions. Then you will see a miraculous change. If you have the 'bhavana ' that Lord is always by your side, then you His servant will know no fear even if the whole world turns up-side down. Therefore turn your heart towards God. Attain his grace. Dedicate all actions to Him. Become altogether His. If you strengthen the attitude that all actions should be offered upto the Lord, this sordid life will become divine, the commonplace will become beautiful. Such actions are not illogical but beyond logic. Where logic ends, spirituality begins.

गीताई - अध्याय
श्री भगवान् म्हणाले

आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज ।
विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥

राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन ।
प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥

लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धेने न सेविती ।
मृत्यूची धरिती वाट संसारी मज सोडुनी ॥ ३ ॥

मी चि अव्यक्त-रूपाने जग हे व्यापिले असे ।
माझ्यात राहती भूते मी न भूतांत राहतो ॥ ४ ॥

न वा भूते हि माझ्यात माझा हा दिव्य योग की ।
करितो धरितो भूते परी त्यात नसे कुठे ॥ ५ ॥

आकाशात महा-वायु सदा सर्वत्र राहतो ।
माझ्यात सगळी भूते राहती जाण तू तशी ॥ ६ ॥

कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमधे ।
कल्पारंभी पुन्हा सारी मी चि जागवितो स्वये ॥ ७ ॥

हाती प्रकृति घेऊनि जागवी मी पुन्हा पुन्हा ।
भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो ॥ ८ ॥

परी ही सगळी कर्मे बांधू न शकती मज ।
उदासीनापरी राहे अनासक्त म्हणूनिया ॥ ९ ॥

साक्षी मी प्रकृति-द्वारा उभारी सचराचर ।
त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे ॥ १० ॥

[२८]

मज मानव-रूपात तुच्छत्वे मूढ देखती ।
नेणूनि थोरले रूप जे माझे विश्व-चालक ॥ ११ ॥

ते आशा-वाद मूढांचे कर्मे ज्ञाने हि ती वृथा ।
संपत्ति जोडिली ज्यांनी आसुरी मोह-कारक ॥ १२ ॥

दैवी संपत्ति जोडूनि महात्मे भजती मज ।
अनन्य-भावे जाणूनि मी विश्वारंभ शाश्वत ॥ १३ ॥

अखंड कीर्तने माझ्या यत्न-शील दृढ-व्रती ।
भक्तीने मज वंदूनि भजती नित्य जोडिले ॥ १४ ॥

दुसरे ज्ञान-यज्ञाने भजती व्यापका मज ।
ब्रह्म-भावे विवेकाने अविरोधे चि देखुनी ॥ १५ ॥

मी चि संकल्प मी यज्ञ स्वावलंबन अन्न मी ।
मंत्र मी हव्य ते मी चि अग्नि मी मी चि अर्पण ॥ १६ ॥

मी ह्या जगास आधार माय बाप वडील मी ।
मी तिन्ही वेद ॐ कार जाणण्या योग्य पावन ॥ १७ ॥

साक्षी स्वामी सखा भर्ता निवास गति आसरा ।
करी हरी धरी मी चि ठेवा मी बीज अक्षय ॥ १८ ॥

तापतो सूर्य-रूपे मी सोडितो वृष्टि खेंचितो ।
मृत्यु मी आणि मी मोक्ष असे आणि नसे हि मी ॥ १९ ॥

[२९]

वेदाभ्यासी सोम-पाने पुनीत ।
माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ॥
ते पुण्याने जाउनी इंद्र-लोकी ।
तेथींचे ते भोगिती दिव्य भोग ॥ २० ॥

त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ ।
क्षीणे पुण्ये मृत्यु-लोकास येती ॥
ऐसे निष्ठा ठेवुनी वेद-धर्मी ।
येणे-जाणे जोडिती काम-मूढ ॥ २१ ॥

अनन्य-भावे चिंतूनि भजती भक्त जे मज ।
सदा मिसळले त्यांचा मी योग-क्षेम चालवी ॥ २२ ॥

श्रद्धा-पूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते ।
यजिती ते हि माते चि परी मार्गास सोडुनी ॥ २३ ॥

भोक्ता मी सर्व यज्ञांचा फल-दाता हि मी चि तो ।
नेणती तत्त्व हे माझे म्हणूनि पडती चि ते ॥ २४ ॥

देवांचे भक्त देवांस पितरांचे तयांस चि ।
भूतांचे भक्त भूतांस माझे हि मज पावती ॥ २५ ॥

[३०]

पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज ।
ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे ॥ २६ ॥

जे खासी होमिसी देसी जे जे आचरिसी तप ।
जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण ॥ २७ ॥

अशाने तोडुनी सर्व कर्म-बंध शुभाशुभ ।
योग-संन्यास सांधूनि मिळसी मज मोकळा ॥ २८ ॥

सम मी सर्व भूतांस प्रियाप्रिय नसे मज ।
परी प्रेम-बळे राहे भक्त माझ्यांत त्यांत मी ॥ २९ ॥

असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो ।
मानावा तो जसा साधु त्याचा सुंदर निश्चय ॥ ३० ॥

शीघ्र तो होय धर्मात्मा शांति शाश्वत मेळवी ।
जाण निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो ॥ ३१ ॥

धरूनि आसरा माझा भोळे स्त्री-वैश्य-शूद्र हि ।
की पाप-योनि जे जीव ते हि मोक्षास पावती ॥ ३२ ॥

तेथे ब्रह्मर्षी राजर्षी ह्यांची गोष्ट कशास ती ।
भज तू मज आलास लोकी दुःख-द नश्वर ॥ ३३ ॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज ।
असे जोडूनि आत्म्यास मिळसी मज मत्पर ॥ ३४ ॥

अध्याय नववा संपूर्ण

Wednesday, March 16, 2011

Geetai - Adhyay 8

Chapter - VIII : Achieving the Goal.

For my own purpose, I gave the name 'Sanskar Mukti' to this chapter i.e. Freedom from good as well as bad tendencies, so that pure existence can be experienced. It is this purity of existence which can get in tune with God during and at the end of the life. 'Eating, drinking, sitting, sleeping, wandering, a little work...likes and dislikes, honour and dishonour, pain and pleasure in endless variety! And they all leave associations, impacts and build up tendencies in the mind. Hence if someone asks me, what life is, I should explain it as an aggregate of 'Sanskaras' or tendencies.

Important and distinct actions leave a deep impression on the mind; other actions fade away from memory. However, a single powerful 'sanskara' alone remains at last as the essential thing. All the efforts of life should be guided by the idea that this final fruit should be full of sweetness, that the last moment should be blissful. When the end is sweet, all else is sweet.

In order to achieve this, we should aim to conquer the fear of death. Thinking of death - not brooding over it - is a means of avoiding sin. With constant awareness of death, with what strength can man commit sin? Man has become so frightened of death that he cannot bear ever the thought of it. Only thing which consoles us for our miseries is diversion, and yet this is the greatest of our miseries. For it is this which makes us ruin ourselves. Diversion amuses us and leads us unconsciously to death.

Therefore remembering that death is the crown of life, we should constantly practice the means by which we can make our last moments holy, pure and sweet. To create such good 'sanskara', let noble thoughts course through the mind. Let the hands be busy doing deeds of goodness. Thoughts of God within, and the performance of Swadharma without, these should go on constantly. When the hands perform acts of service till the last breath, the full moon of Bhavana shines brightly, the mind's sky is free from desire, and the intellect is bright and keen - when a man dies in this state, we may take it that he has merged in God. In order to make such an auspicious ending, one must watch day and night and wage skilful war. Not even for an instant, should an evil tendency be permitted in the mind. And in order to gain strength necessary for this, one should remember His name, and meditate on His truth.

गीताई - अध्याय

अर्जुन म्हणाला

ब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते ।
अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥

अधि-यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे ।
प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती ॥ २ ॥

श्री भगवान् म्हणाले

ब्रम्ह अक्षर ते थोर अध्यात्म निज-भाव जो ।
भूत-सृष्टि घडे सारी तो जो व्यापार कर्म ते ॥ ३ ॥

अधि-भूत विनाशी जे जीवत्व अधि-दैवत ।
अधि-यज्ञ असे मी चि ह्या देही यज्ञ-पूत जो ॥ ४ ॥

अंत-काळी हि माझे चि चित्ती स्मरण राखुनी ।
देह सोडूनि गेला तो मिळे मज न संशय ॥ ५ ॥

जो जो आठवुनी भाव शेवटी देह सोडितो ।
मिळे त्या त्या चि भावास सदा त्यांत चि रंगला ॥ ६ ॥

म्हणूनि सगळा काळ मज आठव झुंज तू ।
मन बुद्धि समर्पूनि मज निःशंक पावसी ॥ ७ ॥

अभ्यासी चित्त जोडूनि योगी अन्य न लक्षुनी ।
पुरुषास महा दिव्य पावे संतत चिंतुनी ॥ ८ ॥

सर्वज्ञ कर्ता गुरू जो पुराण ।
सूक्ष्माहुनी सूक्ष्म अचिंत्य-रूप ॥
गिळूनि अंधार उजेडला जो ।
तो चिंतुनीया प्रभु सूर्य-वर्ण ॥ ९ ॥

प्रयाण-काळी स्थिर चित्त राखे ।
प्रेमे तसा योग-बळे कसूनि ॥
भ्रू-संगमी प्राण जडूनि ठेवी ।
तेंव्हा मिळे त्या पुरुषास दिव्य ॥ १० ॥

जे घोकिती अक्षर वेद-वेत्ते ।
विरक्त यत्ने मिळती जयास ॥
जे ब्रह्मचर्ये पद इच्छिताती ।
ते सांगतो मी तुज तत्त्व-सार ॥ ११ ॥

लावूनि सगळी द्वारे कोंडूनि मन अंतरी ।
मस्तकी प्राण राखूनि चढला धारणेवरी ॥ १२ ॥

मुखे ॐ-ब्रह्म उच्चारी अंतरी मज आठवी ।
ह्यापरी देह ठेवूनि जाय थोर गतीस तो ॥ १३ ॥

अनन्य-चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर ।
सदा मिसळला योगी तो सुखे मज पावतो ॥ १४ ॥

पावले मोक्ष-सिद्धीस महात्मे मज भेटुनी ।
दुःखाचे घर तो जन्म न घेती चि अशाश्वत ॥ १५ ॥

[२५]

ब्रह्मादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा ।
माझी भेट घडे तेंव्हा जन्मणे मग खुंटले ॥ १६ ॥

होतसे ब्रह्म-देवाचा सहस्र-युग तो दिन ।
तेवढी चि तशी रात्र कालोपासक जाणती ॥ १७ ॥

अव्यक्तापासुनी होती भूते व्यक्त दिनोदयी ।
रात्र होता लया जाती सगळी मग त्यात चि ॥ १८ ॥

ती चि ती चि पुन्हा भूते त्यांचे काही न चालता ।
दिनांती मरती सारी उदयी जन्म पावती ॥ १९ ॥

अव्यक्त दुसरे तत्त्व त्या अव्यक्तापलीकडे ।
नाशता सगळी भूते न नाशे जे सनातन ॥ २० ॥

त्यास अक्षर हे नाम ती चि शेवटची गति ।
माझे परम ते धाम जेथूनि परते चि ना ॥ २१ ॥

लाभे अनन्य-भक्तीने पार्था पुरुष थोर तो ।
ज्यात ही राहती भूते ज्याने विस्तारले जग ॥ २२ ॥

[२६]

कोण्या काळी कसा देह ठेवुनी येथ साधक ।
संसारी पडतो किंवा पावतो सिद्धि ऐक ते ॥ २३ ॥

अग्नीने दिन शुक्लार्ध उत्तरायण जोडुनी ।
जाय तो गाठतो ब्रह्म शेवटी ब्रह्म जाणुनी ॥ २४ ॥

धूमाने रात्र कृष्णार्ध दक्षिणायन जोडुनी ।
जाय तो परते येथ चंद्र-लोकास पावुनी ॥ २५ ॥

उजेड आणि अंधार दोन्ही मार्ग अनादि हे ।
सुटका करितो एक-एक फेर्‍यात टाकितो ॥ २६ ॥

असे हे मार्ग जाणूनी योगी मोह न पावतो ।
म्हणूनि सर्वदा राहे योगाने जडिला चि तू ॥ २७ ॥

यज्ञात दानात तपात तैसे ।
जे बोलिले अध्ययनात पुण्य ॥
ते लंघितो सर्व चि जाणुनी हे ।
योगी चढे आद्य पदास थोर ॥ २८ ॥

अध्याय आठवा संपूर्ण

Sunday, March 13, 2011

Geetai - Adhyay 7

Chapter - VII : Surrender to God.

Although Vinoba has given this name to the chapter, as I studied Talks on the Gita, I was tempted to give another name 'Bhakti' or Devotion re-defined'. To understand why I reached this conclusion, let us have a look at India of 1932. India like many other Christian countries had well-defined system of temple worship with its attendant rituals. In the early part of this century these practices had been monopolized by high class Hindus and their priests. All poor and low class Indians were not allowed entry into temples. This was done in the name of preserving the sanctity of the religion. Whereas majority of Indians did not have one square meal to eat, leave alone clothes and other amenities, this minority used to spend many hours in the worship, arrange sumptuous feasts for their caste brethren and were providing for the indulgent and luxurious standard of living of the priest. All this went in the name of surrender to God or Bhakti.

In contrast to this and from the actual text Vinoba deals with common manifestations of life and interprets them as the play of Divine. He says the anger of the angry man, the love of the lover, the agony of the sufferer, happiness of the happy one, the drowsiness of the idler, the activity of the worker, all these have an in-built divinity in them. He shows that man's pleasure hunt is because there is no joy in his life and this condition in turn is because he is unable to experience divinity in ordinary things of-life as taught by Gita. Once we have seen the true nature of the universe and tasted its joy, we shall find these other pleasures insipid.

The best way to discover this joy is 'Bhakti' or Devotion. Even if we have to beg, there is greatness in begging from the God rather than from the world and this begging is Bhakti. Citing his own version of Devotion he says, 'If on seeing the great rivers, if one can feel the river as compassion of God flowing before us, such a man is a true devotee'. If man's heart-beat leaps at the sight of the rain-bow, dances at the sight of the daffodils, he is a true devotee. It starts with desire or 'Sakam Bhakti' and ends with joy without external stimulation
which Gita calls 'Nishkam Bhakti ' or end of ail material desires.

Describing three kinds of Bhaktas, Gita says first kind looks at the whole world through eyes of love, the second kind through the eye of discovery, and the third from the point of view of the world's welfare. There is also a fourth type of perfect devotee. His method is to see God in the ugly as in the handsome, in the beggar as in the king, in men, women, animals and birds, everywhere he sees the presence of God. This pure devotee sees the grandeur of God in majestic ocean, the mother like tenderness of God in cow, in the earth he sees His presence, in the clear sky His purity, in Sun, Moon and Stars, His brightness and beauty, His softness in flowers, and in the evil man the God who tests and tries us. Thus he practices the art of seeing the one God at play everywhere and in doing so, one day the seer-saint merges into the Lord. This was what Vinoba understood as Devotion with all its variegated tools and this is the result of surrendering one's Ego to God.

गीताई - अध्याय

श्री भगवान् म्हणाले

प्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।
जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥

विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो ।
जे जाणूनि पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥

लक्षावधींत एखादा मोक्षार्थ झटतो कधी ।
झटणार्‍यांत एखादा तत्त्वता जाणतो मज ॥ ३॥

पृथ्वी आप तसे तेज वायु आकाश पाचवे ।
मन बुद्धि अहंकार अशी प्रकृति अष्ट-धा ॥ ४ ॥

ही झाली अपरा माझी दुसरी जाण ती परा ।
जीव-रूपे जिने सारे जग हे धरिले असे ॥ ५ ॥

ह्या दोहींपासुनी भूते सगळी जाण निर्मिली ।
सार्‍या जगास तद्-द्वारा मूळ मी आणि शेवट ॥ ६ ॥

दुसरे तत्त्व नाही चि काही माझ्या पलीकडे ।
ओविले सर्व माझ्यात जसे धग्यामधे मणि ॥ ७ ॥

पाण्यात रस मी झालो चंद्र-सूर्यी प्रकाश मी ।
ओं वेदी शब्द आकाशी पुरुषी पुरुषार्थ मी ॥ ८ ॥

मी पुण्य-गंध पृथ्वीत असे अग्नीत उष्णता ।
प्राणि-मात्रात आयुष्य तपो-वृद्धांत मी तप ॥ ९ ॥

सर्व भूतांत जे बीज ते मी जाण सनातन ।
बुद्धिमंतांत मी बुद्धि तेजस्व्यांत हि तेज मी ॥ १० ॥

वैराग्य-युक्त निष्काम बळवंतांत मी बळ ।
राहे धरूनि धर्मास ती मी भूतांत वासना ॥ ११ ॥

माझ्यातूनि तिन्ही झालेसात्त्विकादिक भाव ते ।
परी त्यांत न मी राहे ते चि माझ्यांत राहती ॥ १२ ॥

[२२]

ह्या गुणात्मक भावांनी विश्व मोहूनि टाकिले ।
ज्यामुळे मी न जाणू ये गुणातीत सनातन ॥ १३ ॥

माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा ।
कासेस लागले माझ्या ते चि जाती तरूनिया ॥ १४ ॥

हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती ।
मायेने भ्रांत होऊनि आसुरी भाव जोडिती ॥ १५ ॥

भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना ।
ज्ञानी तसे चि जिज्ञासु हितार्थी आणि विव्हल ॥ १६ ॥

ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्य-युक्त अनन्य जो ।
अत्यंत गोड मी त्यास तो हि गोड तसा मज ॥ १७ ॥

उदार हे जरी सारे ज्ञानी तो मी चि की स्वये ।
जोडला स्थिर माझ्यात गति अंतिम पाहुनी ॥ १८ ॥

अनेक जन्म घेऊनि पावला शरणागति ।
विश्व देखे वासुदेव संत तो बहु दुर्लभ ॥ १९ ॥

भ्रमले कामना-ग्रस्त धुंडिती अन्य दैवते ।
स्वभाव-वश होऊनि तो तो नियम पाळिती ॥ २० ॥

श्रद्धेने ज्या स्वरुपास जे भजू इच्छिती जसे ।
त्यांची ती चि तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये ॥ २१ ॥

त्या श्रद्धेच्या बळाने ते त्या स्वरुपास पूजिती ।
मग मागितले भोग पावती मी चि निर्मिले ॥ २२ ॥

अल्प बुद्धीमुळे त्यांस मिळे फळ अशाश्वत ।
देवांचे भक्त देवांस माझे ते मज पावती ॥ २३ ॥

व्यक्त मी हे चि ते घेती बुद्धि-हीन न जाणुनी ।
अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत ॥ २४ ॥

वेढिलो योग-मायेने अंधार चि जगास मी ।
अजन्मा नित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे ॥ २५ ॥

झाली जी जी हि होतिल भूते आहेत आज जी ।
सगळी जाणतो ती मी मज कोणी न जाणती ॥ २६ ॥

[२३]

राग-द्वेषांमुळे चित्ती जडला द्वंद्व-मोह जो ।
संसारी सगळी भूते त्याने मोहूनि टाकिली ॥ २७ ॥

ज्यांनी झिजविले पाप पुण्य-कर्मे करूनिया ।
ते द्वंद्व-मोह तोडूनि भजती मज निश्चये ॥ २८ ॥

झटती आश्रये माझ्या जरा-मृत्यु गिळावया ।
ते ब्रम्ह जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्म हि ॥ २९ ॥

अधिभूताधिदैवांत अधियज्ञांत जे मज ।
देखती ते प्रयाणी हि जाणती मज सावध ॥ ३० ॥

अध्याय सातवा संपूर्ण

Wednesday, March 9, 2011

Geetai - Adhyay 6

Chapter - VI : Controlling the Mind.

Concepts like Swadharma (Performing one's duty), Karma (Action), vikarma (Inward action) and Akarma (Stress-less Intense action) having been well explained in the preceding chapters, Vinoba now turns to the means for attaining this perfect state of action. One of the important tool in this direction is one-pointedness of mind, an integrated state as opposed to fragmented one.

Before explaining the contents of the chapter, Vinoba once again emphasises that Gita is a scripture intended for ordinary men, living daily life in the world. It may be useful to the ascetics but the main thrust of the discourse has common-man in the centre. He says that Gita is prepared to go to the lowest, the weakest, the least cultured of men. And it goes to him not to keep him where he is, but to grasp him by the hand and lift him up.

This Chapter which deals with the technique of meditation, points out three important parameters to obtain the result, one is one-pointedness of mind, second is setting bounds to one's life to achieve this and third is evenness of vision or a state of equanimity. For achieving this we need practice and objective outlook towards family, society, nation and the world. One-pointedness can be achieved by stopping the wheel of thoughts in the mind by coming out of the habit of brooding on trifles. If the mind incessantly (?) keeps on moving, the man's whole strength is lost. There is no kind of discipline. Our actions should be progressively purer by adopting the technique of Karma and Vikarma. To support the concentrated state of mind, he says that 'Let us turn away not only from bad things, but also from excess of even goods things'. Such disciplined conduct is called 'setting bounds to life'. Third parameter is a balanced outlook. So long as we cannot experience that the whole creation is auspicious, the mind will not be one-pointed. As long as we think that some-thing is wrong with the world, we look at all things with suspicion. If one looks at the world with friendly eyes, a perennial stream will spring in the heart, divine stars will shine in the inner firmament.

He sums the chapter by concluding remarks like this - For dhyana-yoga (the way of meditation), it is thus seen that one-pointedness of mind, disciplined living and a friendly and balanced outlook are necessary. Besides these, two other aids, detachment and practice, are mentioned. The first is a negative, destructive method, the other, positive and constructive. To uproot and throw away the weeds from the field is destructive work and this is vairagya detachment. To sow seeds in the field is constructive work. To think good thoughts again and again is abhyasa - practice. Vairagya is negative, abhyasa is positive.

गीताई - अध्याय


श्री भगवान् म्हणाले

फळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो ।
तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥

संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा ।
सोडिल्याविण संकल्प कोणी योगी न होतसे ॥ २ ॥

योगावरीचढू जाता कर्म साधन बोलिले ।
योगी आरूढ तो होता शम साधन बोलिले ॥ ३ ॥

कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे ।
संकल्प सुटले तेंव्हा तो योगारूढ बोलिला ॥ ४ ॥

उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी ।
आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला ॥ ५ ॥

जिंकूनि घेतला आत्मा बंधु तो होय आपुला ।
सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये ॥ ६ ॥

जितात्मा शांत जो झाला देखे ब्रम्ह चि एकले ।
मानापमानी शीतोष्णी सुख-दुःखी समावले ॥ ७ ॥

तोषला ज्ञान-विज्ञाने स्थिर जिंकूनि इंद्रिये ।
तो योगी सम जो देखे सोने पाषाण मृत्तिका ॥ ८ ॥

शत्रु मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा ।
असो साधु असो पापी सम पाहे विशेष तो ॥ ९ ॥

[१९]

साधके चित्त बांधूनि इच्छा संग्रह सोडुनी ।
आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे ॥ १० ॥

पवित्र स्थान पाहूनि घालावे स्थिर आसन ।
दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते ॥ ११ ॥

चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी ।
आत्म-शुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे ॥ १२ ॥

शरीर सम-रेखेत राखावे स्थिर निश्चळ ।
दृष्टि ठेवूनि नासाग्री न पहावे कुणीकडे ॥ १३ ॥

शांत निर्भय मच्चित्त ब्रम्हचर्य-व्रती स्थिर ।
मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ॥ १४ ॥

असे आत्म्यास जोडूनि योगी आवरिला मने ।
मोक्षास भिडली शांति माझ्या ठाई चि मेळवी ॥ १५ ॥

न योग फार खाऊनि किंवा खाणे चि सोडुनी ।
न फार झोप घेऊनि किंवा जागत बैसुनी ॥ १६ ॥

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि ।
मोजूनि करितो त्यास योग हा दुःख-नाशन ॥ १७ ॥

संपूर्ण नेमिले चित्त आत्म-रूपी चि रंगला ।
निमाली वासना तेंव्हा योगी तो युक्त बोलिला ॥ १८ ॥

निर्वाती ठेविला दीप तेवतो एकसारखा ।
तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती ॥ १९ ॥

निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला ।
जेथ भेटूनि आत्म्याते अंतरी तोषला स्वये ॥ २० ॥

भोगूनि इंद्रियातीत बुद्धि-गम्य महा-सुख ।
न ढळे चि कधी जेथ तत्त्वापासूनि लेश हि ॥ २१ ॥

जया लाभापुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो ।
न चळे जेथ राहूनि दुःख-भारे हि दाटला ॥ २२ ॥

तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोग चि ।
जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी ॥ २३ ॥

संकल्पी उठिले सारे काम निःशेष सोडुनी ।
इंद्रिये ही मनाने चि ओढुनि विषयातुनी ॥ २४ ॥

धरूनि धीर बुद्धीने निवर्तावे हळू हळू ।
आत्म्यात मन रोवूनि काही चिंतू नये स्वये ॥ २५ ॥

फुटेल जेथजेथूनि मन चंचळ अस्थिर ।
तेथतेथूनि बांधूनि लावावे आत्म-चिंतनी ॥ २६ ॥

विकारांसह ते ज्याचे शमले मन निर्मळ ।
झाला ब्रम्ह चि तो योगी पावला सुख उत्तम ॥ २७ ॥

आत्म्यास नित्य जोडूनि ह्यापरी दोष जाळुनी ।
सुखे चि भोगितो योगी ब्रम्हानंद अपार तो ॥ २८ ॥

भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली ।
योगाने जोडिला देखे हे चि सर्वत्र दर्शन ॥ २९ ॥

मज सर्वात जो पाहे पाहे माझ्यात सर्व हि ।
त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय ॥ ३० ॥

स्थिर होऊनि एकत्वी सर्व-भूती भजे मज ।
राहो कसा हि तो योगी माझ्यामध्ये चि राहतो ॥ ३१ ॥

जो आत्मौपम्य-बुद्धीने सर्वत्र सम पाहतो ।
जसे सुख तसे दुःख तो योगी थोर मानिला ॥ ३२ ॥

[२०]

अर्जुन म्हणाला

तू बोलिलास जो आता साम्य-योग जनार्दना ।
न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे ॥ ३३ ॥

मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे ।
धावे वार्‍यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर ॥ ३४ ॥

श्री भगवान् म्हणाले

अवश्य मन दुःसाध्य म्हणतोस तसे चि ते ।
परी अभ्यास-वैराग्ये त्याचा निग्रह होतसे ॥ ३५ ॥

संयमाविण हा योग न साधे मानितो चि मी ।
परी संयमवंतास उपाये साध्य होतसे ॥ ३६ ॥

अर्जुन म्हणाला

श्रद्धा आहे नव्हे यत्न योगातूनि चळूनि जो ।
मुकला योग-सिद्धीस जाय कोण्या गतीस तो ॥ ३७ ॥

काय तो उभय-भ्रष्ट ब्रम्ह-मार्गी भुलूनिया ।
नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी ॥ ३८ ॥

माझा संशय हा कृष्णा तू चि फेडी मुळातुनी ।
फेडीलसा दुजा कोणी न दिसे चि तुझ्याविण ॥ ३९ ॥

श्री भगवान् म्हणाले

न ह्या लोकी न त्या लोकी नाश तो पावतो कधी ।
शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे ॥ ४० ॥

पुण्य-लोकांत राहूनि तो योग-भ्रष्ट संतत ।
शुचि साधनवंतांच्या घरी जन्मास येतसे ॥ ४१ ॥

अथवा प्राज्ञ योग्यांच्या कुळी चि मग जन्मतो ।
अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ ॥ ४२ ॥

तिथे तो पूर्व-जन्मीचा बुद्धि-संस्कार जोडुनी ।
मोक्षार्थ करितो यत्न पूर्वीहूनि पुढे पुन्हा ॥ ४३ ॥

पूर्वाभ्यास-बळाने तो खेचला पर-तंत्र चि ।
जिज्ञासेने हि योगाच्या जातो वेदांस लंघुनी ॥ ४४ ॥

योगी तत्पर राहूनि दोष जाळित जाळित ।
अनेक जन्मी संपूर्ण होउनी मोक्ष पावतो ॥ ४५ ॥

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहूनि आगळा ।
मानिला तो असे योगी योगी होई म्हणूनि तू ॥ ४६ ॥

सर्व योग्यांमधे योगी जीव माझ्यात ठेवुनी ।
श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो ॥ ४७ ॥

अध्याय सहावा संपूर्ण

Tuesday, March 8, 2011

Geetai - Adhyay 5

Chapter - V : The Two Aspects of Akarma - Yoga And Sanyasa.

Vinoba spent several years to absorb this chapter which he considers key to the whole book. Summary of his deep study is the final goal of yoga and Sanyasa 'Action without activity'. These two traditions of spiritual seekers in India - large majority of house-holders engaged in social and economic activity and making themselves fitter for experience by constantly adding inward effort of purity to their external work and a minority group who do not get married and consequently cut themselves off from social and economic activity, get absorbed mainly in inward effort doing minimum external work to keep life going. Both these groups ultimately come to the same result. 'Action without fatigue without stress with very high value adding power, power which move mountains,
revolutionize societies - Power of Buddha, Jesus or Gandhi.'

Although both traditions lead to same result, the path of action is preferred because it is safe. To my mind, the reason why it is safe is that it can be practised successfully from the humblest to the mightiest. Indian History has many actual examples of men who got the results of self-realisation in this way. Potters, weavers, merchants and kings who reached the goal in this way are illustrated in the book. Explaining the beauty and spiritual purpose of action Vinoba explains that external actions reveal the real quality of our minds. He says a man becomes angry because anger was within and external action created circumstances by which it came out. If we do not act, we cannot test our mind that it has anger, jealousy, hatred etc. Our action talks. Our action is a mirror which shows us our true form.

When we act and discover our own defects, we are impelled to employ 'Vikarma' or inward action to remove them. When actions do not distort the mind, when it becomes natural and normal (Sahaja), it becomes 'Akarma' - action with intense results.

Example of Sun is taken to illustrate this final result - 'Akarma' - the goal of all spiritual practices. It shines, gives life to the whole world. As sun rises, people get ready for work, birds start coming out of nest, but Sun is just shining, it is normal and natural for Sun to shine. All activity is inspired by his presence but still he is the witness. Doing nothing though doing all things, to do all things by doing nothing, both alike are 'Yoga'. However to reach the goal of doing nothing by doing all things - the path of Karma-Yoga - Yoga of Action is to be preferred, because it is both the way and the goal - where the path ends, goal is there.

There is room in Karma yoga for effort and practice. Through this path of action, one can learn to control the senses little by little. Ease in practice distinguishes 'karma yoga' or the path of action from 'sanyasa' path of renunciation but in the state of perfection, both are the same. This is 'Akarma' action without activity.

गीताई - अध्याय

अर्जुन म्हणाला

कृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी ।
दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

योग संन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे ।
विशेष चि परी योग संन्यासाहूनि मानिला ॥ २ ॥

तो जाण नित्य-संन्यासी राग-द्वेष नसे जया ।
जो द्वंद्वावेगळा झाला सुखे बंधांतुनी सुटे ॥ ३ ॥

म्हणती सांख्य-योगाते भिन्न मूढ न जाणते ।
बाणो एक हि ती निष्ठा दोहींचे फळ देतसे ॥ ४ ॥

सांख्यास जे मिळे स्थान ते योग्यास हि लाभते ।
एक-रूप चि हे दोन्ही जो पाहे तो चि पाहतो ॥ ५ ।

योगावांचूनि संन्यास कधी साधे चि ना सुखे ।
संयमी योग जओडूनि ब्रम्ह शीघ्र चि गाठतो ॥ ६ ॥

अंतरी धुतला योगी जिंकूनि मन इंद्रिये ।
झाला जीव चि भूतांचा करूनि हि अलिप्त तो ॥ ७ ॥

न काही मी करी ऐसे योगी तत्त्व-ज्ञ जाणुनी ।
देखे ऐके शिवे हुंगे खाय जाय निजे श्वसे ॥ ८ ॥

बोले सोडी धरी किंवा पापणी हालवी जरी ।
इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हे चि पाहतो ॥ ९ ॥

ब्रम्ही ठेऊनिया कर्मे संग सोडूनि जो करी ।
पापे न लिप्त तो होय पद्म-पत्र जसे जळे ॥ १० ॥

देहा-मनाने बुद्धीने इंद्रियांनी हि केवळ ।
आत्म-शुद्ध्यर्थ नि:संग योगी कर्म अनुष्ठिती ॥ ११ ॥

युक्त तो फळ सोडूनि शांति निश्चळ पावतो ।
अयुक्त स्वैर-वृत्तीने फळी आसक्त बांधिला ॥ १२ ॥

[१७]

मनाने सगळी कर्मे सोडुनी संयमी सुखे ।
नव-द्वार-पुरी राहे करी ना करवी हि ना ॥ १३ ॥

न कर्तेपण लोकांचे न कर्मे निर्मितो प्रभु ।
न कर्मी फल-संयोग स्वभावे सर्व होतसे ॥ १४ ॥

न घे पाप हि कोणाचे न वा पुण्य हि तो विभु ।
अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित ॥ १५ ॥

गेले अज्ञान ते ज्यांचे आत्म-ज्ञाने तयां मग ।
पर-ब्रम्ह दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले ॥ १६ ॥

रंगले त्यात ओतूनि बुद्धि निश्चय जीवन ।
पुन्हा येती न माघारे ज्ञाने पाप धुऊनिया ॥ १७ ॥

विद्या-विनय-संपन्न द्विज गाय तसा गज ।
श्वान चांडाळ हे सारे तत्त्व-ज्ञ सम पाहती ॥ १८ ॥

इथे चि जिंकिला जन्म समत्वी मन रोवुनी ।
निर्दोष सम जे ब्रम्ह झाले तेथे चि ते स्थिर ॥ १९ ॥

प्रिय-लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये ।
बुद्धि निश्चळ निर्मोह ब्रम्ही ज्ञानी स्थिरावला ॥ २० ॥

विटला विषयी जाणे अंतरी सुख काय ते ।
ब्रम्ही मिसळला तेंव्हा भोगी ते सुख अक्षय ॥ २१ ॥

विषयातील जे भोग ते दु:खास चि कारण ।
येती जसे तसे जाती विवेकी न रमे तिथे ॥ २२ ॥

प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरवू शके ।
काम-क्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी ॥ २३ ॥

प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया ।
ब्रम्ह होऊनि तो योगी ब्रम्ह-निर्वाण मेळवी ॥ २४ ॥

फिटले दोष शंका हि मुठीत धरिले मन ।
पावले ब्रम्ह-निर्वाण ज्ञानी विश्व-हिती रत ॥ २५ ॥

काम-क्रोधास जिंकूनि यत्ने चित्तास बांधिती ।
देखती ब्रम्ह-निर्वाण आत्म-ज्ञानी चहूंकडे ॥ २६ ॥

विषयांचा बहिष्कार डोळा भ्रू-संगमी स्थिर ।
करूनि नासिका-स्थानी प्राणापान हि सारखे ॥ २७ ॥

आवरी मुनि मोक्षार्थी इंद्रिये मन बुद्धि जो ।
सोडी इच्छा भय-क्रोध सर्वदा सुटला चि तो ॥ २८ ॥

भोक्ता यज्ञ-तपांचा मी सोयरा विश्व-चालक ।
जाणूनि ह्यापरी माते शांतीस वरिला चि तो ॥ २९ ॥

अध्याय पाचवा संपूर्ण