अध्याय ३०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जय वेदवंद्या सकळसारा ॥ मन्मथजनका त्रिभुवनसुंदरा ॥ ब्रह्मानंदा अतिउदारा ॥ द्वारकानगरविलासिया ॥१॥
तुझे उदारपण अतिथोर ॥ बिभीषणे केला एक नमस्कार ॥ त्यासी त्वा दिधले लंकानगर ॥ जोवरी शशिमित्र असती पै ॥२॥
आणि सुदामा अत्यंत दरिद्री ॥ त्यासी द्वारकातुल्य दिधली नगरी ॥ पूर्वी कंस मारूनि मथुरापुरी ॥ उग्रसेन स्थापिला ॥३॥
सुग्रीवासी दिधली किष्किंधा ॥ वाली पाठविला निजपदा ॥ पांडवपालका गोविंदा ॥ भक्त निजपदा स्थापिसी ॥४॥
पूर्वाध्यायी कथन जाहले ॥ सुदामयासी राज्य दिधले ॥ यावरी द्वारावतीसी वर्तले ॥ तेचि परिसा श्रोते हो ॥५॥
द्वारकेसी असता अनंत ॥ जो सच्चिदानंदमूर्ति अमूर्त ॥ रात्रिवेळे कृष्णनाथ ॥ मंदिरा येत सत्यभामेच्या ॥६॥
तव तो मित्रविदेचा दिवस ॥ विसरोनिया ह्रषीकेश ॥ सत्यभामेच्या मंदिरास ॥ अवचित आला चुकोनि ॥७॥
तो दोन्ही हस्त ठेवूनि कटीवरी ॥ सत्यभामा उभी द्वारी ॥ तीस देखोनि मुरारी ॥ काय वचन बोलिला ॥८॥
सत्यभामा न जाणोनि गोविंदे ॥ म्हणे सुखी आहेस की मित्रविंदे ॥ तुजकारणे मी मुग्धे ॥ रात्री आलो जाण पा ॥९॥
ऐकता ऐसे वचन ॥ क्षोभले सत्यभामेचे मन ॥ म्हणे मज सवतीचे नाम ठेवूनि ॥ बोलावी कपटि नायक हा ॥१०॥
माझे नाम टाकूनि सुंदर ॥ मित्रविंदा म्हणे यादवेंद्र ॥ तरी याच्या नावाचा उच्चार ॥ मीही विपरीत करीन ॥११॥
मग श्रीकृष्णासी म्हणे सुंदरा ॥ यावे यावे जी कंसासुरा ॥ मथुरा सांडोनि द्वारकापुरा ॥ किमर्थ येणे जाहलो ॥१२॥
ऐकोनि वैरियाचे नाम ॥ परम क्षोभला पुरुषोत्तम ॥ म्हणे का वो तुज पडला भ्रम ॥ कंस कैसे मज म्हणसी ॥१३॥
तू जाहलीस काय पिशी ॥ कंसनामे मज बाहसी ॥ सत्यभामा म्हणे श्रीहरीसी ॥ डोळे पुसुनि पाहे पा ॥१४॥
कोठे आहे मित्रविंदा ॥ लौकरी दावा जी गोविंदा ॥ हांसे आले मुकुंदा ॥ ऐकोनि शब्द तियेचा ॥१५॥
ऐसा सत्यभामेचा गर्व जाणोन ॥ गुप्त जाहला जगन्मोहन ॥ सत्यभामा पाहे भोवते विलोकून ॥ म्हणे समजावीन हरीसी ॥१६॥
तो हातीचा गेला माधव ॥ जेवी साधका होता ज्ञानगर्व ॥ नित्यात्मप्राप्तीचा अनुभव ॥ कैचा मग तयासी ॥१७॥
ज्ञानगर्वे बहुत नाडले ॥ सत्य भामेसी तैसे जाहले ॥ म्हणे हातींचे निधान गेले ॥ भ्रांत जाहले कैसी मी ॥१८॥
दिव्य रत्न गोफणिले ॥ आहा अमृतपात्र उलंडिले ॥ की परब्रह्म घरा आले ॥ म्यां अव्हेरिले पापिणीने ॥१९॥
कामधेनू आली मंदिरी ॥ ती मूर्खे पिटूनि घातली बाहेरी ॥ तैसेचि म्या केले ये अवसरी ॥ गेला कंसारी हातींचा ॥२०॥
विकळ पडिली सत्यभामा ॥ सख्यांसी म्हणे भेटवा मेघश्यामा ॥ घरा आला परमात्मा ॥ अव्हेर केला जाणोनि ॥२१॥
मग आणावया इंदिरावर ॥ सत्यभामा दूती पाठवा सत्वरा ॥ ते सत्वर येउनि यदुवीरा ॥ काय पार्थिती जाहली ॥२२॥
दूती म्हणे जगज्जीवन ॥ चला सत्यभामेच्या निकेतना ॥ तुम्हांलागी राजीवनयना ॥ विकळ बहुत जाहली ॥२३॥
दिव्य सुमनांचे हार ॥ तीस भासती जैसे विखार ॥ शून्य दिसते मंदिर ॥ तुम्हांविण यादवेंद्रा ॥२४॥
देऊनि वस्त्रे आभरणे ॥ दूती गौरविले मधुसूदने ॥ म्हणे गजगमने माझे येणे ॥ नव्हे आता सर्वथा ॥२५॥
तो इकडे सत्यभामा मंदिरी ॥ हरि प्राप्तीलागी खेद करी ॥ घडिघडी येऊनि पाहे द्वारी ॥ म्हणे का मुरारी न येचि ॥२६॥
शेजेवरी अरळ सुकले ॥ चंदनागरगंध विटले ॥ आणि शेषवल्लीची दले ॥ सुकली सकळ दिसती ॥२७॥
प्रभाहीन दिसे सदन ॥ नावडे सुस्वर गायन ॥ दीप जाहले तेजोहीन ॥ हरिले मन मुर हरे ॥२८॥
अहा माधव कोठे गुंतला ॥ कोणे सवतीशी रतला ॥ चक्रचालक हो भ्रतार आपुला ॥ न म्हणावा कदाही ॥२९॥
की माझ्या सदना येता वनमाळी ॥ कोणी ललना वाटेसी भेटली ॥ सखी बोलावू पाठविली ॥ तिची जाहली काय गति ॥३०॥
अहो न लोटेचि आजिची यामिनी ॥ न ढळती नक्षत्रे गगनी ॥ अहा न उगवेचि वासरमणी ॥ चक्रवाके न बाहती का ॥३१॥
ऐसी चिंता करिता सती ॥ तो दूती आली अवचिती ॥ तीस म्हणे का वो श्रीपती ॥ आले नाहीत सांग पा ॥३२॥
श्वासोच्छ्वास विशेष तुज ॥ का दाटला सांग मज ॥ येरी म्हणे धांवले सहज ॥ म्हणोनि धापा टाकिते ॥३३॥
तुझ्या मस्तकीचे कुरळ का चळले ॥ येरी म्हणे हरिपायी शिर ठेविले ॥ वरिच्यावरी श्रीकृष्णे धरिले ॥ केश चळले म्हणोनिया ॥३४॥
तुझे सुकुमार चीर ॥ का भिजले सांग समग्र ॥ काय करूनि आलीस विचार ॥ तोही निर्धार कळेना ॥३५॥
येरी म्हणे मत्स्यावतार ॥ हरि धरूनि शोधी सागर ॥ मी येथे प्रवेशता समग्र ॥ शेला भिजला साजणी ॥३६॥
तुझी दृष्टी का झाली घूर्णित ॥ निद्रा मोडली दिसे सत्य ॥ तू हरिरूपी जाहलीस रत ॥ चिन्हे सर्व दीसती ॥३७॥
म्हणे कर्मठ जाहला तुझा भ्रतार ॥ कुर्मदृष्टी पाहता परम तीव्र ॥ त्याच्या दर्शने शरीर ॥ भाव सकळ राहिले ॥३८॥
भामा म्हणे तुझे अधर जाण ॥ तेथे दंश केला देता चुंबन ॥ येरी म्हणे हरि सूकर जाहला जाण ॥ अवचितांचि दांत लागला ॥३९॥
भामा म्हणे तुझे पयोधर ॥ तेथे नखे रुतली परम तीव्र ॥ म्या दुग्ध रक्षावया मांजर ॥ पाठविले शहाणीने ॥४०॥
दूती दे प्रत्युत्तर ॥ नरसिंह जाहला तुझा भ्रतार ॥ म्या त्याचा धरिला कर ॥ चला सत्वर म्हणोनिया ॥४१॥
तव तो क्रोधी दैत्यमर्दन ॥ लोटिले स्वकरे करून ॥ तेणे नखे रुतली जाण ॥ नसतेंचि दूषण लावू नको ॥४२॥
म्हणे तुज सत्वर पाठविले ॥ तरी एवढा वेळ कोठे क्रमिले ॥ दूती उत्तर काय बोले ॥ संपादणी ते ऐका ॥४३॥
तुझा भ्रतार घननीळ ॥ जाहला बळीचा द्वारपाल ॥ शोधीत गेले रसातळ ॥ म्हणोनि वेळ लागला ॥४४॥
अगे दिव्य पट्टकूल आणि चोळी ॥ मज कदापि नेदी वनमाळी ॥ सनकादिका न लागे चरणधुळी ॥ वस्त्रे दिधली तुज कैसी ॥४५॥
तुझा पति परशुधर ॥ क्षत्रिय वधोनि जय पावला थोर ॥ ते वेळी मीही जाऊनि सत्वर ॥ उभी पुढे ठाकले ॥४६॥
बाइ मी तुझी सखी म्हणोनि ॥ मजलागी दिधली पाठवणी ॥ तुज विश्वास न वाटे मनी ॥ खूण म्हणोनि आणली हे ॥४७॥
तुझे भाळींचा अर्धचंद्रटिळा ॥ तो कैसेनि सांग चळला ॥ मग प्रतिउत्तर या बोला ॥ काय बोले दूती ते ॥४८॥
श्रीरामे बंदींचे सोडविले निर्जर ॥ त्यांत राहूही सुटला परम क्रूर ॥ त्यासी देखतांचि हा चंद्र ॥ भिऊनिया चळला जी ॥४९॥
तरी मलयागर चंदन शीतळ ॥ तुझे अंगी चर्चिला पातळ ॥ तो वाहवला सकळ ॥ काय निमित्ते सांग पा ॥५०॥
द्वादश गावे अग्नि अद्भुत ॥ गिळी क्षण न लागता कृष्णनाथ ॥ ते समयी स्वेद आला बहुत ॥ म्हणोनि चंदन भ्रंशला ॥५१॥
तुवा तेथे बहुत उशीर ॥ लावावया काय विचार ॥ दूती म्हणे बौद्धावतार ॥ पति तुझा झाला गे ॥५२॥
शस्त्रवस्त्रविरहित ॥ अरण्यांत नग्न फिरत ॥ कोठे न दिसेचि अव्यक्त ॥ म्हणोनि उशीर लागला ॥५३॥
का तुजा उतरला मृगांक ॥ अंजन वाहवले सुरेख ॥ सत्य तुवा भोगिले कृष्णसुख ॥ संपादणी व्यर्थ करितेसी ॥५४॥
दूती म्हणे ऐका सावकाश ॥ पहावया गेले तुझ्या पतीस ॥ तो त्यासी क्रोध चढला विशेष ॥ देखोनि उत्कर्ष म्लेच्छांचा ॥५५॥
मग हाती घेऊनिया कुंत ॥ तुरंगी बैसावया जाहला उदित ॥ तो क्रोधायमान मजसी मात ॥ एकही बाई न बोले ॥५६॥
हरि न बोले म्हणून ॥ बाई मग मज आले रुदन ॥ तेणे वाहवले अंजन ॥ मुखमृगांक उतरला ॥५७॥
मग बोले भामा सती ॥ भली संपादणी जाणसी वो दूती ॥ बहुत कष्टलीस गे निश्चिती ॥ सुखे निद्रा करी आता ॥५८॥
कपाट देऊनिया सेजेवरी ॥ निजे सत्राजितकुमारी ॥ वियोगानळ जाळी अंतरी ॥ अश्रु नेत्री चालिले ॥५९॥
मग म्हणे कृष्णा जगदुद्धारा ॥ मनमोहना वसुदेवकुमरा ॥ यादवकुलटिळक भुवनसुंदरा ॥ धांवे पावे ये समयी ॥६०॥
तै जाणोनिया अंतरभाव ॥ तत्काळ पावला दयार्णव ॥ कपाटावरी श्रीकेशव ॥ अंगुळीअग्र वाजवी ॥६१॥
ते जाणोनि सत्यभामा बाळी ॥ मागुती करी हरीसी रळी ॥ म्हणे कोण तस्कर ये वेळी ॥ कपाटावरी हाणितो ॥६२॥
हरि म्हणे वो कुटिले ॥ मी माधव आलो ये वेळे ॥ निद्रेने काय भ्रमले डोळे ॥ पुसूनि होई सावध ॥६३॥
मग सत्यभामा बोलत ॥ माधव नामे वसंत ॥ तरी वसंते वसावे वनांत ॥ येथे किमर्थ आगमना ॥६४॥
हरि म्हणे मी चक्रधर ॥ तुजलागी पावलो सत्वर ॥ येरी म्हणे तू कुलाल निर्धार ॥ रात्री कासया आलासी ॥६५॥
हरि म्हणे मी धरणिधर ॥ येरी म्हणे तूचि फणिवर ॥ कोणासी डंखावया साचार ॥ रात्री एवढ्या आलासी ॥६६॥
कृष्ण म्हणे काळिया सर्प अघासुर ॥ त्यासी संहारिता मी महावीर ॥ येरी म्हणे तू द्विजेंद्र ॥ किमर्थ येथे आलासी ॥६७॥
मग बोले पूतनारी ॥ मी भोगवेळी पातलो हरी ॥ गदगदा हासे सुंदरी ॥ तरी वानर निर्धारे ॥६८॥
आपुल्या सांडोनि कांतास ॥ का आलासी येथे कपींद्रा ॥ तरी तू जाय माघारा ॥ माझा भ्रतार येईल आता ॥६९॥
तो आहे परमपुरुषार्थी ॥ शिक्षा लावील तुजप्रती ॥ सत्यवादी एकपत्नीव्रती ॥ ऐसा नाहीच दूसरा ॥७०॥
श्रीकृष्णासी हासे आले ॥ सत्यभामेने कपाट उघडिले ॥ श्रीमुखावरूनि निंबलोण केले ॥ दृढ धरिले हरिचरण ॥७१॥
म्हणे आदिपुरुषा नारायणा ॥ मी बहुत उद्धट बोलिले वचना ॥ क्षमा करावी मनमोहना ॥ मी दासी तुझी अन्यायी ॥७२॥तुझे उदारपण अतिथोर ॥ बिभीषणे केला एक नमस्कार ॥ त्यासी त्वा दिधले लंकानगर ॥ जोवरी शशिमित्र असती पै ॥२॥

हाती धरूनि मधुकैटभारी ॥ सत्यभामा आणि सेजेवरी ॥ मग पूजा षोडशोपचारी ॥ करिती जाहली तेधवा ॥७३॥
सत्यभामा म्हणे ते वेळा ॥ एवढा वेळ कोठे क्रमिला ॥ मग बोले घनसावळा ॥ मृगयेसी लागला उशीर ॥७४॥
सत्यभामा म्हणे तुमच्या अंगास ॥ येतो दुसरा सुवास ॥ मग बोले ह्रषीकेश ॥ जो का डोळस चातुर्यसिंधु ॥७५॥
म्हणे वनी नाना पुष्पमाळा ॥ भक्ती गुंफोनि घातल्या गळा ॥ म्हणोनि वास दुसरा आला ॥ तुजलागी मृगनयने ॥७६॥
भामा म्हणे ह्रषीकेषी ॥ घर्म आला शरीरासी ॥ बहु श्रम जाहला तुम्हांसी ॥ आजि मज वाटतसे ॥७७॥
हरि म्हणे धावता वनांतरी ॥ तेणे घर्म आला सुंदरी ॥ मग म्हणे जी कंसारी ॥ आश्चर्य एक वाटते ॥७८॥
तुमचे अधर जैसे विद्रुम ॥ ते कुंचावया काय काम ॥ हरि म्हणे शंख त्राहाटिला परम ॥ तेणे ओष्ठ श्रमले गे ॥७९॥
म्हणे या गोष्टी सत्य म्हणोन ॥ कराल काही येथे प्रमाण ॥ हरि म्हणे समुद्रांत टाकी नेऊन ॥ सत्य असेल तरी तरेन मी ॥८०॥
येरी म्हणे काय हे प्रमाण ॥ तुम्ही समुद्रमाजी करिता शयन ॥ हरि म्हणे महासर्प आणोन ॥ कुंभामाजी घाली का ॥८१॥
मी हस्त घालूनि काढीन सत्वर ॥ सत्य असेल तरि न डंखो विखार ॥ येरी म्हणे तुम्ही सर्पावर निजणार ॥ काय विषधर करील तुम्हा ॥८२॥
हरि म्हणे चेतवी महअग्न ॥ आत निःशंक मी प्रवेशेन ॥ येरी म्हणे द्वादश गावे कृशान ॥ तुम्ही गिळिला बाळपणी ॥८३॥
मग म्हणे वनमाळी ॥ खडतर दैवत असेल भूमंडळी ॥ त्याच्या देवळांत मज घाली ॥ सत्य असत्य निवडेल तेथे ॥८४॥
सत्यभामा म्हणे देव समस्त ॥ राबती तुम्हांपुढे होऊन भृत्य ॥ हरि म्हणे तुलायंत्र करूनि त्वरित ॥ मज त्यांत बैसवी ॥८५॥
घाय हाणिता कळेजवळी ॥ पारडे उचलेल अंतराळी ॥ सत्य असत्य सकळी ॥ निवडेल तेथे गजगमने ॥८६॥
मग बोले ते गोरटी ॥ अनंत ब्रह्मांडे तुमचे पोटी ॥ तुमचे वजन करावया जगजेठी ॥ तुला कोठुनि आणू मी ॥८७॥
असो तुम्हांजवळी मागता प्रमाण ॥ सर्वही होईल अप्रमाण ॥ म्हणोनि दृढ धरिले चरण ॥ महिमा पूर्ण कळेना ॥८८॥
असो एकांतसुखशयनी ॥ सत्यभामा भोगी चक्रपाणी ॥ सच्चिदानंद मोक्षदानी ॥ लीला दावी भक्तांसी ॥८९॥
कमलोद्भवसुत एके दिवशी ॥ आला सत्यभामेच्या गृहासी ॥ येरी धावोनि लागे चरणांसी ॥ बैसावयासी आसन देत ॥९०॥
पूजा करूनि षोडशोपचार ॥ म्हणे परिसा जी एक विचार ॥ जन्मोजन्मी श्रीकृष्ण भ्रतार ॥ व्हावा ऐसे वाटतसे ॥९१॥
यासी कवण व्रत कवण दान ॥ ऐकोनि हासे चतुरास्यनंदन ॥ म्हणे हरिमहिमा नेणोन ॥ जन्मपंक्ती इच्छीतसे ॥९२॥
हे श्रीकृष्णाची पत्नी होऊन ॥ इचे अद्यापि नव जाय अज्ञान ॥ दुर्दुर कमळाजवळी बैसोन ॥ सुवास नेणोन चिखली लोळे ॥९३॥
तरी इचा अभिमान झडे समूळ ॥ ऐसा करावा काही खेळ ॥ पात्र पाहूनि कुशळ ॥ वादार्थ माजी साठविती ॥९४॥
नारद म्हणे जरी कृष्णदान देसी ॥ तरी तो जन्मोजन्मी पावसी ॥ तरी हे पुसोनिया ह्रषीकेशी ॥ आणी मनासी आधी बरे ॥९५॥
हरीसी एकांती पुसे सत्यभामा ॥ तुम्हांसी दान देईन मी पुरुषोत्तमा ॥ ऐकता हासे आले मेघश्यामा ॥ पूर्णकामा सर्वेषा ॥९६॥
सत्यभामेसी म्हणे कृपानिधी ॥ हे मज मानली तुझी बुद्धी ॥ तरी दानासी उशीर न करावा आधी ॥ उठाउठी देइजे ॥९७॥
भामा पुसे द्विजांसी जाऊन ॥ दान घेता काय श्रीकृष्ण ॥ विप्र म्हणती तो गोवळ पूर्ण ॥ आम्ही ब्राह्मण सोवळे ॥९८॥
परम कपटी चोर जार ॥ आमुचे गृही त्याचा न व्हावा संचार ॥ यासी उत्तम वस्त्रे अलंकार ॥ कैचे आम्ही पुरवावे ॥९९॥
कृष्णदानाचा अंगीकार ॥ कदा न करिती कोणी विप्र ॥ अविद्येने वेष्टिले साचार ॥ कृष्णमहिमा नेणती ॥१००॥
अनंत जन्मींचे तपाचरण ॥ तरीच हाता येईल श्रीकृष्ण ॥ असो सत्यभामा परतोन ॥ नारदाजवळी पातली ॥१॥
म्हणे कोणीच दान न घेती तत्त्वतां ॥ तू तरी अंगीकार करी आता ॥ कृष्णदानासी ब्रह्मसुता ॥ पात्र धन्य तूचि पै ॥२॥
नारद म्हणे अवश्य ॥ मी दान घेतो जगन्निवास ॥ पूर्ण ब्रह्म पुराणपुरुष ॥ अनायासे ये हाता ॥३॥
सत्यभामा म्हणे यदुवीरा ॥ दानासी पात्र नारद बरा ॥ हे मानले की तुमच्या विचारा ॥ हरी म्हणे त्वरा करावी ॥४॥
पुष्यार्क योग उत्तम बहुत ॥ ऐसा पुढे न साधे मुहूर्त ॥ नारदाजवळी आला श्रीकृष्णनाथ ॥ वस्त्राभरणी श्रृंगारूनि ॥५॥
संकल्प करूनि यथासांग ॥ नारदकरी देत श्रीरंग ॥ जो क्षीराब्धिह्रदयरत्नरंग ॥ पूर्ण निःसंग परब्रह्म ॥६॥
नारद म्हणे वनमाळी ॥ हा ब्रह्मवीणा घेई का जवळी ॥ तंतु तुटो नेदी निजमूळी ॥ श्रुतिस्वर सांभाळिजे ॥७॥
एक मुळींचा तुटता तंत ॥ तेणे नाश होईल बहुत ॥ कृष्णा माझा भावार्थ ॥ तुज ठाउका असे की ॥८॥
माझी देवतार्चनाची पेटी ॥ जतन करी का जगजेठी ॥ नारद चालिला उठाउठी ॥ पाहे दृष्टी सत्यभामा ॥९॥
पुढे जातो कमलोद्भवपुत्र ॥ मागे चाले शतपत्रनेत्र ॥ जो मेघश्याम कोमलगात्र ॥ सहस्त्रवक्त्र वर्णी जया ॥११०॥
द्वारकेचे म्हणती जन ॥ जगद्वंद्य हा जगज्जीवन ॥ त्याच्या खांदा ओझे देऊन ॥ नारदमुनि नेतसे ॥११॥
नारद म्हणे ह्रषीकेशी ॥ का रे हळुहळू चालतोसी ॥ गृहआशा अजूनि न सोडिसी ॥ कैसा साधिसी परमार्थ ॥१२॥
असो ऐसा शारंगपाणि ॥ नार दूरी गेला घेऊनी ॥ तो सत्यभामा निजसदनी ॥ वियोगानळे आहाळली ॥१३॥
तळमळी विरहेकरून ॥ म्हणे हातींचे गेले निधान ॥ हे कृष्ण हे कृष्ण म्हणोन ॥ वियोगानळे आहाळत ॥१४॥
सत्यभामा करी रुदन ॥ आता कै देखेन मधुसूदन ॥ ठकवूनि गेला ब्रह्मनंदन ॥ भुली पूर्ण घातली ॥१५॥
मग सत्यभामेचिया सदनी ॥ मिळाल्या सकळ कृष्णकामिनी ॥ म्हणती भली गे करणी ॥ दान चक्रपाणी दीधला ॥१६॥
जांबुवंती म्हणे आम्ही इतुक्याजणी ॥ जवळी असता कृष्णकामिनी ॥ दान द्यावयालागूनी ॥ तूचि धनीण झालीस ॥१७॥
अज अजित जगत्पती ॥ त्यासी कैच्या जन्मपंक्ती तुज कोणी दिधली ही मती ॥ दुःखदायक अत्यंत ॥१८॥
मग बोलिली सत्राजितकुमारी ॥ बरा मत्सर साधिला सुंदरी ॥ तुवा आपुले हित तरी ॥ काय विचारिले सांग पा ॥१९॥
पायांवरि घालूनि पाषाण ॥ मोडिले जैसे आपुले चरण ॥ जैसा आपणचि रुईचीक भरून ॥ नेत्र बळे दवडिले ॥१२०॥
की आपुलेचि छेदूनिया घ्राण ॥ वैरियांसी केला अपशकुन ॥ जैसे आपुलेचि तान्हे मारून ॥ आळ घातला सवतीवरी ॥२१॥
कौतुके केले विषप्राशन ॥ परी न कळे जवळी आले मरण ॥ तैसे तुवा श्रीकृष्णदान ॥ करूनि केले अनहित ॥२२॥
मित्रविंदा बोले वचन ॥ जळले तुझे शहाणपण ॥ निर्विकारवस्तु श्रीकृष्ण ॥ त्यासी जन्ममरण लाविसी ॥२३॥
वैकुंठनाथ पूर्णावतारी ॥ त्यावरी तुझ्या बापे घातली चोरी ॥ प्रतापवंत कंसारी ॥ पाताळकुहरी शोधू गेला ॥२४॥
मग युद्धी जिंकूनि ऋक्षपती ॥ मणि आणि जांबुवंती ॥ घेऊनि आला जगत्पती ॥ ऐसी ख्याति तुझी वो ॥२५॥
लक्ष्मणा म्हणे तुझे ज्ञान ॥ आजि कळले संपूर्ण ॥ नरकासुराशी नेऊन ॥ जगज्जीवन भिडविला की ॥२६॥
सोळा सहस्त्र सवती पूर्ण ॥ निर्लज्जे तूचि आलीस घेऊन ॥ शेवटी हरि दिधला दान ॥ शहाणपण वाहवले ॥२७॥
याज्ञजिती म्हणे ते वेळा ॥ बरा सवतीमत्सर साधिला ॥ दाना श्रीरंग दिधला ॥ कोणी सांगितला शास्त्रार्थ ॥२८॥
नारदे आणिले स्वर्गसुमन ॥ ते रुक्मिणीसी दिधले म्हणोन ॥ तुवा अनर्थ केला पूर्ण ॥ तुझे गुण जाणो आम्ही ॥२९॥
की घडिघदी क्षुधा लागते म्हणोन ॥ उदरचि टाकिले फाडून ॥ जैसे देवळाचे शिखर पाडून ॥ पोवळी भोवती रचियेली ॥१३०॥
की गांठी असता काही धन ॥ म्हणोनि तोडूनी टाकिले स्वचरण ॥ वसते मोडूनिया सदन ॥ मांडव पुढे घातला ॥३१॥
तैसेचि हे तुवा केले पूर्ण ॥ दानासी दिधला जगन्मोहन ॥ तो भद्रावती बोले वचन ॥ तुझे ज्ञान दग्ध जाहले ॥३२॥
ज्या हरीचे करिता स्मरण ॥ तुटे जन्मसंसारबंधन ॥ जो सर्वद्रष्टा अचिंत्य निर्गुण ॥ तयासी गुण लाविसी तू ॥३३॥
तो देवकी धावली तत्काळ ॥ म्हणे तुवा दानासी दिधले माझे बाळ ॥ नवमास पोटी वाहिला घननीळ ॥ जो का निर्मळ अंतर्बाह्य ॥३४॥
मी जवळी असता जननी ॥ आणि या सोळा सहस्त्र कामिनी ॥ दान द्यावया स्वामिणी ॥ तूचि कैसी जाहलीस ॥३५॥
जेणे तुजा पिता मारिला ॥ तो शतधन्वा पूर्वी वर योजिला ॥ तो सांडूनि त्वा कृष्ण वरिला ॥ मणि आणिला म्हणोनिया ॥३६॥
सत्यभामा अधोवदन ॥ कोणासी नेदी प्रतिवचन ॥ जैसे तस्करासी होता वृश्चिकदंशन ॥ तो कळ सोसूनि उगाचि राहे ॥३७॥
किंचा चोराची जननी ॥ रडो न लागे प्रकट जनी ॥ असो बळिभद्रे ऐकिले कर्णी ॥ ब्रह्मनंदने हरि नेला ॥३८॥
सिद्ध करूनि चतुरंग दळभार ॥ धावण्या निघाला बळिभद्र ॥ वसुदेव उद्धव अक्रूर ॥ उग्रसेन धांवतसे ॥३९॥
म्हणती नारद मैंद पूर्ण ॥ सत्यभामेसी घालूनि मोहन ॥ श्रीकृष्ण जगाचे जीवन ॥ नेतो चोरून सर्वांसी ॥१४०॥
दूरी देखोनि दळभार ॥ नारदासी म्हणे यदुवीर ॥ आमुचे वडील आले समग्र ॥ शिक्षा थोर करिती आम्हा ॥४१॥
नारद म्हणे ह्रषीकेशी ॥ तू भिऊ नको मानसी ॥ मी प्रत्युत्तर देतो समस्तांसी ॥ तू असे पाठीशी माझिया ॥४२॥
तो जवळी आले वसुदेव संकर्षण ॥ म्हणती श्रीकृष्ण आमुचे जीवन ॥ सत्यभामेसी वचनी गोवून ॥ कैसा नेतोसी दयार्णवा ॥४३॥
नारद म्हणे ऐका समस्त ॥ मी काय ठकवूनि नेतो कृष्णनाथ ॥ पाठीशी का आला धावत ॥ दळभार सिद्ध करूनिया ॥४४॥
मी तरी एकला ब्राह्मण ॥ मजशी करू पाहता भांडण ॥ सत्यभामेने दिधले दान ॥ तुम्ही परतोन मागता ॥४५॥
मज म्हातारपण निश्चिती ॥ म्हणोनि हरि घेतला सांगाती ॥ येरू म्हणती आणिक तुम्हांप्रती ॥ सेवक देऊ दूसरा जी ॥४६॥
नारद म्हणे कासया व्यर्थ ॥ आमुच्या मनोगते चाले कृष्णनाथ ॥ त्रिभुवन शोधिता समस्त ॥ ऐसा सांगाती मिळेना ॥४७॥
यादव घालिती नमस्कार ॥ नारदापुढे पसरिती पदर ॥ तू जे वस्तू मागसी साचार ॥ ते देऊ कृष्णा पालटा ॥४८॥
नारद म्हणे कृष्ण पालटाशी ॥ कोणती वस्तु मागू तुम्हांपाशी ॥ नाशवंत देऊन अविनाशी ॥ नेउ म्हणता ठकवूनिया ॥४९॥
श्रीकृष्णाच्या मुखावरूनी ॥ कोटि काम सांडिजे ओवाळूनी ॥ ऐसा सांगाती त्रिभुवनी ॥ न मिळे शोधिता सर्वथा ॥१५०॥
यादव म्हणती स्यमंतकमणी ॥ घेऊनि सोडा जी चक्रपाणी ॥ मग म्हणे नारदमुनी ॥ नलगे सर्वथा आम्हांते ॥५१॥
त्या मण्याचे पायी अनर्थ बहुत ॥ मेले प्रसेन सत्राजित ॥ तैसाचि आमुचाची होईल घात ॥ न घे मणि सर्वथा तो ॥५२॥
यादव म्हणती दिव्य सुवर्ण ॥ हरीच्या भारोभार देऊ पूर्ण ॥ मग म्हणे ब्रह्मनंदन ॥ अवश्य आणून देईजे ॥५३॥
तुळा उभविली सत्वर ॥ पारदी बैसविला यादवेंद्र ॥ तो भामा म्हणे श्रीधर ॥ मीचि सोडवीन तत्त्वतां ॥५४॥
माझ्या बापाचा मणि आंदण ॥ नित्य प्रसवे नऊ भार सुवर्ण ॥ मज धनासी नाही वाण ॥ जगज्जीवन सोडविते ॥५५॥
अहंकार धरूनि पूर्ण ॥ घातले सकळ संग्रहसुवर्ण ॥ सत्यभामा पाहे अधोवदन ॥ सरले धन सर्वही ॥५६॥
कृष्णनायका एक शत षोडश सहस्त्र ॥ एकदांचि उठिल्या समग्र ॥ सुवर्ण घालिती सत्वर ॥ अणुमात्र न ठेवती ॥५७॥
शेवटी अंगावरील सुवर्ण ॥ गोपी घालिती नेऊन ॥ द्वारकेचे राज्य भांडार संपूर्ण ॥ आणूनि तेथे घातले ॥५८॥
समुद्रामाजी पडले हरळ ॥ तैसे सुवर्ण जाहले सकळ ॥ मशकाचेनि भूगोळ ॥ उलथोनि कैसा पाडवे ॥५९॥
उंच आहे किती नभ ॥ हे काय गणू शके शलभ ॥ आदित्यमंडळ सुप्रभ ॥ मोजवे केवी तमाते ॥१६०॥
मेरूचिया वजनासी पाही ॥ कांटिया घालती जैसी राई ॥ तैसे द्वारकेचे धन सर्वही ॥ तुळेमाजी हळवट ॥६१॥
सकळ नगरींचे लोक धांविन्नले ॥ त्याही आपुले सुवर्ण घातले ॥ गुंज भरी नाही उरले ॥ द्वारकेमाजी कांचन ॥६२॥
आनकदुंदुभीची पत्नी ॥ जिच्या उदरी जन्मला चक्रपाणी ॥ तिने सुवर्ण घातले आणोनी ॥ मोहेकरूनि तेधवा ॥६३॥
रुपे कांसे तांबे पितळ ॥ अष्टधातु घातल्या प्रबळ ॥ जन आश्चर्य करिती सकळ ॥ नवल अद्भुत देखोनि ॥६४॥
पहा वृक्षशाखेवरी देखा ॥ भार घालूनि बैसे पिपीलिका ॥ तैशा अष्टधातू सकळिका ॥ तूळेमाजी दिसती ॥६५॥
अनंत ब्रह्मांडे ज्याच्या पोटी ॥ पारडा बैसविला जगजेठी ॥ एक म्हणती हरि नाटकी कपटी ॥ जड बहुत जाहला ॥६६॥
नारद आणि हा गोविंद ॥ दोघांनी मांडिला हा विनोद ॥ एक भोंदू एक मैंद ॥ सत्यभामेसी मिळाले ॥६७॥
एक चहाड एक चोर ॥ एक कळीलावा एक जार ॥ एक उदास एक उदार ॥ अनिवार दोघेही ॥६८॥
न उचले पारडे देखोनी ॥ देवकी रडे धाय मोकलूनी ॥ म्हणे सत्यभामे वारणी ॥ अघटित करणी त्वा केली ॥६९॥
भ्रताराचे केले दान ॥ हे जाहले नाहि अद्यापि श्रवण ॥ देवकी घरी नारदाचे चरण ॥ मज पुत्रदान देई का ॥१७०॥
नारद म्हणे आली नाही रुक्मिणी ॥ जे त्रिभुवनपतीची पट्टराणी ॥ सुवर्ण बहुत आहे तिचे सदनी ॥ तीस बोलावू पाठवा जी ॥७१॥
सकळांसी मानली गोष्टी ॥ उद्धव पाठविला उठाउठी ॥ तो दृष्टी देखिली गोरटी ॥ जिचे पोटी मन्मन जन्मला ॥७२॥
रत्नजडित चौकी चांगली ॥ त्यावरी जगन्माता बैसली ॥ शुभ्र वस्त्र मुक्तलग चोळी ॥ कंठी एकावेळी डोलत ॥७३॥
ऐसी ते भीमकह्रदय रत्न ॥ उद्धवभक्ते दृष्टी देखोन ॥ केले साष्टांग नमन ॥ वर्तमान निवेदिले ॥७४॥
ऐकता साद्यंत वर्तमान ॥ केले किंचित हास्यवदन ॥ तैसीच वृंदावनी जाऊन ॥ केले नमन तुळशीसी ॥७५॥
त्रिवार प्रदक्षिणा करून ॥ घेतले पक्वदळ प्रार्थून ॥ रत्नताटी घालून ॥ वरी दिव्य वस्त्र झांकिले ॥७६॥
हंसगती चमकत ॥ मन्मथजननी आली तेथ ॥ श्रीकृष्ण आणि कमलोद्भवगत ॥ षोडशोपचारे पूजिले ॥७७॥
रुक्मिणीचा भाव निर्मळ ॥ तुळेवरी ठेविले तुळसीदळ ॥ श्रीकृष्णाचे पारडे तत्काळ ॥ आपोआप उचलले ॥७८॥
सकळांमाजी श्रेष्ठ भाव ॥ भावे सोडविला माधव ॥ विमानी तटस्थ पाहती देव ॥ पुष्पवर्षाव करिताती ॥७९॥
धन्य धन्य भीमकराजकुमारी ॥ तुळसीदळ ठेवूनि तुळेवरी ॥ सोडविला मधुकैटभारी ॥ तो कंसारी भक्तवत्सल ॥१८०॥
जे आदिपुरुषाची ज्ञानशक्ती ॥ अनंत शक्त जियेपुढे राबती ॥ ब्रह्मादिक बाळे निश्चिती ॥ नाचवी रात्रंदिवस जे ॥८१॥
ब्रह्मसुकाचा समुद्र ॥ माजी बुडाले जीव समग्र ॥ तेथींची गोडी अणुमात्र ॥ चाखो नेदी कोणाते ॥८२॥
जिकडे करी कृपावलोकन ॥ तो तत्काळ होय ज्ञानसंपन्न ॥ देहीच विदेही होवोन ॥ कैवल्यपद पावे तो ॥८३॥
असो सोने जाहले बहुत ॥ ते काढिती हातोहात ॥ गोपी धावती समस्त ॥ माझे माझे म्हणोनि ॥८४॥
गुळावरी बैसती मक्षिका ॥ तैशा गोपी झोंबती सकळिका ॥ रुक्मिणी नारद श्रीरंग देखा ॥ कौतुक पाहती तयांचे ॥८५॥
यापरी जन नाडले देख ॥ श्रीकृष्णभजनी जाहले विन्मुख ॥ खरे मानूनि धनदारासुख ॥ झाले भ्रांत अहंमते ॥८६॥
एक म्हणती माजी सरी देख ॥ एक म्हणे माझे पदक ॥ एक म्हणे माझा चितांक ॥ सोडी वेगे आलगटे ॥८७॥
एक म्हणे शीसफूल चंद्ररेखा ॥ तो माझा मजकडे टाका ॥ मूद राखडी गळ्याच्या टिका ॥ तानवडे वोळखा माझी ही ॥८८॥
चुडे दोरे हातसर ॥ माझी दंडकडी बाजुबंद सुंदर ॥ माझ्या मुद्रिका परिकर ॥ मुक्ताहार माझे हे ॥८९॥
सत्यभामा धावे लोभेकरून ॥ म्यां पर्वतासमान घातले सुवर्ण ॥ माझे गुंजभर होता न्यून ॥ अनर्थ पूर्ण होईल ॥१९०॥
षोडशसहस्त्र स्नुषा देखा ॥ देवकी म्हणे तुम्ही आवघ्या मूर्खा ॥ माझे अलंकार मजपुढे टाका ॥ हांसती गोपिका गदगदा ॥९१॥
म्हणती म्हातारपणी सोस ॥ का हो सुटला तुम्हांस ॥ आता हे अलंकार सुनांस ॥ वाटां आम्हांस मामिसे ॥९२॥
नारदे वंदिले भीमकीस ॥ माते तूचि भोगी जगन्निवास ॥ प्रदक्षिणा करूनि दोघांस ॥ ऊर्ध्वपंथे चालिला ॥९३॥
जन सर्वही गुंतले धना ॥ रुक्मिणी घेऊनि जगन्मोहना ॥ पूर्ण ब्रह्मानंद वैकुंठराणा ॥ अगाध लीला दावित ॥९४॥
हरिविजयग्रंथ परिस पूर्ण ॥ जीव केवळ लोह कठिण ॥ या परिसासी झगटती येऊन ॥ तरी तत्काळ सुवर्ण होती पै ॥९५॥
सदा सर्वदा हरिविजयश्रवण ॥ हेचि लोहपरिसाशी संघटण ॥ अहंकृतिकाळिमा जाळून ॥ केवळ सुवर्ण होती ते ॥९६॥
श्रीमद्भीमातटविलासिया ॥ ब्रह्मानंदा पंढरीराया ॥ श्रीधरवरदा करुणालया ॥ विसांविया जगद्गुरु ॥९७॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ प्रेमळ भक्त सदा परिसोत ॥ त्रिंशत्तमाध्याय गोड हा ॥१९८॥ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
No comments:
Post a Comment