अध्याय ५ :- लय
Laya - Stages of Dissolution of ConsciousnessAshtavakra does not disagree, but in a terse four verses points to the next step—dissolution.
॥ अष्टावक्र उवाच ॥
न ते संगोऽस्ति केनापि किं शुद्धस्त्यक्तुमिच्छसि ।
संघातविलयं कुर्वन्नेवमेव लयं व्रज ॥१॥
अष्टावक्र म्हणाला तुझा कोणाशींही संबंध नाहीं, त्यामुळें तूं शुद्ध आहेस. तूं कशाचा त्याग करुं इच्छितोस ? अशा रीतीनें देहाभिमान नाहींसा करुन तूं मोक्षाला प्राप्त हो. ॥१॥
Ashtavakra said:
1. You are not bound by anything. What does a pure person like you need to renounce? Putting the complex organism to rest, you can go to your rest.
उदेति भवतो विश्वं वारिधेरिव बुद्बुदः ।
इति ज्ञात्वैकमात्मानं एवमेव लयं व्रज ॥२॥
अशीच भावना कर कीं, माझ्यापासून संसार निर्माण झाला आहे; जसा समुद्राच्या पाण्यांत बुडबुडा उत्पन्न होतो--आणि स्वतःला व जगाला, स्वतःला व समष्टीला एक समजून, एक जाणून, तूं मोक्षाला प्राप्त हो. ॥२॥ 2. All this arises out of you, like a bubble out of the sea. Knowing yourself like this to be but one, you can go to your rest.
प्रत्यक्षमप्यवस्तुत्वाद् विश्वं नास्त्यमले त्वयि ।
रज्जुसर्प इव व्यक्तं एवमेव लयं व्रज ॥३॥
दृश्यमान जगत् प्रत्यक्ष दिसत असलें तरी दोरीवर सापाचा आभास व्हावा तसें आभासरुप आहे. तुला शुद्धाला----मलरहिताला तें नाहीं, असें जाणून तूं लयाला----निर्वाणाला प्राप्त हो. ॥३॥ 3. In spite of being in front of your eyes, all this, being insubstantial, does not exist in you, spotless as you are. It is an appearance like the snake in a rope, so you can go to your rest.
समदुःखसुखः पूर्ण आशानैराश्ययोः समः ।
समजीवितमृत्युः सन्नेवमेव लयं व्रज ॥४॥
दुःख व सुख, आशा आणि निराशा, जीवन व मृत्यु जो समान मानतो असा पूर्ण होऊन तूं लयाला----मोक्षाला प्राप्त हो. 4. Equal in pain and in pleasure, equal in hope and in disappointment, equal in life and in death, and complete as you are, you can go to your rest.
No comments:
Post a Comment