Monday, November 15, 2010

Ayushya Khup Sundar Ahe

आयुष्यावरिल ह्या आशादायक कवितेचे पहिले पान...

आयुष्य खुप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा....

वादळात सगळं वाहून गेलं,
म्हणून रडत बसू नका,
वेगळं असं काही, माझ्यात खास नाही,
असं म्हणून उदास होवू नका...

मृगाकडे कस्तूरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्यातही लपला आहे..

आव्हान करा त्या सुर्याला !!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नविन क्षितिज घेऊन,
अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजुन,
मग रोजचा उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन....

आयुष्य खुपच सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा...

2 comments:

  1. mamata mam mala tumchya sobat eka concept baddal bolayache aahe plz mala contact karal ashi apeksha aahe
    maza ID ahe chetan.magare@yahoo.com

    ReplyDelete
  2. Aayushya khup sundar aahe... Fakt Gondhala la pices vadhnara olkhicha pahije :)))

    ReplyDelete