वर्तमानपत्र! सकाळी उठल्यावर आपल्या पैकी बऱ्याच लोकांना सर्वप्रथम हाती हवे असते ते म्हणजे वर्तमानपत्र... काही जणांना त्याशिवाय चहा गोड लागत नाही तर काहींना त्याशिवाय... जावू देत - त म्हणजे ताकभात असे ओळखून घ्या... :)
आपल्या पैकी काहींना पेपर मधल्या बातम्या वाचल्याशिवाय दिवस सुरु झाल्यासारखे वाटत नाही तर काहींचा भविष्य हा विकपाँइंट!!
मुंबई सारख्या ठिकाणी प्रवास करणारी चाकरमानी वर्गातली बरीच जणं आसरा घेतात तो वर्तामानपत्रातल्या शब्दकोड्यांचा.. मैत्रीणींसाठी जसा पेपर खास पुरवणी घेवुन सज्ज असतो तसा तरुणाईतल्या मुलांसाठी सुद्धा। आणि आपल्या छोट्या वर्गासाठी ही खास पुरवणी असतेच की धम्माल गोष्टी घेवुन॥
ऑनलाइन वर्तमानपत्रांच्या ह्या काही लिंक्स :-
१। महाराष्टृ टाईम्स - महाराष्ट्रातील प्रादेशिक घडामोडी अणि जगभरातील इतर घडामोडी स्वरूपात प्रक्षेपित करणारे दैनिक। टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचे मराठी वृत्तपत्र.
२. लोकसत्ता - महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर, नागपुर येथून प्रकाशित होणारे एक्सप्रेस ग्रूपचे दैनिक.
३। सकाळ - बहुतांशी पुणेकरांचे आवडते पुण्यातुन प्रकाशित होणारे दैनिक.
४। लोकमत - औरंगाबाद, नागपुर, विदर्भ, मराठवाडा विभागातील प्रसिद्ध दैनिक.
५। सामना - बाळासाहेब ठाकरे संपादक। शिवसेनेचे वृत्तपत्र म्हणून प्रसिद्ध। संपादकीय लेखांसाठी बहुतेकांचे आवडते दैनिक।
६। दैनिक केसरी - पुणे, सोलापुर, सांगली, अहमदनगर आणि चिपळूण येथून प्रकाशित होणारे दैनिक.
७। तरुण भारत - बेळगाव, कर्नाटक, गोवा, दक्षिण महाराष्ट्र, कोकण या विभागात प्रचलित.
८। दैनिक ऐक्य -
९। पुढारी -
१०। देशदूत -
११। देशोन्नती -
१२। प्रहार -
Binaca Geet Mala - 1953 Finals!!!
10 years ago
No comments:
Post a Comment