Tuesday, November 30, 2010

Marathi Newspaper

वर्तमानपत्र! सकाळी उठल्यावर आपल्या पैकी बऱ्याच लोकांना सर्वप्रथम हाती हवे असते ते म्हणजे वर्तमानपत्र... काही जणांना त्याशिवाय चहा गोड लागत नाही तर काहींना त्याशिवाय... जावू देत - त म्हणजे ताकभात असे ओळखून घ्या... :)
आपल्या पैकी काहींना पेपर मधल्या बातम्या वाचल्याशिवाय दिवस सुरु झाल्यासारखे वाटत नाही तर काहींचा भविष्य हा विकपाँइंट!!
मुंबई सारख्या ठिकाणी प्रवास करणारी चाकरमानी वर्गातली बरीच जणं आसरा घेतात तो वर्तामानपत्रातल्या शब्दकोड्यांचा.. मैत्रीणींसाठी जसा पेपर खास पुरवणी घेवुन सज्ज असतो तसा तरुणाईतल्या मुलांसाठी सुद्धा। आणि आपल्या छोट्या वर्गासाठी ही खास पुरवणी असतेच की धम्माल गोष्टी घेवुन॥

ऑनलाइन वर्तमानपत्रांच्या ह्या काही लिंक्स :-

१। महाराष्टृ टाईम्स - महाराष्ट्रातील प्रादेशिक घडामोडी अणि जगभरातील इतर घडामोडी स्वरूपात प्रक्षेपित करणारे दैनिक। टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचे मराठी वृत्तपत्र.

२. लोकसत्ता - महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर, नागपुर येथून प्रकाशित होणारे एक्सप्रेस ग्रूपचे दैनिक.


३। सकाळ - बहुतांशी पुणेकरांचे आवडते पुण्यातुन प्रकाशित होणारे दैनिक.


४। लोकमत - औरंगाबाद, नागपुर, विदर्भ, मराठवाडा विभागातील प्रसिद्ध दैनिक.


५। सामना - बाळासाहेब ठाकरे संपादक। शिवसेनेचे वृत्तपत्र म्हणून प्रसिद्ध। संपादकीय लेखांसाठी बहुतेकांचे आवडते दैनिक।

६। दैनिक केसरी - पुणे, सोलापुर, सांगली, अहमदनगर आणि चिपळूण येथून प्रकाशित होणारे दैनिक.

७। तरुण भारत - बेळगाव, कर्नाटक, गोवा, दक्षिण महाराष्ट्र, कोकण या विभागात प्रचलित.

८। दैनिक ऐक्य -

९। पुढारी -


१०। देशदूत -

११। देशोन्नती -

१२। प्रहार -

Inspiration

प्रेरणा !!!
एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... असा वाटण्याची जागा मग, मूल झालं की... मोठं घर झालं की... अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते. दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.

मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.

आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की ... आपल्या दाराशी एक गाडी आली की... आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की... निवृत्त झालो की... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.

खरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही। आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच। ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?

जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत राहतं. पण, मध्ये बरेच अडथळे असतात . काही आश्‍वासनं पाळायची असतात , कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं.... आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.
या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही. आनंद हाच एक महामार्ग आहे. म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.

शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो.

एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा. आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -
१ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू?
२ - गेल्या पाच वर्षांत विश् ‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील ?
४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का ?

हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण, असं वाटलं नसलं तरी, या प्रश्‍नांची उत्तरं देणं तसं सोपं नाहीच, नाही का? टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो. पदकं आणि चषक धूळ खात पडतात. जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.

आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -
१ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
२ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?
३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद- दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.

क्षणभर विचार करा. आयुष्य अगदी छोटं आहे.

आता एक गोष्ट. काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.

पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.
धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण...
"डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?'' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले.
ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता... त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात. का? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.
आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.
शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही...
दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का?

Thursday, November 18, 2010

Asehi Love Letter

Changing Dreams

स्वप्न अशी बदलतात.....

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचंय.
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचंय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचंय

नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी . व्ही . पहात राहायचंय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचंय ...


सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार् या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचंय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचंय ...


कॉम्प्यूटरवर बसुन कसलं काम करतात ?
कॉम्प्यूटरवर तर नुसतेच गेम असतात

रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचंय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचंय...



ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचंय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचंय ...

ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर , पिज्झा , फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचंय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...



महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात !
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात ?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचंय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचंय ...



आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचंय ....


I am sure this is what each and every one would have experienced…


Here I am sitting in my office @ night…
Thinking hard about life
How it changed from college life to strict professional life
…...



How tiny pocket money changed to huge monthly paychecks
but then why it gives less happiness….

How a few local denim jeans changed to new branded wardrobe
but then why there are less people to use them

How a single plate of samosa changed to a full Pizza or burger
But then why there is less hunger…..

Here i am sitting in my office @ night…
Thinking hard about life
How it changed…..

How a bike always in reserve changed to bike always on
but then why there are less places to go on……

How a small coffee shop changed to cafe coffee day
but then why its feels like shop is far away…..

How a limited prepaid card changed to postpaid package
but then why there are less calls & more messages……

Here i am sitting in my office @ night…
Thinking hard about life
How it changed…...

How a general class journey changed to Flight journey
But then why there are less vacations for enjoyment….

How a old assembled desktop changed to new branded laptop
but then why there is less time to put it on……….

How a small bunch of friends changed to office mate
But then why we always feel lonely n miss those college frnz.….
Here i am sitting in my office @ night…
Thinking hard about life
How it changed…..

How it changed....??????????????

MARATHI SURNAMES

आडनाव - आपल्या नावाच्या शेवटी येणारे हे आडनाव फार चमत्कारिक असते। काहींचे त्यांच्या व्यवसायावरून तर काहींचे वर्णावरून , तर काहींच्या आडनावांना काही अर्थच नसतो. चमत्कारिक अर्थ लावलेली ही काही आडनावे....

1. Gardenner - MAALI - माळी
2. Stenographer - TIPNIS - टिपणिस
3. Goldsmith - SONAR - सोनार
4. Priest - PUJARI - पुजारी
5. Sweeper - ZADE / ZADGAONKAR - झाडे / झाडगावकर
6. Smoker - DHURI - धुरी
7. Milkman - GAWALI - गवळी
8. Roadside Contractor - MUKADAM - मुकादम

9. Royal / King's Family - RAAJE - राजे
10. Drawing Maker - CHITRE - चित्रे
11. Umbrella Maker - CHHATRE - छत्रे
12. Money Spender - KHARCHE - खर्चे
13. Pot Maker - MATKARI - मतकरी
14. Foreigner - PARDESHI - परदेशी
15. Bakery owner - PAWGI /BUNKAR - पावगी / बनकर
16. One with tailoring shop - SHIWDE / SHIMPI - शिवडे / शिंपी
17. Jeweller - RATNAPARAKHI - रत्नपारखी
18. Building constructor - AADEKAR/MAHALE - आडेकर / महाले
19. Lamp factory Owner - DIVEKAR - दिवेकर
20. Cotton mill owner - KAPSE /RUIKAR - कापसे / रुईकर
21. Silver mine owner - CHANDEKAR - चांदेकर

22. One who only takes - LELE - लेले
23. One who always says 'take away' - NENE - नेने
24. Maharashtrian Bill Gates - BAL PHATAK - बाळ फाटक
25. Maharashtrian Mouse - BAL POKHARKAR - बाळ पोखरकर
26. Neil Armstrong - NEELESH BHUJBAL - निलेश भुजबळ
27. One with K on his head - SHIRKE - शिर्के
28. Narasimha Avtar - POTPHODE - पोटफोडे
29. One with stomach problem - POTDUKHE -पोटदुखे
30. One with weight of 100 tonnes - SOMAN - सोमण

31. One who is brave - WAGH /VEERKAR - वाघ / वीरकर
32. Tiger Catcher - WAGHDHARE - वाघमारे

33. Tiger Killer - WAGHMARE - वाघधरे
34. With the face of Cow - GAITONDE - गायतोंडे
35. From Fox family - KOLHE - कोल्हे
36
. From Wolf family - LANDAGE - गोडबोले
37. One who is real cat - MANJAREKAR - मांजरेकर
38. One who lives in village - GAONKAR - गावकर
39. One who only take money - DAMLE - दामले
40. One who is untidy - GABALE - गबाळे

41. One who eats more - DHOLE/DHAMDHERE - ढोले / ढमढेरे
42. One who works very cool - KULKARNI - कुलकर्णी

43. One who is coward - PULEKAR - पुळेकर
44. One who reaches the root - MULEY - मुळे
45. One who is 1000 times more intellegent- SAHASRABUDHHE - सहस्त्रबुद्धे
46. One who divides by 2 - NIMKAR - निमकर
47. One who kills - MARANE - मारणे
48. One who Sleeps a lot - ZOPE - झोपे
49. Do die do - KARMARKAR - करमरकर

50. One who twists - PILGAONKAR- पिळगावकर
51. The God - DEO/DEO-kule - देव / देवकुळे
52. Big old Rishi - MAHAMUNI - महामुनी
53. One who always wins - JAYKAR - जयकर

54. One who talks a lot - MAHASHABDE - महाशब्दे
55. One who doesn't talk - GOOPCHOOP - गुपचुप
56. Talkative - BADBADE - बडबडे

57. Sweet Talker - GODBOLE - सहमते
58. One who never Listens - NAIK - नाईक
59. One who is always on Strike - HARTALKAR - हरताळकर
60. One who always makes the job hard - HARDIKAR - हर्डीकर
61. One who builds temples - DEVALEKAR - देवळेकर
62. One who runs away - BHAGWAT - भागवत

63. One who breaks everything - KHANDEKAR - खांडेकर
64. One who blackens everything - KAJALE - काजळे
65. One who is father - BAPAT - बापट

66. One who lives in Clouds - DHAGE - ढगे
67. One who is from Leaf - PANASE - पानसे
68. One who agrees with everyone - SAHAMATE - सहमते
69. One who always go to varanasi - KASHIKAR - काशीकर
70. One who is very sweat - GODSE - गोडसे
71. Bitter person - KADU - कडू

72. Its okay - BARWE - बर्वे
73. One who thinks - VICHAARE - विचारे
74. One who is wise - SHAHANE - शहाणे

75. One who is close to everyone - JAWALKAR - जवळकर
76. One who is bald - TAKLE - टकले
77. One who only thinks of curd rice - DAHIBHATHE - दहीभाते
78. Mango man - AAMBEKAR - आंबेकर
79. One who Eats only Carrots - GAAJARE - गाजरे

80. One who eats only Snake Gourd - PADVAL - पडवळ

Colourful maharashtrians
81. - KALE - काळे
82.- GORE - गोरे
83. - HIRWE - हिरवे
84. - KALBHOR - काळभोर
85. - PIWALE - पिवळे
86. - DHAWLE - धवले

Some Metallic Maharashtrians
87. - PITALE - पितळे
88. - TAMBE - तांबे
89. - LOKHANDE - लोखंडे
90. - SONE
- सोने


91. One who has by hearted Vedas - VEDPATHAK - वेदपाठक
92. One who troubles whole world - JAGTAP - जगताप
93. One who is Mad - PISAAT - पिसाट
94. One who divides - BHEDE - भेदे
95. House Breaker - GHARPHODE - घरफोडे
96. Head Breaker - DOIPHODE - डोईफोडे
97. Bed Breaker - KHATMODE - खातमोडे
98. Ear Breaker - KANPHODE - कानफोडे
99. One who is always in work - KAMAT - कामत
100. One who has five sons - PACHPUTE - पाचपुते
101. One who has twenty sons - VISPUTE - विसपुते

निरखून पहा

Tuesday, November 16, 2010

Graffiti - 3

ग्राफिटीची काही रंगीत पाने तुमच्या चेहरऽयावर रंग खुलविण्यासाठी .....











Kartiki Ekadashi

कार्तिक शुद्ध एकादशी!!! तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात..

तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरु होतात..

पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस..

विठोबाचे पंचामृत स्नान कसे होते, त्याचा हा व्हिडिओ :-


पंचामृत स्नानानंतर देवाचे मुख अवलोकन व आरती :-


कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठोबाची प्रार्थना :-


पंढरीच्या विठोबाच्या छायाचित्रांची ही काही पाने......


























Monday, November 15, 2010

Ayushya Khup Sundar Ahe

आयुष्यावरिल ह्या आशादायक कवितेचे पहिले पान...

आयुष्य खुप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा....

वादळात सगळं वाहून गेलं,
म्हणून रडत बसू नका,
वेगळं असं काही, माझ्यात खास नाही,
असं म्हणून उदास होवू नका...

मृगाकडे कस्तूरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्यातही लपला आहे..

आव्हान करा त्या सुर्याला !!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नविन क्षितिज घेऊन,
अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजुन,
मग रोजचा उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन....

आयुष्य खुपच सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा...

Saturday, November 13, 2010

Graffiti - 2

पुन्हा एकदा ग्राफिटी !!! ही ग्राफिटीच इतकी बोलकी असते की मी फारसे न लिहिणे हेच उत्तम ......