अध्याय १५ :- तत्त्वं
XV Tattvam - Unborn Self or BrahmanImpressed but not through teaching, Ashtavakra relentlessly points to the vast emptiness of Self.
॥ अष्टावक्र उवाच ॥
यथातथोपदेशेन कृतार्थः सत्त्वबुद्धिमान् ।
आजीवमपि जिज्ञासुः परस्तत्र विमुह्यति ॥१॥
अष्टावक्र म्हणाला सात्त्विक बुद्धीचा पुरुष थोडयाशा उपदेशानेंच कृतार्थ होतो. पण संसारासक्त, असद्बुद्धीचा पुरुष आयुष्यभर जिज्ञासु असूनही पुन्हा पुन्हा मोह पावतो व मुक्तीला मुकतो. ॥१॥
Ashtavakra said:
1. While a person of pure intelligence may achieve the goal by the most casual of instructions, another may seek knowledge all one's life and still remain bewildered.
मोक्षो विषयवैरस्यं बन्धो वैषयिको रसः ।
एतावदेव विज्ञानं यथेच्छसि तथा कुरु ॥२॥
विषयांबद्दल वैराग्य म्हणजे मोक्ष व विषयांविषयीं रस-आवड असणें हाच बन्ध आहे, एवढेंच ज्ञान आहे. जसें वाटेल तसें तूं कर. ॥२॥ 2. Liberation is indifference to the objects of the senses. Bondage is love of the senses. This is knowledge. Now do as you please.
वाग्मिप्राज्ञानमहोद्योगं जनं मूकजडालसं ।
करोति तत्त्वबोधोऽयमतस्त्यक्तो बुभुक्षभिः ॥३॥
तत्त्वबोधवादविवादकुशल, पंडितालाही मूक व जड, व आळशी वाटण्याइतका, कर्मापासून (शारीरिक व मानसिक) परावृत्त करतो व सहजावस्थेंत ठेवतो, त्यामुळें भोगाभिलाषी लोकांनीं या मार्गाचा त्याग केला आहे. ॥३॥ 3. This awareness of the truth makes an eloquent, clever and energetic person dumb, stupid and lazy, so it is avoided by those whose aim is enjoyment or praise.
न त्वं देहो न ते देहो भोक्ता कर्ता न वा भवान् ।
चिद्रूपोऽसि सदा साक्षी निरपेक्षः सुखं चर ॥४॥
हे जनका ! तूं शरीर नाहींस, भोक्ता नाहींस, किंवा कर्ता नाहींस. तूं निखळ चैतन्य आहेस, यांचा साक्षी आहेस. त्याच निरपेक्ष, साक्षी वृत्तींत राहून तूं सुखानें राहा. ॥४॥ 4. You are not the body, nor is the body yours, nor are you the doer of actions nor the reaper of their consequences. You are eternally pure consciousness the witness, in need of nothing - so live happily.
रागद्वेषौ मनोधर्मौ न मनस्ते कदाचन ।
निर्विकल्पोऽसि बोधात्मा निर्विकारः सुखं चर ॥५॥
राग व द्वेष हे मनाचे धर्म आहेत. तें मन म्हणजे तूं नव्हेस तर विकल्परहित, निर्विकार असा बोधरुप आत्मा तूं आहेस, हें जाणून सुखानें राहा. ॥५॥ 5. Desire and anger are objects of the mind, but the mind is not yours, nor ever has been. You are choiceless awareness itself, unchanging - so live happily.
सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
विज्ञाय निरहंकारो निर्ममस्त्वं सुखी भव ॥६॥
सर्व भूतांमध्यें तो चैतन्यरुप आत्मा आहे व भूतें त्यांत सामावलीं आहेत ह्या बोधानें निरहंकारी व ममतारहित असा तूं सुखी अस. ॥६॥ 6. Recognising oneself in all beings, and all beings in oneself, be happy, free from the sense of responsibility and free from preoccupation with me.
विश्वं स्फुरति यत्रेदं तरंगा इव सागरे ।
तत्त्वमेव न सन्देहश्चिन्मूर्ते विज्वरो भव ॥७॥
समुद्रावर उठणार्या तरंगाप्रमाणें हें विश्व ज्यावर स्फुरण पावतें तें तूंच आहेस याबद्दल संदेहच नाहीं म्हणून हे चिन्मय ! तूं विगतज्वर हो ॥७॥ 7. Your nature is the consciousness, in which the whole world wells up, like waves in the sea. That is what you are, without any doubt, so be free of disturbance.
श्रद्धस्व तात श्रद्धस्व नात्र मोऽहं कुरुष्व भोः ।
ज्ञानस्वरूपो भगवानात्मा त्वं प्रकृतेः परः ॥८॥
हे सौम्य ! श्रद्धा ठेव, याबद्दल संशय ठेवूं नकोस. श्रद्धा ठेव कीं, तूं ज्ञानस्वरुप, भगवान्, परमात्मा, प्रकृतीहून वेगळा आहेस. ॥८॥ 8. Have faith, my dearest, have faith. Don't let yourself be deluded in this. You are yourself the Lord, whose property is knowledge- you are beyond natural causation.
गुणैः संवेष्टितो देहस्तिष्ठत्यायाति याति च ।
आत्मा न गंता नागंता किमेनमनुशोचसि ॥९॥
गुणांनीं लपेटलेलें शरीर जड आहे. तें येतें आणि जातें. आत्मा न जाणारा आहे न येणारा आहे, मग त्या शरीराबद्दल एवढा खेद करण्याचें काय कारण आहे ? ॥९॥ 9. The body invested with the senses stands still and comes and goes. You yourself neither come nor go, so why bother about them?
देहस्तिष्ठतु कल्पान्तं गच्छत्वद्यैव वा पुनः ।
क्व वृद्धिः क्व च वा हानिस्तव चिन्मात्ररूपिणः ॥१०॥
तुझा हा देह कल्पांतापर्यंत राहो अथवा या क्षणीं त्याचा नाश होवो, पण तूं चिन्मात्रस्वरुप असल्यानें तुला वृद्धि कुठली व नाश कुठला ? ॥१०॥ 10. Let the body last to the end of the Age, or let it come to an end right now. What have you, who consist of pure consciousness, gained or lost?
त्वय्यनंतमहांभोधौ विश्ववीचिः स्वभावतः ।
उदेतु वास्तमायातु न ते वृद्धिर्न वा क्षतिः ॥११॥
अनंत महासागरावर विश्वरुप तरंग स्वभावतः उत्पन्न होतात व अस्त पावतात. परंतु तुझी (चिन्मय आत्म्याची) न वृद्धि होते न नाश होतो. ॥११॥ 11. Let the world-wave rise or subside according to its own nature in you, the great ocean. It is no gain or loss to you.
तात चिन्मात्ररूपोऽसि न ते भिन्नमिदं जगत् ।
अतः कस्य कथं कुत्र हेयोपादेयकल्पना ॥१२॥
हे तात, तूं चैतन्यस्वरुप आहेस, त्यामुळें तुला कुठल्याही वस्तूचा त्याग वा गृहण करणें शक्य नाहीं. कारण हें जगत् तुझ्याहून वेगळें नाहीं. ॥१२॥ 12. My dearest, you consist of pure consciousness, and the world is not separate from you. So who is to accept or reject it, and how, and why?
एकस्मिन्नव्यये शान्ते चिदाकाशेऽमले त्वयि ।
कुतो जन्म कुतो कर्म कुतोऽहंकार एव च ॥१३॥
हे जनका ! भेदशून्य, अविनाशी, शांत, निर्मल अशा तुझ्या चैतन्याकाशांत न जन्म, न मृत्यु, न कुठलें कर्म, न अहंकार शिल्लक असूं शकेल. ॥१३॥ 13. How can there be either birth, karma or responsibility in that one unchanging, peaceful, unblemished and infinite consciousness which is you?
यत्त्वं पश्यसि तत्रैकस्त्वमेव प्रतिभाससे ।
किं पृथक् भासते स्वर्णात् कटकांगदनूपुरम् ॥१४॥
ज्याप्रमाणें एकाच सोन्यानें घडविलेली बांगडी, बाजूबंद व घुंगरु आकारानें वेगळे वाटले तरी एकाच सोन्याचे आहेत, त्याप्रमाणें तूं जें जें पाहात आहेस त्या त्या ठिकाणीं जरी बाह्य आकार वेगळा दिसला तरी तूंच आहेस : ॥१४॥ 14. Whatever you see, it is you alone manifest in it. How could bracelets, armlets and anklets be different from the gold?
अयं सोऽहमयं नाहं विभागमिति संत्यज ।
सर्वमात्मेति निश्चित्य निःसङ्कल्पः सुखी भव ॥१५॥
हे जनका ! हा तो (परका) आहे, हा मी (माझा) आहे, हा मी (माझा) नव्हे, या भेदबुद्धीचा त्याग करुन मी सर्वरुप आत्माच आहें या निश्चित बोधानें व कामनारहित होऊन सुखी हो. ॥१५॥ 15. Giving up such distinctions as 'That is what I am,' and 'I am not That', recognise that Everything is Self, and be, without distinction, and be happy.
तवैवाज्ञानतो विश्वं त्वमेकः परमार्थतः ।
त्वत्तोऽन्यो नास्ति संसारी नासंसारी च कश्चन ॥१६॥
हे शिष्या ! तुझ्याच अज्ञानामुळे हें जग भासतें, व तुझ्याच आत्मज्ञानानें त्याचा नाश होतो. ज्ञानाचा उदय झाल्यावर तूंच एकटा एकच उरतोस; परमार्थंतः संसारी व असंसारी हे भेद तुला नाहींत. ॥१६॥ 16. It is through your ignorance that all this exists. In reality you alone exist. Apart from you there is no one within or beyond samsara.
भ्रान्तिमात्रमिदं विश्वं न किंचिदिति निश्चयी ।
निर्वासनः स्फूर्तिमात्रो न किंचिदिव शाम्यति ॥१७॥
हें जगत् भ्रांतीमुळें दिसत आहे. त्याचें स्वतःचें त्याशिवाय अस्तित्व नाहीं, असा बोध ज्याच्या अनुभूतींत आला तो वासनारहित होऊन, स्फूर्तिमात्र उरुन, शान्तीला प्राप्त होतो. ॥१७॥ 17. Knowing that all this is an illusion, one becomes free of desire, pure receptivity and at peace, as if nothing existed.
एक एव भवांभोधावासीदस्ति भविष्यति ।
न ते बन्धोऽस्ति मोक्षो वा कृत्यकृत्यः सुखं चर ॥१८॥
अष्टावक्र म्हणतो कीं, हे जनका, या संसाररुपी महासागरांत सदा एकटा एक तूंच असंग व साक्षीरुपानें होतास व राहाशील. आतां तुला न कुठला बंध आहे, न कुठला मोक्ष आहे. तूं आतां कृतकृत्य, धन्य झाला आहेस. ॥१८॥ 18. Only one thing has existed, exists and will exist in the ocean of being. You have no bondage or liberation. Live happily and fulfilled.
मा सङ्कल्पविकल्पाभ्यां चित्तं क्षोभय चिन्मय ।
उपशाम्य सुखं तिष्ठ स्वात्मन्यानन्दविग्रहे ॥१९॥
हे चिन्मय ! संकल्पविकल्पानें तूं आपलें चित्त क्षोभित करुं नकोस तर संकल्पविकल्परहित होऊन आपल्या आनंदस्वरुपांत राहा. ॥१९॥ 19. Being pure consciousness, do not disturb your mind with thoughts of for/against. Be at peace and remain happily in yourself, the essence of joy.
त्यजैव ध्यानं सर्वत्र मा किंचिद् हृदि धारय ।
आत्मा त्वं मुक्त एवासि किं विमृश्य करिष्यसि ॥२०॥
ध्यान करणें ही मनाची क्रिया आहे म्हणून ध्यानाचा व हृदयांत कांहींही प्रतिमा ठेवण्याची क्रिया हेंही ध्यान असल्यानें त्याचाही त्याग कर; आत्मा स्वयमेव मुक्तच असल्यानें तूं विचार करुन काय साधणार आहेस ? ॥२०॥ 20. Give up meditation completely and cling to nothing in your mind. You are free in your very nature, so what will you achieve by conceiving?
No comments:
Post a Comment