अध्याय १७ :- कैवल्य
XVII Kaivalya - Absolute Aloneness of the SelfAshtavakra describes the nature of one who is truly free.
॥ अष्टावक्र उवाच ॥
तेन ज्ञानफलं प्राप्तं योगाभ्यासफलं तथा ।
तृप्तः स्वच्छेन्द्रियो नित्यं एकाकी रमते तु यः ॥१॥
अष्टावक्र म्हणाला आत्मज्ञानाचें फळ त्याच पुरुषाला मिळतें आणि त्याच पुरुषाचा योगाभ्यास सुफलित होतो, ज्यानें विषयवासनांचा त्याग करुन आपलीं इंद्रियें निर्मळ केलीं व ’स्व’ मध्येंच जो राहिला आहे. ॥१॥
Ashtavakra said:
1. He who is content, with purified senses, and always enjoys solitude, has gained the fruit of knowledge and the fruit of the practice of union too.
न कदाचिज्जगत्यस्मिन् तत्त्वज्ञा हन्त खिद्यति ।
यत एकेन तेनेदं पूर्णं ब्रह्माण्डमण्डलम् ॥२॥
हे जनका, या संसारांत तत्त्ववित् ज्ञानी कधीं खेदाला प्राप्त होत नाहीं. कारण तो जाणतो कीं, माझ्या एकटयानेंच हें सर्व विश्व व्यापलें आहे. खेद द्वैतानें होत असतो. अद्वैत असल्यावर खेद कसला ? ॥२॥ 2. The knower of truth is never distressed in this world, for the whole round world is full of himself alone.
न जातु विषयाः केऽपि स्वारामं हर्षयन्त्यमी ।
सल्लकीपल्लवप्रीतमिवेभं निंबपल्लवाः ॥३॥
मधुर रसाच्या सल्लकी नांवाच्या वेलींचा चारा खायला मिळाल्यावर कडू असलेला कडुलिंबाचा पाला हत्ती खात नाहीं त्याप्रमाणें जो आत्मानंदांत रममाण झाला त्याला विषयांचा आनंद आनंदित करुं शकत नाहीं. ॥३॥ 3. None of the senses please a person who has found satisfaction within, just as grape leaves do not please the elephant that likes mango leaves.
यस्तु भोगेषु भुक्तेषु न भवत्यधिवासिता ।
अभुक्तेषु निराकांक्षी तदृशो भवदुर्लभः ॥४॥
हे जनका, ज्या पुरुषाला गतकालांत भोगलेल्या भोगांबद्दल आसक्तिपूर्ण स्मरण होत नाहीं किंवा न भोगलेल्या भोगांबद्दल आकांक्षा निर्माण होत नाहीं, परंतु जो आपल्या आत्म्यांतच तृप्त आहे असा पुरुष संसारसागरांत विरळाच असतो. ॥४॥ 4. The person who is not attached to the things he has enjoyed, and does not hanker after the things he has not enjoyed, such a person is hard to find.
बुभुक्षुरिह संसारे मुमुक्षुरपि दृश्यते ।
भोगमोक्षनिराकांक्षी विरलो हि महाशयः ॥५॥
या जगांत मुमुक्षु-आकांक्षा करणारे अनेक प्रकारचे पाहायला मिळतात परंतु भोग आणि मोक्ष यांच्या आकांक्षारहित आणि परब्रह्माच्या बाबतींत कामनारहित स्थित असा पुरुष क्वचितच सांपडतो. ॥५॥ 5. Those who desire pleasure and those who desire liberation are both bound in samsara; the great-souled person who desires neither pleasure nor liberation is rare indeed.
धर्मार्थकाममोक्षेषु जीविते मरणे तथा ।
कस्याप्युदारचित्तस्य हेयोपादेयता न हि ॥६॥
हे शिष्या, जगांत असा पुरुष दुर्लभ आहे कीं जो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तसाच जगणें आणि मरणें, या सर्वांबद्दल उदासीन----कामनारहित असा आहे. ॥६॥ 6. It is only the noble minded who is free from attraction or repulsion to religion, wealth, sensuality, and life and death too.
वांछा न विश्वविलये न द्वेषस्तस्य च स्थितौ ।
यथा जीविकया तस्माद् धन्य आस्ते यथा सुखम् ॥७॥
विश्वाचा लय व्हावा अशी इच्छा ज्या ज्ञानी पुरुषाला नाहीं किंवा विश्व स्थिर राहिल्याबद्दल ज्याला राग नाहीं, अर्थात् प्रपंच राहो वा नष्ट होवो, याबद्दल जो उदासीन आहे व यथाप्राप्त आजीविकेद्वारा संतुष्ट राहात असतो तो धन्य होय. ॥७॥ 7. Such a one feels no desire for the elimination of all this, nor anger at its continuing, so the lucky person lives happily with whatever sustenance presents itself.
कृतार्थोऽनेन ज्ञानेनेत्येवं गलितधीः कृती ।
पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्न् अश्नन्नस्ते यथा सुखम् ॥८॥
मी अद्वैत आत्मज्ञानानें कृतार्थ झालों आहें अशीही जाणीव ज्या पुरुषाला शिवत नाहीं व बाह्य इंद्रियांचें पाहाणें, ऐकणें, स्पर्श करणें, वास घेणें, खाणें इत्यादि व्यवहार तो सामान्य संसारी माणसाप्रमानें करीत असला तरी आत्मवृत्तीचा भंग---व साक्षी अवस्था सुटणें या गोष्टी होत नाहींत. ॥८॥ 8. Thus fulfilled through this knowledge, contented, the thinking-mind emptied, one lives happily just seeing when seeing, just hearing when hearing, just feeling when feeling, just smelling when smelling and just tasting when tasting.
शून्या दृष्टिर्वृथा चेष्टा विकलानीन्द्रियाणि च ।
न स्पृहा न विरक्तिर्वा क्षीणसंसारसागरे ॥९॥
ज्या पुरुषाचा संसारसागर क्षीण झाला आहे, त्याला विषयांची इच्छाही होत नाहीं किंवा विरक्त होण्याचीही इच्छा होत नाहीं. त्या ज्ञानी पुरुषाचें मन, शरीर व इंद्रियें बालकाप्रमाणें किंवा उन्मत्ताप्रमाणें व्यापारशून्य होतात व त्याच्या शरिराची हालचालही उद्दशहीन व वृथाच होत असते. ॥९॥ 9. In one for whom the ocean of samsara has dried up, there is neither attachment or aversion. Such a one's gaze is vacant, behaviour purposeless, and senses never grappling.
न जगर्ति न निद्राति नोन्मीलति न मीलति ।
अहो परदशा क्वापि वर्तते मुक्तचेतसः ॥१०॥
ज्ञानी पुरुष सामान्य माणसाप्रमाणें बाह्य विषयांकडे डोळे उघडून जागा राहात नाहीं. कारण त्याला बाह्य विषय न दिसतां परब्रह्मच दिसतें. तसाच तो डोळे बंद करुन झोपतही नाहीं. कारण झोपलेल्याची बाह्य विषयांची जाणीव संपते पण ज्ञानी पुरुषाचें अनुसंधान झोपेंतही सुटत नाहीं, आणि त्यामुळें ज्ञानी पुरुष केवढी मुक्तदशा अनुभवतो तें आश्चर्यजनक आहे. ॥१०॥ 10. Surely the supreme state is everywhere for the liberated mind. Such a one is neither awake or asleep, and neither opens or closes the eyes.
सर्वत्र दृश्यते स्वस्थः सर्वत्र विमलाशयः ।
समस्तवासना मुक्तो मुक्तः सर्वत्र राजते ॥११॥
सर्व वासना गळून पडल्यानें, निर्मळ , प्रसन्न व शांत झालेला जीवन्मुक्त सर्व अवस्थांत एकरस ब्रह्मरुपानें सर्वत्र प्रकाशमान होतो. ॥११॥ 11. The liberated one is resplendent everywhere, free from all desires. Everywhere such a one appears self-possessed and pure of heart.
पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्न् अश्नन् गृण्हन् वदन् व्रजन् ।
ईहितानीहितैर्मुक्तो मुक्त एव महाशयः ॥१२॥
सर्वत्र पाहातांना, ऐकतांना, स्पर्श करतांना, वास घेतांना, खातांना, घेतांना, बोलतांना, चालतांनाही ज्ञानी इच्छाद्वेषरहित असतो. कारण त्याची ब्रह्मानंदीं टाळी लागलेली असते. ॥१२॥ 12. Seeing, hearing, feeling, smelling, tasting, speaking and walking about, the great-souled person who is freed from trying to achieve or avoid anything is free indeed.
न निन्दति न च स्तौति न हृष्यति न कुप्यति ।
न ददाति न गृण्हाति मुक्तः सर्वत्र नीरसः ॥१३॥
मुक्त पुरुष कोणाची निंदा करीत नाहीं, कोणाची स्तुतीही करीत नाहीं, हर्षही पावत नाहीं व रागावतही नाहीं, कुणाला कांहीं देत नाहीं, कुणाकडून घेत नाहीं; तो सर्वत्र रसहीन-आसक्तिहीन वृत्तीनें असतो. ॥१३॥ 13. The liberated person is free from desires everywhere. Such a one neither blames, praises, rejoices, is disappointed, gives nor takes.
सानुरागां स्त्रियं दृष्ट्वा मृत्युं वा समुपस्थितं ।
अविह्वलमनाः स्वस्थो मुक्त एव महाशयः ॥१४॥
कामुक स्त्रियांना पाहून वा मृत्यु जवळ उभा ठाकला असतां ज्याचें मन कासावीस होत नाहीं तोच मुक्त पुरुष होय. ॥१४॥ 14. When a great souled one is unperturbed in mind and self-possessed at either the sight of a mate eager with desire, or at fast-approaching death, that one is truly liberated.
सुखे दुःखे नरे नार्यां संपत्सु विपत्सु च ।
विशेषो नैव धीरस्य सर्वत्र समदर्शिनः ॥१५॥
ज्याचें चित्त सुखांत आणि दुःखांत, संपर्कांत आलेल्या स्त्रीपुरुषाबद्दल, संपत् आणि विपत् कालांत समतोल राहातें त्या धीर पुरुषालाचा जीवन्मुक्त म्हणतात. ॥१५॥ 15. There is no distinction between pleasure and pain, man and woman, success and failure for the wise person who looks on everything as equal.
न हिंसा नैव कारुण्यं नौद्धत्यं न च दीनता ।
नाश्चर्यं नैव च क्षोभः क्षीणसंसरणे नरे ॥१६॥
जीवन्मुक्त पुरुष कोणाची हिंसा करीत नाहीं तसेंच कोणावर दया करण्याकरितां हपापत नाहीं. तो कुणाशीं उर्मटपणानें वागणार नाहीं तसाच कोणापुढें दीन होणार नाहीं. त्याला कशाचें आश्चर्य वाटत नाहीं तसाच कशानें त्याला क्षोभ-राग येत नाहीं. ॥१६॥ 16. There is no aggression or compassion, no pride or humility, no wonder or confusion for the person whose days of running about are over.
न मुक्तो विषयद्वेष्टा न वा विषयलोलुपः ।
असंसक्तमना नित्यं प्राप्ताप्राप्तमुपाश्नुते ॥१७॥
जीवन्मुक्त पुरुष विषयांचा द्वेष करीत नाहीं तसाच तो विषयलोलुपही असत नाहीं. प्रारब्धवशात् जें प्राप्त होतें वा अप्राप्त असतें त्या परिस्थितीचा तो आसक्तिरहित बिनतक्रार स्वीकार करतो. ॥१७॥ 17. The liberated person is not averse to the senses and nor is he attached to them. He enjoys himself continually with an unattached mind in both achievement and non-achievement.
समाधानसमाधानहिताहितविकल्पनाः ।
शून्यचित्तो न जानाति कैवल्यमिव संस्थितः ॥१८॥
कुठल्या गोष्टीच्या प्राप्तीनें समाधान होणें, न मिळण्यानें असंतोष होणें, हें हिताचें आहे, हें नुकसानकारक आहे अशा विकल्पना शून्यचित्त पुरुष जाणत नाहीं. तो कैवल्यांत स्थित असतो. ॥१८॥ 18. One established in the absolute state with an empty mind does not know the alternatives of inner stillness and lack of inner stillness, and of good and evil.
निर्ममो निरहंकारो न किंचिदिति निश्चितः ।
अन्तर्गलितसर्वाशः कुर्वन्नपि करोति न ॥१९॥
हे जनका ! अंतरंगांतील सर्व आशा-ममता-अहंकार गळून पडल्यानें जो केवळ अस्तित्वमात्र उरला आहे, तो सर्व करुनही त्यांत लिप्त होत नाहीं. ॥१९॥ 19. Free of me and mine and of a sense of responsibility, aware that nothing exists, with all desires extinguished within, a person does not act even in acting.
मनःप्रकाशसंमोहस्वप्नजाड्यविवर्जितः ।
दशां कामपि संप्राप्तो भवेद् गलितमानसः ॥२०॥
हे जनका ! मनाच्या प्रकाशांत विचारलहरी उत्पन्न झाल्यानें निर्माण होणारा मोह, कल्पना-स्वप्नें, मनोराज्यें व जडता या सर्व गोष्टी-मनाचे सर्व व्यापारच गळून पडल्यानें व मनाचें अस्तित्वच गेल्यानें जीवन्मुक्त सदा अनिर्वचनीय अशा दशेंत राहात असतो. ॥२०॥ 20. One whose thinking mind is dissolved achieves the indescribable state and is free from the mental display of delusion, dream and ignorance.
No comments:
Post a Comment