Friday, March 18, 2011

Geetai - Adhyay 9

Chapter - IX : The Yoga of Dedication.

In this chapter is described the rare power of the name of God. There is an art in chanting this name and experience gained thereby is beyond words and that is why it is sweet. Though this knowledge is a hidden secret, Lord Krishna opens it out for all to understand with ease.

The Gita is the twice-distilled essence of the Vedic Dharma and the name of the Lord is the essence of the Vedas. It is certain that through 'Ramnama ' one can attain 'moksha ' which means that moksha becomes easy for women, children, the rustic and the poor, the weak, sick, lame and indeed for everyone. In whatever action, the man is engaged, through that natural action alone he is able to reach supreme by considering every human form as manifestation of God - such is this method. Another aspect is to dedicate whatever we do to him. Relate to him every act of yours.

There is no question of fitness - no pre-qualification. Any body who does this with pure heart gets the result. When learned men who say 'I'.'I' are left behind, innocent and devout women go forward. When the mind is pure and heart full of simplicity and holiness, moksha or liberation is not difficult to attain. If the action is filled with pure 'bhavana ', with the attitude of service, it becomes 'yagna'-dedication.

The essence of practice is to dissolve our Ego at the feet of the Lord by dedicating our base tendencies like lust, greed, anger etc. with sincere heart and we become pure as a result. Our senses are no longer our enemies. Their power for good is boundless. Therefore the best and the noblest way to use every one of the senses with the intellect surrendered to the Lord. This is called 'Raja-Yoga'.

How pure and holy the food will be when it is cooked with the 'bhavana' of pleasing the Lord. The moments of our daily life may appear commonplace, but in reality they are not so, they carry enormous significance. Life is dark, ugly and ill of sorrow. But just for a while, let the mind consider that all our actions are for the sake of the Lord. Then we will realise how full of beauty and value our lives become. Do not say what good can the word 'Rama' do. Just try saying it and see what happens.

Creation is but a mirror. What you are and what you bring to this mirror, the image of this, you see in this world. Therefore approach all creation with the feeling that it is good - that it is pure. Carry the same 'attitude' to all your ordinary actions. Then you will see a miraculous change. If you have the 'bhavana ' that Lord is always by your side, then you His servant will know no fear even if the whole world turns up-side down. Therefore turn your heart towards God. Attain his grace. Dedicate all actions to Him. Become altogether His. If you strengthen the attitude that all actions should be offered upto the Lord, this sordid life will become divine, the commonplace will become beautiful. Such actions are not illogical but beyond logic. Where logic ends, spirituality begins.

गीताई - अध्याय
श्री भगवान् म्हणाले

आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज ।
विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥

राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन ।
प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥

लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धेने न सेविती ।
मृत्यूची धरिती वाट संसारी मज सोडुनी ॥ ३ ॥

मी चि अव्यक्त-रूपाने जग हे व्यापिले असे ।
माझ्यात राहती भूते मी न भूतांत राहतो ॥ ४ ॥

न वा भूते हि माझ्यात माझा हा दिव्य योग की ।
करितो धरितो भूते परी त्यात नसे कुठे ॥ ५ ॥

आकाशात महा-वायु सदा सर्वत्र राहतो ।
माझ्यात सगळी भूते राहती जाण तू तशी ॥ ६ ॥

कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमधे ।
कल्पारंभी पुन्हा सारी मी चि जागवितो स्वये ॥ ७ ॥

हाती प्रकृति घेऊनि जागवी मी पुन्हा पुन्हा ।
भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो ॥ ८ ॥

परी ही सगळी कर्मे बांधू न शकती मज ।
उदासीनापरी राहे अनासक्त म्हणूनिया ॥ ९ ॥

साक्षी मी प्रकृति-द्वारा उभारी सचराचर ।
त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे ॥ १० ॥

[२८]

मज मानव-रूपात तुच्छत्वे मूढ देखती ।
नेणूनि थोरले रूप जे माझे विश्व-चालक ॥ ११ ॥

ते आशा-वाद मूढांचे कर्मे ज्ञाने हि ती वृथा ।
संपत्ति जोडिली ज्यांनी आसुरी मोह-कारक ॥ १२ ॥

दैवी संपत्ति जोडूनि महात्मे भजती मज ।
अनन्य-भावे जाणूनि मी विश्वारंभ शाश्वत ॥ १३ ॥

अखंड कीर्तने माझ्या यत्न-शील दृढ-व्रती ।
भक्तीने मज वंदूनि भजती नित्य जोडिले ॥ १४ ॥

दुसरे ज्ञान-यज्ञाने भजती व्यापका मज ।
ब्रह्म-भावे विवेकाने अविरोधे चि देखुनी ॥ १५ ॥

मी चि संकल्प मी यज्ञ स्वावलंबन अन्न मी ।
मंत्र मी हव्य ते मी चि अग्नि मी मी चि अर्पण ॥ १६ ॥

मी ह्या जगास आधार माय बाप वडील मी ।
मी तिन्ही वेद ॐ कार जाणण्या योग्य पावन ॥ १७ ॥

साक्षी स्वामी सखा भर्ता निवास गति आसरा ।
करी हरी धरी मी चि ठेवा मी बीज अक्षय ॥ १८ ॥

तापतो सूर्य-रूपे मी सोडितो वृष्टि खेंचितो ।
मृत्यु मी आणि मी मोक्ष असे आणि नसे हि मी ॥ १९ ॥

[२९]

वेदाभ्यासी सोम-पाने पुनीत ।
माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ॥
ते पुण्याने जाउनी इंद्र-लोकी ।
तेथींचे ते भोगिती दिव्य भोग ॥ २० ॥

त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ ।
क्षीणे पुण्ये मृत्यु-लोकास येती ॥
ऐसे निष्ठा ठेवुनी वेद-धर्मी ।
येणे-जाणे जोडिती काम-मूढ ॥ २१ ॥

अनन्य-भावे चिंतूनि भजती भक्त जे मज ।
सदा मिसळले त्यांचा मी योग-क्षेम चालवी ॥ २२ ॥

श्रद्धा-पूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते ।
यजिती ते हि माते चि परी मार्गास सोडुनी ॥ २३ ॥

भोक्ता मी सर्व यज्ञांचा फल-दाता हि मी चि तो ।
नेणती तत्त्व हे माझे म्हणूनि पडती चि ते ॥ २४ ॥

देवांचे भक्त देवांस पितरांचे तयांस चि ।
भूतांचे भक्त भूतांस माझे हि मज पावती ॥ २५ ॥

[३०]

पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज ।
ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे ॥ २६ ॥

जे खासी होमिसी देसी जे जे आचरिसी तप ।
जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण ॥ २७ ॥

अशाने तोडुनी सर्व कर्म-बंध शुभाशुभ ।
योग-संन्यास सांधूनि मिळसी मज मोकळा ॥ २८ ॥

सम मी सर्व भूतांस प्रियाप्रिय नसे मज ।
परी प्रेम-बळे राहे भक्त माझ्यांत त्यांत मी ॥ २९ ॥

असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो ।
मानावा तो जसा साधु त्याचा सुंदर निश्चय ॥ ३० ॥

शीघ्र तो होय धर्मात्मा शांति शाश्वत मेळवी ।
जाण निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो ॥ ३१ ॥

धरूनि आसरा माझा भोळे स्त्री-वैश्य-शूद्र हि ।
की पाप-योनि जे जीव ते हि मोक्षास पावती ॥ ३२ ॥

तेथे ब्रह्मर्षी राजर्षी ह्यांची गोष्ट कशास ती ।
भज तू मज आलास लोकी दुःख-द नश्वर ॥ ३३ ॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज ।
असे जोडूनि आत्म्यास मिळसी मज मत्पर ॥ ३४ ॥

अध्याय नववा संपूर्ण

No comments:

Post a Comment