Wednesday, March 9, 2011

Geetai - Adhyay 6

Chapter - VI : Controlling the Mind.

Concepts like Swadharma (Performing one's duty), Karma (Action), vikarma (Inward action) and Akarma (Stress-less Intense action) having been well explained in the preceding chapters, Vinoba now turns to the means for attaining this perfect state of action. One of the important tool in this direction is one-pointedness of mind, an integrated state as opposed to fragmented one.

Before explaining the contents of the chapter, Vinoba once again emphasises that Gita is a scripture intended for ordinary men, living daily life in the world. It may be useful to the ascetics but the main thrust of the discourse has common-man in the centre. He says that Gita is prepared to go to the lowest, the weakest, the least cultured of men. And it goes to him not to keep him where he is, but to grasp him by the hand and lift him up.

This Chapter which deals with the technique of meditation, points out three important parameters to obtain the result, one is one-pointedness of mind, second is setting bounds to one's life to achieve this and third is evenness of vision or a state of equanimity. For achieving this we need practice and objective outlook towards family, society, nation and the world. One-pointedness can be achieved by stopping the wheel of thoughts in the mind by coming out of the habit of brooding on trifles. If the mind incessantly (?) keeps on moving, the man's whole strength is lost. There is no kind of discipline. Our actions should be progressively purer by adopting the technique of Karma and Vikarma. To support the concentrated state of mind, he says that 'Let us turn away not only from bad things, but also from excess of even goods things'. Such disciplined conduct is called 'setting bounds to life'. Third parameter is a balanced outlook. So long as we cannot experience that the whole creation is auspicious, the mind will not be one-pointed. As long as we think that some-thing is wrong with the world, we look at all things with suspicion. If one looks at the world with friendly eyes, a perennial stream will spring in the heart, divine stars will shine in the inner firmament.

He sums the chapter by concluding remarks like this - For dhyana-yoga (the way of meditation), it is thus seen that one-pointedness of mind, disciplined living and a friendly and balanced outlook are necessary. Besides these, two other aids, detachment and practice, are mentioned. The first is a negative, destructive method, the other, positive and constructive. To uproot and throw away the weeds from the field is destructive work and this is vairagya detachment. To sow seeds in the field is constructive work. To think good thoughts again and again is abhyasa - practice. Vairagya is negative, abhyasa is positive.

गीताई - अध्याय


श्री भगवान् म्हणाले

फळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो ।
तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥

संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा ।
सोडिल्याविण संकल्प कोणी योगी न होतसे ॥ २ ॥

योगावरीचढू जाता कर्म साधन बोलिले ।
योगी आरूढ तो होता शम साधन बोलिले ॥ ३ ॥

कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे ।
संकल्प सुटले तेंव्हा तो योगारूढ बोलिला ॥ ४ ॥

उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी ।
आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला ॥ ५ ॥

जिंकूनि घेतला आत्मा बंधु तो होय आपुला ।
सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये ॥ ६ ॥

जितात्मा शांत जो झाला देखे ब्रम्ह चि एकले ।
मानापमानी शीतोष्णी सुख-दुःखी समावले ॥ ७ ॥

तोषला ज्ञान-विज्ञाने स्थिर जिंकूनि इंद्रिये ।
तो योगी सम जो देखे सोने पाषाण मृत्तिका ॥ ८ ॥

शत्रु मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा ।
असो साधु असो पापी सम पाहे विशेष तो ॥ ९ ॥

[१९]

साधके चित्त बांधूनि इच्छा संग्रह सोडुनी ।
आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे ॥ १० ॥

पवित्र स्थान पाहूनि घालावे स्थिर आसन ।
दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते ॥ ११ ॥

चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी ।
आत्म-शुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे ॥ १२ ॥

शरीर सम-रेखेत राखावे स्थिर निश्चळ ।
दृष्टि ठेवूनि नासाग्री न पहावे कुणीकडे ॥ १३ ॥

शांत निर्भय मच्चित्त ब्रम्हचर्य-व्रती स्थिर ।
मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ॥ १४ ॥

असे आत्म्यास जोडूनि योगी आवरिला मने ।
मोक्षास भिडली शांति माझ्या ठाई चि मेळवी ॥ १५ ॥

न योग फार खाऊनि किंवा खाणे चि सोडुनी ।
न फार झोप घेऊनि किंवा जागत बैसुनी ॥ १६ ॥

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि ।
मोजूनि करितो त्यास योग हा दुःख-नाशन ॥ १७ ॥

संपूर्ण नेमिले चित्त आत्म-रूपी चि रंगला ।
निमाली वासना तेंव्हा योगी तो युक्त बोलिला ॥ १८ ॥

निर्वाती ठेविला दीप तेवतो एकसारखा ।
तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती ॥ १९ ॥

निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला ।
जेथ भेटूनि आत्म्याते अंतरी तोषला स्वये ॥ २० ॥

भोगूनि इंद्रियातीत बुद्धि-गम्य महा-सुख ।
न ढळे चि कधी जेथ तत्त्वापासूनि लेश हि ॥ २१ ॥

जया लाभापुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो ।
न चळे जेथ राहूनि दुःख-भारे हि दाटला ॥ २२ ॥

तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोग चि ।
जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी ॥ २३ ॥

संकल्पी उठिले सारे काम निःशेष सोडुनी ।
इंद्रिये ही मनाने चि ओढुनि विषयातुनी ॥ २४ ॥

धरूनि धीर बुद्धीने निवर्तावे हळू हळू ।
आत्म्यात मन रोवूनि काही चिंतू नये स्वये ॥ २५ ॥

फुटेल जेथजेथूनि मन चंचळ अस्थिर ।
तेथतेथूनि बांधूनि लावावे आत्म-चिंतनी ॥ २६ ॥

विकारांसह ते ज्याचे शमले मन निर्मळ ।
झाला ब्रम्ह चि तो योगी पावला सुख उत्तम ॥ २७ ॥

आत्म्यास नित्य जोडूनि ह्यापरी दोष जाळुनी ।
सुखे चि भोगितो योगी ब्रम्हानंद अपार तो ॥ २८ ॥

भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली ।
योगाने जोडिला देखे हे चि सर्वत्र दर्शन ॥ २९ ॥

मज सर्वात जो पाहे पाहे माझ्यात सर्व हि ।
त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय ॥ ३० ॥

स्थिर होऊनि एकत्वी सर्व-भूती भजे मज ।
राहो कसा हि तो योगी माझ्यामध्ये चि राहतो ॥ ३१ ॥

जो आत्मौपम्य-बुद्धीने सर्वत्र सम पाहतो ।
जसे सुख तसे दुःख तो योगी थोर मानिला ॥ ३२ ॥

[२०]

अर्जुन म्हणाला

तू बोलिलास जो आता साम्य-योग जनार्दना ।
न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे ॥ ३३ ॥

मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे ।
धावे वार्‍यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर ॥ ३४ ॥

श्री भगवान् म्हणाले

अवश्य मन दुःसाध्य म्हणतोस तसे चि ते ।
परी अभ्यास-वैराग्ये त्याचा निग्रह होतसे ॥ ३५ ॥

संयमाविण हा योग न साधे मानितो चि मी ।
परी संयमवंतास उपाये साध्य होतसे ॥ ३६ ॥

अर्जुन म्हणाला

श्रद्धा आहे नव्हे यत्न योगातूनि चळूनि जो ।
मुकला योग-सिद्धीस जाय कोण्या गतीस तो ॥ ३७ ॥

काय तो उभय-भ्रष्ट ब्रम्ह-मार्गी भुलूनिया ।
नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी ॥ ३८ ॥

माझा संशय हा कृष्णा तू चि फेडी मुळातुनी ।
फेडीलसा दुजा कोणी न दिसे चि तुझ्याविण ॥ ३९ ॥

श्री भगवान् म्हणाले

न ह्या लोकी न त्या लोकी नाश तो पावतो कधी ।
शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे ॥ ४० ॥

पुण्य-लोकांत राहूनि तो योग-भ्रष्ट संतत ।
शुचि साधनवंतांच्या घरी जन्मास येतसे ॥ ४१ ॥

अथवा प्राज्ञ योग्यांच्या कुळी चि मग जन्मतो ।
अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ ॥ ४२ ॥

तिथे तो पूर्व-जन्मीचा बुद्धि-संस्कार जोडुनी ।
मोक्षार्थ करितो यत्न पूर्वीहूनि पुढे पुन्हा ॥ ४३ ॥

पूर्वाभ्यास-बळाने तो खेचला पर-तंत्र चि ।
जिज्ञासेने हि योगाच्या जातो वेदांस लंघुनी ॥ ४४ ॥

योगी तत्पर राहूनि दोष जाळित जाळित ।
अनेक जन्मी संपूर्ण होउनी मोक्ष पावतो ॥ ४५ ॥

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहूनि आगळा ।
मानिला तो असे योगी योगी होई म्हणूनि तू ॥ ४६ ॥

सर्व योग्यांमधे योगी जीव माझ्यात ठेवुनी ।
श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो ॥ ४७ ॥

अध्याय सहावा संपूर्ण

No comments:

Post a Comment