Wednesday, March 16, 2011

Geetai - Adhyay 8

Chapter - VIII : Achieving the Goal.

For my own purpose, I gave the name 'Sanskar Mukti' to this chapter i.e. Freedom from good as well as bad tendencies, so that pure existence can be experienced. It is this purity of existence which can get in tune with God during and at the end of the life. 'Eating, drinking, sitting, sleeping, wandering, a little work...likes and dislikes, honour and dishonour, pain and pleasure in endless variety! And they all leave associations, impacts and build up tendencies in the mind. Hence if someone asks me, what life is, I should explain it as an aggregate of 'Sanskaras' or tendencies.

Important and distinct actions leave a deep impression on the mind; other actions fade away from memory. However, a single powerful 'sanskara' alone remains at last as the essential thing. All the efforts of life should be guided by the idea that this final fruit should be full of sweetness, that the last moment should be blissful. When the end is sweet, all else is sweet.

In order to achieve this, we should aim to conquer the fear of death. Thinking of death - not brooding over it - is a means of avoiding sin. With constant awareness of death, with what strength can man commit sin? Man has become so frightened of death that he cannot bear ever the thought of it. Only thing which consoles us for our miseries is diversion, and yet this is the greatest of our miseries. For it is this which makes us ruin ourselves. Diversion amuses us and leads us unconsciously to death.

Therefore remembering that death is the crown of life, we should constantly practice the means by which we can make our last moments holy, pure and sweet. To create such good 'sanskara', let noble thoughts course through the mind. Let the hands be busy doing deeds of goodness. Thoughts of God within, and the performance of Swadharma without, these should go on constantly. When the hands perform acts of service till the last breath, the full moon of Bhavana shines brightly, the mind's sky is free from desire, and the intellect is bright and keen - when a man dies in this state, we may take it that he has merged in God. In order to make such an auspicious ending, one must watch day and night and wage skilful war. Not even for an instant, should an evil tendency be permitted in the mind. And in order to gain strength necessary for this, one should remember His name, and meditate on His truth.

गीताई - अध्याय

अर्जुन म्हणाला

ब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते ।
अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥

अधि-यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे ।
प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती ॥ २ ॥

श्री भगवान् म्हणाले

ब्रम्ह अक्षर ते थोर अध्यात्म निज-भाव जो ।
भूत-सृष्टि घडे सारी तो जो व्यापार कर्म ते ॥ ३ ॥

अधि-भूत विनाशी जे जीवत्व अधि-दैवत ।
अधि-यज्ञ असे मी चि ह्या देही यज्ञ-पूत जो ॥ ४ ॥

अंत-काळी हि माझे चि चित्ती स्मरण राखुनी ।
देह सोडूनि गेला तो मिळे मज न संशय ॥ ५ ॥

जो जो आठवुनी भाव शेवटी देह सोडितो ।
मिळे त्या त्या चि भावास सदा त्यांत चि रंगला ॥ ६ ॥

म्हणूनि सगळा काळ मज आठव झुंज तू ।
मन बुद्धि समर्पूनि मज निःशंक पावसी ॥ ७ ॥

अभ्यासी चित्त जोडूनि योगी अन्य न लक्षुनी ।
पुरुषास महा दिव्य पावे संतत चिंतुनी ॥ ८ ॥

सर्वज्ञ कर्ता गुरू जो पुराण ।
सूक्ष्माहुनी सूक्ष्म अचिंत्य-रूप ॥
गिळूनि अंधार उजेडला जो ।
तो चिंतुनीया प्रभु सूर्य-वर्ण ॥ ९ ॥

प्रयाण-काळी स्थिर चित्त राखे ।
प्रेमे तसा योग-बळे कसूनि ॥
भ्रू-संगमी प्राण जडूनि ठेवी ।
तेंव्हा मिळे त्या पुरुषास दिव्य ॥ १० ॥

जे घोकिती अक्षर वेद-वेत्ते ।
विरक्त यत्ने मिळती जयास ॥
जे ब्रह्मचर्ये पद इच्छिताती ।
ते सांगतो मी तुज तत्त्व-सार ॥ ११ ॥

लावूनि सगळी द्वारे कोंडूनि मन अंतरी ।
मस्तकी प्राण राखूनि चढला धारणेवरी ॥ १२ ॥

मुखे ॐ-ब्रह्म उच्चारी अंतरी मज आठवी ।
ह्यापरी देह ठेवूनि जाय थोर गतीस तो ॥ १३ ॥

अनन्य-चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर ।
सदा मिसळला योगी तो सुखे मज पावतो ॥ १४ ॥

पावले मोक्ष-सिद्धीस महात्मे मज भेटुनी ।
दुःखाचे घर तो जन्म न घेती चि अशाश्वत ॥ १५ ॥

[२५]

ब्रह्मादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा ।
माझी भेट घडे तेंव्हा जन्मणे मग खुंटले ॥ १६ ॥

होतसे ब्रह्म-देवाचा सहस्र-युग तो दिन ।
तेवढी चि तशी रात्र कालोपासक जाणती ॥ १७ ॥

अव्यक्तापासुनी होती भूते व्यक्त दिनोदयी ।
रात्र होता लया जाती सगळी मग त्यात चि ॥ १८ ॥

ती चि ती चि पुन्हा भूते त्यांचे काही न चालता ।
दिनांती मरती सारी उदयी जन्म पावती ॥ १९ ॥

अव्यक्त दुसरे तत्त्व त्या अव्यक्तापलीकडे ।
नाशता सगळी भूते न नाशे जे सनातन ॥ २० ॥

त्यास अक्षर हे नाम ती चि शेवटची गति ।
माझे परम ते धाम जेथूनि परते चि ना ॥ २१ ॥

लाभे अनन्य-भक्तीने पार्था पुरुष थोर तो ।
ज्यात ही राहती भूते ज्याने विस्तारले जग ॥ २२ ॥

[२६]

कोण्या काळी कसा देह ठेवुनी येथ साधक ।
संसारी पडतो किंवा पावतो सिद्धि ऐक ते ॥ २३ ॥

अग्नीने दिन शुक्लार्ध उत्तरायण जोडुनी ।
जाय तो गाठतो ब्रह्म शेवटी ब्रह्म जाणुनी ॥ २४ ॥

धूमाने रात्र कृष्णार्ध दक्षिणायन जोडुनी ।
जाय तो परते येथ चंद्र-लोकास पावुनी ॥ २५ ॥

उजेड आणि अंधार दोन्ही मार्ग अनादि हे ।
सुटका करितो एक-एक फेर्‍यात टाकितो ॥ २६ ॥

असे हे मार्ग जाणूनी योगी मोह न पावतो ।
म्हणूनि सर्वदा राहे योगाने जडिला चि तू ॥ २७ ॥

यज्ञात दानात तपात तैसे ।
जे बोलिले अध्ययनात पुण्य ॥
ते लंघितो सर्व चि जाणुनी हे ।
योगी चढे आद्य पदास थोर ॥ २८ ॥

अध्याय आठवा संपूर्ण

No comments:

Post a Comment