आसू आणि हसू!!! डायरेक्टर - दिलीप कोल्हटकर. कलाकार - मोहन जोशी, रीमा लागू, विद्याधर जोशी आणि त्रीग्वेदी म्हात्रे.
आसू आणि हसू हा एक प्रयत्न आहे एकच कथा, डॉ हेमंत - मोहन जोशी आणि त्यांची पत्नी वर्षा - रीमा लागू यांची कथा, दोन दृष्टीकोनातून बघण्याचा. वर्षा ही संशयी स्वभावाचे असून ती नवरयावर कायम संशय घेते त्याचे विवाह बाह्य संबंध एका विद्यार्थीनीशी असल्याचा। रोजच्या जीवनातील वादविवादाला कंटाळून पहिल्या प्रवेशा अंती हे जोडपे विलग होते.
दुसरा प्रयोग सुरु होतो हीच कथा, हेच पात्र आणि हीच नावे घेऊन। फक्त बदल होतो तो वर्षाच्या प्रवृत्तीमध्ये. डॉ हेमंत हे निष्णात डॉक्टर पण बाहेरख्याली वृत्तीचे. वर्षा जाणून असते त्यांच्या ह्या स्वभावाबद्दल, पण ती दुर्लक्ष करत असते. हेमंतला राग येतो तो तिच्या शांत स्वभावाचा आणि ती त्यांच्याशी भांडत नाही याचा. पण मग याही परिस्थितीत ते वेगळे होतील का???
आस्वाद घ्या ह्या सुंदर नाटकाचा...
आसू अणि हसू - भाग १
आसू अणि हसू - भाग २
No comments:
Post a Comment