Now lets start reading the actual Gurucharitra..
Herewith is the Adhyay - 1 or Chapter - 1. This chapter describes various deities and their praying.
CHAPTER 1
Namdharak sees Shri Guru in Dream.
A devotee of Shri Guru by name Namdharak, greatly worried due to
domestic miseries, left home and started on foot with the intense desire
of seeing Shri Guru. While on his way, he was praying Shri Guru all the
time.
"Oh,Guru,all say,' Thou art Paris' (the Philosopher's stone then turns iron
into gold by mere touch). But then why should I be required to suffer so
much, so I have been reciting your name all the time, and absolutely
having full faith in you?"
"In this Kaliyug, you are the incarnation of Trimurti (three principle Gods - Brahma, Vishnu and Mahesh.) Oh , Shri Narasimha Saraswathi, you are the Guide and treasure of the kindness of the devotees".
"As a mother does not forsake her child, in the same way please do not
keep me away from yourself, as you are my mother, father, brother,
sister, friend, relative - one and all".
"You are the protector of this Universe, donor of Gods you have all the
knowledge. You made Bally, the king of Patal very humble, you gave
Bibhishan the Kingdom of Lanka (Ceylon). You made this Earth devoid of
the Kshatriya race and then gave it in charity to the Brahmins. You
offered ever lasting place to Dhruva : But what did you receive in return
from everyone of these? If you have received nothing, then what can an
innocent human-being like myself, can offer you, who is him- self the
Lord of Lakshmi (Goddess of Wealth)?"
"When a child, on the lap of its mother, opens its mouth to drink milk,
what does the mother expect from the child? It does not become you, a
great Donor, first receive and then to give"
"All the wells on the earth do not adore Varun, the God of rains, but yet
Varun gives rains in abundance to one and all."
"My forefathers have been your devotees for generations. I possess only
this treasure of services of my family unto you.
Kindly give me some loan from this treasure, as I am in very peculiar circumstances. I am seeking your shelter considering my misdeeds, please do not be angry with me."
"If a mother is angry with the child the child seeks father's shelter. So
will you not protect me, an innocent child? Are not even inclined to listen
to my miserable tale?"
Being tried of walking, he sat down under a tree and soon he was asleep.
In his dream, he saw a Personality with hair-locks on head, ash markings
on all the body and face full of kindness. He soon recognized him to be
Shri Guru, who applied ashes to his forehead and placed his blessings
hand in his head.
Contd.....
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीकुलदेवतायै नमः । श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।
ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥
हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो का वारा उसळे । त्याचेनि वाते विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥२॥
तुझे शोभे आनन । जैसे तप्त कांचन । किंवा उदित प्रभारमण । तैसे तेज फाकतसे ॥३॥
विघ्नकाननच्छेदनासी । हाती फरश धरिलासी । नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥४॥
चतुर्भुज दिससी निका । विशालाक्षा विनायका । प्रतिपाळिसी विश्वलोका । निर्विघ्ने करूनिया ॥५॥
तुझे चिंतन जे करिती । तया विघ्ने न बाधती । सकळाभीष्टे साधती । अविलंबेसी ॥६॥
सकळ मंगल कार्यासी । प्रथम वंदिजे तुम्हासी । चतुर्दश विद्यांसी । स्वामी तूचि लंबोदरा ॥७॥
वेद शास्त्रे पुराणे । तुझेचि असेल बोलणे । ब्रह्मादिकि या कारणे । स्तविला असे सुरवरी ॥८॥
त्रिपुर साधन करावयासी । ईश्वरे अर्चिले तुम्हासी । संहारावया दैत्यांसी । पहिले तुम्हांसी स्तविले ॥९॥
हरिहर ब्रह्मादिक गणपती । कार्यारंभी तुज वंदिती । सकळाभीष्टे साधती । तुझेनि प्रसादे ॥१०॥
कृपानिधी गणनाथा । सुरवरादिका विघ्नहर्ता । विनायका अभयदाता । मतिप्रकाश करी मज ॥११॥
समस्त गणांचा नायक । तूचि विघ्नांचा अंतक । तूते वंदिती जे लोक । कार्य साधे तयांचे ॥१२॥
सकळ कार्या आधारू । तूचि कृपेचा सागरू । करुणानिधि गौरीकुमरू । मतिप्रकाश करी मज ॥१३॥
माझे मनींची वासना । तुवा पुरवावी गजानना । साष्टांग करितो नमना । विद्या देई मज आता ॥१४॥
नेणता होतो मतिहीन । म्हणोनि धरिले तुझे चरण । चौदा विद्यांचे निधान । शरणागतवरप्रदा ॥१५॥
माझिया अंतःकरणीचे व्हावे । गुरुचरित्र कथन करावे । पूर्णदृष्टीने पहावे । ग्रंथसिद्धि पाववी दातारा ॥१६॥
आता वंदू ब्रह्मकुमारी । जिचे नाम वागीश्वरी । पुस्तक वीना जिचे करी । हंसवाहिनी असे देखा ॥१७॥
म्हणोनि नमतो तुझे चरणी । प्रसन्न व्हावे मज स्वामिणी । राहोनिया माझिये वाणी । ग्रंथी रिघू करी आता ॥१८॥
विद्या वेद शास्त्रांसी । अधिकार जाणा शारदेशी । तिये वंदिता विश्वासी । ज्ञान होय अवधारा ॥१९॥
ऐक माझी विनंती । द्यावी आता अवलीला मती । विस्तार करावया गुरुचरित्री । मतिप्रकाश करी मज ॥२०॥
जय जय जगन्माते । तूचि विश्वी वाग्देवते । वेदशास्त्रे तुझी लिखिते । नांदविशी येणेपरी ॥२१॥
माते तुझिया वाग्बाणी । उत्पत्ति वेदशास्त्रपुराणी । वदता साही दर्शनी । त्यांते अशक्य परियेसा ॥२२॥
गुरूचे नामी तुझी स्थित । म्हणती नृसिंहसरस्वती । याकारणे मजवरी प्रीति । नाम आपुले म्हणूनी ॥२३॥
खांबसूत्रींची बाहुली जैसी । खेळती तया सूत्रासरसी । स्वतंत्रबुधि नाही त्यांसी । वर्तती आणिकाचेनि मते ॥२४॥
तैसे तुझेनि अनुमते । माझे जिव्हे प्रेरीमाते । कृपानिधि वाग्देवते । म्हणोनि विनवी तुझा बाळ ॥२५॥
म्हणोनि नमिले तुझे चरण । व्हावे स्वामिणी प्रसन्न । द्यावे माते वरदान । ग्रंथी रिघू करवी आता ॥२६॥
आता वंदू त्रिमूर्तीसी । ब्रह्माविष्णुशिवांसी । विद्या मागे मी तयासी । अनुक्रमे करोनी ॥२७॥
चतुर्मुखे असती ज्यासी । कर्ता जो का सृष्टीसी । वेद झाले बोलते ज्यासी । त्याचे चरणी नमन माझे ॥२८॥
आता वंदू ह्रषीकेशी । जो नायक त्या विश्वासी । लक्ष्मीसहित अहर्निशी । क्षीरसागरी असे जाणा ॥२९॥
चतुर्बाहु नरहरी । शंख चक्र गदा करी । पद्महस्त मुरारी । पद्मनाभ परियेसा ॥३०॥
पीतांबर असे कसियेला । वैजयंती माळा गळा । शरणागता अभीष्ट सकळा । देता होय कृपाळू ॥३१॥
आता नमू शिवासी । धरिली गंगा मस्तकेसी । पंचवक्त्र दहा भुजेसी । अर्धांगी असे जगन्माता ॥३२॥
पंचवदने असती ज्यासी । संहारी जो या सृष्टीसी । म्हणोनि बोलती स्मशानवासी । त्याचे चरणी नमन माझे ॥३३॥
व्याघ्रांबर पांघरून । सर्वांगी असे सर्पवेष्टण । ऐसा शंभु उमारमण । त्याचे चरणी नमन माझे ॥३४॥
नमन समस्त सुरवरा । सिद्धसाध्यां अवधारा । गंधर्वयक्षकिन्नरा । ऋषीश्वरा नमन माझे ॥३५॥
वंदू आता कविकुळासी । पराशरादि व्यासांसी । वाल्मीकादि सकळिकांसी । नमन माझे परियेसा ॥३६॥
नेणे कवित्व असे कैसे । म्हणोनि तुम्हा विनवितसे । ज्ञान द्यावे जी भरवसे । आपुला दास म्हणोनि ॥३७॥
न कळे ग्रंथप्रकार । नेणे शास्त्रांचा विचार । भाषा नये महाराष्ट्र । म्हणोनि विनवी तुम्हासी ॥३८॥
समस्त तुम्ही कृपा करणे । माझिया वचना साह्य होणे । शब्दब्युत्पत्तीही नेणे । कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ॥३९॥
ऐसे सकळिका विनवोनि । मग ध्याइले पूर्वज मनी । उभयपक्ष जनकजननी । माहात्म्य पुण्यपुरुषांचे ॥४०॥
आपस्तंबशाखेसी । गोत्र कौंडिण्य महाऋषि । साखरे नाम ख्यातिशी । सायंदेवापासाव ॥४१॥
त्यापासूनि नागनाथ । देवराव तयाचा सुत । सदा श्रीसद्गुरुचरण ध्यात ॥ गंगाधर जनक माझा ॥४२॥
नमन करिता जनकचरणी । मातापूर्वज ध्यातो मनी । जो का पूर्वज नामधारणी । आश्वलायन शाखेचा ॥४३॥
काश्यपाचे गोत्री । चौंडेश्वरी नामधारी । वागे जैसा जन्हु अवधारी । अथवा जनक गंगेचा ॥४४॥
त्याची कन्या माझी जननी । निश्चये जैशी भवानी । चंपा नामे पुण्यखाणी । स्वामिणी माझी परियेसा ॥४५॥
नमिता जनकजननीसी । नंतर नमू श्रीगुरुसी । घाली मति प्रकाशी । गुरुचरण स्मरावया ॥४६॥
गंगाधराचे कुशी । जन्म झाला परियेसी । सदा ध्याय श्रीगुरुसी । एका भावे निरंतर ॥४७॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । करी संतांसी नमस्कार । श्रोतया विनवी वारंवार । क्षमा करणे बाळकासी ॥४८॥
वेदाभ्यासी संन्यासी । यती योगेश्वर तापसी । सदा ध्याती श्रीगुरुसी । तयांसी माझा नमस्कार ॥४९॥
विनवितसे समस्तांसी । अल्पमती आपणासी । माझे बोबडे बोलांसी । सकळ तुम्ही अंगिकारा ॥५०॥
तावन्मात्र माझी मति । नेणे काव्यव्युतपत्ति । जैसे श्रीगुरु निरोपिती । तेणे परी सांगत ॥५१॥
पूर्वापार आमुचे वंशी । गुरु प्रसन्न अहर्निशी । निरोप देती माते परियेसी । चरित्र आपुले विस्तारावया ॥५२॥
म्हणे ग्रंथ कथन करी । अमृतघट स्वीकारी । तुझे वंशी परंपरी । लाधती चारी पुरुषार्थ ॥५३॥
गुरुवाक्य मज कामधेनु । मनी नाही अनुमानु । सिद्धि पावविणार आपणु । श्रीनृसिंहसरस्वती ॥५४॥
त्रैमूर्तीचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर । कवण जाणे याचा पार । चरित्र कवणा न वर्णवे ॥५५॥
चरित्र ऐसे श्रीगुरुचे । वर्णू न शके मी वाचे । आज्ञापन असे श्रीगुरुचे । म्हणोनि वाचे बोलतसे ॥५६॥
ज्यास पुत्रपौत्री असे चाड । त्यासी कथा हे असे गोड । लक्ष्मी वसे अखंड । तया भुवनी परियेसा ॥५७॥
ऐशी कथा जयाचे घरी । वाचिती नित्य प्रेमभरी । श्रियायुक्त निरंतरी । नांदती पुत्रकलत्रयुक्त ॥५८॥
रोग नाही तया भुवनी । सदा संतुष्ट गुरुकृपेकरोनि । निःसंदेह साता दिनी । ऐकता बंधन तुटे जाणा ॥५९॥
ऐसी पुण्यपावन कथा । सांगेन ऐक विस्तारता । सायासाविण होय साध्यता । सद्यःफल प्राप्त होय ॥६०॥
निधान लाधे अप्रयासी । तरी कष्ट का सायासी । विश्वास माझिया बोलासी । ऐका श्रोते एकचित्ते ॥६१॥
आम्हा साक्षी ऐसे घडले । म्हणोनि विनवितसे बळे । श्रीगुरुस्मरण असे भले । अनुभवा हो सकळिक ॥६२॥
तृप्ति झालियावरी ढेकर । देती जैसे जेवणार । गुरुमहिमेचा उद्गार । बोलतसे अनुभवोनि ॥६३॥
मी सामान्य म्हणोनि । उदास व्हाल माझे वचनी । मक्षिकेच्या मुखांतुनी । मधु केवी ग्राह्य होय ॥६४॥
जैसे शिंपल्यांत मुक्ताफळ । अथवा कर्पूर कर्दळ । विचारी पा अश्वत्थमूळ । कवणापासावउत्पत्ति ॥६५॥
ग्रंथ कराल उदास । वाकुड कृष्ण दिसे ऊस । अमृतवत निघे त्याचा रस । दृष्टि द्यावी तयावरी ॥६६॥
तैसे माझे बोलणे । ज्याची चाड गुरुस्मरणे । अंगिकार करणार शहाणे । अनुभविती एकचित्ते ॥६७॥
ब्रह्मरसाची गोडी । अनुभवितां फळें रोकडी । या बोलाची आवडी । ज्यासी संभवे अनुभव ॥६८॥
गुरुचरित्र कामधेनु । ऐकता होय महाज्ञानु । श्रोती करोनिया सावध मनु । एकचिते परियेसा ॥६९॥
श्रीगुरुनृसिंहसरस्वती । होते गाणगापुरी ख्याति । महिमा त्यांचा अत्यद्भुती । सांगेन ऐका एकचित्ते ॥७०॥
तया ग्रामी वसती गुरु । म्हणोनि महिमा असे थोरु । जाणती लोक चहू राष्ट्रु । समस्त जाती यात्रेसी ॥७१॥
तेथे राहोनि आराधिती । त्वरित होय फलप्राप्ति । पुत्र दारा धन संपत्ति । जे जे इच्छिले होय जना ॥७२॥
लाधोनिया संताने । नामे ठेविती नामकरणे । संतोषरूपे येऊन । पावती चारी पुरुषार्थ ॥७३॥
ऐसे असता वर्तमानी । भक्त एक ’नामकरणी’ । कष्टतसे अति गहनी । सदा ध्याय श्रीगुरुसी ॥७४॥
ऐसा मनी व्याकुळित । चिंतेने वेष्टिला बहुत । गुरुदर्शना जाऊ म्हणत । निर्वाणमानसे निघाला ॥७५॥
अति निर्वाण अंतःकरणी । लय होवोनि गुरुचरणी । जातो शिष्यशिरोमणी । विसरोनिया क्षुधातृषा ॥७६॥
निर्धार करोनि मानसी । म्हणे पाहीन श्रीगुरुसी । अथवा सांडीन देहासी । जडस्वरूपे काय काज ॥७७॥
ज्याचे नामस्मरण करिता । दैन्यहानि होय त्वरिता । आपण तैसा नामांकिता । किंकर म्हणतसे ॥७८॥
दैव असे आपुले उणे । तरी का भजावे श्रीगुरुचरण । परिस लावता लोहा जाण । सुवर्ण केवी होतसे ॥७९॥
तैसे तुझे नाम परिसे । माझे ह्रदयी सदा वसे । माते कष्टी सायासे । ठेविता लाज कवणासी ॥८०॥
या बोलाचिया हेवा । मनी धरोनि पहावा । गुरुमूर्ती सदाशिवा । कृपाळू बा सर्वभूती ॥८१॥
अतिव्याकुळ अंतःकरणी । निंदास्तुति आपुली वाणी । कष्टला भक्त नामकरणी । करिता होय परियेसा ॥८२॥
राग स्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे । आजि पाहुणे पंढरीचे रावे । वंदू विघ्नहरा भावे । नमू ते सुंदरा शारदेसी ॥८३॥
गुरूची त्रैमूर्ति । म्हणती वेदश्रुति । सांगती दृष्टान्ती । कलियुगात ॥८४॥
कलियुगात ख्याति । श्रीनृसिहसरस्वती । भक्तांसी सारथी । कृपासिंधू ॥८५॥
कृपासिंधु भक्ता । वेद वाखाणिता । त्रयमूर्ति गुरुनाथा । म्हणोनिया ॥८६॥
त्रयमूर्तीचे गुण । तू एक निधान । भक्तांसी रक्षण । दयानिधि ॥८७॥
दयानिधि यती । विनवितो मी श्रीपती । नेणे भावभक्ति । अंतःकरणी ॥८८॥
अंतःकरणी स्थिरु । नव्हे बा श्रीगुरु । तू कृपासागरु । पाव वेगी ॥८९॥
पाव वेगी आता । नरहरी अनंता । बाळालागी माता । केवी टाकी ॥९०॥
तू माता तू पिता । तूचि सखा भ्राता । तूचि कुळदेवता । परंपरी ॥९१॥
वंशपरंपरी । धरूनि निर्धारी । भजतो मी नरहरी । सरस्वतीसी ॥९२॥
सरस्वती नरहरी । दैन्य माझे हरी । म्हणूनि मी निरंतरी । सदा कष्टे व९३॥
सदा कष्ट चित्ता । का हो देशी आता । कृपासिंधु भक्ता । केवी होसी ॥९४॥
कृपासिंधु भक्ता । कृपाळू अनंता । त्रयमूर्ति जगन्नाथा । दयानिधी ॥९५॥
त्रयमूर्ति तू होसी । पाळिसी विश्वासी । समस्त देवांसी । तूचि दाता ॥९६॥
समस्ता देवांसी । तूचि दाता होसी । मागो मी कवणासी । तुजवांचोनी ॥९७॥
तुजवाचोनी आता । असे कवण दाता । विश्वासी पोषिता । सर्वज्ञ तू ॥९८॥
सर्वज्ञाची खूण । असे हे लक्षण । समस्तांचे जाणे । कवण ऐसा ॥९९॥
सर्वज्ञ म्हणोनि । वानिती पुराणी । माझे अंतःकरणी । न ये साक्षी ॥१००॥
कवण कैशापरी । असती भूमीवरी । जाणिजेचि तरी । सर्वज्ञ तो ॥१॥
बाळक तान्हये । नेणे बापमाये । कृपा केवी होय । मातापित्या ॥२॥
दिलियावांचोनि । न देववे म्हणोनि । असेल तुझे मनी । सांग मज ॥३॥
समस्त महीतळी । तुम्हा दिल्हे बळी । त्याते हो पाताळी । बैसविले ॥४॥
सुवर्णाची लंका । तुवा दिल्ही एका । तेणे पूर्वी लंका । कवणा दिल्ही ॥५॥
अढळ ध्रुवासी । दिल्हे ह्रषीकेशी । त्याने हो तुम्हासी । काय दिल्हे ॥६॥
निःक्षत्र करूनी । विप्राते मेदिनी । देता तुम्हा कोणी । काय दिल्हे ॥७॥
सृष्टीचा पोषक । तूचि देव एक । तूते मी मशक । काय देऊ ॥८॥
नाही तुम्हा जरी । श्रीमंत नरहरी । लक्ष्मी तुझे घरी । नांदतसे ॥९॥
याहोनी आम्हासी । तू काय मागसी । सांग ह्रषीकेशी । काय देऊ ॥११०॥
मातेचे वोसंगी । बैसोनिया बाळ वेगी । पसरी मुखसुरंगी । स्तनकांक्षेसी ॥११॥
बाळापासी माता । काय मागे ताता । ऐक श्रीगुरुनाथा । काय देऊ ॥१२॥
घेऊनिया देता । नाम नाही दाता । दयानिधि म्हणता । बोल दिसे ॥१३॥
देऊ न शकसी । म्हणे मी मानसी । चौदाही भुवनासी । तूचि दाता ॥१४॥
तुझे मनी पाही । वसे आणिक काही । सेवा केली नाही । म्हणोनिया ॥१५॥
सेवा घेवोनिया । देणे हे सामान्य । नाम नसे जाण । दातृत्वासी ॥१६॥
तळी बावी विहिरी । असती भूमीवरी । मेघ तो अंबरी । वर्षतसे ॥१७॥
मेघाची ही सेवा । न करिता स्वभावा । उदकपूर्ण सर्वा । केवी करी ॥१८॥
सेवा अपेक्षिता । बोल असे दाता । दयानिधि म्हणता । केवी साजे ॥१९॥
नेणे सेवा कैसी । स्थिर होय मानसी । माझे वंशोवंशी । तुझे दास ॥१२०॥
माझे पूर्वजवंशी । सेविले तुम्हांसी । संग्रह बहुवसी । तुझे चरणी ॥२१॥
बापाचे सेवेसी । पाळिती पुत्रासी । तेवी त्वा आम्हासी । प्रतिपाळावे ॥२२॥
माझे पूर्वधन । तुम्ही द्यावे ऋण । का बा नये करुणा । कृपासिंधु ॥२३॥
आमुचे आम्ही घेता । का बा नये चित्ता । मागेन मी सत्ता । घेईन आता ॥२४॥
आता मज जरी । न देसी नरहरी । जिंतोनि वेव्हारी । घेईन जाणा ॥२५॥
दिसतसे आता । कठिणता गुरुनाथा । दास मी अंकिता । सनातन ॥२६॥
आपुले समान । असेल कवण । तयासवे मन । कठिण कीजे ॥२७॥
कठीण कीजे हरी । तुवा दैत्यांवरी । प्रल्हाद कैवारी । सेवकांसी ॥२८॥
सेवका बाळकासी । करू नये ऐसी । कठिणता परियेसी । बरवे न दिसे ॥२९॥
माझिया अपराधी । धरोनिया बुद्धि । अंतःकरण क्रोधी । पहासी जरी ॥१३०॥
बाळक मातेसी । बोले निष्ठुरेसी । अज्ञाने मायेसी । मारी जरी ॥३१॥
माता त्या कुमारासी । कोप न धरी कैशी । आलिंगोनि हर्षी । संबोखी पा ॥३२॥
कवण्या अपराधेसी । न घालिसी आम्हासी । अहो ह्रषीकेशी । सांगा मज ॥३३॥
माता हो कोपासी । बोले बाळकासी । जावोनि पितयासी । सांगे बाळ ॥३४॥
माता कोपे जरी । एखादे अवसरी । पिता कृपा करी । संबोखूनि ॥३५॥
तू माता तू पिता । कोपसी गुरुनाथा । सांगो कवणा आता । क्षमा करी ॥३६॥
तूचि स्वामी ऐसा । जगी झाला ठसा । दास तुझा भलतैसा । प्रतिपाळावा ॥३७॥
अनाथरक्षक । म्हणती तुज लोक । मी तुझा बाळक । प्रतिपाळावे ॥३८॥
कृपाळु म्हणोनि । वानिती पुराणी । माझे बोल कानी । न घालिसीच ॥३९॥
नायकसी गुरुराणा । माझे करुनावचना । काय दुश्चितपणा । तुझा असे ॥४०॥
माझे करुणावचन । न ऐकती तुझे कान । ऐकोनि पाषाण । विखुरतसे ॥४१॥
करुणा करी ऐसे । वानिती तुज पिसे । अजुनी तरी कैसे । कृपा न ये ॥४२॥
ऐसे नामांकित । विनविता त्वरित । कृपाळु श्रीगुरुनाथ । आले वेगी ॥४३॥
वत्सालागी धेनु । जैशी ये धावोनु । तैसे श्रीगुरु आपणु । आले जवळी ॥४४॥
येतांचि गुरुमुनि । वंदी नामकरणी । मस्तक ठेवोनि । चरणयुग्मी ॥४५॥
केश तो मोकळी । झाडी चरणधुळी । आनंदाश्रुजळी । अंघ्रि क्षाळी ॥४६॥
ह्रदयमंदिरात । बैसवोनि व्यक्त । पूजा उपचारित । षोडशविधि ॥४७॥
आनंदभरित । झाला नामांकित । ह्रदयी श्रीगुरुनाथ । स्थिरावला ॥४८॥
भक्तांच्या ह्रदयांत । राहे श्रीगुरुनाथ । संतोष बहुत । सरस्वतीसी ॥४९॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥
ओवीसंख्या १४९
क्रमशः
Binaca Geet Mala - 1953 Finals!!!
10 years ago
No comments:
Post a Comment