CHAPTER 36
Code of Brahmin's Daily Rituals.
There lived a pious vedic brahmin. He did not take food at others. He would beg alms of corn and maintained on the same. His wife was discontented and hot tempered. A rich person came to ganagapur for Samaradhana (feeding Brahmins and others). But as this Brahmin did not accept food at otheers, his wife also was was not invited and she was discontented for not having good, delicious food and sweets.
Once a very rich person came to Ganagapur to observe Shraddha. He invited all Brahmin couples and offered good dakshina (money), clothers and rich delicious food. She told her husband about this. He said, `If you wish you can go there, but as I do not accept food at others, I cannot come'.
The wife went to the Brahmin host and said, `My husband does not take food at others. Can I come alone to you for meals?'
The host said, `I invite Brahmin couples. So you can come with your husband.'
The Wife could not know what to do. She came to Shri Guru Narsinhasaraswati and narrated to him her grievance and said, `I like to enjoy rich, delicious food. But my husband does not take food at others and so I am also not invited by anybody. At present a rich Brahmin is inviting all the Brahmin couples and offering them good dakshina, clothes and rich delicious food. Kindly advise my husband to accept this invitation.'
Hearing this, Shri Guru smiled and asked his disciples to call her husband. When he came, Shri Guru said to the Brahmin, `your wife desires to take delicious food. You should accept invitation of the Brahmin and fulfil your wife's desire. Married women should not be displeased?
The Brahmin said, `Gurudeo, I am observing vrat of not taking meals at others. But as per your adesh (order) I shall accept this invitation.'
This Brahmin couple went for meals at the rich Brahmin's who offered them good, delicious food. While dining the Brahmin wife observed that dogs and pigs are also dinings with her. Being disgusted, she got up, returned home and told this to her husband. He said, `I had to break my vrat for you and accept food eaten by dogs and pigs.' Both then came to Shri Guru.
Shri Guru asked the wife, `How did you enjoy the food of the rich Brahmin host? You always blamed your husband. Now are you satisfied?'
The wife said, `Gurudeo, I am a silly woman. I broke the vrat of my husband by asking him to take food at others, kindly forgive me.'
Shri Guru said to the Brahmin, `Your wife's desire of taking delicious food is fulfilled. Now she will act as per your wishes. I will tell you the rules of acting as per the order of religion. If a Brahmin is in need of a Brahmin for some religious function and for anniversary (Shraddha), you should go for meals. If you do not go, you will be committing an offence. You should take food at the Guru, disciple, maternal uncle, father-in-law, brothers and saints. If you recite Gayatri Mantra, you are not offended.'
The Brahmin then asked, 'Kindly tell me which and at whose house the food should be avoided?
Shri Gure, 'Good natured Brahmins should not dine at one who takes service from parents, who is greedy, who gives in charity displeasing his wife and children, who is proud, armed or a teacherof flute or foutcast, who lives on begging, who praises himself and cajoles others, who does not observe viaishwadeo. He should also not dine with a Gure who gets enrages. Who is cruel adulterous and a pretender, who forsakes his wife, a woman who lives fosaking her sons and husband, a Brahmin, who sells wine and does the prefession of a blacksmithl, a washerman or a gamblers, onw who is a prostitute, a thief, a doorkeeper ,who teaches a shudra by taking money, who sells horses, who is Hardas (Kirtankar), onw who does not bathe and does not oberve Sandhya and Shraddha, who is treacherous, who dispises others, one who forsakes his parents and cajoles his Gure, who kills a cow, a Brahmin or a woman, one who does not give in charity, who has no issue. Who despises one's fdood and praises the food of others. Food at such persons should also be avoided. If one takes food on Amavasya he loses virtue of one month. Unless one's daughter has an issue, one whould not dine at her house. All these sins are wiped off if one abides by one's own religion.'
The Brahmin further asked Shri Guru, 'kindly tell me the code of daily rites of a rahmin.'
Shri Guru-'I will tell you the code of rites of a Brahmin as narrated by Parashar to the Rishis in the Nemisharanya.
One should get up on Brahma muhurta i.e. 2 hours (5 Ghatkas) before the Sun-rise and bow to Shri Guru and god. Go to the south-west for excretion at a place away from the residence of people and the source of water. One should sit facing the south at night and facing the north in the morning and the evening. Arms, hands and legs should be wahsed with soft earth and water. He should take 2 'achman' (taking ten drops of water saying bow to Kesshav, bow Narayan, bow to Madhav etc) If there is no water at hand you should touch the eyes and ears. Seven deities stay at the right ear of a Brahmin as described in the following Shloka.
(Fire, Water, Vedas, Sun, Moon and the Wind are the seven deities who always reside in the right ear of a Brahmin)
Holy places on the Palm
'Brahmatirth' is at the root of the thumb, 'Agnitirth' is on the palm, 'Pitru tirth' is at the root of the thumb and the fore finger, 'Deotirth' is at the ends of the four fingers(except the thumb) and 'Rishitirth' is at the root of this small finger. While offering 'tarpan to forefathers, Gods and Rishi water, til etc are to be poured though the respective tirthas.
Achaman
Saying 'Bow to Keshav, Narayan, Madhav, the little water on the Brahmatirth is to be taken in the mouth and is to be drunk. The little water is to poured in plate after saying bow to Govinda. If one is touched by a Shudra of an impure one, if one becomes wet in the rains, if one comes home from a funeral, one becomes pure by taking 2 achamans.
Washing of teeth and mouth
Teeth should not be cleaned by 'datoon'(stem of some tree) on parva , pratipada, shashti, Noumi, Dwadashi and on Saturdays, Shradda and wedding days. This does not mean that the mouth, teech and tongue should not be cleaned at all. Only datoon should not be used on these days.
Datoon sticks should be taken of Babul, karanj, palm, aghada, audumbar and rui trees. After use the datoon should be throuwn to the South-West.
Bath(Snan)
Morning bath gives one lust, strength, life, intellect, pleasure and nutrition. A Grahastha and Vanaprastha should bathe in the morning and midday. A Yati, Tapasi on Sanyasi should bathe thrice while a Brahmachari should bathe once a day.
If these is no sufficient water and in case of difficulty any onw of the following alternatives may be shosen. 'Agnisnan'-means to stand in the Sun. `Mantra snan' means to sprinkle water on body after reciting `Apohistadi' mantra. `Bhasmasnan' means to apply bhasma or vibhuti all over the body. `Vayusnan' means to take the dust at the feet of the cow. `Tirthsnan' means to bring the idol of vishnu in the mind. After saying `Apavitrah Pavitrova etc.' if water is sprinkled on one's body, it is like a bath. A weak person should sponge his body with cloth dipped in warm water.
Healthy persons should bathe with cold water. In case of difficulty do `upsnan' i.e. (wash hands, feet and rub the body with a wet cloth). If cold water is not tolerable, hot water bath should be taken. Water itself is pure. Heated water is more pure. A Grahastha should bathe with hot water. He should take achaman in the midst of the bath. Females should not bathe over their head daily.
In the bath at home do not do `Aghamarshan' (saying of mantra wiping off the sins) and `Tarpan' (offering til to Gods, forefathers and Rishis). Do not take hot water bath on the day of birth of a son on day of Shraddha or death on Sankranti, Purnima and Amavasya. Take the darbha in hand, tie the hair on the head (shikha) with them, enchant the water of your bath with `Apohishta' etc, mantra and three Gayatris. Take cold water first and then hot water.
While taking bath in the river, face to the flow of the river and do `Aghamarshan'. In the bath at home, turn your face to the east in the morning and to the west in the evening. Bath purifies the body if taken after weeping, vomiting, sex-act and sight of bad dreams. A Grahastha should not wear wet and safron cloth. He should have a `upwastra' such as dupatta. If there is no upwastra, the credit of the bath goes to Rakshas. the Brahmins should wear white dhoti and should have a cloth, a dupatta or a shawl on the body.
Bhasma or Vibhuti
After bath one should apply Basma or Vibhuti as per Shastra rules. If it is not available 'Gopichandan' should be applied. Devotees of Vishnu have verticle lines of Bhasma (tripundra) on the forehead. For acquiring long life one should apply bhasma with the middle finger, for devotion use the tarjani i.e.the 2nd finger near the Thumb, for food use the anamika i.e. the 4th finger Bhasma should not be applied on the day of Shraddha, Thread, Wedding and other ceremonies and after funeral bath.
Darbha (kind of grass)
These are required for Brahmayadna and Tarpan, Durva, wala, darbha, kush, kunda, wheat, paddy, mola, nagarmotha, Bhadra and mustha are the ten kinds of grass which can be used as darbha. Darbha should be brought on Bhadrapad and Shravan Amavasyas and stored and used for a year.
Brahma is at the end of the darbha, Rudra is at the root and Vishnu is in the middle. Pavitraka (ring) of darbha should be kept in a finger. Sins are wiped off due to this.
While doing jap (recitation), tap (penance), homa, (sacrifice) and chanting of vedas, gold or silver rings should not be taken off, for wearing the darbha pavitraka. Ring should not be put in the tarjani by one who has father. Ring with 9 gems destroys sins. A Brahmin should have a ring with at least one gem.
Sandhya
A Brahmin should start sandhya after bath, early in the morning when the nakshatra (stat) is visible in the sky. He should ofter 'Arghyas' (offering water) to the Sun at Sunrise. If the normal time for the Arghya has elapsed one more Arghya should be given.
Mandesh demons are always fighting with the Sun. To nullify the obstruction in the rising of the Sun, these Arghyas are to be given. These Arghyas strike the demons like weapons and in order to wipe off this sin, one has to move round oneself saying 'Asavaditya Brahma...'
Recitation of Gayatri
After this recollect the names of Rishis etc. and recite 'Gayatri Mantra.' For this purpose a wreath of Rudraksh, coral beads or white stone beads should be used. The wreath should not have any broken beads. One should onbserve 'moun' (non-speaking0) while reciting. One should recite the morning and midday sandhya after standing and the evening sandhya after sitting.
Recitation of Gayatri at home gives one credit; if sone outside it gives double credit. If done on the bank of a river the credit is threefold, and if done at a cowshed or a vrindawan (Tulsi plant planted in the hallow stone or in brick construction) the credit is tenfold. The recitation at a place of Agnihotra, gives 100 fold credit; at a holy place or near a shrine of god it gives 1000 fold credit, while recitation near Vishnu gives crore fold credit and near Shiva it gives immeasurable credit.
Recitation made while sitting on a broken wood plank causes misery, and that done while sitting on grass, causes loss of good fate and glory. Recitation done while sitting on a stone causes disease; that done while sitting on bhasmasan cuses cure of diseases. A blanket seat gives pleasure, a seat of the skin of a black deer gives knowledge, while that of the skin of a black deer gives knowledge, while that of the skin of a tiger gives salvation. Kushasan causes hypnotism and destroys all diseases and sins.
The appearance (Dhyan of Gayatri in the morning Sandhya is of Kumari. Her colour is red, her clothes are red. She is riding a goose. She has four hands and four heads.
The appearance of Gayatri in the midday Sandhya is of a young lady. Her colour is white. Her clothes are white. She is riding on ox. She has five heads.
The appearance of Gayatri in the evening sandhya is of an old lady. Her colour is black. Her clothes are black. She rides Garud. She has four heads.
Sunmukh, Samput, Vitat, Vistrat, Dwimukh, Trimukh, Chaturmukh, Panchmuykh, Shanmukh, Adhomukh, Vy;apanjalik, Shakat, Yampash, Gnanthit, Sanmukhonmukh, Pralamb, Muohti. Mats;ya Kurma, Varaha, Sinhakranti, Mahakranti, Mudgar and Pallava are the 24 mudras (poses). Recitation of Gayatri with mudras is more fruitful. Gayatri has three parts (pad or charan)_ and they should not be recited without pause after each part.
'Man' means mind and 'Tra' means Pran (soul). Recitation of a mantra should therefore be done with the union of mind and soul.
A Brahmachari and a Grahastha should recite Gayatri Mantra 108 times daily. A Vanprastha, Yati or a Sanyasi should recite it 1000 (thousand) times. In case of difficulty one may recite it at least 10 times a daily.
Recitation in the mind is the best. Whispering in mouth is medium and loud recitation is worst. While reciting, with a wreath, do not transgress the meru or the head bead. If it is transgressed 3 pranayams should be observed. Reciting Gayatri a crore time fulfills all desires. After jap, upsthan (prayer) should be recited while standing. Bow to ten dishas (directions), Gods, Brahmin, guru, pronounce one's Gotra and birth name and end the ritual of sandhya.
The home should be swept daily land kept clean. The earthen floor should smeared with cowdung and water. Rangoli (stonepowder) designs should be drawn in the courtyard and before thee shrines of worship. A Grihastha should keep a cow, a shaligram, (soft black round stone as Vishnu), Gauya and Grihyagni at home.
A Brahmin should perform Sandhya daily and should also worship gods daily. One who does not worship gods is like a beast. In the morning the worship should be done with 16 upchars and in the night, light of ghee (Arati) should be waved before the shrines. Yama punishes those who do not worship gods. The eight places or objects of worship are as follows. The Shrine og fods, the Sthandil (earthen elevated construction for fire of sacrifice), the Agni (Fire), the Sun, the water, the heart, the Brahmin and the Sadguru. The Brahmin males should worship gods with Veda mantras, while the females and Shudras should worship with Purana mantras.
Flowers brought from trees in the forest are of medium value. Those purchased are worst. The flowers grown by one self in one's housee garden are the best. Flowers eaten by worms and having holes should not be used. Shri Durga should not be offered' `durva' (a kind grass), Kevada should not be offered to Shri Shiva, Tulsi should not be offered to Shri Ganesh and flowers of Dhotra and Rui should not be offered to Shri Vishnu.
Keep the pot of water at the left hand all the articles of worship at the right hand.
16 upchars of worship should be observed devotedly with panchamrit (mixture of milk, curds, ghee, honey and sugar). Shankh (Conch) should be kept on the left and Ghanta (bell) on the right hand. After bowing to gods, do achman and the Sankalpa (pronounciation of desire of worship mentioning the time, year, ayan, ritu, month, paksh (fortnight, dark or bright) tithi (particular day of a month), Nakshatra (star), places of various planets on the day and purpose or desire of worship. Then start ordinary bath with water, panchamrit, abhishek (pouring water) chanting Purush Sukta, Vishnu Sukta, Shri Sukta, Lakshmi Sukta, Rudra Sukta, Pavaman Sukta, etc. (as per devotion all or particular Sukta or Suktas may be selected for Abhishek.)
After Abhishek, dry the shrines with a piece of cloth and place them at their places and offer clothes, ornaments, Gandha, Halad, Kunkum, flowers or wreaths, tulsi, bel leaves saying, `give me shelter, protect me.' Withrered folowers taken out of the shrines should be touched, to one's head and nose and kept aside to be immersed in the river or rivulet. The bhasma scented sticks be applied to forehead and the tirth (holy water of bath of gods) should be drunk.
For purification of food and wiping off 5 great sins, one should do waishwadeo in the morning and in the evening before meals. Homa in the morning is a sacrifice for god. Bali is given for the ghosts, and Tarpan is the sacrifice for forefathers. At the time of dinner, one should wait for a guest. If a guest ccomes, give him food. If he is a yati, give him food and water also.
Before taking meals wash your feet, hands and the mouth. If an unknown person dines with you, offer him food at a distance. There should not be distinction of food for persons dining at a time. After four Chitrahutis take five Pranahutis. Observe `moun' during meals or at least upto Pranahutis. Do not leave things in platee except little for your wife. There should be no noise while taking water or liquid articles. If while dining the lamp goes off, then stop taking food till the lamp is replaced. While dining do not see and hear the words of females in monthly course, Do not touch each other when dining.
If gases pass, if he food contains worms or if their is vomiting, then stop dining. If hair is found, it should be put off and the food should be sprinkled with tirth. If onion and garlik are taken one is deprived of Brahminism. `Satwic' food increases knowledge, while `Tamas' food increases ignorance.
While dining, first take liquid articles and then take otheers. Last `aposhan' should be half taken and half should be poured down. Wash your mouth with the forefinger. For purification of mouth and fingers, two achmans should be taken.
After dinner, take pan and hear Purana. Evening sandhya etc. and meals should be taken as in the mid-day. It would be better if articles prepared with milk are taken in the night.
Do the professional work during the day. "Sour Path" should not be chanted after sunset. Before going to bed bow to the God and dedicate all thee Karma (acts) of the day to him.
Going outside at the fertilisation period of the wife is sinful. During this time of the first four days Parvakal, Mul, Magha and Revati stars should be avoided for sex-act. There should be no sex-act on the Shraddha day and during day time. If these rules are followed, even a Grihastha is a Brahmachari (i.e. follower of Veda Shashtras in sex-act). One should not enjoy with an older female. There should be no feeling of despise, or grief at the time of the sex-act.
The Brahmins who behaved as instructed by Shri Guru attained good "parlok".
Contd....
श्रीगणेशाय नमः । शिष्योत्तम नामकरणी । लागे सिद्धाचे चरणी । विनवीतसे कर जोडोनि । भक्तिभावे करूनिया ॥१॥
जय जयाजी सिद्ध मुनि । तूचि तारक भवार्णी । तूचि होसी ब्रह्मज्ञानी । अविद्यातिमिरभास्कर ॥२॥
मायामोहरजनीत । होतो आपण निद्रिस्त । कृपासागर श्रीगुरुनाथ । जागृत केले आम्हांसी ॥३॥
तिमिरहरण भास्करु । मज भेटलासी गुरु । कडे केले भवसागरु । चिन्मयात्मा सिद्ध मुनि ॥४॥
ऐसे म्हणोनि सिद्धासी । विनवी भावभक्तीसी । गुरुमूर्ति संतोषी । अभयकर देतसे ॥५॥
पुढे चरित्र केवी झाले । विस्तारावे स्वामी वहिले । आमुते स्वामी कृतार्थ केले । ज्ञानामृत प्राशवून ॥६॥
कथामृत ऐकता श्रवणी । तृप्ति न होय अंतःकरणी । निरोपावे विस्तारोनि म्हणोनि चरणी लागला ॥७॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढील कथा झाली निका । एकचित्ते तुम्ही ऐका । ज्ञान होय समस्तांसी ॥८॥
गाणगापुरी असता श्रीगुरु । महिमा वाढली अपरंपारु । बोलता असे विस्तारु । तावन्मात्र सांगतसो ॥९॥
महिमा एकेक सांगता । विस्तार होईल बहु कथा । अवतार श्रीहरी साक्षाता । कवण शके वर्णावया ॥१०॥
तया गाणगापुरात । होता विप्र वेदरत । विरक्त असे बहुश्रुत । कर्ममार्गे वर्ततसे ॥११॥
न घेतला प्रतिग्रह त्याणे । परान्नासी न वचे नेणे । मिथ्या वाचे नेणे । अनुवाद आपण न करीच ॥१२॥
नित्य शुष्क भिक्षा करी । तेणे आपुले उदर भरी । तयाची नारी असे घरी । क्रोधवंत परियेसा ॥१३॥
याचकवृत्ति तो ब्राह्मण । कंठी संसार सामान्यपणे । अतीत- अभ्यागताविणे । न घेई अन्न प्रत्यही ॥१४॥
तया ग्रामी प्रतिदिवसी । विप्र येती समाराधनेसी । सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी । मिष्टान्न घालिती परियेसा ॥१५॥
समस्त जावोनि भोजन करिती । तया विप्रवनितेप्रती । येऊनि गृही स्तुति करिती । अनेक परीची पक्वान्ने ॥१६॥
ऐकोनि तया विप्रनारी । नानापरी दुःख करी । परमेश्वरा श्रीहरी । म्हणोनि चिंती मनात ॥१७॥
कैसे दैव आपुले हीन । नेणे स्वप्नी ऐसे अन्न । दरिद्री पतीसी वरून । सदा कष्ट भोगितसे ॥१८॥
पूर्वजन्मीचे आराधन । तैसा आपणासी पति हीन । सदा पाहे दरिद्रपण । वर्ततसो देवराया ॥१९॥
समस्त विप्र स्त्रियांसहित । नित्य परान्नभोजन करीत । पूर्वजन्मीचे सुकृत । केले होते समस्ती ॥२०॥
आपुला पति दैवहीन । कदा नेणे परान्नभोजन । काय करावे नारायण । म्हणोनि चिंती मनात ॥२१॥
वर्तता ऐसे तया स्थानी । आला विप्र महाधनी । अपरपक्ष करणे मनी । म्हणोनि आला परियेसी ॥२२॥
तया स्थानी विप्रासी । क्षण दिले परियेसी । सवे त्यांच्या स्त्रियांसी । आवंतिले तिही परियेसा ॥२३॥
देखोनि ते विप्रवनिता । पतीजवळी आली त्वरिता । सांगती झाली विस्तारता । आमंत्रण ब्राह्मणाचे ॥२४॥
अनेक परीची पक्वान्ने । देताती वस्त्रे परिधाने । अपार दक्षिणाद्रव्यदाने । देताती ऐके प्राणेश्वरा ॥२५॥
याते स्वामी अंगीकारणे । अथवा आपण निरोप देणे । कांक्षा करिते माझे मन । अपूर्व अन्न जेवावे ॥२६॥
ऐकोनि तियेचे वचन । निरोप देत ब्राह्मण । सुखे जावे करी भोजन । आपणा न घडे म्हणतसे ॥२७॥
निरोप घेउनी तये वेळी । गेली तया गृहस्थाजवळी । आपण येऊ भोजनकाळी । म्हणोनि पुसे तयासी ॥२८॥
विप्र म्हणे तियेसी । आम्ही सांगू दंपतीसी । बोलावी आपुल्या पतीसी । तरीच आमुच्या गृहा यावे ॥२९॥
ऐकोनि तयाचे वचन । झाली नारी खेदे खिन्न । विचार करी आपुले मन । काय करावे म्हणोनिया ॥३०॥
म्हणे आता काय करणे । कैसे दैव आपुले उणे । बरवे अन्न स्वप्नी नेणे । पतीकरिता आपणासी ॥३१॥
विचारोनि मानसी । आली नृसिंहगुरूपासी । नमन करी साष्टांगेसी । अनेकापरी विनवीतसे ॥३२॥
म्हणे स्वामी काय करणे । बरवे अन्न कधी नेणे । आपुले पतीसी सांगणे । आवंतणे बरवे येतसे ॥३३॥
सांगू म्हणती दंपतीसी । माझा पति नायके वचनासी । न वचे कधी परान्नासी । काय करू म्हणतसे ॥३४॥
स्वामी आता कृपा करणे । माझ्या पतीते सांगणे । बरवी येताती आमंत्रणे । अन्नवस्त्र देताती ॥३५॥
ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन । बोलावूनिया तत्क्षण । सांगती तया द्विजासी ॥३६॥
श्रीगुरु म्हणती तयासी । जावे तुम्ही आवंतणेसी । तुझे स्त्रियेचे मानसी । असे मिष्टान्न जेवावे ॥३७॥
तिचे मनींची वासना जाण । तुवा पुरवावी कारण । सदा दुश्चित अंतःकरण । कुलस्त्रियेचे असो नये ॥३८॥
ऐकोनि श्रीगुरूचे वचन । नमन करी तो ब्राह्मण । विनवीतसे कर जोडून । परान्न आपणा नेम असे ॥३९॥
गुरुवचन जो न करी । तोचि पडे रौरवघोरी । निरोप तुमचा माझ्या शिरी । जाईन त्वरित म्हणतसे ॥४०॥
पुसोनिया श्रीगुरूसी । आले दंपत्य आवंतणेसी । आनंद झाला बहुवसी । तया विप्रस्त्रियेते ॥४१॥
पितृनाम उच्चारोन । संकल्प करी तो ब्राह्मण । अनेक परीचे मिष्टान्न । वाढिती तया दंपतीसी ॥४२॥
भोजन करिता समयासी । दिसे विपरीत तियेसी । श्वान सूकर येउनी हर्षी । समागमे जेविताती ॥४३॥
कंटाळले तिचे मन । उठली आपण त्यजुनी अन्न । जे जेवीत होते ब्राह्मण । तया समस्तांसी सांगतसे ॥४४॥
ऐसेपरी पतीसहित । आली नारी चिंताक्रांत । पतीस सांगे वृत्तान्त । श्वानउच्छिष्ट जेविलेती ॥४५॥
स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण । तुझे नि आपुले दैव हीन । घडले आपणासी परान्न । उच्छिष्ट श्वानसूकरांचे ॥४६॥
ऐसे म्हणोनि स्त्रियेसी । आली दोघे श्रीगुरुपासी । नमन केले परियेसी । ऐका श्रोते एकचित्ते ॥४७॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । कैसे सुख परान्नासी । सदा दुखविसी पतीसी । पुरले तुझे मनोरथ ॥४८॥
ऐसे वचन ऐकोनि । लागे नारी श्रीगुरुचरणी । विनवीतसे कर जोडूनि । क्षमा करणे स्वामिया ॥४९॥
मंदमति आपणासी । दोष घडविले पतीसी । नेले आपण परान्नासी । क्षमा करणे स्वामिया ॥५०॥
चिंता करी द्विजवरू । म्हणे स्वामी काय करू । दोष घडला अपारू । व्रतभंग झाला म्हणोनि ॥५१॥
परान्न न घ्यावे म्हणोनि । संकल्प होता माझे मनी । मिळाली सती वैरिणी । दोष आपणा घडविला ॥५२॥
ऐकोनि तयाचे वचन । श्रीगुरु म्हणती हासोन । पुरविली स्त्रियेची वासना । आता तिचे मन धाले ॥५३॥
कधी न वचे परान्नासी । वर्तेल तुझ्या वाक्यासरसी । न करी चिंता मानसी । दोष तुज नाही जाण ॥५४॥
आणिक एक सांगे तुज । जेणे धर्म घडती सहज । अडला असेल एखादा द्विज । देवपितृकर्माविणे ॥५५॥
कोणी न मिळती विप्र त्यासी । जावे तेथे भोजनासी । जरी तेथे तू न जासी । अनंत दोष असे जाण ॥५६॥
श्रीगुरूचे वचन ऐकोन । साष्टांगी करी नमन । विनवीतसे कर जोडून । विनंति माझी परियेसा ॥५७॥
अन्न घ्यावे कवणा घरी । घडतील दोष कवणेपरी । जाऊ नये कवणा घरी । निरोपावे स्वामिया ॥५८॥
विप्रवचन ऐकोन । श्रीगुरु सांगती विस्तारोन । सावधान करून मन । ऐका श्रोते सकळिक ॥५९॥
श्रीगुरु म्हणती विप्रासी । अन्न घ्यावया घरे पुससी । गुरुभुवनादिकी हर्षी । जेवावे शिष्यवर्गा घरी ॥६०॥
वैदिकादि विद्वज्जन । मातुळ आपुला श्वशुर जाण । सहोदरादि साधुजन । तया घरि जेवावे ॥६१॥
अडला विप्र ब्राह्मणाविण । त्याचे घरी घ्यावे अन्न । करावे गायत्रीजपन । दोष जाती अवधारा ॥६२॥
विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंत माझी परियेसी । निषिद्ध अन्न आम्हासी । कवण्या घरी जेवू नये ॥६३॥
श्रीगुरु सांगती ब्राह्मणासी । अन्नवर्जित घरे ऐसी । अपार असे स्मृति चंद्रिकेसी । ऋषिसंमते सांगेन ॥६४॥
नित्य मातापितयांसी । सेवा घेती अतिदोषी । जाऊ नये तया घरांसी । धनलोभिष्ठ द्विजांघरी ॥६५॥
कलत्र पुत्र कष्टवोनि । धर्म करी विप्रालागोनि । अन्ननिषेध तया भुवनी । दोष घडती जेविल्या ॥६६॥
गर्विष्ठ चित्रक शस्त्रधारी । विप्र जाण मल्लयुद्ध करी । वीणा वाद्य ज्याचे घरी । न घ्यावे अन्न ब्राह्मणाने ॥६७॥
बहिष्कारी विप्राघरी । याचकवृत्तीने उदर भरी । अन्न वर्जावे तया घरी । आत्मस्तुति परनिंदक ॥६८॥
बहुजन एक अन्न करिती । पृथक् वैश्वदेव न करिती । वर्जावी अन्ने विप्रजाती । महादोष बोलिजे ॥६९॥
गुरु म्हणोनि समस्तांसी । आपण मंत्र उपदेशी । शिष्य रहाटे दुर्वृत्तींसी । त्या गुरुघरी जेवू नये ॥७०॥
क्रोधवंत ब्राह्मण असे । अन्न न घ्यावे त्या गृही ऐसे । स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे । जेवू नये तया घरी ॥७१॥
धनगर्वी तामसाघरी । कृपण निर्द्रव्य व्यभिचारी । दांभिक दुराचारी विप्राघरी । अन्न तुम्ही वर्जावे ॥७२॥
पुत्रा पतीते सोडोनि । वेगळी असे जे ब्राह्मणी । वर्जावे अन्न साधुजनी । महादोष बोलिजे ॥७३॥
स्त्रीजित असे एखादा जरी । विप्र सुवर्णाकार करी । सदा बहु याचक जरी । तया घरी न जेवावे ॥७४॥
खळ राजसेवकाघरी । लोह काष्ठ छेदन करी । वस्त्रधुत्या रजकाघरी । दान विप्रे घेऊ नये ॥७५॥
मद्यपान नराघरी । याचने उदरपूर्ति करी । वेश्मी सहजार असे नारी । दान विप्रे न घ्यावे ॥७६॥
तस्करविद्या असे ज्यासी । द्वारपाळकाघरी परियेसी । न घ्यावे अन्न कुटिलासी । महादोष बोलिजे ॥७७॥
द्रव्य घेउनी शूद्राकरी । अध्ययन सांगे द्विजवरी । अन्न वर्जावे तया घरी । घोडी विकी जो ब्राह्मण ॥७८॥
भागवतकीर्तन नाही घरी । द्यूतकर्मी अतिनिष्ठुरी । स्नानावीण भोजन करी । तया घरी जेवू नये ॥७९॥
न करी संध्या सायंकाळी । दान न करी कदा काळी । पितृकर्म वर्जिता कुळी । तया घरी न जेवावे ॥८०॥
दंभार्थाने जो जप करी । अथवा कापट्यरूपे जरी । द्रव्य घेवोनि जप करी । तया घरी जेवू नये ॥८१॥
ऋण देऊन एखाद्यासी । उपकार दावी परियेसी । द्रव्य सांची कलत्रेसी । तया घरी जेवू नये ॥८२॥
विश्वासघातकी नराघरी । अनीति पक्षपात करी । स्वधर्म सांडी दुराचारी । पूर्वजमार्ग सोडिल्या घरी ॥८३॥
विद्वज्जन ब्राह्मण साधूसी । एखादा करी अति द्वेषी । अन्न वर्जावे तुम्ही हर्षी । तया घरी जेवू नये ॥८४॥
कुळदैवत माता पिता । सोडोनि जाय जो परता । आपुलाले गुरूसी निंदिता । जेवू नये तया घरी ॥८५॥
गोब्राह्मणवध करी । स्त्रीवधु नर असे जरी । अन्न घेता दोष भारी । श्रीगुरु म्हणती विप्रासी ॥८६॥
आशाबद्ध सदा नरु । धरूनि राहे एका द्वारु । दान देता वर्जी जरु । जेवू नये तया घरी ॥८७॥
समस्त जातीस करी शरण । तोचि चांडाळ होय जाण । घेऊ नये त्याचे अन्न । नमन न करी विप्रासी ॥८८॥
आपुल्या कन्याजामातेसी । क्रोधे करून सदा दूषी । न घ्यावे अन्न त्या घरासी । निपुत्राचे घरी देखा ॥८९॥
पंचमहायज्ञ करी आपण । जेवी आणिकाचे घरी अन्न । परपाक करी तया नाम जाण । तया घरी जेवू नये ॥९०॥
विवाह झाला असता आपण । पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण । स्थालीपाकनिवृत्ति नव जाणे । न जेवावे तया घरी ॥९१॥
घरचे अन्न दूषण करी । परान्नाची स्तुति करी । अन्न वर्जावे तया घरी । श्वपच नाम तयाचे ॥९२॥
भाणसपणे उदर भरी । अन्न घेता तया घरी । डोळे जाती अवधारी । आंधळा होय अल्पायुषी ॥९३॥
बधिर होय शरीरहीन । स्मृतिमेघा जाय जाण । धृतिशक्ति जाय जाण । माणसाचे घरी जेवू नये ॥९४॥
गृहस्थधर्मे असे आपण । दानधर्म न करी जाण । अद्वैतशास्त्र बोलू जाणे । तया घरी जेवू नये ॥९५॥
परगृही वास आपण । परान्न जेवी जो ब्राह्मण । त्याचे जितुके असे पुण्य । यजमानासी जाय देखा ॥९६॥
तया यजमानाचे दोष । लागती त्वरित भोजनस्पर्श । त्याचिकारणे निषिद्ध असे । परान्न तुम्ही वर्जावे ॥९७॥
भूदान गोदान सुवर्णदान । गजवाजीरत्नदान । घेता नाही महादूषण । अन्नदाना अतिदोष असे ॥९८॥
समस्त दुष्कृत परान्नासी । घडती देखा ब्राह्मणासी । तैसेचि जाणा परस्त्रियेसी । संग केलिया नरक होय ॥९९॥
परगृही वास करिता । जाय आपुली लक्ष्मी त्वरिता । अमावास्येसी परान्न जेविता । मासपुण्य जाय देखा ॥१००॥
अगत्य जाणे परान्नासी । न बोलाविता जाय संतोषी । जाता होती महादोषी । शूद्रे बोलाविता जाऊ नये ॥१॥
आपुल्या कन्येच्या घरासी । जाऊ नये भोजनासी । पुत्र झालिया कन्येसी । सुखे जावे अवधारा ॥२॥
सूर्यचंद्रग्रहणेसी । दान घेऊ नये परियेसी । जात अथवा मृतसूतकेसी । जाऊ नये परियेसा ॥३॥
ब्राह्मणपणाचा आचार । कवण रहाटे द्विजवर । तैसे जरी करिती नर । त्यासी कैचे दैन्य असे ॥४॥
समस्त देव त्याचे होती । अष्ट महासिद्धि साधती । ब्राह्मणकर्मै आचरती । कामधेनु तया घरी ॥५॥
विप्र मदांधे व्यापिले । आचारकर्मे सांडिले । याचिकारणे दरिद्री झाले । स्वधर्म नष्ट होऊनिया ॥६॥
विप्र विनवी स्वामीसी । आमुची विनंति परियेसी । सकळ आचारधर्मासी । निरोपावे दातारा ॥७॥
श्रीगुरुमूर्ति कृपासागरु । त्रिमूर्तीच्या अवतारु । भक्तजनांच्या आधारु । निरोपावे आचार ब्राह्मणाचे ॥८॥
श्रीगुरु म्हणती तयासी । ब्राह्मणाचा आचार पुससी । सांगेन ऐक विस्तारेसी । पूर्वी ऋषि आचरले जे ॥९॥
नैमिषारण्यी समस्त ऋषि । तप करिती बहु दिवसी । आला पराशर ऋषि । म्हणोनि समस्त वंदिती ॥११०॥
समस्त ऋषि मिळोन । विनविताती कर जोडून । ब्राह्मणाचे आचरण । केवी करावे म्हणती ते ॥११॥
आता आम्ही आचार करितो । तेणे संशय मनी येतो । ब्रह्मऋषि तुम्ही म्हणूनि पुसतो । तुमचा उपदेश आम्हा व्हावा ॥१२॥
गुरुमुखेवीण मंत्र । ग्राह्य नव्हे हो पवित्र । तैसा श्रीगुरु तू सत्पात्र । आचार आम्हा सांगावे ॥१३॥
पराशर म्हणे ऋषींसी । सांगेन आचार तुम्हासी । जेणे होय अप्रयासी । सर्व सिद्धि पावती ॥१४॥
ब्राह्ममुहूर्ती उठोनि । श्रीगुरुस्मरण करोनि । मग ध्याव्या मूर्ति तिन्ही । ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥१५॥
मग स्मरावे नवग्रह । सूर्यादि केतूसह । सनत्कुमार-सनक-सनंदन-सह । स्मरावे तये वेळी ॥१६॥
सह-नारद तुंबरु देखा । स्मरावे सिद्ध योगी देखा । सप्त समुद्र असती जे का । स्मरावे सप्त पितृदेवता ॥१७॥
सप्त ऋषीते स्मरोनि । सप्त द्वीपे सप्त भुवनी । समस्त नामे घेऊनि । ऐसे म्हणावे प्रातःस्मरण ॥१८॥
मग उठावे शयनस्थानी । आचमन करोनि दोनी । लघुशंकेसी जाऊनि । शौचाचमन करावे ॥१९॥
पराशर म्हणे ऋषींसी । ऐका आचमनविधीसी । सांगतसे विस्तारेसी । जे जे समयी करणे ऐका ॥१२०॥
स्नानापूर्वी अपर दोनी । उदक प्राशिता येणेचि गुणी । निजता उठता समयी दोनी । आचमने करावी ॥२१॥
अधोवायुशब्द झालिया । वोखटे दृष्टी देखिलिया । दोन्ही वेळा आचमूनिया । शुचि व्हावे परियेसा ॥२२॥
भोजनापूर्वी अपर दोनी । जांभई आलिया शिंकलिया दोनी । लघुशंकाशौची दोनी । आचमन करावे ॥२३॥
जवळी उदक नसेल जरी । श्रोत्राचमन करा निर्धारी । स्पर्श करावा अक्ष श्रोत्री । येणे पवित्र परियेसा ॥२४॥
ब्राह्मणाचे उजवे कानी । सप्त देवता असती निर्गुणी । त्यासी स्पर्शिता तत्क्षणी । आचमनफळ असे देखा ॥२५॥
श्लोक । अग्निरापश्च चंद्रश्च वरुणार्कैद्रवायवः । विप्रस्य दक्षिणे कर्णे नित्यं तिष्ठन्ति देवताः ॥२६॥
टीका । त्या देवतांची नावे ऐका । सांगेन ऋषि सकळिका । अग्नि आप वरुणार्का । वायु इंद्र चंद्र असती ॥२७॥
लघुशंकाचमन करोनि । तूष्णीम स्नान करा सुमनी । बैसावे शुचि आसनी । अरुणोदय होय तव ॥२८॥
गायत्रीमंत्रजपाव्यतिरिक्त । वरकड जपावे पवित्र । प्रगट होता अरुणोदित । बहिर्भूमीसी जाईजे ॥२९॥
यज्ञोपवीत कानी ठेवोनि । डोईल पालव घालूनि । नैऋत्य दिशे जाऊनि । अधोमुखी बैसावे ॥१३०॥
दिवसा बसावे उत्तरमुखी । रात्री बैसावे दक्षिणमुखी । मौन असावे विवेकी । चहूकडे पाहू नये ॥३१॥
सूर्यचंद्रनक्षत्रांसी । पाहू नये नदी-आकाशी । स्त्रीजन लोक परियेसी । पाहू नये कवणाते ॥३२॥
शौचाविणे कांस घाली । कांस न काढी लघुशंकाकाळी । त्यासी होय यमपुरी अढळी । नरक भोगी अवधारा ॥३३॥
अगत्य घडे उदकावीण । करूनिया गंगास्मरण । मृत्तिकेने शौच करणे । भक्षणादि वर्जावे ॥३४॥
बर्हिर्भूमि जावयासी । ठाऊ कैसा परियेसी । ऐका समस्त तत्परेसी । म्हणे पराशर सर्वाते ॥३५॥
न बैसावे भूमीवरी । बैसिजे पानगवतावरी । हिरवी पर्णे करावी दुरी । वाळल्या पानी बैसावे ॥३६॥
जे ब्राह्मण उभ्या मुतती । त्यांसी ऐका कवण गति । त्यांचे रोमे अंगी किती । तावत्काळ वर्षे नरकी पडती ॥३७॥
मळविसर्जन करूनि । उठावे हाती शिश्न धरूनि । जळपात्रापासी जाऊनि । शौच करावे परियेसा ॥३८॥
मृत्तिकाशौच करावयासी । मृत्तिका आणावी तुम्ही ऐसी । वारुळ मूषकगृह परियेसी । नदीमधील आणु नये ॥३९॥
ज्या मार्गी लोक चालती । अथवा वृक्षाखालील माती । देवालय क्षेत्रतीर्थी । मृत्तिका आपण वर्जावी ॥१४०॥
वापी कूप तडागात । मृत्तिका आणिता पुण्य बहुत । उदक करी घेऊनि प्रोक्षित । मृत्तिका घ्यावी शौचासी ॥४१॥
आवळ्याएवढे गोळे करावे । लिंगस्थानी एक लावावे । अपानद्वारी पाच स्वभावे । एकैका हस्तासी तीन सप्ते ॥४२॥
एकैक पायासी सात वेळ । मृत्तिका लावावी सकळ । आणिक सांगेन समय केवळ । ऋषि समस्त परियेसा ॥४३॥
या मृत्तिका शौचविधान । मूत्रशंकेसी एक गुण । बहुर्भूमीसी द्विगुण । मैथुनाअंती त्रिगुण देखा ॥४४॥
आणिक प्रकार असे देखा । करावे येणेप्रमाणे ऐका । जितुके करणे गृहस्थ लोका । द्विगुण करावे ब्रह्मचारी ॥४५॥
त्रिगुण करावे वानप्रस्थे । चतुर्गुण करावे यती समस्ते । न्यून पूर्ण करावे यापरते । धर्मसिद्धि होय देखा ॥४६॥
येणे प्रकारे करा दिवसी । रात्री याच्या अर्धैसी । संकटसमयी या अर्धैसी । मार्गस्थे अर्ध त्याहुनी ॥४७॥
व्रतबंध झालिया ब्राह्मणासी । हाच आचार परियेसी । हाचि उपदेश चहू वर्णासी । शौचविधि बोलिला ॥४८॥
शौच केलियानंतरी । चूळ भरावे परिकरी । ब्राह्मणे आठ भरी । क्षत्रिये सहा परियेसा ॥४९॥
वैश्ये चार शूद्रे दोनी वेळ । येणे विधि भरा चूळ । अधिक न करावे केवळ । म्हणे पराशर ऋषि ॥१५०॥
चूळ भरावे आठ वेळा । आचमावे तीन वेळा । शुचिस्थानी बैसून निर्मळा । कुळदेवता स्मरावी ॥५१॥
तूष्णीम् आचमन करावे । नाम घेता चोवीस ठावे । आतळावे पुनः आचमावे । त्याचा विधी सांगेन ॥५२॥
विप्रदक्षिणतळहाती । पाच तीर्थे विख्यात असती । जे बोलिले असे श्रुती । सांगेन तीर्थ अवधारा ॥५३॥
अंगुष्ठमूळ तळहातेसी । अग्निब्रह्मतीर्थ परियेसी । तर्जनी अंगुष्ठ मध्यदेशी । पितृतीर्थ असे जाण ॥५४॥
चतुर्थ अंगुलीचे वरी । देवतीर्थ अवधारी । कनिष्ठिका भागोत्तरी । ऋषितीर्थ परियेसा ॥५५॥
तर्पण देवापितृऋषि । जे स्थानी तीर्थै करावी हर्षी । आचमन ब्रह्मतीर्थेसी । करा ब्राह्मण विद्वज्जन ॥५६॥
ब्रह्मतीर्थे आचमने तिन्ही । केशव नारायण माधव म्हणोनि । देवतीर्थ उदक सांडोनि । गोविंद नाम उच्चारावे ॥५७॥
विष्णु मधुसूदन हस्त धुवोनि दोन्ही । त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोनि । बिंबोष्ठ तळहस्ते स्पर्शोनि । श्रीधर नाम उच्चारावे ॥५८॥
पुनरपि हस्त ह्रषीकेशी । पद्मनाभ पादद्वय स्पर्शी । सव्य हस्त पंचांगुलीसी । दामोदर शिखास्थानी ॥५९॥
चतुरंगुलि पृष्ठदेशी । संकर्षण घ्राणेसी । तर्जनी आणि अंगुष्ठेसी । म्हणावा वासुदेव प्रद्युम्न ॥१६०॥
अंगुष्ठ अनामिकेसी । नेत्रस्पर्श श्रोत्रेसी । कनिष्ठिका अंगुष्ठेसी । अच्युत नाभी म्हणावे ॥६१॥
पंचांगुली उपेंद्र देखा । हरी श्रीकृष्ण भुजा एका । पाच अंगुली विधिपूर्वका । येणे विधी स्पर्शावे ॥६२॥
विधी संध्याकाळी । आणिक करावे वेळोवेळी । अशौच अथवा संकटकाळी । असती विधाने ती ऐका ॥६३॥
देवतीर्थे तिन्ही घ्यावे । हस्त प्रक्षाळा गोविंद नावे । मुख प्रक्षाळोनि मंत्र म्हणावे । संध्याव्यतिरिक्त येणेपरी ॥६४॥
विधान आणिक सांगेन । देवतीर्थे तिनी घेऊन । गोविंदनामे हस्त धुवून । चक्षु श्रोत्र स्पर्शावे ॥६५॥
शूद्रादि ओवाळियासी । स्पर्श होता परियेसी । आचमनविधि ऐसी । गुरु म्हणती ब्राह्मणाते ॥६६॥
भिजोनि आलिया पाउसात । द्विराचमने होय पुनीत । स्नान भोजनी निश्चित । द्विराचमन करावे ॥६७॥
फलाहार भक्षण करिता । अथवा आपण उदक घेता । आला असेल स्मशानी हिंडता द्विराचमने शुद्ध होय ॥६८॥
उदक नसे जवळी जरी । श्रोत्राचमन करा निर्धारी । आणिक असे एक परी । तूष्णीम आचमन करावे ॥६९॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आचमनविधि आहे ऐसी । जे करिती भक्तीसी । दैन्य कैचे तया घरी ॥१७०॥
आता सांगेन विधान । करावया दंतधावन । समस्त पर्वणी त्यजून । प्रतिपदा षष्ठी वर्जावी ॥७१॥
न करावे नवमीद्वादशीसी । शनयर्कमंगळवारेसी । श्राद्धकाळी विवाहदिवसी । करू नये दंतधावन ॥७२॥
कंटकवृक्षशाखेसी । ताडमाडकेतकीसी । खर्जूरनारिकेलशाखेसी । केलिया जन्म चांडाळयोनी ॥७३॥
खदिरकरंजाआघाडेसी । औदुंबरार्कवटशाखेसी । अथवा वृक्ष करवंदेसी । पुण्य वृक्ष ऐका तुम्ही ॥७४॥
विप्रे द्वादशांगुलेसी । नवांगुले क्षत्रियासी । षडांगुले वैश्यशूद्रांसी । दंतधावन काष्ठ आणावे ॥७५॥
दंतधावन काष्ठेसी । तोडिता म्हणावे मंत्रासी । आयुः प्रज्ञा नाम परियेसी । म्हणोनि काष्ठ तोडावे ॥७६॥
दंतधावन करोनि ऐसे । काष्ठ टाकावे नैऋत्य दिशे । चूळ भरोनि द्वादश । द्विराचमन करावे ॥७७॥
मग करावे प्रातःस्नान । तेणे होय सर्व साधन । तेजोबलाआयुष्यवर्धन । प्रातःस्नान केलिया ॥७८॥
प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश । सकळ दैवते होती वश । सौभाग्य सुख होती हर्ष । प्रातःस्नान केलिया ॥७९॥
यती तापसी संन्यासी । त्रिकाळ करावे स्नानासी । ब्रह्मचारी विधींसी । एक वेळ करावे ॥१८०॥
नित्य केलिया पापनाश असे । करावे याचि कारणे हर्षे । गृहस्थे वानप्रस्थे विशेषे । प्रातर्मध्याह्नी करावे ॥८१॥
अशक्य संकट आले जरी । अथवा न मिळे निर्मल वारि । स्नान करावयाचि परी । सांगेन ऐका ब्राह्मणहो ॥८२॥
अग्निस्नान भस्मस्नान । अथवा करावे वायुस्नान । करा विधीने मंत्रस्नान । आपोहिष्ठा मंत्राने ॥८३॥
आणिक स्नानफळे असती । ज्यास असेल भावभक्ति । गुरुदेवता दर्शनमात्री । तीर्थस्नानफळ असे ॥८४॥
अथवा दर्शन मातापिता । चरणतीर्थ भक्तीने घेता । अंगावरी प्रोक्षिता । तीर्थस्नानफळ असे ॥८५॥
अथवा भिजेल पर्जन्यांत । उभा राहोनि वारा घेत । किंवा बैसावे गोधुळीत । स्नानफळ असे देखा ॥८६॥
स्पर्श चांडाळा होता । जलस्नाने होय शुचिता । शूद्राचा स्पर्श होता । उपस्नान करावे ॥८७॥
दृढ असे तनु आपुले । स्नान मुख्य करावे जले । संधि-विग्रह-साकडे पडले । उषःस्नान करावे ॥८८॥
प्रातःस्नान करावयासी । शीतोदक उत्तम परियेसी । अशक्तता असेल देहासी । उष्णोदके करावे ॥८९॥
स्वभावे पवित्र असे उदक । वरी झालिया अग्निसंपर्क । पवित्र झाले उदक अधिक । गृहस्थासी मुख्य असे ॥१९०॥
उष्णोदके स्नान करिता । शीतोदक करा मिश्रित । मध्ये करावे आचमन तत्त्वता । संकल्प तेथे म्हणावा ॥९१॥
घरी स्नान करिता देखा । अघमर्षण तर्पण नव्हे निका । वस्त्रे पिळू नये ऐका । आपुले हस्ते करूनिया ॥९२॥
पुत्रोत्साह संक्रांतीसी । श्राद्धकाळ मृतदिवसी । न करावे स्नान उष्णोदकेसी । अमावास्या पौर्णिमा ॥९३॥
स्नान करिता बांधा शिखा । दर्भहस्ती सूर्याभिमुखा । मौन असावे विवेका । कवणासवे न बोलावे ॥९४॥
आपोहिष्ठा मंत्रेसी । गायत्री तीन म्हणा सुरसी । येणेपरी स्नानोदकासी । अभिमंत्रावे ब्राह्मणे ॥९५॥
प्रथम शीतोदक घेऊनि । पश्चात उष्णोदक मिळवोनि । स्नान करावे प्रतिदिनी । गृहस्थांनी घरी देखा ॥९६॥
अवधूत मंत्र म्हणत । वस्त्र उकलावे त्वरित । उद्यंत मंत्र जपत । वस्त्र सूर्यासी दाखवावे ॥९७॥
आचमन करूनि आपण देवस्यत्व मंत्र जपोन । धूत वस्त्र नेसून । आणिक मंत्र जपावे ॥९८॥
आवहंती वितन्वती मंत्रे । वस्त्रे नेसावी पवित्र । द्विराचमन करावे तंत्रे । वस्त्र पिळोनि आचमन कीजे ॥९९॥
आता मंत्रस्नान करणे । सांगेन त्याची विधाने । आपोहिष्ठादि मंत्राने । प्रोक्षावे शरीरावरी ॥२००॥
पाद मुर्ध्नी ह्रदयस्थानी । मूर्ध्नीं ह्रदय पाद प्रोक्षोनि । करावे तुम्ही मार्जनी । आपोहिष्ठा मंत्रेसी ॥१॥
ऐसे स्नान करोनि । पुनः आचमन करोनि । मानसस्नान विधींनी । करावे ऐका भक्तीने ॥२॥
नारायण विष्णूमूर्तीसी । स्नान करावे भक्तीसी । चतुर्भुज अलंकारेसी । ध्यान केलिया मानसन्मान ॥३॥
अपवित्रः पवित्रो वा । येणे मंत्रे हरि ध्यावा । उदके देहे प्रोक्षावा । स्नानफळ अवधारा ॥४॥
मंगलस्नानविधा । सांगेन ऐका ब्राह्मण । रविवारी निषेध जाण । ज्वर होय अंगासी ॥५॥
नदीतीरी असे नरु । अशक्त असे शरीरु । गंगास्मरणे निर्धारु । आर्द्रवस्त्रे अंग पुसावे ॥६॥
कांतिहानि सोमवारासी । मंगळवारी मृत्यु परियेसी । लक्ष्मी पावे बुधवारेसी । धनहानि गुरुवारी ॥७॥
शुक्रवारी पुत्रघात । शनिवारी अखिल संपत । जाणा ऐसे निश्चित । मंगलस्नान करावे ॥८॥
नदीस्नान प्रवाहमुखी । घरी प्रातःसूर्याभिमुखी । संध्याकाळी पश्चिममुखी । स्नान करावे अवधारा ॥९॥
स्नान करिता नदीसी । अघमर्षण करावे परियेसी । नमोऽग्नयेऽप्सुमते मंत्रेसी । नदीस्नान करावे ॥२१०॥
यदपांक्रूर मत्रेंसी । उदक लोटावे द्विहस्तेसी । तीन वेळा लोटोनि हर्षी । इमं मे गंगे जपावे ॥११॥
ऋतं च सत्यं च मंत्र जपत । स्नान करावे गंगेत । नदीस्नानविधि ख्यात । करा तुम्ही विप्रवर्ग ॥१२॥
रोदनांती वमनांती । मैथुनदुःस्वप्नदर्शनांती । स्नानावेगळे शुद्ध न होती । स्नान करावे अवधारा ॥१३॥
आता वस्त्रावे विधान । सांगेन ऐका ऋषिजन । ओले वस्त्रे कासेवीण । नेसू नये गृहस्थाने ॥१४॥
रक्तादि वस्त्र जीर्ण धोत्र । नेसूनि जे जन जप करीत । ते पुण्य जाय राक्षसांप्रत । एक धोत्र असलिया ॥१५॥
श्वेतवस्त्र ब्राह्मणासी । मुख्य असे परियेसी । उपवस्त्र वहिर्वासी । उत्तरवस्त्र म्हणिजे तया ॥१६॥
धोत्र नेसलिया नंतरी । विभूति लावावी परिकरी । मंत्रविधान-पुरःसरी । भस्म धारण करावे ॥१७॥
भस्म शुद्ध न मिळे जरी । गोपीचंदन लावावे परी । द्वारावती मुख्य धरी । वरकड मृत्तिका अग्राह्य ॥१८॥
न मिळे द्वारावती देखा । करा धारण गंगामृत्तिका । ऊर्ध्वपुंड्र असे निका । विष्णुसायुज्य होय तया ॥१९॥
पुष्टिकाम असे ज्यासी । लावावे तेणे अंगुष्ठेसी । ज्यासी काम असे आयुधी । मध्यांगुली लावावे ॥२२०॥
अन्नकाम अनामिएसी । तर्जनी काम्य मुक्तीसी । जे लाविती नखेसी । महापातक घडे तया ॥२१॥
उत्तम रुंदी दशांगुली । मध्यम नव आष्ट अंगुली । सप्त सहा पंचागुली । शूर्पाकार लावावे ॥२२॥
चतुर्थ त्रीणि द्वयांगुली । अधम पक्ष असे बोली । द्वादश नामे करा भली । विष्णुनाम उच्चारित ॥२३॥
केशव म्हणावे ललाटस्थानी । नाभी नारायण म्हणोनि । माधवनामे ह्रदयस्थानी । कमळपुष्पाकार देखा ॥२४॥
गोविंदनामे कंठेसी । विष्णुनामे कटिप्रदेशी । दक्षिणभुजा मधुसूदनेसी । नाभी उत्तर त्रिविक्रम ॥२५॥
वामन नामे बाहु देखा । श्रीधर दक्षिणकर्णिका । ह्रषीकेश वामकर्णिका । पद्मनाभ दक्षिणकटी ॥२६॥
दामोदर शिरस्थान । ऐका ऊर्ध्वपुंड्रविधान । पापे जाती जळोन । गोपीचंदन लाविता ॥२७॥
द्वारावती लावोनि । लावा भस्म त्रिपुंड्रांनी । हरिहर संतोषोनि । साधे भुक्ति मुक्ति देखा ॥२८॥
विवाहादि शोभन दिवसी । देवताकृत्य श्राद्धदिवसी । अभ्यंगानंतर सूतकेसी । गोपीचंदन वर्जावे ॥२९॥
ब्रह्मयज्ञतर्पणासी । कुश सांगेन विस्तारेसी । आहेत दश प्रकारेसी । नामे सांगेन विख्यात ॥२३०॥
दूर्वा उशीर कुश काश । सकुद गोधूम व्रीहि मौजीष । नागरमोथा दर्भ परियेसा । दश दर्भ मुख्य असती ॥३१॥
नित्य आणावे दूर्वैसी । जरी न साधे आपणासी । श्रावण भाद्रपदमासी । संग्रह संवत्सरी करावा ॥३२॥
चारी दूर्वा विप्रासी । त्रीणि क्षत्रिय-वैश्यासी । एक नेमिली शूद्रासी । चतुर्वर्णी धरावे ॥३३॥
या दूर्वेची महिमा । सांगता असे अनुपमा । अग्रस्थानी असे ब्रह्मा । मूळी रुद्र मध्ये हरि ॥३४॥
अग्रभागी चतुरंगुल । ग्रंथी मूळी द्वयांगुल । धारण करावे ब्रह्मकुळे । याची महिमा थोर असे ॥३५॥
चक्र धरोनि विष्णु देखा । दैत्य पराभवी ऐका । ईश्वर त्रिशूल धरिता देखा । राक्षसांतक केवी होय ॥३६॥
इंद्र वज्रायुध धरिता । दैत्यगिरी विभांडी तत्त्वता । तैसे ब्राह्मण दूर्वा धरिता । पापदुरिते पराभवती ॥३७॥
जैसे तृणाचे बणवीसी । अग्निस्पर्श होता नाशी । तेवी आलिया पापराशि । दर्भस्पर्शै जळती देखा ॥३८॥
ब्रह्मयज्ञ जपसमयी । ग्रंथि बांधावी कुशाग्री । वर्तुळाकार भोजनसमयी । धरावी ब्राह्मणे भक्तीने ॥३९॥
कर्म आचरता दूर्वैसी । ग्रंथि बांधावी परियेसी । अग्निस्पर्श कर्पूराशी । पाप नाशी येणेपरी ॥२४०॥
एकादशांगुल प्रादेशमात्र । द्विदल असावे पवित्र । नित्य-कर्मासी हेच पवित्र । द्विदल जाणा मुख्य असे ॥४१॥
जपहोमादि दानासी । स्वाध्याय पितृकर्मासी । सुवर्णरजतमुद्रिकेसी । कुशावेगळे न करावे ॥४२॥
देवपितृकर्मासी देख । रजत करावे सुवर्णयुक्त । तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका । सुवर्ण धरावे अनामिकेसी ॥४३॥
मुद्रिका असावी खड्गपात्री । कनिष्ठिकांगुली पवित्री । ग्राह्य नव्हे जीवंतपित्री । तर्जनांगुली मुद्रिका ॥४४॥
योगपट उत्तरी देखा । तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका । पायी न घालाव्या पादुका । गयाश्राद्ध न करावे ॥४५॥
नवरत्न मुद्रिका ज्याचे हाती । पापे त्यासी न लागती । एखादे रत्न असता हाती । मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी ॥४६॥
प्रातःसंध्येच विधान । सांगेन ऐका ऋषिजन । नक्षत्र असतांचि प्रारंभून । अर्घ्य सूर्योदयी द्यावे ॥४७॥
सूर्योदय होय तव । जप करीत उभे असावे । उदयसमयी अर्घ्य द्यावे । तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ ॥४८॥
ऋषि पुसती पराशरासी । संध्या करावया विधि कैसी । विस्तारोनि आम्हांसी । सांगावे जी स्वामिया ॥४९॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । सांगेन संध्याविधिसी । ऐका तुम्ही तत्परेसी । पराशरस्मृतीसी असे ॥२५०॥
गायत्रीमंत्र जप करिता । शिखा बांधावी तत्त्वता । आसन घालावे निरुता । दर्भपाणि होउनी ॥५१॥
देवतीर्थे द्विराचमन । विष्णुनाम स्मरोन । प्राणायाम विस्तारोन । न्यासपूर्वक करावे ॥५२॥
प्रणवाचा परब्रह्म ऋषि । गायत्री नाम छंदासी । परमात्मा देवता परियेसी । म्हणा प्राणायामे विनियोगः ॥५३॥
ॐ व्याह्रति सत्यज्ञानिया । नाभि ह्रदय मूर्ध्नी स्पर्शावया । व्याह्रति सप्त अतिशया । प्रत्येक देवता ऋषि सांगेन ॥५४॥
व्याह्रति सप्तस्थानासी । ऐका असे प्रजापति ऋषि । प्रत्येक देवता परियेसी । सप्त नामे देवांची ॥५५॥
अग्निर्वायु गुरुः सूर्य । वरुणेंद्र विश्वदेव । सप्त व्याह्रति सप्त देव । छंद सप्त सांगेन ॥५६॥
गायत्री आणि उष्णिका । अनुष्टुप् बृहती पंक्ति पंचम ऐका । त्रिष्टुप् जगती छंद विशेखा । प्राणायामे विनियोगः ॥५७॥
ॐ भूः पादन्यास । ॐ भुवः जानु स्वः गुह्य । ॐ महः नाभि स्थान स्पर्शा । जनो ह्रदय तपो कंठ ॥॥५८॥॥
ॐ भू र्ह्रदयाय नम इति । ॐ भुवः शिरसे स्वाहेति । ॐ स्वः शिखायै वषडिति । ॐ तत्सवितुर्वरेण्यं कवचाय हुं ॥२६०॥
ॐ भर्गोदेवस्य धीमहि नेत्रत्रयाय वोषट् । धियोयोनः प्रचोदयात् अस्त्राय फट् । ॐ भूर्भु०इति दिग्बंधः । ऐसे षडंग करावे ॥६१॥
प्राणायामे विनियोगः म्हणुनि । आपोस्तन स्पर्शोनि । ज्योतिर्नेत्रस्पर्शस्थानी । रसो जिव्हामृतललाटे ॥६२॥
प्राणायाम करावयासी । प्रजापति म्हणती ऋषि । देवतानामे परियेसी । ब्रह्माग्निवायु सूर्य असे ॥६३॥
ब्रह्मभूर्भुवःस्वः म्हणुनि । प्राणायाम करा तिन्ही । त्रिपदा गायत्री जप कोणी । जपणारासी सर्व सिद्धि ॥६४॥
गायत्रीची अधिदेवता । ब्रह्माग्निवायु सविता । ऋषि ब्रह्मा असे ख्याता । सप्त लोकन्यास सांगेन ॥६५॥
पादन्यास भुर्लोक । भुवः जानु अतिविशेख । स्वः गुह्य असे लोक । नाभिन्यास महर्लोक ॥६६॥
जनो ह्रदय तपो ग्रीवे । भ्रुवोर्ललाटे सत्यलोक म्हणावे । ऐसे शिरस्थान बरवे । सत्यलोक म्हणती तयासी ॥६७॥
गायत्रीची प्रार्थना करूनि । प्राणायाम करा विधींनी । ब्रह्मचारी गृहस्थानी । पंचांगुली धरा परमेष्ठी ॥६८॥
वानप्रस्थ संन्यासी यती । अनामिकाकनिष्ठिकांगुष्ठेसी । ओंकारादि वायुपूरकेसी । दक्षिणनासापुटे चढवावे ॥६९॥
वामनासापुटी विसर्जोनि । करा प्राणायाम तिन्ही । येणेचि विधी करा मुनि । त्रिकालसंध्या कर्मै ॥२७०॥
आता करावे मार्जनेसी । सांगेन ऐका समस्त ऋषि । जैसे अति स्मृतिचंद्रिकेसी । तेणे विधी सांगतो ॥७१॥
आपोहिष्ठेति सूक्तेसी । सिंधुद्वीप ऋषि गायत्री छंदेसी । आपोदेवता मार्जनासी । हा म्हणावा विनियोग ॥७२॥
येणे मंत्रे म्हणोन । कुशपवित्रे करा मार्जन । यस्य क्षयाय मंत्रे जाण । आपुले पाद प्रोक्षावे ॥७३॥
आपोजनयथा मंत्रेसी । प्रोक्षावे आपुल्या शिरसी । सूर्यश्चेति मंत्रेसी । उदक प्राशन करावे ॥७४॥
हिरण्यवर्णसूक्तेसी । मार्जन करावे परियेसी । द्रुपदादिवेति मंत्रेसी । घ्राणोनि उदक सोडावे ॥७५॥
आचमने करोनि दोन । मार्जनविधान सांगेन । वामहस्ती पात्र धरून । मार्जन करा विशेषी ॥७६॥
औदुंबर सुवर्ण रजत । काष्ठाचेही असे पवित्र । ऐसे असे निर्मळ पात्र । वामहस्ती उदक बरवे ॥७७॥
मृण्मय अथवा द्विमुख पात्र । भिन्न पात्र ते जाण अपवित्र । ते अग्राह्य देवपितरा । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥७८॥
मार्जनसंख्या सांगेन ऐका । शिरसी अष्ट पादे नवका । यस्य क्षयाय स्नान भुमिका । येणेपरी मार्जन ॥७९॥
आपः पुनन्तु मंत्रेसी । प्राशनोदक माध्याह्नेसी । अग्निश्चेति मंत्रेसी । सायंसंध्या करावी ॥२८०॥
प्राशनांती तुम्ही ऐका । द्विराचमन करा निका । आघ्राण करुनी सांडिजे ऐका । एक आचमन करावे ॥८१॥
अर्घ्य द्यावयाचे विधान । सांगेन ऐका ऋषिजन । गोश्रृंगाइतुके आकारोन । अर्घ्य द्यावे मनोभावे ॥८२॥
गायत्रीमंत्र जपोनि । सायंप्रातर्द्यावी तिन्ही । हंसःशुचिषेति माध्याह्नी । अर्घ्य द्यावे अवधारा ॥८३॥
प्रातर्माध्याह्नी उभे बरवे । सायं अर्घ्य बैसोनि द्यावे । आचमन त्रिवारी करावे । करी प्रदक्षिणा असावादित्य ॥८४॥
अर्घ्य द्यावयाचे कारण । सांगेन कथा विस्तारोन । राक्षस मंदेह दारुण । तीस कोटि आहेती देखा ॥८५॥
सूर्यासवे युद्धासी। नित्य येतीपरियेसी । संदेह पडे देवांसी । सूर्या होईल अपजय ॥८६॥
अपजय येता सूर्यासी । उदयास्तमान न होय परियेसी । कर्मै न चालती ब्राह्मणांसी । स्वाहास्वधाकार न चाले ॥८७॥
स्वाहास्वधाकार रहाती । समस्त देवांस उपवास होती । सृष्टि राहिली न होय उत्पत्ति । म्हणोनि उपाय रचियेला ॥८८॥
याचि कारणे अर्घ्य देती । तीचि वज्रायुधे होती । जावोनि दैत्यांसी लागती । पराभविती प्रतिदिवसी ॥८९॥
दैत्य असती ब्रह्मवंश । त्यांसी वधिलिया घडती दोष । प्रदक्षिणा करिता होय नाश । असावादित्य म्हणोनिया ॥२९०॥
ब्रह्महत्येचिया पातकासी । भूमिप्रदक्षिणा दोष नाशी । चार पावले फिरता कैसी । भूमिप्रदक्षिणा पुण्य असे ॥९१॥
संध्या करावयाचे स्थान । सांगेन ऐका फलविधान । घरी करिता प्रतिदिन । एकचि फळ अवधारा ॥९२॥
दश फळ ग्रामाबाहेर देखा । नदीस केलिया शताधिका । पुष्करतीरी सहस्त्र ऐका । गंगासुरनदी कोटिफल ॥९३॥
सुरापान दिवा मैथुन । अनृतादि वाक्ये पापे जाण । संध्या बाहेर करिता क्षण । जळती दोष तात्काळी ॥९४॥
स्थाने असती जप करावयासी । विस्तारे सांगेन तुम्हासी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । एकचित्ते परियेसा ॥९५॥
जप केलिया घरी ऐका । एकचि फल असे देखा । बाहेर द्विगुणी फल अधिका । नदीतीरी त्रिगुण फल ॥९६॥
गोस्थळ वृंदावन देखा । दशगुण फल अधिका । अग्निहोत्रस्थानी निका । शतगुणफल अधिक असे ॥९७॥
तीर्थदेवता सन्निधानी । सहस्त्रफल असे निर्गुणी । शतकोटि फल हरिसन्निधानी । ईश्वरसंनिधानी अनंत फल ॥९८॥
जप करिता आसनासी । विधिनिषेध आहे परियेसी । सांगेन ऐका तत्परेसी । पुण्य पाप बोलिले असे ॥९९॥
काष्ठासनी बैसोनि जरी । जप करिता मनोहरी । दुःख भोगी निरंतरी । अभागी पुरुष तो होय ॥३००॥
पल्लवशाखांसी बसता । सदा होय दुश्चिता । वस्त्रासनी दरिद्रता । पाषाणासनी व्याधि होय ॥१॥
भस्मासनी व्याधिनाश । कंबलासनी सुखसंतोष । कृष्णाजिनी ज्ञानप्रकाश । व्याघ्रचर्मी मोक्षश्री ॥२॥
कुशासनी वशीकरण । सर्व रोगांचे उपहरण । पापे जाती पळोन । आयुःप्रज्ञा अधिक होय ॥३॥
ओ इत्येक्षारकमंत्री । जपावा तुम्ही पवित्री । ध्यान करावे गायत्री । समस्त पापे हरती देखा ॥४॥
गायत्रीचे स्वरूप आता । अभिवन असे वर्णिता । रक्तांगी वास रक्ता । हंस वाहन असे देखा ॥५॥
अकार ब्रह्मा अधिदेवता । चतुर्भुजा चतुर्वक्त्रा । कमंडलु अक्षसूत्रा । चाटु धरिला असे करी ॥६॥
ऋग्वेद असे समागमी । अग्निहोत्रफल आवाहयामि । मग आयातु वरदा देवी । म्हणावे ऐका ब्राह्मणाने ॥७॥
त्या मंत्रासी ऋषि देवता । गायत्रीसदृश असे ख्याता । प्रातःसंध्या तुम्ही करिता । विधि तुम्हा सांगेन ॥८॥
गायत्री देवता गायत्री अनुष्टुप छंदः । ॐ आदित्य देवता देवा । हे प्रातःसंध्या म्हणता भेद । गायत्री देवता गायत्री छंदः ॥९॥
गायत्री आवाहने विनियोगः । ही माध्याह्नसंध्या म्हणावी । सविता देवता गायत्री छंदः । सरस्वती आवाहने विनियोगः ॥३१०॥
प्रातःसंध्येचे ध्यान । सांगेन ऐका तुम्ही गहन । रक्तांगी रक्तवसन । हंसासनी आरूढ असे ॥११॥
चतुर्बाहु चतुर्मुखी । कमंडलु धरिला विशेखी । अक्षसूत्र चाटु हस्तकी । ऋग्वेदसहित अग्निहोत्र ॥१२॥
ऐसे ध्यान करोनि । मग म्हणावे अक्षरज्ञानी । एकचित्ते असा ध्यानी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥
ओंकार शिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामी । श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥१४॥
ऐसे म्हणोनि प्रातःकाळी । संध्या करावी सुवेळी । आता सांगेन माध्याह्नकाळी । ध्यान आवाहनपूर्वक ॥१५॥
अभिभुरो सावित्रीध्यान । यौवनस्था माध्याह्न । सांगेन ऐका ऋषिजन । एकचित्ते परियेसा ॥१६॥
श्वेतांगी श्वेतवस्त्र । वाहन असे वृषभ पवित्र । उकार रुद्रगण दैवत । पंचमुखा असे देखा ॥१७॥
वरद अभयहस्त देखा । रुद्राक्षमाळा त्रिशूलधारका । यजुर्वेद असे देखा । अग्निष्टोम फल जाणा ॥१८॥
ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि । श्रियमावाहयामि । ह्रियमावाहयामि ॥१९॥
आता सायंसंध्या ध्यान । सांगेन ऐका विधान । एकचित्ते ऐका वचन । ध्यानपूर्वक सांगेन ॥३२०॥
अभिभूरो सरस्वती वृद्धा । जाणावी तुम्ही सायंसंध्या । कृष्णांगी कृष्णवस्त्रपरिधाना । गरुडवाहन असे देखा ॥२१॥
मकार विष्णुदेवता । चतुर्भुज शंखचक्रधृता । गदापद्मधारणहस्ता । सामवेदसहित जाणा ॥२२॥
वाजपेयफल जाण । सायंसंध्या असे ध्यान । करावे ऐका तुम्ही ब्राह्मण । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥२३॥
ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि । श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥२४॥
पंचशीर्षोपनयने विनियोगः । प्रणवस्य परब्रह्म ऋषिः । परमात्मा देवता । गायत्री छंदः ॥२५॥
उदात्तस्वरित स्वरः अग्निर्वायुः सूर्यदेवता । गायत्री त्रिष्टुप् जगती छंदः । ब्रह्माविष्णुमहेश्वरादेवताः । ऋग्यजुःसामानि स्वरूपाणि ॥२६॥
आहवनीयाग्निगार्हपत्य । दक्षिणाग्निउपस्थानानि । पृथिव्यंतरिक्षं द्यौस्तत्त्वानि । उदात्तानुदात्तस्वरितस्वराः ॥२७॥
पीतविद्युतश्वेतवर्णी । प्रातर्मध्याह्नतृतीयसवनानि । विश्वतजसप्राज्ञस्वरूपिणी । जागृतीस्वपन्सुषुप्त्यवस्था ॥२८॥
ऐसे त्रिपदा गायत्रीसी । सांगितले त्रिविध ध्यानासी । आता विधान जपासी । सांगेन ऐका एकचित्ते ॥२९॥
ममोपात्तदुरितक्षयद्वारा । श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं जपे विनियोगः । ॐ अं नाभौ । वं ह्रदये मं कंठे ॥३३०॥
भूः अक्षरमंत्रासी । गायत्री असे छंदेसी । अग्निर्देवता परिएय्सी । विश्वामित्र ऋषि देखा ॥३१॥
षड्ज स्वर श्वेत वर्ण । पादस्पर्श उच्चारोन । प्राणायामे विनियोगून । दुसरी व्याह्रति म्हणावी ॥३२॥
भुवः अक्षरमंत्रासी । उष्णिक् नाम छंदासी । वायुर्देवता परियेसी । भृगु ऋषि असे जाण ॥३३॥
असे रूप श्यामवर्ण । पादस्पर्श रूप उच्चारोन । करा तुम्ही ऐसे ध्यान । जानूमध्ये न्यासावे ॥३४॥
प्राणायाम विनियोग म्हणोनि । न्यास करावे भक्तिभावनी । स्वः व्याह्रति म्हणोनि । ध्यान करा भक्तीने ॥३५॥
स्वः व्याह्रतिमंत्रासी । म्हणा अनुष्टुप् छंदासी । सविता देवता परियेसी । भारद्वाज ऋषि जाण ॥३६॥
स्वर गांधार पीतवर्णा । कंठी स्पर्शोन मंत्र म्हणा । प्राणायामे विनियोग जाणा । तृतीय व्याह्रतिमंत्रासी ॥३७॥
ॐ महः मंत्रासी । बृहती छंदासी । बृहस्पति देवता परियेसी । वसिष्ठ ऋषि निर्धारे ॥३८॥
मध्यम स्वर पिशंग वर्ण । ऐसे करा तुम्ही ध्यान । वेगे म्हणा नाभी स्पर्शोन । प्राणायामे विनियोगः ॥३९॥
जन मंत्र उच्चारासी । म्हणा पंक्ति छंदासी । वरुण देवता गौतम ऋषि । पंचम स्वर असे जाण ॥३४०॥
रूप असे नीलवर्ण । करा न्यास ह्रदयस्थान । प्राणायामे विनियोगून । जनः पंच न्यास ऐसे ॥४१॥
तपः मंत्र न्यासासी । त्रिष्टुप् छंद परियेसी । ईश्वर देवता कश्यप ऋषि । धैवत स्वर परियेसा ॥४२॥
असे आपण लोहवर्ण । स्पर्श करावे कंठस्थान । प्राणायामे विनियोगून । न्यास करावा ब्राह्मणहो ॥४३॥
सत्यं म्हणतसे मंत्रासी । करावे जगती छंदासी । विश्वेदेव अंगिरस ऋषि । निषाद स्वर जाणावा ॥४४॥
रूप असे कनकवर्ण । भ्रुवोर्ललाटा स्पर्शून । प्राणायामे विनियोगून । न्यास करावा भक्तीने ॥४५॥
इतुके न्यास करोनि । हस्त ठेवा शिरस्थानी । ध्यान करा विधानी । सांगेन ऐका ब्राह्मणहो ॥४६॥
शिरस्थान स्पर्शासी । म्हणा अनुष्टुप् छंदासी । उच्चार प्रजापति ऋषि । परमात्मा देवता जाण ॥४७॥
प्राणायामे विनियोगून । मग करावे गायत्रीध्यान । ॐ आपोज्योति म्हणोन । मंत्र म्हणा भक्तीने ॥४८॥
ॐ आपोज्योतिरसोमृतं । ब्रह्मभूर्भुवःस्वरो । शिरसी येणे विधी । अंगन्यास करावे ॥४९॥
चोवीस अक्षरे मंत्रासी । न्यास सांगेन एकाएकासी । एकचित्ते परियेसी । म्हणे पराशर ऋषि तो ॥३५०॥
या त्रिपदा गायत्रीसी । असे विश्वामित्र ऋषि । देवी गायत्री छंदेसी । वर्ण देवता सांगेन ॥५१॥
ऐसे त्रिपदा गायत्रीमंत्रासी । चोवीस अक्षरे परियेसी । पृथक् न्यास परियेसी । सांगेन ऐक द्विजोत्तमा ॥५२॥
तवर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । अग्नि देवता परियेसी गायत्री छंद म्हणावा ॥५३॥
अतसीपुष्पे वर्णै जैसी । तद्रूप वर्ण असे परियेसी । वायव्य कोण स्थान त्यासी । गुल्फन्यास करावा ॥५४॥
त्सवर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वायुदेवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५५॥
जंघस्थानी असे न्यास । सौम्यरूप पिवळे सुरस । सर्व पापे दहती परियेस । त्सवर्णाचे लक्षण ॥५६॥
विवर्णनाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । सोमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५७॥
न्यास करावया जानुस्थान । इंद्रनील विद्युद्वर्ण । ऐसे अक्षरविधान । महारोग हरती देखा ॥५८॥
तुवर्ण नाम अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । विद्युद्देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५९॥
न्यास करा जानुस्थानी । दीप्ति असे जैसा वह्नि । रूप असे सौम्यपणी । भ्रूणहत्यापाप नाशी ॥३६०॥
र्ववर्ण अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । सोम देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६१॥
सुवर्णस्फटिककांति । गुह्यस्थानी न्यास बोलती । समस्त अघौघ नाशती । रूपार्ववर्णस्थाना उत्तम ॥६२॥
रेवर्ण नाम अक्षरमंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वरुण देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६३॥
णिकार वृषणस्थान जाणा । विद्युत्प्रकाशरूपधारणा । बार्हस्पत्यनाम खुणा । अभक्ष्यपापक्षालन ॥६४॥
णिवर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । बृहस्पति देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६५॥
यं कटिस्थान शांताकारवर्ण । देहहत्यापापज्वलन । न्यास करावे सगुण । विद्वज्जन ब्राह्मणा ॥६६॥
यं अक्षर म्हणावयासी । असे विश्वामित्र ऋषि । तारका दैवत परियेसी । देवी गायत्री छंद असे ॥६७॥
भकारा नाभी करा न्यास । कृष्णमेघवर्ण सुरस । पर्जन्य देवता संकाश । गुरुहत्यापाप नाशी ॥६८॥
भवर्ण नाम अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । पर्जन्य देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥६९॥
र्गो अक्षरा उदर न्यास । ध्यान रक्तवर्ण सुरस । इंद्र देवता परियेस । गोहत्येचे पाप जाय ॥३७०॥
गोवर्ण नाम अक्षरासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । इंद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७१॥
देकारन्यास स्तनासी । गंधर्व नाम देव परियेसी । स्त्रीहत्यापाप नाशी । एकचित्ते परियेसा ॥७२॥
देवर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । गंधर्व देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥७३॥
वकार ह्रदयस्थानन्यास । शुक्ल रूप वर्ण परियेस । पूषा देवता असे त्यास । वाणीजातपाप नाशी ॥७४॥
ववर्णाक्षर मंत्रासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । रुद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७५॥
स्य अक्षरा कंठन्यास । कांचनवर्ण रूप सुरस । मित्र देवता परियेस । मार्जारकुक्कुटपाप जाय ॥७६॥
स्यवर्ण अक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । मित्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७७॥
धीकाराक्षरमंत्र दंती न्यास । शुक्लकुमुदसंकाश । त्वष्टा देवता परियेस । पितृहत्यापाप जाय ॥७८॥
धीवर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । विष्णु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाण ॥७९॥
मकारन्यास तालुस्थान । पद्म तेजोमय जाण । वासुदेव असे खूण । सर्वजन्मपाप जाय ॥३८०॥
मकार वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वासुदेव देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८१॥
हिकार नासिकी करा न्यास । शंखवर्ण असे त्यास । वासुदेव देवता परियेस । सर्व पाप हरण होय ॥८२॥
हिवर्ण नाम मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । मेरु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८३॥
धिकारा नेत्रस्थानी न्यास । पांडुरभास संकाश । सोम देवता परियेस । पाणिग्रहणपाप नाशी ॥८४॥
धिवर्ण नाम मंत्रासी । तोचि विश्वामित्र ऋषि । सोमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८५॥
योकाराक्षर मंत्रासी । भुवोर्मध्ये न्यासिजे त्यासी । रक्तगौरवर्ण रूपेसी । प्राणिवधपाप जाय ॥८६॥
योकाराक्षर नामाक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । यमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८७॥
योकार ललाटस्थानी न्यास । रूप रुक्मांभसंकाश । सर्व पाप होय नाश । भक्तिपूर्वक न्यासावे ॥८८॥
योवर्णाक्षर मंत्रासी । तोचि विश्वामित्र ऋषि । विश्वे देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८९॥
नकारा उदित प्राङ्मुखा । सूर्यासमान तेज देखा । आश्विनौ देवता असे निका । विराजमान परियेसा ॥३९०॥
नकाराक्षर वर्णासी । जाणा विश्वामित्र ऋषि । अश्विनौ देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९१॥
प्रकाराक्षरन्यास करोनि दक्षिणे । रूप असे नीलवर्ण । प्रजापति देवता जाण । विष्णुसायुज्य पाविजे ॥९२॥
प्रवर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । प्रजापति देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९३॥
चोकार वर्ण मंत्रासी । न्यासिजे तया पश्चिम भागासी । कुंकुमरूपवर्ण त्यासी । सर्वदेवपदवी पाविजे ॥९४॥
चोकार वर्ण मंत्राक्षरासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । सर्व देवता परियेसी । गायत्री देवी छंद जाणा ॥९५॥
दकाराक्षराचा उत्तरे न्यास । शुक्लवर्ण रूप सुरस । करावे तुम्ही ऐसे न्यास । कैलासपद पाविजे ॥९६॥
दकाराक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । रुद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९७॥
याकार मूर्धास्थानी न्यास । सुवर्णरूप सुरस । ब्रह्मस्थाना होय वास । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥९८॥
यावर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । ब्रह्म देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९९॥
तकार न्यास शिखास्थानी । निरुपम वैष्णवभुवनी । विष्णुरूप धरोनि । वैकुंठवास होय जाणा ॥४००॥
तकार वर्णाक्षरमंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । विष्णु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥१॥
ऐसे चोवीस अक्षरमंत्रासी । न्यास करावे विधींसी । हस्त ठेवोनिया शिरासी । आणिक न्यास करावे ॥२॥
शिरस्थानी न्यासासी । म्हणावे अनुष्टुप् छंदासी । ख्याति प्रजापति ऋषि । परमात्मा देवता जाणा ॥३॥
प्राणायामे विनियोग म्हणोनि । ओं आपोस्तन स्पर्शोनि । ज्योतिर्नेत्र स्पर्शोनि । रसोजिह्वा न्यासावे ॥४॥
अमृतेति ललाटेसी । मूर्घ्नि स्पर्शोनि ऐसी । ब्रह्मभूर्भुवःस्वरोमासी । न्यास करा येणे विधी ॥५॥
इतुके न्यास करोनि । गायत्री त्रिवार म्हणोनि । व्यापक न्यास करोनि । करशुद्धि करा तीन वेळा ॥६॥
भुः० स्वः० विन्यसोनि । गायत्रीच्या दश पदांनी । दशांगुली न्यासोनि । पादप्रमाण करावे ॥७॥
अंगुष्ठमूल धरोनि । कनिष्ठिका स्पर्शोनि । उभय हस्त न्यासोनि । दशपादांगुली न्यासावे ॥८॥
चोवीस अक्षरमंत्रासी । अंगुलिन्यास करा हर्षी । तर्जनीमूलादारभ्येसी । कनिष्ठिकापर्यंत ॥९॥
द्वादशाक्षरी अकैक हस्त । करावे न्यास सुनिश्चित । षडंगन्यास समस्त । प्रणवासहित करावे ॥४१०॥
ॐ भूः हिरण्यात्मने । अंगुष्ठाभ्यां नमः । ॐ भुवः प्रजापत्यात्मने । तर्जनीभ्यां नमः ॥११॥
ॐ स्वः सूर्यात्मने मध्यमाभ्यां नमः । ॐ महः ब्रह्मात्मने अनामिकाभ्यां नमः ।
ॐ जनः, ॐ तपः ॐ सत्यं, कनिष्ठिकाभ्यां नमः । प्रचोदयात् करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॥१२॥
ॐ तत्सवितुः अंगुष्ठाभ्यां ह्रदयाय नमः । वरेण्यं तर्जनीभ्यां शिरसे स्वाहा ।
भर्गोदेवस्य मध्यमाभ्यां शिखायै वषट् । धीमहि अनामिकाभ्यां कवचाय हुं ॥१३॥
धियोयोनः कनिष्ठिकाभ्यां नेत्रत्रयाय वौषट् । प्रचोदयात् करतलकरपृष्ठाभ्यां अस्त्राय फट् । उभयहस्तांगुलिन्यासं कुर्यात् । अथ षडंगन्यासः ॥१४॥
ॐ भूः हिरण्यात्मने ह्रदयाय नमः । ॐ भुवः प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा । ॐ स्वः सूर्यात्मने शिखायै वौषट् । ॐ महः ब्रह्मात्मने कवचाय हुं ॥१५॥
ॐ जनः, ॐ तपः, ॐ सत्यं, सोमात्मने । नेत्रत्रयाय वौषट् । प्रचोदयात सर्वात्मने अस्त्राय फट् । ॐ तत्स० ह्रदयाय नमः ॥१६॥
ॐ वरेण्यं शिरसे स्वाहा ।भर्गोदेवस्य शिखायै वौषट् । धीमहि कवचाय हुं । धियोयोनः नेत्रत्रयाय वौषट् । प्रचोदयात अस्त्राय फट् ॥१७॥
षडंगन्यास करोनि । अंगन्यास दशस्थानी । त्यांची नावे सांगेन कानी । एकचित्ते अवधारा ॥१८॥
पादजानुकटिस्थानी । नाभिह्रदयकंठभुवनी । तालुनेत्र स्पर्शोनि । ललाटशिरी दशस्थान ॥१९॥
गायत्रीमंत्राच्या दहा पदांसी । दशस्थान अंगन्यासासी । तत्सवितुर्वरेण्येसी । भर्गोदेवस्य पंचम स्थान ॥४२०॥
धीमहि म्हणजे षष्ठ स्थान । धियो सप्तम स्थान जाण । योकारो अष्टम अंगन्यास पूर्ण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥२१॥
नकार नवम मंत्रस्थान । प्रचोदयात् दहावे जाण । अंगन्यास येणे गुण । करा तुम्ही द्विजोत्तमा ॥२२॥
चतुर्विशति अक्षरांसी । करावे अंगन्यासासी । पादांगुष्ठस्पर्श हर्षी । शिखादारभ्य न्यासावे ॥२३॥
अंगुष्ठाभ्यां नमः । त्सं गुल्फयोर्नमः । विं जंघर्योर्नमः । तुं जानुभ्यां नमः ॥२४॥
व ऊरुभ्यां नमः । रें गुह्याय नमः । णीं वृषणाय नमः । यं कटिभ्यां नमः ॥२५॥
भं नाभ्यै नमः । र्गौ उदराय नमः । दें स्तनाभ्यां नमः । वं ह्रदयाय नमः ॥२६॥
स्यं कंठाय नमः । धीं दंतेभ्यो नमः । मं तालवे नमः । हिं नासिकायै नमः ॥२७॥
धिं नेत्राभ्यां नमः । यों भ्रुवोर्मध्याय नमः । यों ललाटाय नमः । नः प्राङ्मुखाय नमः ॥२८॥
प्रं दक्षिणमुखाय नमः । चों पश्चिममुखाय नमः । दं उत्तरमुखाय नमः । यां मूर्ध्ने नमः । तं शिखायै वषट् ॥२९॥
ऐसे न्यास करोनि । पुनः पादांगुष्ठ धरोनि । कटिपर्यंत न्यासोनि । ऊर्ध्वन्यास करावे ॥४३०॥
तकारा अंगुष्ठस्थान । त्सकार गुल्फ असे स्थान । विकार जंघास्थान । ऐका ब्राह्मणा म्हणती गुरु ॥३१॥
तुकार जानूर्वकार ऊरवे । वकार गुह्यपूर्वक स्पर्श । णिकारा वुषणस्थान बरवे । तुकार कटिस्थान न्यास ॥३२॥
शिखा धरोनि पादपर्यंत । करावे न्यास उतरत । त्याते सांगेन आदिअंत । एकचित्ते परियेसा ॥३३॥
तं नमः शिकायै विन्यस्य । यां नमः मुर्ध्नि विन्यस्य । दं नमः उत्तरशिखायां न्यस्य । चो नमः पश्चिमशिखायां ॥३४॥
प्रं नमः दक्षिणशिखायां । नं नमः प्राङ्मुखे । यो नमः ललाटे । यो नमः भ्रुवोर्मध्यी ॥३५॥
धिं नमः नेत्रत्रये । हिं नमः नासिकयोः । मं नमः तालौ । धी नमः दंतेषु ॥३६॥
स्यं नमः कंठे । वं नमः ह्र्दये । दें नमः स्तनयोः । र्गौ नमः उदरे । भं नमः नाभौ ॥३७॥
प्रणवादि नमोत न्यास करावे । आकार नाभी उकार ह्रदये । मकार मुखे नकार ललाटे । मकर शिरसि हस्तेन नमस्कृत्वा ॥३८॥
अथ मुद्रासंपुटप्रकारी । चतुर्विशति अवधारी । सांगेन त्यांचा विस्तार परी । ऐका ब्राह्मण एकचित्ते ॥३९॥
श्लोक । सुमुखं संपुटं चैव विततं विस्तृतं तथा । द्विमुखं त्रिमुखं चैव चतुःपंचमुखं तथा ॥४४०॥
षण्मुखाधोमुखं चैव व्यापकांजलिकं तथा । शकटं यमपाशं च ग्रंथितं चोल्मुकोल्मुकम ॥४१॥
प्रलंबं मुष्टिकं चैव मत्स्यकूर्मो वराहकम् । सिंहाक्रांतं महाक्रांतं मुद्गरं पल्लवं तथा ॥४२॥
एता मुद्रा न जानाति गायत्री निष्फला भवेत् । एता मुद्रास्तु कर्तव्या गायत्री सुप्रतिष्ठिता ॥४३॥
अस्यार्थः । सुमुखं ॥१॥ संपुटं ॥२॥ विततं ॥३॥ विस्तृतं ॥४॥ द्विमुखं ॥५॥ त्रिमुखं ॥६॥
चतुर्मुखं ॥७॥ पंचमुखं ॥८॥ षण्मुखं ॥९॥ अधोमुखं ॥१०॥ व्यापकांजलिकं ॥११॥
शकटं ॥१२॥ यमपाशं च ॥१३॥ ग्रंथितं ॥१४॥ चोल्मुकोल्मुकं ॥१५॥ प्रलंबं ॥१६॥
मुष्टिकं ॥१७॥ मत्स्यः ॥१८॥ कूर्मः ॥१९॥ वराहः ॥२०॥
सिंहाक्रांतं ॥२१॥ महाक्रांतं ॥२२॥ मुद्गरं ॥२३॥ पल्लवं ॥२४॥
मुद्राविण गायत्रीमंत्र । जप करितां सर्व व्यर्थ । या कारणे करावे पात्र । मुद्रापूर्वक जप करावा ॥४४॥
गौप्प्य करावा मुद्रायुक्त । प्राणायाम करा निश्चित । समस्त पापक्षयार्थ । म्हणोनि अष्टोत्तरीय संकल्पावे ॥४५॥
या गायत्रीप्रथमपादासी । म्हणा ऋग्वेद असे ऋषि । भूमितत्त्व परियेसी । ब्रह्मा देवता त्रिष्टुप् छंद ॥४६॥
द्वितीयपाद गायत्रीसी । यजुर्वेद असे ऋषि । रुद्रदेवता प्राणापानव्यालतत्त्वेसी । जगती म्हणा अहर्निशी ॥४७॥
गायत्री तृतीयपादासी । ऋग्यजुः सामतत्त्व परियेसी । विष्णु देवता त्रिष्टुप छंदेसी । समस्तपापक्षयार्थ विनियोग ॥४८॥
भूमिस्तंभ परियेसी । गायत्री छंदासी । म्हणावे ब्रह्मपदासी । ब्रह्मा दैवत जाणावे ॥४९॥
गायत्रीचे ध्यान । सांगेन तुम्हा विधान । एकचित्ते करा पठण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४५०॥
श्लोक । मुक्ताविदुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणैर्युक्तामिंदुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम् ।
गायत्री वरदाभयांकुशकशां शुभ्रं कपालं गदां शंखं चक्रमथारविदयुगलं हस्तैर्वहन्ती भजे ॥५१॥
ऐसे ध्यान करोनि । जप करावा नासिकाग्रनयनी । अंती षडंग न्यासोनि । जप करा येणेपरी ॥५२॥
गायत्रीमंत्राची प्रशंसा । एकचित्ते परियेसा । मंत्रनाम असे विशेषा । अक्षरे दोनी पाप हरे ॥५३॥
मकार म्हणजे आपुले मन । त्रकार नाम आपुला प्राण । मन प्राण एकवटोन । जप करावा एकचित्ते ॥५४॥
जप म्हणजे अक्षरे दोनी । प्रख्यात असती त्रिभुवनी । जकार जन्म विच्छेदोनि । पकारे जन्मपाप दुरी ॥५५॥
चारी वेदांस मूळ एका । गायत्रीनाम नाशी पातका । याचि कारणे करावा निका । वेदपठणफळ असे ॥५६॥
ऐसा मंत्र न जरी जपे नर । वृथा जन्म जैसा सूकर । जप करा हो निर्धार । चिंतिले फल पाविजे ॥५७॥
न करावा उदकी बैसोन । त्वरित होय प्रज्ञाहीन । याचि कारणे सांगेन विस्तारोन । अग्नि तीनि विप्रमुखी ॥५८॥
आहवनीय गार्हपत्य । दक्षिणाग्नि तिसरा विख्यात । अग्निउदकसंपर्कै त्वरित । तेजत्व जाय अग्नीचे ॥५९॥
या कारणे उदक वर्जोनि । बैसिजे उत्तम आसनी । हस्तस्पर्शी नाभिस्थानी । जपावा माळ धरोनिया ॥४६०॥
उभेनी जपावा प्रातःकाळी । बैसोनि कीजे माध्याह्नकाळी । अथवा उभा ठाकोनि । उभय पक्षी करावा ॥६१॥
माध्याह्नी ह्रदयस्थानी । जपावा माळ धरोनि । हस्त मुखे स्पर्शोनि । सायंकाळी जपावा ॥६२॥
बैसोनि जपावा सायंकाळी । पहावा वृक्ष निर्मळी । जरी वृक्ष नसे जवळी । नासाग्रानयनी जपावा ॥६३॥
ब्रह्मचारी गृहस्थासी । जप नेमिला अष्टोत्तरेसी । वानप्रस्थ संन्यासी यासी । सहस्त्र मुख्य करावा ॥६४॥
संधिविग्रह होय जरी । अष्टाविंशति तरी करी । अशक्ति होय जरी । दहा वेळ जपावा ॥६५॥
उत्तम पक्ष मानसी । मध्यम गौप्य सुमुखेसी । अक्षरे प्रगट वाक्येसी । कनिष्ठ पुकार परियेसा ॥६६॥
त्रिपाद असती गायत्रीसी । मिळोनि न म्हणावी परियेसी । म्हणता होय महादोषी । महानरक अवधारा ॥६७॥
पृथक करोनि त्रिपदासी । जपा मंत्र अतिहर्षी । ब्रह्महत्यादि पापे नाशी । अनंत पुण्य लाधिजे ॥६८॥
अंगुष्ठजपे एक पुण्य । पर्वांगुलीने दशगुण । शंखमणीने होय शतगुण । प्रवालमाला सहस्त्रफळ ॥६९॥
स्फटिकमणि दहासहस्त्र । मौक्तिके पुण्य लक्षाधिक । पद्माक्षी निर्गुण जप । दशलक्ष पुण्य असे ॥४७०॥
कोटुगुणे सुवर्णमाला । कुश रुद्राक्ष अनंतफला । जप करा नित्य काळा । गौप्यमाला धरोनिया ॥७१॥
गौप्यमाला करकमळी । जप करा निश्चली । सौख्य पावे अनंत फळी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाते ॥७२॥
जप करिता नुल्लंघिजे मेरु । उल्लंघिता पाप बोलिले अपारु । प्राणायाम केलिया त्रिवारु । मेरुलंघनपाप जाय ॥७३॥
गायत्रीजप तीन दिवस । प्रत्यही करावा एकादश । सर्व पातके होती नाश । त्रिरात्रीचे पाप जाय ॥७४॥
अष्टोत्तरशत जप करिता । अघोर पातक जाय त्वरिता । करोनि सहस्त्र जप एकाग्रता । उपपातके नासती ॥७५॥
महापातकादि दोषासी । कोटि जप करावा परियेसी । जे जे कर्म इच्छिसी । त्वरित होय अवधारा ॥७६॥
जप करावा मन दृढे । न पहावे मागे पुढे । शूद्रादिक यातीकडे । संभाषण न करावे ॥७७॥
द्रव्य घेवोनि एखाद्यासी । जपता होय अनंतदोषी । चांडाळयोनीत भरवसी । जन्म पावे परियेसा ॥७८॥
कंडू नये शरीर आपुले । नेणता जरी इतुके घडले । श्रोत्राचमन करा वहिले । दोष नाही अवधारा ॥७९॥
ब्राह्मणाचे दक्षिणकर्णी । सप्त देवता ऐका निर्गुणी । स्पर्श करिता तत्क्षणी । पापे जाती परियेसा ॥४८०॥
दृष्टी पडता चांडाळासी । द्विराचमने शुद्ध होसी । संभाषण झालिया पतितासी । आचमनस्नान करावे ॥८१॥
जपता निद्रा येई जरी । अधोवायु जांभई आलियावरी । क्रोधरूपे जपता जरी । पापरूपे अवधारा ॥८२॥
मौन्य करावे हे उत्तमी । अगत्ये बोलिजे संधिविषयी । तद्विष्णो मंत्र जपता कर्मीं । पापे जाती सकळिक ॥८३॥
नेणता घडे इतुके जरी । आचमन करावे श्रोत्री । अग्नि सूर्यधेनुदर्शन करी । विष्णुमंत्र जपावा ॥८४॥
ऐसा जप करावा विधीने । मनकामना होय पूर्ण । ऐकती समस्त ऋषिजन । म्हणोनि सांगे पराशर ॥८५॥
गायत्री जपावी ऐशी । प्रातःकाळी म्हणा मित्रस्य ऋषि । उदुत्यं मंत्र माध्याह्नेसी । इमं मे वरुण सायंकाळी ॥८६॥
शाखापरत्वे मंत्र असती । म्हणावे विधि जैसे असती । गोत्र प्रवर म्हणा भक्ती । वृद्धाचाराप्रमाणे ॥८७॥
चारी दिशा नमोनि । प्रदक्षिणा करावी सगुणी । गोत्र प्रवर उच्चारोनि । नमस्कार करा परियेसा ॥८८॥
ऐसी संध्या करून । मग करावे औपासन । सांगेन त्याचे विधान । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥८९॥
साय्म्प्रातवेला दोन्ही । औपासन करावे सगुणी । मिळोनि न करावे द्विजजनी । सर्वांनी पृथक् पृथक् हेचि जाणा ॥४९०॥
न करावे वेळणी आळंद्यात । भूमीवरी न करा नित्य । स्थंडिली करावे विहित । अथवा उदके सारवावे ॥९१॥
कुंडी स्थापोनि अग्नीसी । करावे नित्य उपासनेसी । वारा घालो नये त्यासी । हाते पर्णी आणि सुपे ॥९२॥
व्याधिष्ठ पर्णवाते होय । सुपे दरित्र धनक्षय । मुखे फुंकिलिया आयुष्य जाय । हस्तमूली होय मृत्यु ॥९३॥
फुंकणी अथवा विंझण्यासी । वायु घालावा अग्नीसी । काष्ठे समृद्धि परियेसी । ज्वलित असावा अग्नि देखा ॥९४॥
ज्वाला निघती जये स्थानी । आहुति घालावी तया वदनी । समिधा आणाव्या ब्राह्मणी । शूद्रहस्ते घेऊ नये ॥९५॥
समिधा पुष्पे दूर्वा देखा । आणो नये शूद्रे ऐका । होमद्रव्ये होती विशेखा । सांगेन नावे परियेसा ॥९६॥
साळी सावे नीवार । तंदुल असती मनोहर । गोधूम जव निर्धार । यावनाळ मुख्य असे ॥९७॥
साठी दाणे मिति प्रमाण । आहुति मुख्य कारण । अधिक न कीजे अथवा न्यून । घृतसंपर्क करावे ॥९८॥
घृत नसेल समयासी । तिल पवित्र होमासी । तिळांचे तैल परियेसी । तेही पवित्र असे देखा ॥९९॥
औपासन केलियावरी । ब्रह्मयज्ञ तर्पण करी । सांगेन विधि अवधारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥५००॥
मुख्य सकळ प्रातःकर्म सारोनि । ब्रह्मयज्ञ करावा माध्याह्नी । उपासनादि कर्मै करोनि । मग करावा ब्रह्मयज्ञ ॥१॥
उदकसन्निध मुख्य स्थानी । करावे तर्पण ब्राह्मणी । प्राणायाम तीन करोनि । विद्युदसि मंत्र जपावा ॥२॥
दूर्वा घेऊनि दक्षिण करी । पूर्वमुख अथवा उत्तरी । बसावे वाम पादावरी । दक्षिण पाद ठेवोनि ॥३॥
उभयहास्तसंपुटेसी । ठेवावे दक्षिण जानुवासी । म्हणावे तीन प्रणवांसी । मग म्हणावे ऋचाक्षर ॥४॥
ॐ भू० ऐसे म्हणोनि । त्रिपदा गायत्री उच्चारोनि । तत्स० म्हणोनि । मग जपावी दश वेळा ॥५॥
स्वाध्याय दिवसासी । म्हणा वेद शक्तीसी । अनध्याय होय तया दिवसी । एक ऋचा म्हणा पन्नासा ॥६॥
तोही नये एखाद्यासी । मंत्र म्हणावा विशेषी । नमो ब्रह्मणे मंत्रासी । तीन वेळा जपावा ॥७॥
वृष्टिरासि मंत्रासी । जपोनि स्पर्शावे उदकासी । तर्पण करावे परियेसी । ऐक ब्राह्मणा एकचित्ते ॥८॥
ब्रह्मयज्ञ करावयासी । द्रव्य दर्भ परियेसी । वसुरुद्रआदित्यांसी । तृप्त समस्त देव पितर ॥९॥
एखादे दिवसी न घडे जरी । अथवा होय समय रात्री । जप करावा गायत्री । वेदपठण फल असे ॥५१०॥
देवतर्पण कुशाग्रेसी । मध्यस्थाने तृप्त ऋषि । मुळे पितृवर्गासी । तर्पण करावे परियेसा ॥११॥
न करावे तर्पण पात्रात । करावे आपण उदकात । भूमीवरी घरी नित्य । निषिद्ध असे करू नये ॥१२॥
दर्भ ठेवोनि भूमीवरी । तर्पण करावे अवधारी । विधियुक्त भक्तिपुरःसरी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥
तीळ धरोनि आपुल्या करी । तर्पण करावे अवधारी । ठेवो नये शिळेवरी । भूमी काष्ठपात्री देखा ॥१४॥
रोमकूपादि स्थानी देखा । तीळ ठेविता पावती दुःखा । तीळ होती कृमि ऐका । निषिद्ध बोलली स्थाने पाच ॥१५॥
घरी तर्पण करावयासी । तीळ अग्राह्य परियेसी । करावे आपण उदकासी । ऐका समस्त ऋषिजन ॥१६॥
श्वेत तीळ देवांसी । धूम्रवर्ण ऋषिजनांसी । कृष्णवर्ण पितरांसी । तीळतर्पण करावे ॥१७॥
यज्ञोपवीती सव्ये देवांसी । निवीती करावी ऋषींसी । अपसव्य पितरांसी । तर्पण करावे येणे रीती ॥१८॥
देवासी अंजुलि एक । ऋषींसी अंजुलिद्वय सम्यक । पितरांसी अंजुलि त्रिक । तर्पण ऐसे करावे ॥१९॥
स्त्रियांसी अंजुलि एक देखा । व्यतिरिक्त बंधूसी एक । सपत्नी आचार्य नामिका । द्वयांजुलि करावे ॥५२०॥
देवब्रह्मऋषीश्वरांसी । अक्षता मुख्य तर्पणासी । कृष्णतिलतर्पण पितरांसी । अनंत पुण्ये परियेसा ॥२१॥
आदित्य शुक्रवारेसी । प्रतिपदा मघा नक्षत्रासी । षष्ठी नवमी एकादशीसी । तिलतर्पण करू नये ॥२२॥
अथवा विवाह उपनयनासी । जन्मनक्षत्र जन्मदिवसी । आपुल्या घरी शुभदिवसी । तिलतर्पण करू नये ॥२३॥
जधी न करी तिलतर्पण । उदके मुख्य करा जाण । मुद्रिका हस्ती सुवर्ण । दर्भपवित्रे करावे ॥२४॥
पाय न धुता मंगलस्नान । तिलावीण करिता तर्पण । श्राद्ध करी दक्षिणेविण । निष्फल असे अवधारी ॥२५॥
निषिद्ध बोलिले ज्या दिवसी । तर्पण करावे उदकेसी । दिपवाळी चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसा ॥२६॥
अंगारक कृष्ण चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसी । यमाचे नावे विधींसी । यज्ञोपवीत सव्याने ॥२७॥
एकेक तीळ घेऊनि । त्रिवार अंजुलि देऊनि । यमाचे नाव उच्चारोनि । तर्पण करावे भक्तीने ॥२८॥
यमाची नावे त्रयोदशी । सांगेन ऐका विस्तारेसी । यम धर्मराजा परियेसी । मृत्यु अंतक चौथा जाणा ॥२९॥
वैवस्वत काल देखा । सर्वभूतक्षय ऐका । आठवा औदुंबरनामिका । नीलाय परमेष्ठी दहा जाणा ॥५३०॥
वृकोदर चित्ररेखा । चित्रगुप्त त्रयोदशिका । प्रत्येक नामे म्हणोनि एकेका । नदीत द्यावे परियेसा ॥३१॥
समस्त पातके नासती । रोगराई न पीडिती । अपमृत्यु कधी न येती । ग्रहपीडा न बाधे ॥३२॥
शुक्लपक्षी माघमासी । तर्पण करावे अष्टमीसी । भीष्मनामे परियेसी । वर्षपातके परिहरती ॥३३॥
ऐसे तर्पण करोनि । सूर्यनामे अर्घ्यै तिन्ही । द्यावी समस्त द्विजजनी । म्हणे नृसिंहसरस्वती ॥३४॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । कृपामूर्ति स्वामी कर्मविधिसी । सांगता झाला ब्राह्मणासी । येणेपरी विहिताचार ॥३५॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । ऐसा ब्राह्मणांचा आचार । वर्तता होय मनोहर । सर्वाभीष्टे साधतील ॥३६॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । नामधारक शिष्य संवादत । वेदोपनिषदमतितार्थ । आचारनिरूपणाध्याय हा ॥५३७॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निकनिरूपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः ॥३६॥
ओवीसंख्या ॥५३७॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमशः
छान आहे.परंतु मराठी भाषातरा मध्ये व्याकरणाप्रमाणे अर्थ लागलेला नाही त्यामुळे वाचन करताना काही शद्ब समजत नाही.
ReplyDeleteआभारी आहे.
ReplyDelete