निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला, झोप का ग येत नाही
(निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला ग बाई )- 2 ॥ ध्रु ॥
(गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई )- 2
परसात वेलीवर, झोपली ग जाइ जुई
(मीट पाकळ्या डोळ्यांच्या )- 2, गाते तुला मी अंगाई ॥ १ ॥
आज माझ्या पाडसाला, झोप का ग येत नाही
The next two stanzas are related to the situations in movie. These doesnt come in the general lullaby singing.
The original song was written of seven stanzas in which mom sings for a new born baby girl till she goes with her prince after marriage.
That original song - may be some other time.
(देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी )- 2
तुझे दुख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
(जगावेगळी ही ममता ) - 2, जगावेगळी ही अंगाई ॥ २ ॥
आज माझ्या पाडसाला, झोप का ग येत नाही
रित्या पाळण्याची दोरी , उरे आज माझ्या हाती
स्वप्ना एक उधळून गेले , माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येत , गावू कशी मी अंगाई ॥ ३ ॥
आज माझ्या पाडसाला , झोप का ग येत नाही
Binaca Geet Mala - 1953 Finals!!!
10 years ago
No comments:
Post a Comment