Chapter 42 Guru asks Sayamdev to perform the Ananta-vrata and tells the story of it.
CHAPTER 42
Significance of Anant Vrat.
Shri Guru narrated the significance of Anant vrat to Sayamdeo. He said, `Dharmaraj, the son of Pandu, did this vrat. He regained his kingdom, which was lost in a game of chess with the Kouravas. Thereafter the Pandavas were living in the forest with great sufferings. Th Kouravas sent durvas Rishi to the Pandavas for harassing them even in the forest. Shrikrishna, protector of his devotees, assisted Pandavas in difficulties. Once Droupadi and the five Pandavas bowed to Shrikrishna and asked , `How shall we be relieved from this vanvas (living in forest)?'
Shrikrishna advised them to do the Anant vrat. shrikrishna said, `Anant should be worshipped on bhadrapad Shuddha 14. I will tell you a tale regarding this Vrat. In the Krit-yug there lived a Brahmin named Sumantu of the vashishta Gotra. Deeksha was his devoted wife. She begot a daughter named Sushila. Later Deeksha died and in order to continue the Grahastha rites he married with Karkasha, who used to quarrel with her husband and daughter every now and then. Due to this, Sumantu was always dejected.
As Sushila grew, she became fit for marriage. One day Koundinya came to Sumantu, who gave Sushila to him in marriage. In Ashadh and Shrawan months, Sushila and Koundinya lived with Sumantu, but Karkasha quarrelled with Sushila daily. So Koundinya requested Sumantu to allow him to go home. Sumantu felt very sorry, as his only daughter would be going away. He said, `This is not my wife but she is my enemy. Now my daughter will go away. Where there is no peace, the home is like a forest.
Koundinya consoled him. Due to his pursuation, he agreed to stay for 12 days more. On the 13th day Sumantu asked his wife to prepare delicious food for his daughter and son-in-law, as they were departing. Karkasha entered the inner room, shut the door and placed stones against the door so that it should not be opened easily. At least Sumantu gave wheat konda to Sushila and bade them goodbye.
Next morning they reached a river. Koundinya got down from the chariot and went to the river for bath and rituals. Sushila saw that many females wearing red silk saries, had gathered in the sand and they were worshipping some god. Sushila went to them, and inquired what they were doing. The females replied, `We are worshipping Anant. By doing this vrat, all the desires are fulfilled.' Sushila took instructions from them. She gave 14 knots to a red string and prepared Anant and shesh (cobra) of darbha and worshipped Anant with 16 upchars. She then tied the Anant on her wrist.
Once when they were sitting, Koundinya observed the red string on the wrist of Sushila. He asked angrily, 'Did you tie this red string to keep me under your thumb?' She said, `This is Anant, by whose favour we got this kingdom and prosperity.' Hearing this, Koundinya took the string by force and threw it into fire. He remakred, `It is due to my penance that this kingdom is botained by us.'
Sushila was very dejcted. She hastened to take out the Anant from fire and put it in milk. But due to this the Anant was enraged. The kingdom and all their glory was destroyed in no time and Koundinya became a pauper. Koundinya now repented and resolved that so long as he would not see Anant, he would neither drink or eat.
Having resolved, he started with Sushila and went into a forest. He saw a tree laden with fruits but no bird touched its friut. Koundinya asked the tree if it had seen Anant. the tree said, `I have not seen Anant, but if you see, please speak to him about me.' Further he saw a cow and a calf. They were trying to eat grass; but they could not do so. Then he saw a big bull. Further he saw two lakes. The goose and other birds did not drink the water. Later he came across an elephant and an ass who could not speak. Koundinya had asked all if they had seen Anant. They all denied, but said if he saw Anant, he should speak about him to each of them. At last Koundinya was tried of walking and he lay down on the ground.
In the meantime an old Brahmin came there and inquired about him. Knowing the cause of his worry he said, `I shall show you Anant. Come with me.' Koundinya followed him and saw a fine city. Brahmin seated Koundinya on the throne of precious stones and appeared before him in his real form. Seeing this, Koundinya was amazed and he bowed to Shri Anant and began to praise him. Shri Anant was pleased and gave him 3 boons. By the first he attained Dharma, by the second his poverty was destroyed and by the third he got abode in vaikuntha.
Koundinya referred to the tree, the cow with the calf, the bull, the two lakes, elephant, ass and the old Brahmin. Shri Anant said, `The tree, laden with fruits, was a Brahmin, who was proud of his learning and did not teach his students, hence he became a tree. The cow had given an unfertile land to a Brahmin in charity. The bull was a rich Brahmin who did not give in charity to anyone. The two lakes were two sisters who exchanged charity among themselves. The elephant is your anger and the ass is your vanity. The old brahmin you met was myself. Whomsoever you have seen, are all liberated.
After receiving the blessing of Shri Anant, Koundinya lived as a ruler for many years and in the end went to heaven.
Srikrishna told this to Yudhisthira, who then worshipped Anant with devotion. Shri Guru told this Sayamdeo and asked him to let his eldest son Nagnath to do Anant Puja. Sayamdeo did as advised, arranged grand samardhana and dined with Shri Guru. Sayamdeo then returned to his place, kept the family there and he alone returned to Shri Guru to serve him. In this way your forefathers attained the favour of Shri Guru.
Contd...
श्रीगणेशाय नमः ।
संकल्प करोनिया मनीं । जावें स्वर्गद्वाराभुवनीं । गंगाकेशव पूजोनि । हरिश्चंद्र मंडपा जावें ॥१॥
स्वर्गद्वार असे जाण । मणिकर्णिकातीर्थ विस्तीर्ण । तुवां तेथें जावोन । संकल्पावें विधीनें ॥२॥
हविष्यान्न पूर्व दिवशीं । करोनि असावें शुचीसी । प्रातःकाळीं गंगेसी । स्नान आपण करावें ॥३॥
धुंडिराजातें प्रार्थोनि । मागावें करुणावचनीं । पुनर्दर्शन दे म्हणोनि । विनवावें परियेसा ॥४॥
मग गंगेतें नमोनि । जावें विश्वनाथभुवनीं । मग तयाते पूजोनि । भवानीशंकर पूजावा ॥५॥
मग जावें मुक्तिमंडपासीं । नमोनि निघावें संतोषीं । धुंडिराजाचे पूजेसी । पुनरपि जावें परियेसा ॥६॥
मागुती यावें महाद्वारा । विश्वेश्वर-पूजा करा । मोदादि पंच विघ्नेश्वरा । नमन करावें दंडपाणीसी ॥७॥
पूजा आनंदभैरवासी । मागुतीं यावें मणिकर्णिकेसी । पूजोनिया ईश्वरासी । सिद्धिविनायक पूजावा ॥८॥
गंगाकेशव पूजोनि । ललितादेवीसी नमोनि । राजसिद्धेश्वर आणा ध्यानीं । दुर्लभेश्वर पूजावा ॥९॥
सोमनाथ पूजा करीं । पुढें शूलटंकेश्वरी । मग पूजा वाराहेश्वरी । द्शाश्वमेध पूजा मग ॥१०॥
बंदी देवीतें पूजोनि । सर्वेश्वरातें नमोनि । केदारेश्वर धरा ध्यानीं । हनुमंतेश्वर पूजावा ॥११॥
मग पूजावा संगमेश्वरी । लोलार्कातें अवधारीं । अर्कविनायका पूजा करीं । दुर्गाकुंडीं स्नान मग ॥१२॥
आर्यादुर्गां देवी पूजोनि । दुर्गा गणेश ध्याऊनि । पुनर्दर्शन दे म्हणोनि । प्रार्थावें तयासी ॥१३॥
विश्वकूपेंत ईश्वरासी । कर्दमतीर्थी स्नान हर्षी । कर्दमेश्वरपूजेसी । तुवां जावें बाळका ॥१४॥
जावें कर्दमकूपासी । पूजा मग सोमनाथासी । मग विरुपालिंगासी । पूजा करीं ब्रह्मचारी ॥१५॥
पुढें जावें नीलकंठासी । पूजा करीं गा भावेंसी । कर जोडोनि भक्तींसी । कर्दमेश्वर पूजावा ॥१६॥
पुनर्दर्शन आम्हांसी । दे म्हणावें भक्तींसी । मग निघावें वेगेंसी । नागनाथाचे पूजेतें ॥१७॥
पुढें पूजीं चामुंडेसी । मोक्षेश्वरा परियेसीं । वरुणेश्वर भक्तींसी । पूजा करीं गा बाळका ॥१८॥
वीरभद्रपूजेसी । जावोनि द्वितीय दुर्गेसी । अर्चावें विकटाक्षा देवीसी । पूजा करीं मनोभावें ॥१९॥
पूजीं भैरव उन्मत्त । विमळार्जुन प्रख्यात । काळकूटदेवाप्रत । पूजा करीं गा बाळका ॥२०॥
पूजा करीं महादेवासी । नंदिकेश्वर भैरवासी । भृंगेश्वर विशेषीं । पूजा करीं मनोहर ॥२१॥
गणप्रियासी पूजोनि । विरुपाक्षातें नमोनि । यक्षेश्वर अर्चोनि । विमलेश्वर पूजीं मग ॥२२॥
भीमचंडीं शक्तीसी । पूजीं चंडीविनायकासी । रविरक्ताक्ष गंधर्वासी । पूजा करीं मनोभावें ॥२३॥
ज्ञानेश्वर असे थोर । पूजा पुढें अमृतेश्वर । गंधर्वसागर मनोहर । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४॥
नरकार्णव तरावयासी । पूजीं भीमचंडीसी । विनवावें तुम्हीं त्यासी । पुनर्दर्शन दे म्हणावें ॥२५॥
एकपादविनायकासी । पुढें पूजीं भैरवासी । संगमेश्वरा भरंवसीं । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥२६॥
भूतनाथ सोमनाथ । कालनाथ असे विख्यात । पूजा करीं गा त्वरित । कपर्दिकेश्वरलिंगाची ॥२७॥
नागेश्वर कामेश्वर । पुढें पूजीं गणेश्वर । पूजा करीं विश्वेश्वर । चतुर्मुख विनायका ॥२८॥
पूजीं देहलीविनायकासी । पूजीं गणेश षोडशीं । उदंडगणेश षोडशीं । पूजा करीं मनोहर ॥२९॥
उत्कलेश्वर महाथोर । असे लिंग मनोहर । पुढें एकादश रुद्र । तयांचें पूजन करावें ॥३०॥
जावें तपोभूमीसी । पूजा करीं गा भक्तींसी । रामेश्वर महाहर्षीं । पूजीं मग सोमनाथ ॥३१॥
भरतेश्वर असे थोर । लक्ष्मणेश्वर मनोहर । पूजीं मग शत्रुघ्नेश्वर । भूमिदेवी अर्चीं मग ॥३२॥
नकुळेश्वर पूजोन । करीं रामेश्वरध्यान । पुनर्दर्शन दे म्हणोन । विनवावें परियेसा ॥३३॥
असंख्यात तीर्थ वरुण । तेथें करा तुम्हीं नमन । असंख्यात लिंगें जाण । पूजा करावी भक्तींसी ॥३४॥
पुढें असे लिंग थोर । नामें देव सिद्धेश्वर । पूजा करीं गा मनोहर । पशुपाणि विनायक ॥३५॥
याची पूजा करोनि । पृथ्वीश्वरातें नमोनि । शरयूकूपीं स्नान करोनि । कपिलधारा स्नान करीं ॥३६॥
वृषभध्वजा पूजोनि । ज्वालानृसिंहाचे वंदी चरणीं । वरुणासंगमीं स्नान करोनि । श्राद्धादि कर्मे करावीं ॥३७॥
संगमेश्वर पूजावा । सर्वविनायक बरवा । पुढें पूजीं तूं केशवा । भावें करुनि ब्रह्मचारी ॥३८॥
पूजा प्रर्हादेश्वरासी । स्नान कपिलातीर्थासी । त्रिलोचनेश्वरासी । पूजा करीं गा भक्तीनें ॥३९॥
पुढें असे महादेव । पंचगंगातीर ठाव । पूजा करीं गा भक्तिभावें । तया बिंदुमाधवासी ॥४०॥
पूजीं मंगळागौरीसी । गभस्तेश्वरा परियेसीं । वसिष्ठ वामदेवासी । पर्वतेश्वर पूजावा ॥४१॥
महेश्वराचे पूजेसी । पुढें सिद्धिविनायकासी । पूजा सप्तवर्णेश्वरासी । सर्वगणेश पूजावा ॥४२॥
मग जावें मणिकर्णिके । स्नान करावें विवेकें । विश्वेश्वरातें स्मरोनि निकें । महादेव पूजावा ॥४३॥
मग जावें मुक्तिमंडपासी । नमन करावे विष्णूसी । पूजीं दंडपाणीसी । धुंडिराज अर्चावा ॥४४॥
आनंदभैरव पूजोनि । आदित्येशा नमोनि । पूजा करीं गा भक्तींसी । मोदादि पंचविनायका ॥४५॥
पूजा करीं गा विश्वेश्वरासी । मोक्षलक्ष्मीविलासासी । नमोनि देवा संमुखेसी । मंत्र म्हणावा येणेंपरी ॥४६॥
श्लोक ॥ जय विश्वेश विश्वात्मन् काशीनाथ जगत्पते । त्वत्प्रसादान्महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा ॥४७॥
अनेकजन्मपापानि कृतानि मम शंकर । गतानि पंचक्रोशात्मा कृता लिंगप्रदक्षिणा ॥४८॥
ऐसा मंत्र जपोन । पुढें करावें शिवध्यान । मुक्तिमंडपा येवोन । आठां ठायीं वंदावें ॥४९॥
प्रथम मुक्तिमंडपासी । नमन करावें परियेसीं । वंदोनि स्वर्गमंडपासी । जावें ऐश्वर्यमंडपा ॥५०॥
ज्ञानमंडपा नमोनि । मोक्षलक्ष्मीविलासस्थानीं । मुक्तिमंडपा वंदोनि । आनंदमंडपा जावें तुवा ॥५१॥
पुढें वैराग्यमंडपासी । तुवां जावें भक्तींसी । येणेंपरी यात्रेसी । करीं गा बाळा ब्रह्मचारी ॥५२॥
आणिक एक प्रकार । सांगेन ऐक विचार । नित्ययात्रा मनोहर । ऐक बाळका गुरुदासा ॥५३॥
सचैल शुचि होवोनि । चक्रपुष्करणीं स्नान करोनि । देवपितर तर्पोनि । ब्राह्मणपूजा करावी ॥५४॥मग निघावें तेथोनि । पदादित्येश्वर पूजोनि । दंपत्येश्वर नमोनि । श्रीविष्णूतें पूजावें ॥५५॥
मग नमावा दंडपाणि । महेश्वरातें पूजोनि । मग निघावें तेथोनि । धुंडिराज अर्चिजे ॥५६॥
ज्ञानवापीं करी स्नान । नंदिकेश्वर अर्चोन । तारकेश्वर पूजोन । पुढें जावें मग तुवां ॥५७॥
महाकाळेश्वर देखा । पूजा करीं भावें एका । दंडपाणि विनायका । पूजा करीं मनोहर ॥५८॥
मग यात्रा विश्वेश्वर । करीं गा बाळका मनोहर । लिंग असे ओंकारेश्वर । प्रतिपदेसी पूजावा ॥५९॥
मत्स्योदरी तीर्थासी । स्नान करावें प्रतिपदेसी । त्रिलोचन महादेवासी । दोन्ही लिंगे असतीं जाण ॥६०॥
तेथें बीजतिजेसी । जावें तुवां यात्रेसी । यात्रा जाण चतुर्थीसी । कांचीवास लिंग जाणा ॥६१॥
रत्नेश्वर पंचमीसी । चंद्रेश्वरपूजेसी । षष्ठीसी जावें परियेसीं । ऐक शिष्या एकचित्तें ॥६२॥
सप्तमीसी केदारेश्वर । अष्टमीसी लिंग धूमेश्वर । विश्वेश्वर लिंग थोर । नवमी यात्रा महापुण्य ॥६३॥
कामेश्वर दशमीसी । एकादशीसी विश्वेश्वरासी । द्वादशीसी मणिकर्णिकेसी । मणिकेश्वर पूजावा ॥६४॥
त्रयोदशी प्रदोषेसी । पूजा अविमुक्तेश्वरासी । चतुर्दशीसी विशेषीं । विश्वेश्वर पूजावा ॥६५॥
जे कोणी काशीवासी । असती नर परियेसीं । त्यांणीं करावी यात्रा ऐसी । नाहीं तरी विघ्न घडे ॥६६॥
शुक्लपक्षीं येणेंपरी । यात्रा करीं मनोहरी । कृष्णपक्ष आलियावरी । यात्रा करा सांगेन ॥६७॥
चतुर्दशी धरोनि । यात्रा करा प्रतिदिनीं । सांगेन ऐका विधानीं । एकचित्तें परियेसा ॥६८॥
वरुणानदीं करा स्नान । करा शैल्येश्वरदर्शन । संगमेश्वर पूजोन । संगमीं स्नान तये दिनीं ॥६९॥
स्वर्गतीर्थस्नानेंसी । स्वर्गेश्वर पूजा हर्षी । मंदाकिनी येरे दिवसीं । मध्यमेश्वर पूजावा ॥७०॥
मणिकर्णिका स्नानेंसी । पूजा ईशानेश्वरासी । हिरण्यगर्भ परियेसीं । दोनी लिंगें पूजिजे ॥७१॥
स्नान धर्मकूपेसी । करीं पूजा गोपद्मेश्वरासी । पूजा करा तया दिवसीं । एकचित्तें परियेसा ॥७२॥
कपिलधारा तीर्थासी । स्नान करा भक्तींसी । वृषभध्वज लिंगासी । सप्तमीचे दिवसीं पूजीं पै ॥७३॥
उपाशांतिकूपेसी । स्नान करा भक्तींसी । उपशांतेश्वरासी । पूजा करीं तया दिनीं ॥७४॥
पंचचूडडोहांत । स्नान करा शिव ध्यात । ज्येष्ठेश्वरा त्वरित । पूजावें तया दिनीं ॥७५॥
चतुःसमुद्रकूपासी । स्नान करीं भावेंसी । समुद्रेश्वर हर्षी । पूजा करीं तया दिनीं ॥७६॥
देवापुढें कूप असे । स्नान करावें संतोषें । शुक्रेश्वर पूजा हर्षें । पूजा करीं तया दिनीं ॥७७॥
दंडखात तीर्थेंसी । स्नान करोनि देवासी । व्याघ्रेश्वरपूजेसी । तुंवा जावें तया दिनीं ॥७८॥
शौनकेश्वरतीर्थेसी । स्नान तुम्ही करा हर्षीं । तीर्थनामें लिंगासी । पूजा करा मनोहर ॥७९॥
जंबुतीर्थ मनोहर । स्नान करा शुभाचार । पूजावा भावें जंबुकेश्वर । चतुर्दश लिंगें येणेंपरी ॥८०॥
शुक्लपक्षकृष्णेसी । अष्टमी तिथि विशेषीं । पूजावें तुम्हीं लिंगासी । सांगेन ऐका महापुण्य ॥८१॥
मोक्षेश्वर पर्वतेश्वर । तिसरा पशुपतेश्वर । गंगेश्वर नर्मदेश्वर । पूजा करीं मनोभावें ॥८२॥
आणिक भक्तेश्वर गभस्तीश्वर । मध्यमेश्वर असे थोर । तारकेश्वरनामें निर्धार । नव लिंगें पूजावीं ॥८३॥
आणिक लिंगें एकादश । नित्ययात्रा विशेष । लिंग असे अग्निध्रुवेश । यात्रा तुम्हीं करावी ॥८४॥
दुसरा असे उर्वशीश्वर । नकुलेश्वर मनोहर । चौथा असे आषाढेश्वर । भारभूतेश्वर पंचम ॥८५॥
लांगूलेश्वरीं करा पूजा । करा त्रिपुरांतका ओजा । मनःप्रकामेश्वरकाजा । तुम्हीं जावें परियेसा ॥८६॥
प्रीतेश्वर असे देखा । मंदालिकेश्वर ऐका । तिलपर्णेश्वर निका । पूजा करीं भावेंसी ॥८७॥
आतां शक्तियात्रेसी । सांगेन ऐका विधीसी । शुक्लपक्षतृतीयेसी । आठ यात्रा कराव्या ॥८८॥
गोप्रेक्षतीर्थ देखा । स्नान करोनि ऐका । पूजा मुख्य भाळनेत्रिका । भक्तिभावेंकरोनिया ॥८९॥
ज्येष्ठवापीं स्नानेंसी । ज्येष्ठागौरी पूजा हर्षीं । स्नान पान करा वापीसी । शृंगार सौभाग्य गौरीपूजा ॥९०॥
विशाळगंगास्नानासी । पूजा विशाळगौरीसी । ललितातीर्थस्नानेसी । ललिता देवी पूजावी ॥९१॥
स्नान भवानीतीर्थेसी । पूजा करा भवानीसी । बिंदुतीर्थ स्नानासी । मंगळागौरी पूजावी ॥९२॥
पूजा इतुके शक्तींसी । मग पूजिजे लक्ष्मीसी । येणें विधी भक्तींसी । यात्रा करीं मनोहर ॥९३॥
यात्रातीर्थ चतुर्थीसी । पूजा सर्व गणेशासी । मोदक द्यावे गौरीपुत्रासी । विघ्न न करीं तीर्थवासियांतें ॥९४॥
मंगळ अथवा रविवारेंसी । यात्रा करीं भैरवासी । षष्ठी तिथि परियेसीं । जावें तुम्हीं मनोहर ॥९५॥
रविवारीं सप्तमीसी । यात्रा रविदेवासी । नवमी अष्टमी चंडीसी । यात्रा तुम्हीं करावी ॥९६॥
अंतर्गृहयात्रेसी । करावी तुम्हीं प्रतिदिवसीं । विस्तारकाशीखंडासी । ऐक शिष्या ब्रह्मचारी ॥९७॥
ऐशी काशीविश्वेश्वर । यात्रा करावी तुम्हीं परिकर । आपुल्या नामीं सोमेश्वर । लिंगप्रतिष्ठा करावी ॥९८॥
इतुकें ब्रह्मचारियासी । यात्रा सांगितली परियेसीं । आचरण करीं येणें विधींसी । तुझी वासना पुरेल ॥९९॥
तुझे चित्तीं असे गुरु । प्रसन्न होईल शंकरु । मनीं धरीं गा निर्धारु । गुरुस्मरण करीं निरंतर ॥१००॥
इतकें सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसीं । ब्रह्मचारी म्हणे हर्षीं । हाचि माझा गुरु सत्य ॥१॥
अथवा होईल ईश्वर । मज कृपाळू झाला सत्वर । कार्यं लाधेल निर्धार । म्हणोनि मनीं धरियेलें ॥२॥
न आराधितां आपोआप । भेटला मातें मायबाप । गुरुभक्तीनें अमूप । सकाळाभीष्टें पाविजे ॥३॥
समस्त देवा ऐशी गति । दिल्यावांचोन न देती । ईश्वर भोळा चक्रवर्ती । गुरुप्रसादें भेटला ॥४॥
यज्ञ दान तप सायास । कांहीं न करितां सायास । भेटला मज विशेष । गुरुकृपेंकरोनिया ॥५॥
ऐसें गुरुस्मरण करीत । ब्रह्मचारी जाय त्वरित । विधिपूर्वक आचरत । यात्रा केली भक्तीनें ॥६॥
यात्रा करितां भक्तींसी । प्रसन्न झाला व्योमकेशी । निजस्वरुपें संमुखेसी । उभा राहिला शंकर ॥७॥
प्रसन्न होवोनि शंकर । म्हणे दिधला माग वर । संतोषोनि त्वष्ट्रकुमार । निवेदिता झाला वृत्तान्त ॥८॥
जें जें मागितलें गुरुवर्यें । आणिक त्याचे कन्याकुमारें । सांगता झाला विस्तारें । शंकराजवळी देखा ॥९॥
संतोषोनि ईश्वर । देता झाला अखिल वर । म्हणे बाळा माझा कुमार । सकळ विद्याकुशल होसी ॥११०॥
तुवां केली गुरुभक्ति । तेणें झाली आपणा तृप्ति । अखिल विद्या तुज होती । विश्वकर्मा तूंचि होसी ॥११॥
चतुर्विध पुरुषार्थ । लाधला तुज परमार्थ । सृष्टि रचावया समर्थ । होसी जाण त्वष्ट्रपुत्रा ॥१२॥
ऐसा वर लाधोन । त्वष्टा ब्रह्मानंदन । केलें लिंग स्थापन । आपुले नामीं परियेसा ॥१३॥
मग निघाला तेथोनि । केली आयती तत्क्षणीं । प्रसन्न होतां शूलपाणि । काय नोहे तयासी ॥१४॥
जें जें मागितलें श्रीगुरुवरें । सकळ वस्तु केल्या चतुरें । घेऊनिया सत्वरें । आला श्रीगुरुसंमुख ॥१५॥
सकळ वस्तु देऊनि । लागतसे श्रीगुरुचरणीं । अनुक्रमें गुरुरमणि । पुत्र-कन्येंसी वंदिलें ॥१६॥
उल्हास झाला श्रीगुरुसी । आलिंगितसे महाहर्षीं । शिष्य ताता ज्ञानराशि । तुष्टलों तुझे भक्तीनें ॥१७॥
सकल विद्याकुशल होसी । अष्टैश्वर्ये नांदसी । त्रैमूर्ति तुझिया वंशीं । होतील ऐक शिष्योत्तमा ॥१८॥
घर केलें तुवां आम्हांसी । आणिक वस्तु विचित्रेंसी । चिरंजीव तूंचि होसी । आचंद्रार्क तुझें नाम ॥१९॥
स्वर्गमृत्युपाताळासी । पसरवीं तुझे चातुर्यासी । रचिसी तूंचि सृष्टीसी । विद्या चौसष्टी तूंचि ज्ञाता ॥१२०॥
तुज वश्य अष्ट सिद्धि । होतील जाण नव निधि । चिंता कष्ट न होती कधीं । म्हणोनि वर देतसे ॥२१॥
ऐसा वर लाधोनि । गेला शिष्य महाज्ञानी । येणेंपरी विस्तारोनि । सांगे ईश्वर पार्वतीसी ॥२२॥
ईश्वर म्हणे गिरिजेसी । गुरुभक्ति आहे ऐसी । एकभाव असे ज्यासी । सकळाभीष्टें पावती ॥२३॥
भव म्हणिजे सागर । उतरावया पैल पार । समर्थ असे एक गुरुवर । त्रैमूर्तीचा अवतार ॥२४॥
या कारणें त्रैमूर्ति । गुरुचरणीं भजती । वेदशास्त्रें बोलती । गुरुविणें सिद्धि नाहीं ॥२५॥
श्लोक ॥ यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ । तस्यैते कथिता ह्यर्था : प्रकाशन्ते महात्मनः ॥२६॥
ऐसें ईश्वर पार्वतीसी । सांगता झाला विस्तारेंसी । म्हणोनि श्रीगुरु प्रीतीसी । निरोपिलें द्विजातें ॥२७॥
इतुकें होतां रजनीसी । उदय झाला दिनकरासी । चिंता अंधकारासी । गुरुकृपा ज्योती जाणा ॥२८॥
संतोषोनि द्विजवर । करिता झाला नमस्कार । ऐसी बुद्धि देणार । तूंचि स्वामी कृपानिधि ॥२९॥
नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे भावेंसी । स्वामी कथा निरोपिलीसी । अपूर्व मातें वाटलें ॥१३०॥
काशीयात्राविधान । निरोपिलें मज विस्तारोन । तया वेळीं होतों आपण । तुम्हांसहित तेथेंचि ॥३१॥
पाहिलें आपण दृष्टान्तीं । स्वामी काशीपुरीं असती । जागृतीं कीं सुषुप्तीं । नकळे मातें स्वामिया ॥३२॥
म्हणोनि विप्र तये वेळीं । वंदी श्रीगुरुचरणकमळीं । विनवीतसे करुणा बहाळी । भक्तिभावेंकरोनिया ॥३३॥
जय जया परमपुरुषा । परात्परा परमहंसा । भक्तजनमानसहंसा । श्रीनृसिंहसरस्वती ॥३४॥
ऐसें तया अवसरीं । पूर्वज तुझा स्तोत्र करी । सांगेन तुज अवधारीं । एकचित्तें करुनिया ॥३५॥
श्लोक ॥ आदौ ब्रह्मत्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं । पश्चात् क्षोणिजडा विनाश-दितिजां कृत्वाऽवतारं प्रभो । हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं, भूत्वाऽत्मजोऽत्रेर्गृहे । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥३६॥
भूदेवाखिलमानुषं विदुजना बाधायमानं कलिं । वेदादुश्यमनेकवर्णमनुजा, भेदादि-भूतोन्नतम् । छेदः कर्मतमांधकारहरणं श्रीपादसूर्योदयं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥३७॥
धातस्त्वं हरिशंकरप्रतिगुरो, जाताग्रजन्मं विभो । हेतुः सर्वविदोजनाय तरणं, ज्योतिःस्वरुपं जगत् । चातुर्थाश्रमस्थापितं क्षितितले, पातुः सदा सेव्ययं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम् ॥३८॥
चरितं चित्रमनेककीर्तिमतुलं, परिभूतभूमंडले । मूकं वाक्यदिवांधकस्य नयनं, वंध्यां च पुत्रं ददौ । सौभाग्यं विधवां च दायकश्रियं, दत्त्वा च भक्तं जनं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम् ॥३९॥
दुरितं, घोरदरिद्रदावतिमिरं, हरणं जगज्जोतिष । स्वर्धेंनुं सुरपादपूजितजना, करुणाब्धिभक्तार्तितः । नरसिंहेंद्रसरस्वतीश्वर विभो, शरणागतं रक्षकं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥१४०॥
गुरुमूर्तिश्चरणारविंदयुगलं, स्मरणं कृतं नित्यसौ । चरितं क्षेत्रमनेकतीर्थसफलं सरितादि-भागीरथी । तुरगामेधसहस्त्रगोविदुजनाः स्मयक् ददंस्तत्फलं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम् ॥४१॥
नो शक्यं तव नाममंगल-स्तुवं, वेदागमागोचरं । पादद्वं ह्रदयाब्जमंतरजलं निर्धारमीमांसतं । भूयो भूयः स्मरन्नमामि मनसा, श्रीमद्गुरुं पाहि मां । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥४२॥
भक्तानां तरणार्थ सर्वजगतां, दीक्षां ददन्योगिनां । सुक्षेत्रं पुरगाणगस्थित प्रभो, दत्त्वा चतुष्कामदं । स्तुत्वा भक्तसरस्वतीगुरुपदं, जित्वाऽद्यदोषादिकं । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥४३॥
एवं श्रीगुरुनाथमष्टकमिदं स्तोत्रं पठेन्नित्यसौ । तेजोवर्चबलोन्नतं श्रियकरं आनंदवर्धं वपुः । पुत्रापत्यमनेकसंपदशुभा दीर्घायुरारोग्यतां । वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥४४॥
येणेंपरी स्तोत्र करीत । मागुती करी दंडवत । सद्गदित कंठ होत । रोमांच अंगीं उठियेले ॥४५॥
म्हणे त्रैमूर्ति अवतारु । तूंचि देवा जगद्गुरु । आम्हां दिसतोसी नरु । कृपानिधि स्वामिया ॥४६॥
मज दाविला परमार्थ । लाधलों चारी पुरुषार्थ । तूंचि सत्य विश्वनाथ । काशीपुर तुजपाशीं ॥४७॥
ऐसेंपरी श्रीगुरुसी । विनवीतसे परियेसीं । संतोषोनि महाहर्षीं । निरोप देती तये वेळीं ॥४८॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । दाखविली तुज काशी । पुढें तुझ्या वंशीं एकविसांसी । यात्राफळ तयां असे ॥४९॥
तूंचि आमुचा निजभक्त । दाखविला तुज दृष्टान्त । आम्हांपासीं सेवा करीत । राहें भक्ता म्हणती तया ॥१५०॥
जरी राहसी आम्हांपासी । तरी त्वां न वंदिजे म्लेंच्छासी । आणोनिया स्त्रीपुत्रांसी । भेटी करीं आम्हांतें ॥५१॥
निरोप देऊनि द्विजासी । गेले गुरु मठासी । आनंद झाला मनासी । श्रीगुरुदर्शनीं भक्तजना ॥५२॥
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणां । विनवीतसे कर जोडोनि जाणा । भक्तिभावेंकरोनिया ॥५३॥
मागें कथानक निरोपिलें । सायंदेव शिष्य श्रीगुरुंनीं त्यातें निरोपिलें । कलत्रपुत्र आणीं म्हणत ॥५४॥
पुढें तया काय झालें । विस्तारोनि सांगा वहिलें । पाहिजे आतां अनुग्रहिलें । म्हणोनि चरणीं लागला ॥५५॥
संतोषोनि सिद्ध मुनि । सांगतसे विस्तारोनि । सायंदेव महाज्ञानी । गेला श्रीगुरुनिरोपें ॥५६॥
जाऊनि आपुले स्त्रियेसी । सांगता झाला पुत्रासी । आमुचा गुरु परियेसीं । असे गाणगापुरांत ॥५७॥
आम्हीं जावें भेटीसी । समस्त कन्यापुत्रांसी । म्हणोनि निघाला वेगेंसी । महानंदेंकरोनिया ॥५८॥
पावला गाणगापुरासी । भेटी जहाली श्रीगुरुसी । नमन करी भक्तींसी । साष्टांगीं तये वेळीं ॥५९॥
कर जोडुनी तये वेळीं । स्तोत्र करी वेळोवेळीं । ओंनमोजी चंद्रमौळि । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥१६०॥
तूं त्रैमूर्तिचा अवतार । अज्ञानदृष्टीं दिससी नर । वर्णावया न दिसे पार । तुझा महिमा स्वामिया ॥६१॥
तुझा महिमा वर्णावयासी । शक्ति कैची आम्हांसी । आदिपुरुष भेटलासी । कृपानिधि स्वामिया ॥६२॥
जैसा चंद्र चकोरासी । उदय होतां संतोष त्यासी । तैसा आनंद आम्हांसी । तुझे चरण लक्षितां ॥६३॥
पूर्वजन्मीं पापराशि । केल्या होत्या बहुवशी । श्रीगुरुचे दर्शनेसी । पुनीत झालों म्हणतसे ॥६४॥
जैसा चिंतामणि स्पर्शीं । हेमत्व होय लोहासी । मृत्तिका पडतां जंबूनदीसी । उत्तम सुवर्ण होतसे ॥६५॥
जातां मानससरोवरासी । हंसत्व येई वायसासी । तैसें तुझे दर्शनेंसी । पुनीत झालों स्वामिया ॥६६॥
श्लोक ॥ गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तस्था । पापं तापं च हरति दैन्यं च गुरुदर्शनम् ॥१॥
टीका ॥ गंगा स्नानानें पापें नाशी । ताप निवारी देखा शशी । कल्पवृक्षछायेसी । कल्पिलें फळ पाविजे ॥६७॥
एकेकाचे एकेक गुणें । असतीं ऐसीं हीं लक्षणें । दर्शन होतां श्रीगुरुचरणें । तिन्ही फळें पाविजे ॥६८॥
पापें हरती तात्काळीं । तापचिंता जातीं सकळी । दैन्यकानन समूळ जाळी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥६९॥
चतुर्विध पुरुषार्थ । देता होय गुरुनाथ । ऐसा वोले वेदसिद्धान्त । तोचि आम्हीं देखिला ॥१७०॥
म्हणोनिया आनंदेंसी । गायन करी संतोषीं । अनेक रागें परियेसीं । कर्नाटक भाषें करोनि ॥७१॥
राग श्रीराग । कंडेनिंदु भक्तजनराभाग्यनिधियभूमंडलदोळगेनारसिंहसरस्वतीया ॥७२॥
कंडेनिंदुउंडेनिंदुवारिजादोळपादवाराजाकमळांदोळदंतध्यानिसी ॥७३॥
सुखसुवाजनारुगळा । भोरगेलान्नेकामिफळफळा । नित्यसकळाहूवा । धीनारसिंहसरस्वतीवरानना ॥७४॥
वाक्यकरुणानेनसुवा । जगदोळगदंडकमंडलुधराशी । सगुणानेनीशीसुजनरिगे । वगादुनीवासश्रीगुरुयतिवरान्न ॥७५॥
धारगेगाणगापुरडोलकेलाशीहरी । दासिसोनुनादयाकरुणादली । वरावीतुंगमुनाहोरावनुअनुबिना ।
नारसिंहसरस्वतीगुरुचरणवन्न ॥७६॥
राजगखंडीकंडीनेननमा । इंदुकडेनेनमा । मंडलादोळगेयती कुलराये । चंद्रमन्ना ॥७७॥
तत्त्वबोधायाउपनिषदतत्त्वचरित नाव्यक्तवादपरब्रह्ममूर्तियनायना । शेषशयनापरवेशकायना । लेशकृपयनीवनेवभवासौपालकाना ॥७८॥
गंधपरिमळादिशोभितानंदासरसाछंदालयोगेंद्रेगोपीवृंदवल्लभना ॥७९॥
करीयनीयानांपापगुरु । नवरसगुसायन्नीं । नरसिंहसरस्वत्यन्ना । नादपुरुषवादना ॥१८०॥
यापरी स्तोत्रें श्रीगुरुसी । स्तुति केली बहुवसीं । संतोषोनि महाहर्षीं । आश्वासिताती तये वेळीं ॥८१॥
प्रेमभावें समस्तांसी । बैसा म्हणती समीपेसी । जैसा लोभ मायेसी । या बाळकावरी परियेसा ॥८२॥
आज्ञा घेउनी सहज । गेला तुमचा पूर्वज । सकळ पुत्रांसहित द्विज । आला श्रीगुरुदर्शना ॥८३॥
भाद्रपद चतुर्दशीसी । शुक्लपक्ष परियेसीं । आला शिष्य भेटीसी । एकाभावेंकरोनिया ॥८४॥
येती शिष्य लोटांगणीं । एकाभावें तनुमनीं । येऊनि लागती चरणीं । सद्गदित कंठ झाला ॥८५॥
स्तोत्र करिती तिहीं काळीं । कर जोडोनि तये वेळीं । ओं नमोजी चंद्रमौळि । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥८६॥
त्रैमूर्तींचा अवतारु । झालासी तूं जगद्गुरु । येरां दिसतोसी नरु । न कळे पार तुझा स्वामिया ॥८७॥
सिद्ध म्हणे नामकरणी । काय सांगू तये दिनीं । कैशी कृपा अंतःकरणीं । तया श्रीगुरु यतीचे ॥८८॥
आपुले पुत्रकलत्रेंसी । जैसा लोभ परियेसीं । तैसा तुमचे पूर्वजासी । प्रेमभावें पुसताती ॥८९॥
गृहवार्ता सुरसी । क्षेम पुत्रकलत्रेंसी । द्विज सांगे मनोहर्षी । सविस्तारीं परियेसा ॥१९०॥
पुत्रकलत्रेंसंहित नमोन । सांगे क्षेम समाधान । होते पुत्र चौघेजण । चरणावरी घातले ॥९१॥
ज्येष्ठसुत नागनाथ । तयावरी कृपा बहुत । कृपानिधि गुरुनाथ । माथां हस्त ठेविती ॥९२॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । तुझ्या ज्येष्ठसुतासी । आयुष्य पूर्ण असे त्यासी । संतति बहु याची वाढेल ॥९३॥
हाच भक्त आम्हांसी । असेल श्रियायुक्तेसी । तुवां आतां म्लेंच्छासी । सेवा न करावी म्हणितलें ॥९४॥
आणिक तूंतें असे नारी । पुत्र होती तीस चारी । नांदतील श्रेयस्करी । तुवां सुखें असावें ॥९५॥
जया दिवसीं म्लेंच्छासी । तुवां जावोनि वंदिसी । हानि असे जीवासी । म्हणोनि सांगती तये वेळीं ॥९६॥
तुझा असे वडिल सुत । तोचि आमुचा निज भक्त । त्याची कीर्ति वाढेल बहुत । म्हणती श्रीगुरु तये वेळीं ॥९७॥
मग म्हणती द्विजासी । जावें त्वरित संगमासी । स्नान करोनि त्वरितेंसी । यावें म्हणती तये वेळीं ॥९८॥
ग्रामलोक तया दिवसीं । पूजा करितां अनंतासी । येऊनिया श्रीगुरुसी । पूजा करितो परियेसा ॥९९॥
पुत्रमित्रकलत्रेंसी । गेले स्नाना संगमासी । विधिपूर्वक अश्वत्थासी । पूजूनि आले मठातें ॥२००॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । आजि व्रतचतुर्दशी । पूजा करीं अनंतासी । समस्त द्विज मिळोनि ॥१॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु । आमुचा अनंत तूंचि गुरु । व्रतसेवा तुमचे चरण ॥२॥
तये वेळीं श्रीगुरु । सांगतां झाला विस्तारु । कौंडिण्यमहाऋषीश्वरु । केलें व्रत प्रख्यात ॥३॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु । कैसें व्रत आचरावें साचारु । पूर्वीं कोणी केलें असे ॥४॥
ऐसें व्रत प्रख्यात । व्रत दैवत अनंत । जेणें होय माझें हित । कथामृत निरोपिजे ॥५॥
येणें पुण्य काय घडे । काय लाभतसे रोकडें । ऐसें मनींचें साकडें । फेडावें माझें स्वामिया ॥६॥
ऐसें विनवीतसे द्विजवरु । संतोषोनि गुरु दातारु । सांगते झाले व्रताचारु । सिद्ध म्हणे नामधारका ॥७॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधरु । सांगे गुरुचरित्रविस्तारु । ऐकतां भवसागरु । पैल पार पाववी श्रीगुरु ॥८॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीयात्रा समस्त करीत । श्रोते ऐकती आनंदित । तेणें सफल जन्म होय ॥९॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । सांगतसे नामधारक विख्यात । जेणें होय मोक्ष प्राप्त । द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥२१०॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीक्षेत्रमहिमावर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥४२॥
ओवीसंख्या ॥२१०॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमशः
Binaca Geet Mala - 1953 Finals!!!
10 years ago
No comments:
Post a Comment