Chapter 40 A Brahmin named Narahari Skin is cured of leprosy and he is told the story of Shabardut and his devotion to Shiva-linga Who has written the famous Indukoti stotra which is recited everyday at Narasoba Wadi alias Nrusimhapur which is 50 km from Kolhapur and also at Audumbar (4 km from Bhilavadi railway station). Both these places are close to Kolhapur and on the banks of Krishna river. The Indukoti stotra is very poetic and is very brilliantly composed piece work.
CHAPTER 40
Leper Brahmin Cured.
Once a Brahmin `Narhari' by name came to Shri Guru at Ganagapur and bowing to him said, `My life is futile. I studied Yajurveda, but as I am suffering from leprosy. All people despise me and do not invite for Karma. I have visited several holy places but the disease is there, kindly bless me.'
Shri Guru gave him a dry log of Audumbar and said, `Go to the Sangam and plant it on the bank of Bhima in the east. After bath, worship Ashwattha at the Sangam. Again bathe and give water to this log thrice a day. When it sprouts green foliage, your sins will be wiped off and you will be free from leprosy.
As instructed by Shri Guru, Narhari planted the log on the bank of Bhima and began to water it thrice. Some persons said to him, `Are you mad ? How can a dry log bear green foliage ? Still Narhari continued his watering of the log devotedly. He also observed fast for 7 days.
Shri Guru was informed by his disciples regarding the devoted service of Narhari to the log. Shri Guru said, "One gets the fruits as per one's devotion. There is a tale in the Skanda Purana in this connection.
Soot narrated to the Rishis, `In former days there lived a king Sinhaket in Panchal. His son Dhananjaya once went to a forest with a Shabardut, who picked up a Linga-like stone near a Shiva Temple. Rajkumar asked him `What will you do with this stone ? There are so many lingas like this spread over here.'
Shabardut said, `I wish to worship this Linga daily. Please tell me how to worship it.'
Rajkumar siad, `Take this Linga home, worship it with flowers and bel leaves along with your wife. Offer naivedya of fresh chita (corpse) bhasma daily. Whatever food you have, should also be offered.' The Shabar took the Linga home and started the worship. One day, he could not get fresh chita bhasma. He was much worried. His devoted wife said, `Burn my body and offer chita bhasma to god Shiva, `the Shabar was very much pained to hear this. He said, `I shall be doing a great sin if I burn you.' The wife said, `Death will occur some day or the other. If I give my body for Shiva's worship, I shall have place in Kailas. So you need not be sorry.'
The Shabar burnt her and the chita bhasma was offered to the Shiva Linga. As usual he called his wife to take prasad. She also came smiling and took the prasad. The home appeared to be normal, as if nothing had occured. Seeing this, the Shabar was much astonished. His wife said, `I heard your voice and was as if aroused from sleep. `Gouri Raman Shiva appeared before them. Both bowed to him Shri Shiva was pleased and blessed the couple. Such is the greatness of the devotion of Guru. One who has implicit faith in the words of Guru's gets such fruit.'
Shri Guru went to the Sangam to see the leper Brahmin. He was pleased to see his devotion. The Brahmin was giving water to the log. Shri Guru sprinkled the holy water of his bowl on the log and instantly green foliage sprouted on the log. The leprosy of the Brahmin disappeared and his body became healthy and bright. Narhari bowed to Shri Guru and began to pray Him.
He composed 8 shlokas which are being chanted at Ganagapur in the night, after Aarati daily, till now.
Shri Guru placed his hand on the head of Narhari and blessed him. He returned to the Math with Narhari. All persons wondered to see this miracle. Many did Samaradhna. Shri Guru named Narhari as 'Yogeshwar' and asked him to come with his family and live with him. Shri Guru gave him "Vidya Saraswati" mantra also.
Contd....
श्रीगणेशाय नमः ।
सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तले आणिक ऐका । वृक्ष होता काष्ठ शुष्का । विचित्र कथा ऐक पा ॥१॥
गाणगापुरी असता श्रीगुरु । आला एक कुष्ठी द्विजवरु । आपस्तंब भार्गवगोत्रु । नाम तयाचे नरहरि ॥२॥
येवोनिया श्रीगुरुमूर्तीसी । नमन करी भक्तीसी । करी स्तोत्र बहुवसी । करसंपुट जोडोनिया ॥३॥
जय जयाजी गुरुमुर्ति । ऐकोनि आलो तुझी कीर्ति । भक्तवत्सला परंज्योती । परमपुरुषा जगद्गुरु ॥४॥
आपण जन्मोनि संसारी । वृथा झालो दगडापरी । निंदा करिताती द्विजवरी । कुष्ठी म्हणोनि स्वामिया ॥५॥
वाचिला वेद यजुःशाखा । निंदा करिताती माझी लोका । ब्राह्मणार्थी न सांगती देखा । अंगहीन म्हणोनिया ॥६॥
प्रातःकाळी उठोनि लोक । आफती माझे मुख । तेणे होते मनात दुःख । जन्म पुरे आता मज ॥७॥
पाप केले आपण बहुत । जन्मांतरी असंख्यात । तेणे हा भोग भोगित । आता न साहे स्वामिया ॥८॥
नाना तीर्थ नाना व्रत । हिंडोनि आलो आचरत । म्या पूजिले देव समस्त । माझी व्याधि न वचेची ॥९॥
आता धरोनि निर्धारु । आलो स्वामीजवळी जगद्गुरु । तुझा न होता कृपावरु । प्राण आपुला त्यजीन ॥१०॥
म्हणोनिया निर्वाणेसी । विनवीतसे श्रीगुरूसी । एकभावे भक्तीसी । करुणा भाकी द्विजवर ॥११॥
म्हणोनि मागुती नमस्कारी । नानापरी स्तुति करी । लोहपरिसा भेटीपरी । तुझ्या दर्शनमात्रेसी ॥१२॥
करुणावचनी ऐकोनि । भक्तवत्सल श्रीगुरु मुनि । निरोप देती कृपा करोनि । ऐक शिष्या नामधारका ॥१३॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । पूर्वजन्मी महादोषासी । तुवा केले बहुवसी । म्हणोनि कुष्ठी झालास ॥१४॥
आता सांगेन ते करी । तुझी पापे जाती दुरी । होशील दिव्यशरीरी । एकभावे आचरावे ॥१५॥
इतुकिया अवसरी । काष्ठ एक औदुंबरी । शुष्क होते वर्षे चारी । घेवोनि आले सर्पणासी ॥१६॥
ते देखिले श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती । एकभावे करोनि चित्ती । घेई काष्ठ झडकरी ॥१७॥
काष्ठ घेवोनि संगमासी । त्वरित जाय भावेसी । संगमनाथपूर्वभागेसी । भीमातीरी रोवी पा ॥१८॥
तुवा जावोनिया संगमात । स्नान करोनिया त्वरित । पूजा करोनि अश्वत्थ । पुनरपि जाय स्नानासी ॥१९॥
हाती धरोनिया कलश दोनी । आणी उदक तत्क्षणी । शुष्क काष्ठा वेळ तिन्ही । स्नपन करी मनोभावे ॥२०॥
ज्या दिवसी काष्ठासी । पर्णै येतील संजिवेसी । दोष गेले तुझे परियेसी । अंग तुझे होय बरवे ॥२१॥
येणेपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रासी निरोप देती । विश्वास झाला त्याचे चित्ती । धावत गेला काष्ठाजवळी ॥२२॥
काष्ठ उचलोनि डोईवरी । घेवोनि आला भीमातीरी । संगमेश्वरासमोरी । रोविता झाला द्विजवर ॥२३॥
जेणे रीती श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती । आचरतसे एकचित्ती । भावभक्ति करोनिया ॥२४॥
येणेपरी सात दिवस । द्विजे केले उपवास । तया काष्ठा दोनी कलश । भरोनि घाली वेळोवेळी ॥२५॥
देखोनि म्हणती सकळजन । तया विप्रा बोलावोन । सांगताती विवंचून । गुरुनिरोपलक्षण ॥२६॥
म्हणती तूते काय झाले । शुष काष्ठ का रोविले । याचे तुवा संजीवन योजिले । मग तूते काय होय ॥२७॥
याते तू सजीव करिसी । मागुती काय येतीपल्लव यासी । ऐसे पाहिले नाही भूमिसी । श्रीगुरूची इच्छा कळेना ॥२८॥
श्रीगुरुमूर्ति क्रुपासिंधु । भक्तजना असे वरदु । त्याची कृपा असे अगाधु । समस्ताते कृपा करी ॥२९॥
नसेल निष्कृति तुझिया पापा । म्हणोनि दिधले काष्ठ बापा । वाया कष्ट करिसी का पा । तूते श्रीगुरूंनी निरोपिले ॥३०॥
ऐकोनि तयांचे वचन । विप्रवर करी नमन । गुरुवाक्य मज कामधेनु । अन्यथा केवी होईल ॥३१॥
सत्यसंकल्प श्रीगुरुनाथ । त्याचे वाक्य न होय मिथ्य । माझे मनी निर्धार सत्य । होईल काष्ठ वृक्ष जाणा ॥३२॥
माझ्या मनी निर्धारु । असत्य न होय वाक्यगुरु । प्राण वेचीन साचारु । गुरुवाक्य कारण आपणा ॥३३॥
येणेपरी समस्तांसी । विप्र सांगे परियेसी । सेवा करितो भक्तीसी । तया शुष्क काष्ठासी ॥३४॥
एके दिवशी गुरुमूर्तीसी । शिष्य सांगती परियेसी । स्वामींनी निरोपिले द्विजासी । शुष्क काष्ठा भजे म्हणोनि ॥३५॥
सात दिवस उपवासी । सेवा करितो काष्ठासी । एकभावे भक्तीसी । निर्धार केला गुरुवचनी ॥३६॥
किती रीती आम्ही त्यासी । सांगितले सर्व हितासी । वाया का गा कष्ट करिसी । मूर्खपणे म्हणोनि ॥३७॥
विप्र आम्हाते ऐसे म्हणे । चाड नाही काष्ठाविणे । गुरुवाक्य मजकारणे । करील आपुले बोल साच ॥३८॥
निर्धार धरोनि मानसी । सेवा करितो काष्ठासी । सात दिवस उपवासी । उदक मुखी घेत नाही ॥३९॥
ऐकोनि शिष्यांचे वचन । निरोप देती श्रीगुरु आपण । जैसा असे भाव अंतःकरण । तैसी सिद्धि पावेल ॥४०॥
गुरुवाक्य शिष्यासी कारण । सर्वथा न होय निर्वाण । जैसे भक्ताचे अंतःकरण । तैशी सिद्धि पावेल ॥४१॥
याकारणे तुम्हांसी । सांगेन कथा इतिहासी । सांगे सूत ऋषीश्वरांसी । स्कंदपुराणी परियेसा ॥४२॥
गुरुभक्तीचा प्रकार । पुसती सूतासी ऋषीश्वर । सांगे सूत सविस्तर । तेचि कथा सांगतसे ॥४३॥
सूत म्हणे ऋषीश्वरांसी । गुरुभक्ति असे विशेषी । तारावया संसारासी । आणिक नाही उपाय ॥४४॥
अयोग्य अथवा ज्ञानवंत । म्हणोनि न पाहिजे अंत । गुरुमूर्ति मनी ध्यात । सेवा करणे भक्तिभावे ॥४५॥
दृढ भक्ति असे जयापासी । सर्व धर्म साधती त्यासी । संदेह न धरावा मानसी । एकचित्ते भजावे ॥४६॥
श्रीगुरु नर ऐसा न म्हणावा । त्रैमूर्ति तोचि जाणावा । गुणदोष न विचारावा । म्हणावा तोचि ईश्वर ॥४७॥
येणेपरी धरोनि मनी । जे जे भजती श्रीगुरुचरणी । प्रसन्न होय शूलपाणि । तात्काळिक परियेसा ॥४८॥
श्लोक ॥ मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवेज्ञे भेषजे गुरौ । यादृशी भावनां कुर्यात् सिद्धिर्भवति तादृशी ॥४९॥
टीका ॥ मंत्रतीर्थद्विजस्थानी । देवभक्ती औषधगुणी । गुरूसी पाहे शिवसमानी । भाविल्यासारखे फल होय ॥५०॥
म्हणे सूत ऋषीश्वरांसी । गुरुभक्ति म्हणिजे आहे कैसी । सांगेन साक्ष तुम्हांसी । अपूर्व एक वर्तलेसे ॥५१॥
पूर्वी पांचाल नगरात । होता राजा सिंहकेत । तयासी होता एक सुत । नाम तयाचे धनंजय ॥५२॥
एके दिवसी राजसुत । गेला पारधीसी अरण्यात । तेथे नसती मनुष्यमात्र । उदकवर्जित स्थळांसी ॥५३॥
राजकुमार तृषाक्रांत । हिंडतसे अरण्यात । संगे होत शबरसुत । श्रमले बहुत अवधारा ॥५४॥
तेथे एक शबरसुत । हिंडत होता वनात । देखता झाला अवचित । जीर्ण एक शिवालय ॥५५॥
भिन्नलिंग तया स्थानी । पडिले होते मेदिनी । शबरे घेतले उचलोनि । म्हणे लिंग बरवे असे ॥५६॥
हाती घेवोनि लिंगासी । पहात होता शबर हर्षी । राजसुत तया संधीसी । आला तया जवळिक ॥५७॥
राजकुमार म्हणे तयासी । भिन्न लिंग काय करिसी । पडिली असती भुमीसी । लिंगाकार अनेक ॥५८॥
शबर म्हणे राजसुताते । माझ्या मनी ऐसे येते । लिंगपूजा करावयाते । म्हणोन घेतले परियेसा ॥५९॥
ऐकोनि तयाचे वचन । राजपुत्र सुहास्यवदन । म्हणे पूजी एकमने । लिंग बरवे असे सत्य ॥६०॥
ऐसे म्हणता राजकुमार । तयासी करी नमस्कार । कोण विधि पूजाप्रकार । निरोपावे म्हणतसे ॥६१॥
तुवा व्हावे माते गुरु । मी तव असे शबरु । नेणे पूजेचा प्रकारु । विस्तारावे म्हणतसे ॥६२॥
राजपुत्रे म्हणे तयासी । न्यावा पाषाण घरासी । पूजा करावी भक्तीसी । पत्रपुष्पे अर्चोनिया ॥६३॥
दंपत्ये दोघेजण । पूजा करणे मने पूर्ण । हेचि लिंग गिरिजारमण । म्हणोनि मनी निर्धारी पा ॥६४॥
नानापरी पुष्पजाती । आणाव्या तुवा शिवाप्रती । धूप दीप नैवेद्य आरती । नैवेद्यासी भस्म जाण ॥६५॥
भस्म असेल जे स्मशानी । आणावे तुवा प्रतिदिनी । द्यावा नैवेद्य सुमनी । प्रसाद आपण भक्षावा ॥६६॥
आणिक जे जे जेवी आपण । तोही द्यावा नैवेद्य जाण । ऐसे आहे पूजाविधान । म्हणोनि सांगे राजकुमारु ॥६७॥
येणेपरी राजकुमारु । तया शबरा झाला गुरु । विश्वासे केला निर्धारु । शबरे आपुले मनात ॥६८॥
संतोषोनि शबर देखा । नेले लिंग गृहांतिका । स्त्रियेसी सांगे कौतुका । म्हणे लिंग प्रसन्न झाले ॥६९॥
गुरुनिरोप जेणे रीती । पूजा करीन एकचित्ती । चिताभस्म अतिप्रीती । आणोनि नैवेद्या देतसे ॥७०॥
क्वचित्काळ येणेपरी । पूजा करी शबरशबरी । एके दिवशी तया नगरी । चिताभस्म न मिळेचि ॥७१॥
हिंडोनि पाहे गावोगावी । चिताभस्म न मिळे काही । येणेपरी सात गावी । हिंडोनि आला घरासी ॥७२॥
चिंता लागली शबरासी । पुसता झाला स्त्रियेसी । काय करू म्हणे तिसी । प्राण आपुला त्यजीन म्हणे ॥७३॥
पूजा राहिली लिंगासी । भस्म न मिळे नैवेद्यासी । हिंडोनि आलो दाही दिशी । चिताभस्म न मिळेचि ॥७४॥
जैसे गुरूंनी आज्ञापिले । त्या विधीने पाहिजे अर्चिले । नाही तरी वृथा गेले । शिवपूजन परियेसा ॥७५॥
गुरूचे वाक्य जो न करी । तो पडेल रौरवघोरी । तयाते पाप नाही दूरी । सदा दरिद्री होय नर ॥७६॥
त्यासी होय अधोगति । अखंड नरकी तया वस्ती । जो करी गुरूची भक्ति । तोचि तरेल भवार्णवी ॥७७॥
सकळ शास्त्रे येणेपरी । बोलताती वेद चारी । याचि कारणे ऐक हो शबरी । प्राण आपुला त्यजीन ॥७८॥
ऐकोनि पतीचे वचन । बोले शबरी हासोन । चिंता करिता किंकारण । चिताभस्म देईन मी ॥७९॥
मज घालोनि गृहांत । अग्नि लावा तुम्ही त्वरित । काष्ठे असती बहुत । दहन करा आपणासी ॥८०॥
तेचि भस्म ईश्वरासी । उपहारावे तुम्ही हर्षी । व्रतभंग न करावा भरवसी । संतोषरूपे बोलतसे ॥८१॥
कधी तरी शरीरासी । नाश असे परियेसी । ऐसे कार्यकारणासी । देह आपुला समर्पीन ॥८२॥
ऐकोनि स्त्रियेचे वचन । शबर झाला मनी खिन्न । प्राणेश्वरी तुझा प्राण । केवी घ्यावा म्हणतसे ॥८३॥
रूपे दिससी रतीसरसी । अद्यापि तू पुर्ववयासी । पुत्रअपत्य न देखिलेसी । या संसारासी येउनी ॥८४॥
मन नाही तुझे धाले । संसारसुख नाही देखिले । तुझे मातापित्याने मज निरविले । प्राणप्रिया रक्ष म्हणोनि ॥८५॥
चंद्रसूर्यसाक्षीसी । तुज वरिले म्या संतोषी । प्राण रक्षीन म्हणोनी हर्षी । घेवोनि आलो मंदिरात ॥८६॥
आता दहन करिता तूते । घडती पापे असंख्याते । स्त्रीहत्या महादोषाते। केवी करू म्हणतसे ॥८७॥
तू माझी प्राणेश्वरी । तूते मारू कवणेपरी । कैसा तुष्टेल त्रिपुरारि । पुण्य जावोनि पाप घडे ॥८८॥
दुःखे तुझी मातापिता । माते म्हणती स्त्रीघाता । अजूनि तुझी लावण्यता । दिसतसे प्राणप्रिये ॥८९॥
नाना व्रते नाना भक्ति । या शरीरालागी करिती । दहन करू कवणे रीती । पापे माते घडतील ॥९०॥
ऐकोनि पतीचे वचन । विनवीतसे सती आपण । कैसे असे तुम्हा अज्ञान । मिथ्या बोल बोलतसा ॥९१॥
शरीर म्हणे स्वप्नापरी । जैसा फेण गंगेवरी । स्थिर न राहे क्षणभरी । मरणे सत्य परियेसा ॥९२॥
आमुचे मायबापे जाण । तुम्हा दिधले माते दान । तुमची अर्धांगी मी पूर्ण । भिन्नभावना कोठे दिसे ॥९३॥
मी म्हणजे तुमचा देहे । विचार करोनि मनी पाहे । आपुले अर्ध शरीर आहे । काय दोष दहन करिता ॥९४॥
जे जे उपजे भूमीवरी । ते ते नाश पावे निर्धारी । माझे देहसाफल्य करी । ईश्वराप्रती पावेल ॥९५॥
संदेह सोडोनि आपणासी । दहन करी वो वेगेसी । आपण होवोनि संतोषी । निरोप देते परियेसा ॥९६॥
नानापरी पतीसी । बोधी शबरी परियेसी । घरात जावोनि पतीसी । म्हणे अग्नि लावी आता ॥९७॥
संतोषोनि तो शबर । बांधिता झाला गृहाचे द्वार । अग्नि लाविता थोर । ज्वाळा व्यापिती गगनासी ॥९८॥
दहन झाले शबरीसी । भस्म घेतले परियेसी । पूजा करोनि शिवासी । नैवेद्य दिधला अवधारा ॥९९॥
पूजा करिता ईश्वरासी । आनंद झाला बहुवसी । स्त्री दिधली हुताशी । स्मरण ऐसे त्यास नाही ॥१००॥
ऐसी भक्तिभावेसी । पूजा केली महेश्वरासी । प्रसाद घेवोनि हस्तेसी । पाचारिले स्त्रियेते ॥१॥
जैसी पूजा नित्य करोन । प्रसाद हाती घेऊन । आपुले स्त्रियेते बोलावून । देत असे तो शबर ॥२॥
तया दिवसी त्याचपरी । आपल्या स्त्रियेते पाचारी । कृपासागरी त्रिपुरारि । प्रसन्न झाला परियेसा ॥३॥
तेचि शबरी येवोनि । उभी ठेली सुहास्यवदनी । घेतला प्रसाद मागोनि । घेवोनि गेली घरात ॥४॥
जैसे तैसेचि घर दिसे । शबर विस्मय करीतसे । म्हणे दग्ध केले स्त्रियेसरिसे । घर कैसे दिसताहे ॥५॥
बोलावोनि स्त्रियेसी । शबर पुसतसे तियेसी । दहन केले मी तुजसी । पुनरपि कैसी आलीस ॥६॥
शबरी सांगे पतीसी । आपणास आठवण आहे ऐसी । अग्नि लाविता घरासी । निद्रिस्थ झाल्ये परियेसा ॥७॥
महाशीते पीडित । आपण होत्ये निद्रिस्थ । तुमचे बोल ऐकोन सत्य । उठोनि आल्ये परिय्सा ॥८॥
हे होईल देवकरणी । प्रसन्न झाला शूलपाणि । ऐसे म्हणता तत्क्षणी । निजस्वरूपी उभा ठाकला ॥९॥
नमन करिती लोटांगणी । धावोनि लागती दोघे चरणी । प्रसन्न झाला शूलपाणि । मागा वर म्हणतसे ॥११०॥
होईल सुख संसारी । राज्य दिधले धुरंधरी । गति होईल त्यानंतरी । कल्पकोटि स्वर्गवास ॥११॥
येणेपरी ऋषीश्वरांसी । सूत सांगे विस्तारेसी । गुरुचरणी विश्वास असे ज्यासी । तैसे फळ होय जाणा ॥१२॥
म्हणोनि श्रीगुरु शिष्यासी । सांगते झाले परियेसी । विश्वासे करोनि द्विज हर्षी । शुष्क काष्ठ सेवितसे ॥१३॥
जैसा भाव तैसी सिद्धि । होईल सत्य हे त्रिशुद्धि । श्रीगुरुनाथ कृपानिधि । सहज निघाले संगमासी ॥१४॥
जावोनि करिती अनुष्ठान । पहावया येती ते ब्राह्मण । देखोनि त्याचे अंतःकरण । प्रसन्न झाले तत्क्षणी ॥१५॥
होता कमंडलु करकमळी । भरला सदा गंगाजळी । उचलोनिया हस्तकमळी । घालिती उदक काष्ठासी ॥१६॥
तेचि क्षणी काष्ठासी । पल्लव आले परियेसी । औंदुबर वृक्ष जनासी । दिसतसे समस्ता ॥१७॥
जैसा चिंतामणिस्पर्श । सुवर्ण करी लोहास । तैसा श्रीगुरु सुधारस । काष्ठ झाला औदुंबर ॥१८॥
काष्ठ दिसे औदुंबर । सुदेही झाला तो विप्र । दिसे सुवर्णकांति नर । गेले कुष्ठ तात्काळी ॥१९॥
संतोषोनि द्विजवर । करी साष्टांग नमस्कार । करिता झाला महास्तोत्र । श्रीगुरूचे तये वेळी ॥१२०॥
श्लोक ॥ इंदुकोटितेज-करुणासिंधु-भक्तवत्सलम् । नंदनात्रिसूनुदत्त, इंदिराक्ष-श्रीगुरुम् ।
गंधमाल्यअक्षतादिवृंददेववंदितम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२१॥
मोहपाशअंधकारछायदूरभास्करम् । आयताक्ष, पाहि श्रियावल्लभेशनायकम् ।
सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२२॥
चित्तजादिवर्गषट्कमत्तवारणांकुशम् । तत्त्वसारशोभितात्मदत्त-श्रियावल्लभम् ।
उत्तमावतार-भूतकर्तृ-भक्तवत्सलम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२३॥
व्योमवायुतेज-आपभूमिकर्तृमीश्वरम् । कामक्रोधमोहरहितसोमसूर्यलोचनम् ।
कामितार्थदातृभक्तकामधेनु-श्रीगुरुम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२४॥
पुंडरीक-आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम् । चंडुदुरितखंडनार्थ - दंडधारि-श्रीगुरुम् ।
मंडलीकमौलि-मार्तंडभासिताननं । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२५॥
वेदशास्त्रस्तुत्यपाद, आदिमूर्तिश्रीगुरुम् । नादबिंदुकलातीत-कल्पपादसेव्ययम् ।
सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२६॥
अष्टयोगतत्त्वनिष्ठ, तुष्टज्ञानवारिधिम । कृष्णावेणितीरवासपंचनदीसंगमम् ।
कष्टदैन्यदूरिभक्ततुष्टकाम्यदायकम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२७॥
नारसिंहसरस्वती-नामअष्टमौक्तिकम् । हारकृत्यशारदेन गंगाधर आत्मजम् ।
धारणीकदेवदीक्षगुरुमूर्तितोषितम् । परमात्मानंदश्रियापुत्रपौत्रदायकम् ॥२८॥
नारसिंहसरस्वतीय-अष्टकं च यः पठेत् । घोरसंसारसिंधुतारणाख्यसाधनम् ।
सारज्ञानदीर्घआयुरारोग्यादिसंपदम् । चारुवर्गकाम्यलाभ, वारंवारं यज्जपेत ॥२९॥
स्तोत्र केले येणेपरी । आणिक विनवी परोपरी । म्हणे देवा श्रीहरी । कृपा केली स्वामिया ॥१३०॥
म्हणोनि मागुती नमस्कारी । श्रीगुरुनाथ अभयकरी । उठविता झाला अवधारी । ज्ञानराशि म्हणोनिया ॥३१॥
समस्त लोक विस्मय करिती । श्रीगुरूते नमस्कारिती । नानापरी स्तोत्रे करिती । भक्तिभावेकरोनिया ॥३२॥
मग निघाले मठासी । समस्त शिष्यादि द्विजांसरसी । ग्रामलोक आनंदेसी । घेऊनि येती आरत्या ॥३३॥
जावोनि बैसती मठात । शिष्यांसहित श्रीगुरुनाथ । समाराधना असंख्यात । झाली ऐका ते दिनी ॥३४॥
तया विप्रा बोलावोनि । सद्गुरु म्हणती संतोषोनि । कन्यापुत्रगोधनी । तुझी संतति वाढेल ॥३५॥
तुझे नाम योगेश्वर । आम्ही ठेविले निर्धार । समस्त शिष्यांमाजी थोर । तूचि आमुचा भक्त जाण ॥३६॥
वेदशास्त्री संपन्न । तुझ्या वंशोवंशी जाण । होतील पुरुष निर्माण । म्हणोनि देती निरोप ॥३७॥
श्रीगुरु म्हणती तयासी । जावोनि आणि कलत्रासी । तुम्ही रहावे आम्हापासी । येचि ग्रामी नांदत ॥३८॥
म्हणोनि तया द्विजासी । श्रीगुरु मंत्र उपदेशी । विद्यासरस्वती या मंत्रासी । उपदेशिले परियेसा ॥३९॥
तूते होतील तिघे सुत । एकाचे नाव योगी विख्यात । आमुची सेवा करील बहुत । वंशोवंशी माझे दास ॥१४०॥
जैसे श्रीगुरूंनी निरोपिले । तयापरी त्यासी झाले । म्हणोनि सिद्धे सांगितले । नामधारकशिष्यासी ॥४१॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार । उतरावया पैल पार । कथा ऐका एकचित्ते ॥४२॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । कुष्ठी उद्धरिला भक्त । गुरुमहिमा अत्यद्भुत । प्रकट झाला येणेपरी ॥१४३॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शुष्ककाष्ठसंजीवन नाम
चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४०॥
ओवीसंख्या ॥१४३॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु
क्रमशः
Binaca Geet Mala - 1953 Finals!!!
10 years ago
Thank you. With love and gratitude!
ReplyDeleteThank you
ReplyDelete