Famous marathi Lullaby sung by Lata Mangeshkar, written by Mangesh Padgaonkar and music is composed by Shrinivas Khale.
मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली आणि लता मंगेशकरांनी गायलेली ही प्रसिद्ध अंगाई. या गाण्याचा साज होता श्रीनिवास खळे यांचा.
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे ॥ ध्रु ॥
शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे
या झर्याचा सूर आता मंद झाला रे ॥ १ ॥
झोपल्या गोठयात गाई, साद वा पडसाद नाही
पाखरांचा गलबला ही बंद झाला, बंद झाला रे ॥ २ ॥
सावल्यांची तीट गाली, चांदण्याला नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे ॥ ३ ॥
नीज रे आनंदकंदा, नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागर्यांचा छंदताला, छंदताला रे ॥ ४ ॥
Here is the Audio link for the complete song....
Binaca Geet Mala - 1953 Finals!!!
10 years ago
No comments:
Post a Comment