Chapter 48 Amaraja-sangam importance is told and his own sister's leprosy is cured.
CHAPTER 48
Amarja Sangam and the Greatness of Ganagapur.
On the parva day of Ashvin Vad 14, Shri Guru said to the disciple, 'We shal have bath at trishali (3 Holy places i. e. Prayag, Kashi and Gaya ) with family and children.
The disciple said, 'For such a long journey, we require some time for preparations'.
Shri Guru, 'These holy places are near about. So there is no need for special preparation.'
Saying this he went with them all to the sangamam. All took bath there. Shri Guru said, 'The Sangam is like Prayag. Bhima flows there northwards. This Amarja Sangam is as holy as the Ganga-Yamuna Sangam of Prayag. There are other eight holy places (Tirthas) near about.'
The disciples, -'Why this river is called Amarja?'
Shri Guru, -'Jallundhar Rakshasa were on War. Indra went to Shri Shankar and said, 'We kill Rakshasa but from each drop of their blood, new Rakshasa are born and they have spread in Three Lokas. They have killed many Gods.'
Hearing this, Shri Shankar was enraged and started to kill the Rakshas in the form of Rudra. Indra said, 'You will kill the Rakshas: but kindly suggest any device to make the gods alive.'
Shri Shankar recited Amrutmantra and gave a jar filled with nectar. Indra sprinkled the nectar on the Gods and made them alive. While Indra was going with the jar of the remaining nectar some drops fell on the earth and a river hus created was called 'Amarja'. Bath in this river prevents diseases and untimely death. This river meets Bhima and this Sangam is great like Triveni Sangam of Prayag. Bath in this Kartika and Magha months, on Somwati, Sankratini grahan (eclipse) Parva at this Sangam is very virtuous.
Before this Sangam is the Ashwattha, bath near which fulfils all the desires. I also live here. After worshipping this Ashwattha, worship the 'Sangameshwar' with devotion. This is like Mallikarjuna of Shri Shailya. Bow to Nandi and Chandi, have three rounds and see Shiva Shankar.
There is the 'Varanashi' Tirth i. e. Kashi one mile ahead. One Brahmin of Bhardwaj Gotra was a great devotee of Shri Shiva. He roamed everywhere without clothes, people called him 'mad'. He had two brothers Ishwar and Pandurang. They were thinking of going to Kashi. At this time one devotee of Shri Shiva came there and said to his brothers, ' Why do you go to Kashi? Here is Kashi Visheshwar.' The brothers said, 'Where is it? Show us'.
The devotee took a bath and sat in meditation. Shri Shankar appeared before him. The devotee requested him to create an idol of Kashi Vishveshwar there for daily worship and darshan. Shri Shankar conceded and Manikarnika Kund was created first and the shrine of Kashi Vishveshwar came out of it. A river flowing northward like Bhagirthi also came into existence. All the principal places of Kashi were thus created here. Both the brothers then worshipped Kashi Vishveshwar. These brothers lived at Pandharpur and were known as 'Aradhye'.
Hearing this from Shri Guru, all took bath there and worshipped Shri Vishveswar with devotion and observed other rites.
Shri Guru -'Here is ' Papavinashi Teerth' bath in which destroys all sins.' Shri Guru called his sister Ratnai here and said, 'You had killed a cat with a stickand therefore you are having leprosy. You bathe in this Tirth daily and your disease will disappear.' As advised, she bathed here for three days and her disease was wiped off.
A little further is 'Kothi Tirth'. One should bathe here on Sankranthi, Grahan, Purnima and Amavasya and give a cow with a calf in charity. Further to this is 'Rudra Tirth'. It is as holy as Gaya. Observe Sraddha here.
Further is 'Chakra Tirth' like Dwaraka. Beyond is 'Manmath Tirth'. To the east of it, is 'Kalleshwar' like Gokarna Mahabaleshwar. By doing this, eight glories are obtained.'
Shri Guru thus narrated the greatness of the eight holy places and all were pleased. They bathed and observed other rites and returned to Gangapur with Shri Guru. A grand samardhana was arranged jointly.
Contd....
श्रीगणेशाय नमः ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व झालें परियेसीं । गुरुचरित्र विस्तारेंसी । सांगतां संतोष होतसे ॥१॥
गाणगापुरीं असतां गुरु । ख्याति झाली अपरंपारु । भक्त होता एक शूद्रू । तयाची कथा ऐक पां ॥२॥
श्रीगुरु नित्य संगमासी । जात असता अनुष्ठानासी । मार्गी तो शूद्र परियेसीं । आपुले शेतीं उभा असे ॥३॥
श्रीगुरुतें नित्य देखोनि । धावत येऊनि शेतांतूनी । आपण साष्टांगीं नमोनि । पुनरपि जात आपुले स्थाना ॥४॥
माध्यान्हकाळीं मठासी येता । पुनरपि चरणीं ठेवी माथा । ऐसे कितीएक दिवस होतां । शूद्राची भक्ति वाढली ॥५॥
श्रीगुरु तयासी न बोलती । नमन केलिया उभे असती । येणें विधीं बहु काळ क्रमिती । आला शूद्र नमस्कारा ॥६॥
नमस्कारितां शूद्रासी श्रीगुरु पुसती संतोषीं । कां गा नित्य तूं कष्टतोसी । नमन करिसी येऊनिया ॥७॥
तुझे मनीं काय वासना । सांग त्वरित आम्हां जाणा । शूद्र म्हणे आवड मना । शेत अधिक पिकावें ॥८॥
तयासी पुसती गुरुनाथ । काय पेरिलें शेतांत । शूद्र म्हणे यावनाळ बहुत । पीक आलें तुझे धर्मीं ॥९॥
नमस्कारितां तुम्हां नित्य । पीक आलें असे अत्यंत । पोटरीं येतील त्वरित । आतां तुझेनि धर्मीं जेवूं ॥१०॥
स्वामी यावें शेतापासीं । पहावें अमृतदृष्टींसी । तूं समस्तां प्रतिपाळिसी । शूद्र म्हणोनि न उपेक्षावें ॥११॥
श्रीगुरु गेले शेतापासीं । पाहूनि म्हणती त्या शूद्रासी । सांगेन एक ऐकसी । विश्वास होईल बोलाचा ॥१२॥
जें सांगेन मी तुजसी । जरी भक्तीनें अंगिकारिसी । तरीच सांगूं परियेसीं । एकभावें त्वां करावें ॥१३॥
शूद्र विनवी स्वामियासी । गुरुवाक्य कारण आम्हांसी । दुसरा भाव आम्हांसी । नाहीं स्वामी म्हणे तो ॥१४॥
मग निरोपिती श्रीगुरु तयासी । आम्ही जातों संगमासी । परतोनि येऊं मध्यान्हासी । तंव कापावें सर्व पीक ॥१५॥
ऐसें सांगोनि शूद्रासी । श्रीगुरु गेले संगमासी । शूद्र विचारी मानसीं । गुरुवाक्य आपणा कारण ॥१६॥
शीघ्र आला ग्रामांत । अधिकारियासी विनवीत । खंडोनि द्यावें मला शेत । गत संवत्सराप्रमाणें धान्य देईन ॥१७॥
अधिकारी म्हणती तयासी । पीक झालें असे बहुवसीं । या कारणें उक्तें मागसी । अंगिकार न करिती ॥१८॥
नाना प्रकारें विनवी त्यांसी । द्विगुण देईन गतसंवत्सरेसी । अंगिकारिलें संतोषीं । वचनपत्र लिहून घेती ॥१९॥
आपण अभयपत्र घेऊनि । लोक मिळवोनि तत्क्षणीं । गेला शेतांत संतोषोनि । म्हणे कापा तयासी ॥२०॥
कापूं लागतां शेतासी । स्त्री-पुत्र वर्जिती तयासी । पाषाण घेऊनि स्त्रियेसी । मारुं आला तो शूद्र ॥२१॥
पुत्रातें मांरी येणेंपरी । पळत आले गांवाभीतरीं । आड पडतां राजद्वारीं । पिसें लागलें पतीसी ॥२२॥
पीक असे बहुवसी । कापून टाकितो मूर्खपणेंसी । वर्जितां पहा आम्हांसी । पाषाणघाईं मारिलें ॥२३॥
संन्याशाचें माहात्म्य वाचें बोले । पीक सर्व कोमळ कापिलें । आमुचें जीवित्व भाणास गेलें । आणिक भक्षितों एक मास आम्ही ॥२४॥
अधिकारी म्हणती तयासी । कापी ना का आपुल्या शेतासी । पत्र असे आम्हांपासीं । गतसंवत्सरा द्विगुण धान्य द्यावें ॥२५॥
वर्जावया माणसें पाठविती । शूद्र न ऐके कवणे गतीं । शूद्र म्हणे अधिकारी भीतीं । पेवीचे कण आतां देईन ॥२६॥
दूत सांगती अधिकारियासी । आम्हीं सांगितलें शूद्रासी । सांगोनि पाठविलें तुम्हांसी । विनोद असे परियेसा ॥२७॥
जरी भितील अधिकारी । तरी देईन आतांचि घरीं । गुरें बांधीन तयांचे द्वारीं । पत्र आपण दिलें असे ॥२८॥
दूत सांगती ऐशा रीतीं । पुढें वर्तली काय स्थिति । राजा अधिकारी तयाप्रती । काय उत्तर बोलतसे ॥२९॥
अधिकारी म्हणती तयासी । आम्हां चिंता कायसी । पेव ठाउकें आहे आम्हांसी । धान्य आहे अपार ॥३०॥
इतुकें होतां शूद्रें देखा । पीक कापिलें मनःपूर्वका । उभा असे मार्गीं ऐका । श्रीगुरु आले परतोनि ॥३१॥
नमन करोनि श्रीगुरुसी । शेत दाखविलें कापिलें ऐसी । श्रीगुरु म्हणती तयासी । वायां कापिलें म्हणोनि ॥३२॥
विनोदें तुज सांगितलें । तुवां निर्धारें कापलें । शूद्र म्हणे तुमचें वाक्य भलें । तेंचि मज कामधेनु ॥३३॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । निर्धार असे तुझे चित्तीं । होईल अत्यंत फळप्राप्ति । चिंता न करीं मानसीं ॥३४॥
ऐसें सांगोनि श्रीगुरुनाथ । आले आपण ग्रामांत । सवें शूद्र असे येत । आपुले घराप्रती गेला ॥३५॥
पुसावया येती समस्त । तयाचे घरीं होतो आकांत । स्त्री-पुत्र सर्व रुदन करीत । म्हणती आपुला ग्रास गेला ॥३६॥
शूद्र समस्तांतें संबोखी । न करीं चिंता रहा सुखी । गुरुसोय नेणती मूर्खी । कामधेनु वाक्य तयांचें ॥३७॥
एकेकाचे सहस्त्रगुण । अधिक लाभ तुम्हां जाण । स्थिर करा अंतःकरण । हानि नव्हे निर्धार पैं ॥३८॥
गुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैचें होय त्यासी । निधान जोडलें आम्हांसी । म्हणोनि शूद्र सांगतसे ॥३९॥
नर म्हणूं नये श्रीगुरुसी । शिवस्वरुप जाणा भरंवसीं । असे कारण पुढें आम्हांसी । म्हणोनि निरोपिलें असे मज ॥४०॥
नानापरी स्त्री-पुत्रांसी । संबोधित असे शूद्र अति हर्षीं । इष्टजन बंधुवर्गासी । येणेंचि रीतीं सांगतसे ॥४१॥
समस्त राहिले निवांत । ऐसें आठ दिवस क्रमित । वायु झाला अति शीत । समस्त पिकें नासलीं ॥४२॥
समस्त ग्रामींची पिकें देखा । शीतें नासलीं सकळिका । पर्जन्य पडला अकाळिका । मूळ नक्षत्रीं परियेसा ॥४३॥
ग्राम राहिला पिकावीण । शूद्रशेत वाढलें शतगुणें । वाढला यावनाळ सगुण । एकेका अकरा फरगडेंसी ॥४४॥
तैं शूद्र-स्त्री संतोषोनि । शेता आली पूजा घेऊनि । अवलोकितसे आपुले नयनीं । महानंद करितसे ॥४५॥
पीक झालें अत्यंत । देखोनिया समस्त । येऊनि जन समस्त तेथ । महदाश्चर्य करीत देखा ॥४६॥
येऊनि लागे पतिचरणीं । विनवीतसे कर जोडोनि । बोले मधुर करुणावचनीं । क्षमा करीं म्हणतसे ॥४७॥
अज्ञानमदें अति वेष्टिलें । नेणतां तुम्हांतें निंदिलें । गुरु कैचा काय म्हणितलें । क्षमा करणें प्राणनाथ ॥४८॥
ऐसें पतीसी संबोधोनि । शेतींचा देव पूजोनि । विचार केला दोघांनीं । गुरुदर्शना जावें आतां ॥४९॥
म्हणोनि सांगे स्त्रियेसी । पूजों आलीं श्रीगुरुसी । स्वामी पुसती तयांसी । काय वर्तमान म्हणोनिया ॥५०॥
चरणीं लागलीं तेव्हां दोन्ही । हस्तद्वय जोडोनि । स्वामीदर्शन उल्हासोनि । उभीं ठाकलीं संमुख ॥५१॥
दोघेंजणें स्तोत्र करिती । जय जयाजी श्रीगुरुमूर्ती । कामधेनु कुळदैवत म्हणती । तूंचि आमुचा गुरुराया ॥५२॥
तुझें अमृतवचन आम्हां । चिंतामणिप्रकार महिमा । पूर्ण केलें आमुच्या कामा । शरण आलों तुज आम्ही ॥५३॥
भक्तवत्सल ब्रीदख्याति । ऐसें जगीं तुज वानिती । आम्हीं देखिलें दृष्टांतीं । म्हणोनि चरणीं लागलीं ॥५४॥
नाना प्रकारें पूजा आरती । शूद्र-स्त्री करीतसे भक्तीं । श्रीगुरु बोलती अतिप्रीतीं । लक्ष्मी अखंड तुझे घरीं ॥५५॥
निरोप घेऊनि दोघेंजण । गेलीं आपुले आश्रमीं जाण । करितां मास काळक्रमण । पीक आलें अपार ॥५६॥
गतसंवत्सराहूनि देखा । शतगुणी झालें धान्य अधिका । शूद्र म्हणतसे ऐका । अधिकारियातें बोलावोनि ॥५७॥
शूद्र म्हणे अधिकारियासी । पीक गेलें सर्व गांवासी । वोस दिसे कोठारासी । आपण देऊं अर्धा भाग ॥५८॥
गतवर्षा द्विगुण तुम्हांसी । अंगिकारिलें मीं परियेसीं । धान्य झालें बहुवसीं । शतगुणें अधिक देखा ॥५९॥
परी देईन अर्ध संतोषीं । संदेह न धरा हो मानसीं । अधिकारी म्हणती तयासी । धर्महानि केवी करुं ॥६०॥
गुरुकृपा होतां तुजवरी । पीक झालें बहुतांपरी । नेऊनिया आपुले घरीं । राज्य करीं म्हणती तया ॥६१॥
संतोषोनि शूद्र देखा । विप्रासी वांटी धान्य अनेका । घेऊनि गेला सकळिका । राजधान्य देऊनि ॥६२॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र-महिमा परियेसीं । दृढ भक्ति असे ज्यासी । दैन्य कैचें तया घरीं ॥६३॥
सकळाभीष्टें त्यासी होती । लक्ष्मी राहे अखंडिती । गुरु सेवा हो निश्चिती । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥६४॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । गुरुशिष्यसंवाद विख्यात । भक्ता शूद्रा वर प्राप्त । अष्टचत्वारिंशोऽध्याय हा ॥६५॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शूद्रवरप्रदानं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः ॥४८॥
ओवीसंख्या ॥६५॥
श्रीगुरुद्त्तात्रेयार्पणमस्तु ॥
Binaca Geet Mala - 1953 Finals!!!
10 years ago
Marathi madhala 47 and 48 va adhyay ekach distoy
ReplyDelete