Monday, January 24, 2011

Bala mazya neej na!!

बाळा माझ्या नीज ना....
This is a marathi lullaby (Angai). This was written by famous poetess Shanta Shelke and is sung by Asha Bhosale. Music is by Hemant Bhosale.

एक भावनाशील कवयत्री शांता शेळके यांचे हे गीत. गायलेले आहे आशा भोसले यांनी तर गाण्याचा साज आहे हेमंत भोसले यांचा. रात्र झाली तरी बाळाला का अजुन नीज आली नाही या विचाराने काळजी करणारी आई या गाण्यात आपल्याला दिसते. गाणे तसे फार कठीण नाही. चित्रपटातील गाण्यासारखी चाल असल्याने लवकर पाठ होईल. बघा प्रयत्न करून.

जो
जो गाई अंगाई गाते,
बाळा माझ्या नीज नाध्रु

ज्योत मंदावली,
पेंगते साऊली
पानोपानी वारा हलेना,
बाळा माझ्या नीज ना

पाऊलचाळा, घुंगूरवाळा,
का नीज नाही राजा तुला
इवल्या पापण्या शिणल्या ना,
बाळा माझ्या नीज ना

डोळे फुलाचे मिटले गं बाई,
ओठांत दाटून ये जांभई
बाळास माझ्या आता निजू द्या,
काऊ चिऊ या सारे उद्या
बाळा माझ्या नीज ना

No comments:

Post a Comment