Saturday, January 22, 2011

Gurucharitra - Adhyay 28

Chapter 28 Shri Guru removes Bhasma from the Harijan's body, clears the shudra of knowledge and sends him home.

CHAPTER 28

Advice of Karma Vipak to the Harijan.

Shri Guru said, `I will tell you the account of your past life. One gets birth as per one's good or bad actions. If Shudra enjoys with a Brahmin woman he becomes a chandal. Brahmins and persons of other castes are degenerated if they lead a faulty life.

One who leaves his parents or Guru and goes elsewhere and who forsakes his wife, becomes a chandal. One who adores other deities, leaving one's family god, who speaks a lie, who kills animals, sells his daughter, takes Shudra's food, sells horses, enjoys with Shudra women, sets fire to the forest, separates a cow from its calves, rides on an ox, becomes a chandal.

A Brahmin after going to a holy place, does not bathe there and does not observe six Karmas, his first wife being alive, marries with another and forsakes the first, who enjoys with widows, becomes degenerated. Similarly one who breaks tanks and wells, causes split in Brahmins' houses, enjoys with wives of master, Guru or a friend, takes meals in the evening, runs away from the battle field leaving the master, tells vedas to shudras, does not observe shradha, (anniversary of parents etc.) speaks about one's virtues, administers medicines without knowing the pulse, censures Hari and Har also gets birth in a chandal family.

One who learns mantras from shudras, mixes water in cow's milk, becomes a dog. One who criticises Vedas, disrespects. Brahmins, suffers from stone in the bladder. One who causes abortions of women, becomes neutral and even if he has issues they do not survive.

One who steals gold, suffers from syphills, he who steals book becomes blind. One who steals at his friend's house, suffers from glands in the neck. A theif of food articles suffers from tumour. One who takes away other's wife, becomes a Brahma Rakshas. One who takes away money offered to god becomes a leper. One who takes away money offered to God becomes a steals cow's milk becomes a leper.

The bad results of adultery are given in Shantiparva of Mahabharat. One who embraces other's wife, becomes a dog for 100 lives and then a serpent. One who sees the vagina of other's wife becomes blind. One who enjoys with a friend's wife or maternal aunt, becomes a dog If a Shudra enjoys with a Brahmin woman, both will become worms.'

Hearing this Trivikram asked, `If one has committed a sin, how can it be wiped off?'

Shri Guru: `If there is real repentence, the sin is wiped off. Prayashchittas (Puritive acts) are given in `Karma Vipak' as follows. Take Brahmadand. Give cow with ornaments in charity to a Brahmin. If this is not possible give money. If the sin is minor then giving of a gold coin will suffice. If a man and his wife both have committed a sin both should take Prayashchitta or recite `ayatri' mantra ten thousand times or feed 12 Brahmins. `Gayatri Krichhra' `Prajapati Krichhra' means to take meal once a day or take `madhukari' (food alms taken at Brahmins) and have fasts for 3 days, mild sins are wiped off by this act.

In `Ati Krichhra' take 15 morsals of food in the morning and 12 in the night or take eight morsels of madhukari food each in the morning and in the night. Take ghee for 3 days and milk for 3 days, live only on air for 3 days and then only milk for 3 days and then take only milk for 21 days. A weak person can observe fast taking ti, gur, parched paddy (Lahi). In `Parna Krichhra' water in which leaves of certain trees are dipped, is to be taken. One should declare one's sin in meeting openly. `Tirth Krichhra' means to go to a holy place, take bath and recite Gayatri mantra for twelve hundred times. All sins are destroyed by doing this. Bath at Setubandh wipes off sin of killing a child in womb. Recitation of a crore of Gayatri mantra wipes off even the sin of a Brahmahatya.

Pavmansukta, Indra mitra, Shunah shep, Apamadhya, Tadvishnoh, Purushsukta from the vedas will wipe off sins if recited daily. Taking of Panch Gavya (mixture of 5 things i.e. Cow's milk, curds, ghee, cow's urine and dung) after repentence, destroys sins committed due to ignorance.

Brahmahatya, drinking, enjoying with guru's wife, theft of gold and cooperation in these crimes are the five great sins which are destroyed by the favour of Shri Guru'.

Shri Guru told the Harijan, `You were a brahmin but you disregarded your parents and therefore, you have become a chandal. You bathe at the sangam for a month and your sins will be wiped off'.

The Harijan said, `A crow becomes a Rajhansa on going to the Manas lake, similarly I have been pure by your sighty (darshan). How can the iron transformed into gold by the touch of paris (Philosopher's stone) be iron again ?' Assimilate me now amongst the Brahmins'.

Shri Guru smiled and said, `You are born in a low caste. How can you be a Brahmin without change of the present day? In the former times, Vishwamitra was born as Kshatriya, by penance he called himself a `Brahmarshi'. Indra and other gods said, `If our guru Vashishta calls you `Brahmarshi' we shall follow his verdict.' Vashishta did not address Vishwamitra as `Brahmarshi' Vishwamitra was enraged and he killed 100 sons of Vashishta and came to eat the flesh of the corpse. Thus the bhasma touched the dead body of the Brahmin. He being a sinner, was being taken by the Yamadoots. But as his body had the marks of bhasma, Shivadoots also came to carry him to Shiva's place. The Shivadoots attacked the Yamadoots, who then left the Brahmin's corpse and complained to Yama, who came to the Shivadoots and angrily asked them. "Why did you take that sinful Brahmin from mymen?" The Shivadoots told him, "The body of the Brahmin and marks of bhasma on it and so as per Shiva's orders we are taking him to touch the body, with marks of Bhasma." Being satisfied Yama then went away.

Brahma rakshas said, `When I was the king, I had constructed a tank in a forest and had given some land to the Brahmins. So as told by Yama, I had the fortune to see you in this 25th life. Kindly tell me how bhasma is to be applied and liberate me from the cycle of births and deaths.'

Wamdeo said, `Shri Shankar had gone to Mandrachal along with his Rudragan. Indra, Brahmadeo, Vashishta, Narad, Yaksh, gandharva and Rishis also had come there to see Shri Shankar. who was seated on a beautiful throne, having seven back grounds, all very bright and made of precious stones. He had the Moon on his forehead, locks of hair on his head, Takshak on one ear and Vasuki on the other and wreaths of serpents around this neck. He had trishul in one hand, Damaru (drum) in the second, sword hands, held different weapons. He was sitting with Parwati devi, who was wearing rich clothes and ornaments.

Sanatkumar requested Shri Shankar to tell some means by which one couln attain all the four Purusharthas.

Shri Shankar said, 'have tripundra (3 lines) on the forehead and apply bhasma on the body. This will destroy all the sins, such as taking the wealth of others, enjoying with others, wives, cajoling, giving false witness, stealing of cow, land, gold or til, selling milk, flesh,salt and doing adultry etc and after deat one goes to heaven.

Wamdeo gave enchanted Bhasma to the Brahma Rakshas who applied it to his body and had tripundra on his forehead. He was at once transformed into a celestial person and a plane descended to take him to the heaven.

Though Bhasma has much greatness, the greatness of Shri Guru is stll more and so due to the favour of Wamdeo the Brahma Rakshas was liberated".



श्रीगणेशाय नमः ।

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांग आम्हांसी । उल्हास माझे मानसी । गुरुचरित्र अतिगोड ॥१॥
सिद्ध म्हणे नामधारका । कथा असे अतिविशेष । ऐकता जाती सर्व दोष । ज्ञानज्योतिप्रकाशे ॥२॥
श्रीगुरु म्हणती पतितासी । आपुले पूर्वजन्म पुससी । सांगेन ऐक परियेसी । चांडालजन्म होणार गति ॥३॥
पुण्यपापांची गति । आपुले आर्जव भोगिती । कर्मविपाकी असे ख्याति । नीचश्रेष्ठकर्मानुसारी ॥४॥
विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण । यांचेपासाव चांडाल वर्ण । उपजला असता ज्ञातिहीन । जातिविभाग कर्मापरी ॥५॥
विप्रस्त्रियेपासी देखा । शूद्र जाय व्यभिचारिका । पिंड उपजे तो चांडालिका । सोळावी जाती चांडाल ॥६॥
हे मूळ उत्पत्तीचे लक्षण । नाना दोषांचे आचरण । तेणे हीन जन्म घेणे । विप्रादि चारी वर्णांसी ॥७॥
या दोषाचा विस्तार । सांगतो की सविस्तर । विप्रे करिता अनाचा । जन्म हीनजाती पावे ॥८॥
गुरु अथवा मातापिता । सांडोनि जाय तत्त्वतां । चांडालजन्म होय निरुता । सोडिता कुलस्त्रियेसी ॥९॥
कुलदेवता सोडोनि एका । पूजा करी आणिका । तो होय चांडाल देखा । सदा अनृत बोले नर ॥१०॥
सदा जीवहिंसा करी । कन्याविक्रय मनोहरी । लटिकेचि आपण प्रमाण करी । तोही जन्मे चांडालयोनी ॥११॥
शूद्रहस्ते करी भोजन । अश्वविक्रय करी ब्राह्मण । तोही चांडाल होय जाण । सदा शूद्रसंपर्कै ॥१२॥
शूद्रस्त्रीसी सदा संग । नित्य असे दासीयोग । गृहभांड अतळती त्याग । तेणे देवपितृकर्मे करी ॥१३॥
तोही पावे हीनयोनी । जो का अग्नि-घाली रानी । गायवासरांसी विघडोनि । वेगळी करी तोही । होय चांडाल ॥१४॥
सोडी आपुल्या जननीते । आणि मारी लेकराते । वेगळी करी आपुल्या सत्ते । तोही जन्मे चांडाल ॥१५॥
बैलावरी विप्र बैसे । शूद्रान्न जेवी हर्षे । चांडाल होय भरवसे । ऐसे म्हणती श्रीगुरु ॥१६॥
विप्र तीर्थास जावोन । श्राद्धादि न करी जाण । परान्न प्रतिग्रह घेणे । तो होय चांडाल ॥१७॥
षट्‍कर्मेरहित विप्र देखा । कपिला गाईचे दुग्ध ऐका । न करिता अभिषेका । क्षीरपान जो करी ॥१८॥
तोही पावे चांडालयोनी । तुळसीपत्रे ओरपोनि । पूजा करी देवांलागोनि । शालिग्राम शूद्रे भजलिया ॥१९॥
न सेवीच मातापिता । त्यजी त्यासी न प्रतिपाळिता । चांडाल होय जन्मता । सप्तजन्मी कृमि होय ॥२०॥
पहिली एक स्त्री असता । दुजी करोनि तिसी त्यजिता । होय जन्म त्यासी पतिता । आणिक सांगेन एक नवल ॥२१॥
श्रमोनि अतिथी आला असता । वेद म्हणवोनि अन्न घालिता । जन्म पावे हा तत्त्वता । चांडालयोनी परियेसा ॥२२॥
योग्य विप्रांते निंदिती । आणिक जाती पूजिती । चांडालयोनी जाती । वृत्तिलोप केलिया ॥२३॥
तळी विहिरी फोडी मोडी । शिवालयी पूजा तोडी । ब्राह्मणांची घरे मोडी । तोही जन्मे पतितकुळी ॥२४॥
स्वामिस्त्रियेसी । शत्रुमित्रविश्वासस्त्रीसी । जो करी व्याभिचारासी । तोही जन्मे पतितागृही ॥२५॥
दोघी स्त्रिया जयासी । त्यात ठेवी प्रपंचेसी । अतिथि आलिया अस्तमानासी । ग्रास न दे तोही पतित होय ॥२६॥
त्रिसंध्यासमयी देखा । जो विप्र जेवी अविवेका । भाक देउनी फिरे निका । तो जन्मे चांडालयोनी ॥२७॥
राजे देती भूमिदान । आपण घेती हिरोन । संध्याकाली करी शयन । तोही होय चांडाल ॥२८॥
वैश्वदेवकालि अतिथीसी । जो करी दुष्टोत्तरेसी । अन्न न देई तयासी । कुक्कुटजन्म होवोनि उपजे ॥२९॥
गंगातीर्थांची निंदा करी । एकादशी भोजन करी । स्वामीस सोडी समरी । चांडालयोनी तया जन्म ॥३०॥
स्त्री संभोगी पर्वणीसी । अथवा हरिहरादिवशी । वेद शिकवी शूद्रासी । चांडालयोनी जन्म पावे ॥३१॥
मृत्युदिवसी न करी श्राद्ध । केले पुण्य सांगे प्रसिद्ध । वाटेकरांसी करी भेद । चांडालयोनी जन्म पावे ॥३२॥
ग्रीष्मकाली अरण्यात । पोई घालिती ज्ञानवंत । तेथे विघ्न जो करी । तोही जन्मे चांडालयोनी ॥३३॥
नाडीभेद न कळता वैद्यकी । जाणोनि औषधे दे आणिकी । तो होय महापातकी । चांडालयोनीत संभवे ॥३४॥
जारण मारण मोहनादि । मंत्र जपती कुबुद्धि । जन्म चांडाल होय त्रिशुद्धी । वेदमार्ग त्यजिता विप्रे ॥३५॥
श्रीगुरुसी नर म्हणे कोण । हरिहराते निंदे जाण । अन्य देवतांचे करी पूजन । तो नर पतित होय ॥३६॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । आपुले कर्म त्यजूनि मंद । आणिक कर्म आचरे सदा । तोही होय चांडाल ॥३७॥
शूद्रापासूनी मंत्र शिके । त्यासी घडती सर्व पातके । गंगोदक क्षीरोदके । श्वानचर्मी घातले परी ॥३८॥
विधवा स्त्रीशी संग करी । शिव्या देऊन अतिथि जेववी घरी । श्राद्धदिनी पिंड न करी । चांडालयोनी तो जन्मे ॥३९॥
माता पिता गुरु द्वेषी । तो जन्मे चांडालयोनीसी । आणिक जन्म पापवंशी । उपजोनि येती परियेसा ॥४०॥
गुरूची निंदा करी हर्षी । सदा असे विप्रद्वेषी । वेदचर्चा करी बहुवशी । तो होय ब्रह्मराक्षस ॥४१॥
भजे आपण एक दैवत । दुजे देव निंदा करीत । तो होय अपस्मारित । दरिद्ररूपे पीडतसे ॥४२॥
माता पिता गुरु वर्जोन । वेगळा होय स्त्री आपण । बेरडाचे पोटी उपजोन । रोगी होऊन राहतसे ॥४३॥
सदा वेद दूषी आपण । अवमानीत ब्राह्मण । कर्मभ्रष्ट होय आपण । मूत्रकृच्छ्ररोगी होय ॥४४॥
लोकांचे वर्मकर्म आपण । सदा करी उच्चारण । ह्रदयरोगी होय जाण । महाकष्ट भोगीतसे ॥४५॥
गर्भपात करी स्त्रियेसी । वांझ होवोनि उपजे परियेसी । पुत्र झालिया मरती त्वरेसी । गर्भपात करू नये ॥४६॥
धर्मशास्त्रादि पुराण । सांगता नायके जाण । आणिक जेविता दृष्टि आपण । बहिरट होवोनि उपजे ॥४७॥
पतितासवे करी इष्टती । गर्दभजन्म पावती । त्यासी रस औषध घेती । मृगयोनी जन्मे तो ॥४८॥
ब्रह्महत्या केली जरी । क्षयरोगी होय निर्धारी । सुरापानी ओळखा परी । श्यामदंत उपजेल ॥४९॥
अश्ववध गोवध करिता । वांझ ज्वरी होय निश्चिता । सवेचि होय अनुतप्तता । दोष काही नाही त्यासी ॥५०॥
विश्वासघातकी नरासी । जन्म होय ऐसा त्यासी । अन्न जेविता वांति उर्वशी । अन्नवैरी तो होय ॥५१॥
सेवक एकाचा चाळवोन । घेवोनि जाती जे जन । त्यासी होय जाण बंधन । कारागृह भोगीतसे ॥५२॥
सर्पजाती मारी नर । सर्पयोनी पुढे निर्धार । ऐसे दोष अपार । आता तस्कर प्रकरण सांगेन ॥५३॥
स्त्रियांते चोरूनि घेऊनि जाय । मतिहीन जन्म होय । सदा क्लेशी आपण होय । अंती जाय नरकासी ॥५४॥
सुवर्णचोरी करी नर । प्रमेहव्याधि होय निर्धार । पुस्तक चोरिता नर । अंध होउनि उपजे देखा ॥५५॥
वेस्त्रचोरी करी जरी । श्वित्री रोगी होय निर्धारी । गणद्रव्यचोरी घरी । ब्रह्मांडपुराणी बोलिले असे ॥५७॥
परद्रव्य-अपहार देखा । परदत्तापहार विशेषा । परद्वेषी नर ऐका । धान्य अपुत्री होउनि उपजे ॥५८॥
अन्नचोरी केलिया देखा । गुल्मव्याधि होय ऐका । धान्य करील तस्करिका । रक्तांग होय दुर्गंध शरीर ॥५९॥
का एखादा तैल चोरी । तोही दुर्गंधी पावे शरीरी । परस्त्रीब्रह्मस्व अपहारी । ब्रह्मराक्षसजन्म पावे ॥६०॥
मोती माणिक रत्‍ने देखा । चोरी करी नर ऐका । हीनजातीसी जन्म निका । पावे नर अवधारा ॥६१॥
पत्रशाखादि फळे चोरी । खरूजी होय अपरंपारी । रक्तांगी होय निर्धारी । गोचिड होय तो नर ॥६२॥
कांस्य लोह कर्पास लवण । तस्करिता नरा जाण । श्वेतकुष्ठ होय निर्गुण । विचारोनि रहाटावे ॥६३॥
देवद्रव्यापहारी देखा । देवकार्यनाश अपहार देखा । पंडुरोगी तो निका । फळचोरी विद्रूपी ॥६४॥
परनिक्षेपचोरी करी देखा । करिता होय सदा शोका । धनतस्कर उंष्ट्र ऐका । जन्म पावे अवधारा ॥६५॥
फलचोरी होय वनचर । जलचोरही होय कावळा थोर । गृहोपकरणे तस्कर । काकजन्म तो पावे ॥६६॥
मधुतस्कर अवधारी । जन्म पावे होय घारी । गोरस करी चोरी । कुष्ठी होय परियेसा ॥६७॥
श्रीगुरु म्हणती पतितासी । जन्म पावे ऐसिया दोषी । आता सांगेन व्यभिचारप्रकरणेसी । शांतिपर्वी बोलिले असे ॥६८॥
परस्त्री आलिंगिया देखा । शतजन्म श्वान निका । पुढे मागुती सप्तजन्मिका । भोगी दुःखा अवधारा ॥६९॥
परस्त्रीयोनी पाहे दृष्टीने । जन्मे तो अंधत्वपणे । बंधुभार्यासंपर्क करणे । गर्दभजन्म तो पावे ॥७०॥
तोही जन्म सोडोनि । निघोनि जाय सर्पयोनी । पुन्हा नरकी जावोनि । नाना कष्ट भोगीतसे ॥७१॥
सखीभार्यासवे ऐका । मातुलस्त्री असे विशेखा । येखादा करी संपर्का । श्वानयोनी जन्म पावे ॥७२॥
परस्त्रियांचे वदन । न करावे कदा अवलोकन । कुबुद्धी करिता निरीक्षण । चक्षुरोगी होऊनि उपजे ॥७३॥
आपण असे शूद्रजाति । विप्रस्त्रीशी करी रति । ती दोघेही कृमि होती । हे निश्चित अवधारा ॥७४॥
सदा शूद्रसंपर्क करी । याची स्त्री व्यभिचारी । जन्म पावे हो कुतरी । महादोष बोलिलासे ॥७५॥
ऐसे तया पतिताप्रती । श्रीगुरु आपण निरोपिती । ऐकत होता त्रिविक्रमभारती । प्रश्न केला श्रीगुरूसी ॥७६॥
स्वामी निरोपिले धर्म सकळ । ऐकता होय मन निर्मळ । जरी घडले एक वेळ । पाप जाय कवणेपरी ॥७७॥
श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी । प्रायश्चित्त असे पापासी । पश्चात्ताप होय ज्यासी । पाप नाही सर्वथा ॥७८॥
पाप असे थोर केले । अंतःकरणी असे खोचले । त्यासी प्रायश्चित्त भले । कर्मविपाकी बोलिले ॥७९॥
प्रायश्चित्तांची विधाने । सांगेन ऐका स्थिर मने । अनेक ऋषींची वचने । ती सांगेन ऐका तुम्ही ॥८०॥
प्रथम व्हावा ब्रह्मदंड । तेणे होय पापखंड । गोदाने सालंकृत अखंड । अशक्त तरी द्रव्य द्यावे ॥८१॥
निष्क अथवा अर्धनिष्क । सूक्ष्म पाप पाव निष्क । स्थूलसूक्ष्म असेल पातक । तेणे विधीं द्रव्य द्यावे ॥८२॥
अज्ञानकृत पापासी । पश्चात्तापे शुद्धि परियेसी । गुरुसेवा तत्परेसी । केलिया गुरु निवारी ॥८३॥
नेणता पाप केलियासी । प्रायश्चित्त असे परियेसी । प्राणायाम द्विशतेसी । पुण्यतीर्थी दहा स्नाने ॥८४॥
तीन गुंजा सुवर्ण द्यावे । नदी आचरावे दोन गावे । सौम्य पातक याचि भावे । जाती पापे परियेसी ॥८५॥
स्त्रीपुरुष दोघांत एक । करिती पुण्यपाप दोष । दोघेही पडती दोषात । दोघे आचरावे प्रायश्चित्त ॥८६॥
आणिक एक असे प्रकार । जेणे पाप होय दूर । गायत्रीजप दहा सहस्त्र । करावा तेणे वेदमंत्र ॥८७॥
याचे नाव गायत्रीकृच्छ । महादोषी करी पवित्र । ऐसे करावे विचित्र । श्रीगुरु सांगती त्रिविक्रमासी ॥८८॥
प्राजापत्यकृच्छ्र देखा । असे विधि अतिविशेषा । भोजन करावे मुक्त एका । अथवा अयाचित भिक्षा ॥८९॥
उपवास करावे तीन दिवस । स्मरावे गुरुचरणास । येणे जाती सौम्य दोष । जे आपणासी सामान्य ॥९०॥
’अतिकच्छ्र’ असे एक । एकचित्ते मुनि ऐक । दोष असतील सामान्यक । अज्ञानेचि केलिया ॥९१॥
अन्न घ्यावे सप्तविंशति ग्रास । सकाळी बारा रात्री पंचदश । अथवा दोनी अष्ट ग्रास । अयाचित अन्न द्यावे ॥९२॥
ऐसे सौम्य पातकासी । विधि असती परियेसी । मास एक नेमेसी । अंजुली एक जेवावे ॥९३॥
उपवास तीन करावे देखा । प्रकार सांगेन आणिका । तीन दिन उपोषका । घृतपारणे करावे ॥९४॥
तीन दिवस घृत घेवोनि । क्षीर घ्यावे दिवस तीनी । तीन दिवस वायु भक्षोनि । पुनः क्षीर एक दिवस ॥९५॥
एखादा असेल अशक्त । तयासी असे एक व्रत । तीळ गुळ लाह्या पीठ । उपवास एक करावा ॥९६॥
पूर्णकृच्छ्र करा ऐसी । पर्णोदक घ्यावे प्रतिदिवशी । करावे तितके उपवासी । पश्चात्तापे प्राशन कीजे ॥९७॥
कमल बिल्व अश्वत्थ । कुशोदक बिंदु नित्य । पान करावे सत्य । पर्णकृच्छ्र परियेसा ॥९८॥
आणिक एक प्रकार । करी चांद्रायण-आचार । कुक्कुटांडप्रमाण आहार । ग्रास घ्यावे वर्धमानी ॥९९॥
अमावास्येसी एक ग्रास । पौर्णिमेसी पंचदश । कृष्णपक्षी उतरत । दुसरे मासी हविष्यान्न ॥१००॥
आपले पाप प्रगटूनि । उच्चारावे सभास्थानी । पश्चात्तापे जळूनि । पाप जाय अवधारा ॥१॥
आता सांगेन तीर्थकृच्छ्र । यात्रा करावी पवित्र । वाराणसी श्वेतपर्वत । स्नानमात्रे पापे जाती ॥२॥
वरकड तीर्थी गेलियासी । गायत्रीजप सहस्त्रेसी । पाप जाय त्वरेसी । अगस्तीवचन बोलिले असे ॥३॥
समुद्रसेतुबंधेसी । स्नान केलिया परियेसी । भ्रूणहत्यापाप नाशी । कृतघ्नादि पातके ॥४॥
विधिपूर्वक शुचीसी । जप कोटी गायत्रीसी । ब्रह्महत्यापाप नाशी । ऐके त्रिविक्रम एकचित्ते ॥५॥
लक्ष गायत्री जप केलिया । सुरापानपाप जाय लया । सुवर्णचोरी केलिया । सात लक्ष जपावे ॥६॥
अष्ट लक्ष गुरुतल्पगासी । गायत्री जपता पाप नाशी । आता सांगेन परियेसी । वेदाक्षरे पाप दूर ॥७॥
पवमानसूक्त चत्वारी । पठण करिता ब्रह्महत्या दूरी । इंद्रमित्र अवधारी । एक मास जपावे ॥८॥
सुरापानादि पातके । जातील येणे सूक्तके । शुनःशेपा नाम सूक्ते । सुवर्णहरा पाप जाय ॥९॥
पवमानशन्नसूक्त । पठण करिता हविष्योक्त । मास एक पठत । गुरुतल्पगादिक हरती ॥११०॥
पंच मास सहा मास । मिताहर करुनी पुरुष । पुरुषसूक्ते कर्मनाश । पंचमहापापे नासती ॥११॥
त्रिमधु म्हणेजे मंत्रसूक्त । सुवर्णात्रीनास मंत्र । जपावे नाचिकेत । समस्त पातके प्रायश्चित्त ॥१२॥
नारायणपन्न देखा । जपावे भक्तिपूर्वका । नाशी पंच महापातका । प्रीतिपूर्वक जपावे ॥१३॥
त्रिपदा नाम गायत्रीसी । जपती जे भक्तीसी । अघमर्षण त्रिरावृत्तेसी । सप्त जन्म पाप जाय ॥१४॥
अपांमध्य पन्नासी । तद्विष्णो नाम सूक्तेसी । जपती जे जन भक्तीसी । सप्त जन्म पाप जाय ॥१५॥
आणिक असे विधान देखा । अज्ञानकृत दोषादिका । अनुतप्त होवोनि विशेषा । पंचगव्य प्राशन कीजे ॥१६॥
गोमूत्र गोमय क्षीर । दधि घृत कुशसार । विधिमंत्रे घ्यावे निर्धार । पहिले दिनी उपवास ॥१७॥
नीलवर्ण गोमूत्र । कृष्णगोमय पवित्र । ताम्र गायत्रीचे क्षीर । श्वेतधेनूचे दधि घ्यावे ॥१८॥
कपिला गाईचे तूप बरवे । ऐसे पंचगव्य बरवे घ्यावे । एकेकाचे क्लप्त भावे । सांगेन सर्व अवधारा ॥१९॥
गोमूत्र घ्यावे पावशेर। अंगुष्ठपर्व गोमय पवित्र । क्षीर पावणे दोन शेर । दधि तीन पाव घ्यावे ॥१२०॥
घृत घ्यावे पाव शेर । तितुकेचि मिळवावे कुशनीर । घेता मंत्र उच्चार । विस्तारोनि सांगेन ॥२१॥
कुशांसहित सहा रसे । एकेकासी मंत्र पृथक्‍ असे । प्रथम मंत्र इरावती असे । इदं विष्णु दुजा देख ॥२२॥
मानस्तोक मंत्र तिसरा । प्रजापति चतुर्थ अवधारा । पंचम गायत्री उच्चारा । सहावी व्याह्रति प्रणवपूर्वका ॥२३॥
ऐसे मंत्रोनि पंचगव्य । प्यावे अनुतप्त एकभाव । अस्थिगत चर्मगत पूर्व । पापे जाती अवधारा ॥२४॥
गाई न मिळता इतुके जिन्नसी । कपिला गाय मुख्य परियेसी । दर्शनमात्रे दोष नाशी । कपिला गाई उत्तम ॥२५॥
पंचमहापातक नावे । ब्रह्महत्या सुरापान जाणावे । स्वर्णस्तेय गुरुतल्पग जाणावे । पाचवा त्यासवे मिळालेला ॥२६॥
चौघे पातकी देखा । पाचवा तया मिळता देखा । त्यासहित पंचमहापातका । आहेती पापे परियेसा ॥२७॥
सुरापानी ब्रह्मघातकी । सुवर्णस्तेय गुरुतल्पकी । पाचवा महाघातकी । जो सानुकूळ मिळे तो ॥२८॥
ऐसे पातक घडे त्यासी । प्रायश्चित्त परियेसी । श्रीगुरुसंतोषी । अनुग्रहे पुनीत ॥२९॥
एखादा मिळेल शास्त्रज्ञ । स्वधर्माचारे अभिज्ञ । त्याच्या अनुग्रहे पापघ्न । पुनीत होय अवधारा ॥१३०॥
ऐसे श्रीगुरु त्रिक्रमासी । प्रायश्चित्त सांगती परियेसी । सकल विप्र संतोषी । ज्ञानप्रकाशे होती ॥३१॥
श्रीगुरु म्हणती पतितासी । पूर्वी तू विप्र होतासी । माता पिता गुरु दूषी । तेणे होय चांडालजन्म ॥३२॥
आता सांगतो ऐक । स्नानसंगमी मास एक । केलिया दोष जाती निःशंक । पुनः विप्रजन्म होसी ॥३३॥
पतित म्हणे स्वामीसी । तव दर्शन जाहले आम्हांसी । कावळा जाता मानसासी । राजहंस तो होतसे ॥३४॥
तैस तव दर्शनमात्रे । पवित्र झाली सकळ गात्रे । तारावे आता त्वा कृपापात्रे । शरणागतासी ॥३५॥
परिस लागता लोखंडासी । सुवर्ण होय तत्क्षणेसी । सुवर्ण मागुती लोहासी । केवी मिळे स्वामिया ॥३६॥
तव दर्शनसुधारसी । आपण झालो ज्ञानराशी । अभिमंत्रोनि आम्हांसी । विप्रांमध्ये मिळवावे ॥३७॥
ऐकोनि तयाचे वचन । गुरु बोलती हासोन । तव देह जातिहीन । विप्र केवी म्हणतील ॥३८॥
पतिताच्या गृहासी । उपजोनि तू वाढलासी । ब्रह्मत्व केवी पावसी । विप्र निंदा करितील ॥३९॥
पूर्वी ऐसा विश्वामित्र । क्षत्रियवंशी गाधिपुत्र । तपोबळे म्हणवी पवित्र । म्हणे तो विप्र आपणा ॥१४०॥
ब्रह्मयाची शत वर्षे । तप केले महाक्लेशे । त्याचे बळे म्हणवीतसे । ब्रह्मऋषी आपणा ॥४१॥
इंद्रादि सुरवरांसी । विनविता झाला परियेसी । आपणाते ब्रह्मर्षि । म्हणा ऐसे बोलतसे ॥४२॥
देव म्हणती तयासी । आम्हा गुरु वसिष्ठ ऋषि । जरी तो बोले ब्रह्मऋषि । तरी आम्ही अंगिकारू ॥४३॥
मग त्या वसिष्ठासी । विनवी विश्वामित्र ऋषि । विप्र म्हणा आपणासी । केले तप बहुकाळ ॥४४॥
वसिष्ठ म्हणे विश्वामित्र । क्षत्रिय तपास अपात्र । देह टाकोनि मग पवित्र । विप्रकुळी जन्मावे ॥४५॥
मग तुझा होईल व्रतबंध । होईल गायत्रीप्रबोध । तधी तुवा होसी शुद्ध । ब्रह्मऋषि नाम तुझे ॥४६॥
काही केल्या न म्हणे विप्र । मग कोपला विश्वामित्र । वसिष्ठाचे शत पुत्र । मारिता झाला तये वेळी ॥४७॥
ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषि । नव्हे कदा तामसी । अथवा न म्हणे ब्रह्मऋषि । तया विश्वामित्रासी ॥४८॥
वर्तता ऐसे एके दिवसी । विश्वामित्र कोपेसी । हाती घेउनी पर्वतासी । घालू आला वसिष्ठावरी ॥४९॥
विचार करीत मागुती मनी । जरी वधीन वसिष्ठमुनि । आपणाते न म्हणे कोणी । ब्रह्मऋषि म्हणोनिया ॥१५०॥
इंद्रादि देव समस्त ऋषि । म्हणती वसिष्ठवाक्यासरसी । आपण म्हणो ब्रह्मऋषि । अन्यथा नाही म्हणोनिया ॥५१॥
ऐशा वसिष्ठमुनीस । मारिता यासी फार दोष । म्हणोनि टाकी गिरिवरास । भूमीवरी परियेसा ॥५२॥
अनुतप्त झाला अंतःकरणी । वसिष्ठे ते ओळखूनि । ब्रह्मऋषि म्हणोनि । पाचारिले तये वेळी ॥५३॥
संतोषोनि विश्वामित्र । म्हणे बोल बोलिला पवित्र । म्हणे घरी अन्नमात्र । तुम्ही घ्यावे स्वामिया ॥५४॥
संतोषोनि वसिष्ठ । तयालागी बोलत । म्हणे शरीर हे निभ्रांत । सूर्यकिरणी पचवावे ॥५५॥
विश्वामित्रे अंगिकारिले । सूर्यकिरणे देहा जाळिले । सहस्त्रकिरणी तापले । देह सर्व भस्म झाला ॥५६॥
विश्वामित्र महामुनि । अतिसामर्थ्य अनुष्ठानी । पहिला देह जाळोनि । नूतन देह धरियेला ॥५७॥
ब्रह्मर्षि तेथोन । विश्वामित्र झाला जाण । सकळांसी मान्य । महाराज ॥५८॥
मग म्हणती सकळ मुनि । विश्वामित्र ब्रह्मज्ञानी । ब्रह्मऋषी म्हणोनि । झाला त्रिभुवनी प्रख्यात ॥५९॥
या कारणे तव देह । विसर्जावा जन्म इह । अनुतप्त तव भाव । ब्रह्मकुल भाविसी ॥१६०॥
ऐसे त्या पतितासी । बोधिता गुरु परियेसी । लाधले सुख त्यासी । त्याच्या मानसी न ये काही ॥६१॥
निधान सापडे दरिद्र्यासी । तो का सांडील संतोषी । अमृत सापडता रोग्यासी । का सांडील जीवित्व ॥६२॥
एखादे ढोर उपवासी । पावे तृणबिढारासी । तेथोनि जावया त्यासी । मन नव्हे सर्वथा ॥६३॥
तैसे त्या पतितासी । लागले ध्यान गुरूसी । न जाय आपुल्या मंदिरासी । विप्र आपणा म्हणतसे ॥६४॥
इतुके होता ते अवसरी । आली त्यांची पुत्रनारी । म्हणो लागले अपस्मारी । म्हणोनि आलो धावत ॥६५॥
जवळ येता स्त्रियेसी । स्पर्शो नको म्हणे तिसी । कोपेकरोनि मारावयासी । जात असे तो पतित ॥६६॥
दुःख करी ती भार्या । दुरुनी नमे गुरुपाया । पति माते सोडोनिया । जातो आता काय करू ॥६७॥
कन्या पुत्र मज बहुत । तया कोण पाळित । आम्हा सांडोनि जातो किमर्थ । सांगा तयासी स्वामिया ॥६८॥
जरी न सांगाल स्वामी त्यासी । त्यजीन प्राण पुत्रासरसी । येरवी आपणाते कोण पोषी । अनाथ मी स्वामिया ॥६९॥
ऐकोनि तियेचे वचन । गुरु बोलती हासोन । त्या नराते बोलावून । सांगताती परियेसा ॥१७०॥
गुरु म्हणती पतितासी । जावे आपुल्या घरासी । पुत्रकलश क्षोभता दोषी । तूते केवी गति होय ॥७१॥
या संसारी जन्मोनिया । संतोषवावे इंद्रिया । मग पावे धर्मकाया । तरीच तरे भवार्णव ॥७२॥
या कारणे पूर्वीच जाणा । न करावी आपण अंगना । करोनि तिसी त्यजिता जाणा । महादोष बोलिजे ॥७३॥
सूर्य-भूमी-साक्षीसी । तुवा वरिले स्त्रियेसी । तीस त्यागिता महादोषी । तूते नव्हे गति जाण ॥७४॥
श्रीगुरुवचन ऐकोन । विनवीतसे कर जोडून । केवी होऊ जातिहीन । ज्ञान होवोनि मागुती ॥७५॥
श्रीगुरु मनी विचारिती । याचे अंगी असे विभूति । प्रक्षाळावे लुब्धका-हाती । अज्ञानत्व पावेल ॥७६॥
ऐसे मनी विचारूनि । सांगती शिष्यासी बोलावोनि । एका लुब्धका पाचारोनि । आणा अतित्वरेसी ॥७७॥
तया ग्रामी द्विज एक । करी उदीम वाणिक । तयाते पाचारिती ऐक । तया पतितासन्निध ॥७८॥
श्रीगुरु म्हणती त्यासी । उदक घेवोनि हस्तेसी । स्नपन करी गा पतितासी । होय आसक्त संसारी ॥७९॥
आज्ञा होता ब्राह्मण । आला उदक घेऊन । त्यावरी घालिता तत्‌क्षण । गेली विभूति धुवोनि ॥८०॥
विभूति धूता पतिताचे । झाले अज्ञान मन त्याचे । मुख पाहता स्त्री-पुत्रांचे । धावत गेला त्याजवळी ॥८१॥
आलिंगोनिया पुत्रासी । भ्रांति म्हणे त्यासी । का आलो या स्थळासी । तुम्ही आला कवण कार्या ॥८२॥
ऐसा मनी विस्मय करीत । निघोनि घरा गेला पतित । सांगितला वृत्तान्त । विस्मय सर्व करिताती ॥८३॥
इतुके झाले कौतुक । पहाती नगरलोक । विस्मय करिती सकळिक । म्हणती अभिनव काय झाले ॥८४॥
त्रिविक्रमभारती मुनि । जो का होता गुरुसन्निधानी । पुसतसे विनवोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥८५॥
त्रिविक्रम म्हणे श्रीगुरूसी । होतो संदेह मानसी । निरोप द्यावा कृपेसी । विनंती एक अवधारा ॥८६॥
महापतित जातिहीन जाण । तयाते दिधले दिव्यज्ञान । अंग धुता तत्‌क्षण । गेले ज्ञान केवी त्याचे ॥८७॥
विस्तारोनि आम्हांसी । निरोपावे कृपेसी । म्हणोनि लागला चरणांसी । भावभक्ति करोनिया ॥८८॥
ऐसे पुत्र त्रिविक्रम यति । श्रीगुरु तया निरोपिती । त्याचे अंगाची विभूति । धुता गेले ज्ञान त्याचे ॥८९॥
ऐसे विभूतीचे महिमान । माहात्म्य असे पावन । सांच होय ब्रह्म पूर्ण । भस्ममहिमा अपार ॥१९०॥
गुरुवचन ऐकोनि । विनवीतसे त्रिविक्रम मुनि । देव गुरुशिरोमणि । भस्ममहिमा निरोपावा ॥९१॥
सिद्ध म्हणे शिष्यासी । भस्ममहिमा परियेसी । गुरु सांगता विस्तारेसी । एकचित्ते अवधारा ॥९२॥
म्हणोनि सरस्वतिगंगाधर । गुरुचरित्रविस्तार । ऐकता होय मनोहर । सकळाभीष्टे साधती ॥९३॥
पुढील कथा पावन । सांगे सिद्ध विस्तारोन । महाराष्ट्रभाषेकरून । सांगे सरस्वती गुरुदास ॥९४॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे कर्मविपाककथनं नाम अष्टाविंशोऽध्यायः ॥२८॥
ओवीसंख्या ॥१९५॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

2 comments:

  1. Recheck this article. Some part of vishwamitra's story is missing and in the end it has the story of 29th adhyay.

    ReplyDelete
  2. श्री गुरूदेव दत्त

    ReplyDelete