Sunday, January 23, 2011

Gurucharitra - Adhyay 29

Chapter 29 The greatness of Bhasma is explained to Trivikrambharati with Vamdev story.

CHAPTER 29

The Great Power of Bhasma.

Trivikrama bowed to Sri Guru and asked. "Oh Guru, how did the Chandala get knowledge. and how did it vanish after the bath?"


Sri Guru said,"He received knowledge when I sprinkled Vibhuti, the sacred ashes on him. His knowledge disappeared when the ashes disappeared. One who applies Vibhuti will become pure and whole and get knowledge of Brahman." Then He narrated a story:

In Krithayuga there was a Mahayogi named Vamadeva. He used to apply Bhasma to His body. He was without pride and desire. Once He wandered into a forest named Krauncharanya. There a demon came to eat Him. But as He held Vamadeva, some bhasma on Vamadeva's body rubbed off onto his body. As a result, the demon's sins were washed away and he received enlightenment. "Oh, Trivikrama, one's sins are washed away on one's coming into contact with a person of good character and integrity."

The demon bowed to Vamadeva and prayed for redemption. Sri Guru asked the demon about him. The demon said,""Now I remember my 25 previous births, before which I was a king named Durjaya. I was a wicked king, harassed my citizens, including women, and drank alcohol. Due to all this I had to go to hell and become a ghost for a hundred years. Then I took birth as a dog, a jackal, and other animals. I was tired of all these births. Then I became a demon. Although I eat so many animals, I am still hungry. So I came to eat You. But the contact with Your body has washed my sins away. I have attained peace and acquired knowledge. Oh compassionate one, redeem me, and explain to me how I attained knowledge due to contact with the Bhasma on Your body."

Vamadeva said, "The power of Bhasma is great and limitless. You touched my body on which I had applied the sacred ashes." With these words he put the power of the Shiva mantra into the Bhasma and gave it to the demon to apply.

The demon said, "Oh Sri Jagadguru, I met You due to my good deeds in my previous birth. As a king I had built a water tank, and gave lands and cows to Brahmins,so now I have been rewarded. I have been purified." With these words he applied Bhasma to his body. On doing so he immediately got a heavenly body.

Vamadeva was an incarnation of Trimurthy (Dattatreya) in form of a Rishi. As Jagadguru He wandered from place to place to redeem humans. This demon bowed to Vamadeva and attained moksha. This was the story Sri Guru told to describe the glory of Bhasma.

The power of Bhasma is great. Even a demon was saved by it. But no Mantra is successful unless it is blessed by a Guru. That is why they say no salvation is possible without the Guru. He is the liberator and the protector.

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।

नामधारक विनवी सिद्धासी । मागे कथा निरोपिलीसी । भस्ममाहात्म्य श्रीगुरूसी । पुसिले त्रिविक्रमभारतीने ॥१॥

पुढे कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्री । निरोप द्यावा सविस्तारी । सिद्धमुनि कृपासिंधु ॥२॥

ऐसे विनवी शिष्य राणा । ऐकोनि सिद्ध प्रसन्नवदना । सांगतसे विस्तारून । भस्ममाहात्म्य परियेसा ॥३॥

श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी । भस्ममाहात्म्य मज पुससी । एकचित करूनि मानसी । सावधान ऐक पा ॥४॥

पूर्वापरी कृतयुगी । वामदेव म्हणिजे योगी । प्रसिद्ध गुरु तो जगी । वर्तत होता भूमीवरी ॥५॥

शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी । गृह-सारादि वर्जूनि । कामक्रोधादि त्यजूनि । हिंडत होता महीवरी ॥६॥

संतुष्ट निःस्पृह असे मौनी । भस्म सर्वांगी लावोनि । जटाधारी असे मुनि । वल्कल-वस्त्र व्याघ्राजिन ॥७॥

ऐसा मुनि भूमंडळात । नाना क्षेत्री असे हिंडत । पातला क्रौचारण्यात । जेथे नसे संचार मनुश्यमात्राचा ॥८॥

तया स्थानी असे एक । ब्रह्मराक्षस भयानक । मनुष्यादि जीव अनेक । भक्षीतसे परियेसा ॥९॥

ऐशा अघोर वनात । वामदेव गेला हिंडत । ब्रह्मराक्षस अवलोकित । आला घावोनि भक्षावया ॥१०॥

ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत । आला असे भक्षू म्हणत । करकरा दात खात । मुख पसरूनि जवळी आला ॥११॥

राक्षस येता देखोनि । वामदेव निःशंक धीर मनी । उभा असे महाज्ञानी । पातला राक्षस तयाजवळी ॥१२॥

राक्षस मनी संतोषत । ग्रास बरवा लाधला म्हणत । भक्षावया कांक्षा बहुत । येवोनि धरिला आलिंगोनि ॥१३॥

आलिंगिता मुनीश्वरासी । भस्म लागले राक्षसासी । जाहले ज्ञान तयासी । जातिस्मरण जन्मांतरीचे ॥१४॥

पातक गेले जळोनि । राक्षस झाला महाज्ञानी । जैसा लागता चिंतामणि । लोह सुवर्ण केवी होय ॥१५॥

जैसा मानससरोवरास । वायस जाता होय हंस । अमृत पाजिता मनुष्यास । देवत्व होय परियेसा ॥१६॥

जैसे का जंबूनदीत । घालिता मृत्तिका कांचन त्वरित । तैसा जाहला पापी पुनीत । मुनीश्वराचे अंगस्पर्श ॥१७॥

समस्त मिळती कामना । दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन । स्पर्श होता श्रीगुरुचरण । पापावेगळा होय नर ॥१८॥

ब्रह्मराक्षस भयानक । काय सांगो त्याची भूक । गजतुरग मनुष्यादिक । नित्य आहार करी सकळ ॥१९॥

इतुए भक्षिता तयासी । न वचे भूक परियेसी । तृषाक्रांत समुद्रासी । प्राशन करिता न वचे तृषा ॥२०॥

ऐसा पापिष्ट राक्षस । होता मुनीचा अंगस्पर्श । गेली क्षुधा-तृषा-आक्रोश । झाला ज्ञानी परियेसा ॥२१॥

राक्षस ज्ञानी होऊनि । लागला मुनीश्वराचे चरणी । त्राहि त्राहि गुरुशिरोमणि । तू साक्षात ईश्वर ॥२२॥

तारी तारी मुनिवरा । बुडालो अघोर सागरा । उद्धरावे दातारा । कृपासिंधु जगदीशा ॥२३॥

तुझ्या दर्शनमात्रेसी । जळत्या माझ्या पापराशी । तू कृपाळू भक्तांसी । तारी तारी जगद्गुरु ॥२४॥

येणेपरी मुनिवरास । विनवीतसे राक्षस । वामदेव कृपासुरस । पुसतसे तये वेळी ॥२५॥

वामदेव म्हणे तयासी । तुवा कवणाचा कवण वंशी । ऐसा अघोर ठायी वससी । मनुष्य मात्र नसे ते ठायी ॥२६॥

ऐकोनि मुनीचे वचन । ब्रह्मराक्षस करी नमन । विनवीतसे कर जोडोन । ऐक त्रिविक्रम मुनिराया ॥२७॥

म्हणे राक्षस तये वेळी । आपणासी ज्ञान जहाले सकळी । जातिस्मरण अनंतकाळी । पूर्वापरीचे स्वामिया ॥२८॥

तयामध्ये माझे दोष । उत्कृष्ट जन्म पंचवीस । दिसतसे प्रकाश । ऐक स्वामी वामदेवा ॥२९॥

पूर्वजन्मे पंचविसी । होया राजा यवन-देशी । ’दुर्जय’ नाम आपणासी । दुराचारी वर्तलो जाण ॥३०॥

म्या मारिले बहुत लोक । प्रजेसी दिधले दुःख । स्त्रिया वरिल्या अनेक । राज्यमदे करूनिया ॥३१॥

वरिल्या स्त्रियांव्यतिरिक्त । बलात्कारे धरिल्या अमित । एक दिवस देवोनि रति । पुनरपि न भोगी तयासी ॥३२॥

एके दिवशी एकीसी । रति देऊनि त्यजी तिसी । ठेविले अंतर्गृहासी । पुनरपि तीते न देखे नयनी ॥३३॥

ऐसे अनेक स्त्रियांसी । ठेविले म्या अंतर्गृहासी । माते शापिती अहर्निशी । दर्शन नेदी म्हणोनिया ॥३४॥

समस्त राजे जिंकोनिया । आणि स्त्रिया धरोनिया । एकेक दिवस भोगूनिया । त्याते ठेविले अंतर्गृहासी ॥३५॥

जेथे स्त्रिया सुरूपे असती । बळे आणोन देई मी रति । ज्या न येती संतोषवृत्ती । तया द्रव्य देऊनि आणवी ॥३६॥

विप्र होते माझे देशी । ते जाऊनि राहिले आणि देशी । जाऊनि आणी त्यांचे स्त्रियांसी । भोगी आपण उन्मत्तपणे ॥३७॥

पतिव्रता सुवासिनी । विधवा मुख्य करोनि । त्याते भोगी उन्मत्तपणी । रजस्वला स्त्रियांसी देखा ॥३८॥

विवाह न होता कन्यांसी । बलात्कारे भोगी त्यांसी । येणेपरी समस्त देशी । उपद्रविले मदांधपणे ॥३९॥

ब्राह्मणस्त्रिया तीन शते । शतचारी क्षत्रिया ते । वैश्यिणी वरिल्या षट्‍शत । शूद्रस्त्रिया सहस्त्र जाण ॥४०॥

एक शत चांडाळिणी । सहस्त्र वरिल्या पुलदिनी । पाच शत स्त्रिया डोंबिणी । रजकिणी वरिल्या शत चारी ॥४१॥

असंख्यात वारवनिता । भोगिल्या म्या उन्मत्तता । तथापि माझे मनी तृप्तता । नाही झाली स्वामिया ॥४२॥

इतुक्या स्त्रिया भोगून । संतुष्ट नव्हे माझे मन । विषयासक्त मद्यपान । करी नित्य उन्मत्ते ॥४३॥

वर्तता येणेपरी देखा । व्याधिष्ठ झालो यक्ष्मादिका । परराष्ट्रराजे चालोनि ऐका । राज्य हिरतले स्वामिया ॥४४॥

ऐसेपरी आपणासी । मरण जाहले परियेसी । नेले दूती यमपुरासी । मज नरकामध्ये घातले ॥४५॥

देवांसी सहस्त्र वर्षे देखा । दहा वेळ फिरविले ऐका । पितृसहित आपण देखा । नरक भोगिले येणेपरी ॥४६॥

पुढे जन्मलो प्रेतवंशी । विद्रूप देही परियेसी । सहस्त्र शिश्ने अंगासी । लागली असती परियेसी ॥४७॥

येणेपरी दिव्य शत वर्षे । कष्टलो बहु क्षुधार्थै । पुनरपि पावलो यमपंथ । अनंत कष्ट भोगिले ॥४८॥

दुसरा जन्म आपणासी । व्याघ्रजन्म जीवहिंसी । अजगर जन्म तृतीयेसी । चवथा जाहलो लांडगा ॥४९॥

पाचवा जन्म आपणासी । ग्रामसूकर परियेसी । सहावा जन्म जाहलो कैसी । सरडा होऊनि जन्मलो ॥५०॥

सातवा जन्म झालो श्वान । आठवा जंबुक मतिहीन । नवम जन्म रोही-हरण । दहावा झालो ससा देखा ॥५१॥

मर्कट जन्म एकादश । घारी झालो मी द्वादश । जन्म तेरावा मुंगूस । वायस जाहलो चतुर्दश ॥५२॥

जांबुवंत झालो पंचादश । रानकुक्कुट मी षोडश । जन्म जाहलो परियेस । पुढे येणेपरी अवधारी ॥५३॥

सप्तदश जन्मी आपण । गर्दभ झालो अक्षहीन । मार्जारयोनी । संभवून । आलो स्वामी अष्टादशेसी ॥५४॥

एकुणिसावे जन्मासी । मंडूक झालो परियेसी । कासवजन्म विशतीसी । एकविसावा मस्त्य झालो ॥५५॥

बाविसावा जन्म थोर । झालो तस्कर उंदीर । दिवांध झालो मी बधिर । उलूक जन्म तेविसावा ॥५६॥

जन्म चतुर्विशतीसी । झालो कुंजर तामसी । पंचविंशति जन्मासी । ब्रह्मराक्षस आपण देखा ॥५७॥

क्षुधाक्रांत अहर्निशी । कष्टतसे परियेसी । निराहारी अरण्यावासी । वर्ततसे स्वामिया ॥५८॥

तुम्हा देखता अंतःकरणी । वासना झालो भक्षीन म्हणोनि । यालागी आलो धावोनि । पापरूपी आपण देखा ॥५९॥

तुझा अंगस्पर्श होता । जातिस्मरण झाले आता । सहस्त्र जन्मीचे दुष्कृत । दिसतसे स्वामिया ॥६०॥

माते आता जन्म पुरे । तुझ्या अनुग्रहे मी तरे । घोरांधार संसार । आता यातना कडे करी ॥६१॥

तू तारक विश्वासी । म्हणोनि माते भेटलासी । तुझी दर्शनमहिमा कैसी । स्पर्श होता ज्ञान झाले ॥६२॥

भूमीवरी मनुष्य असती । तैसा रूप दिससी यति । परि तुझी महिमा ख्याति । निरुपम असे दातारा ॥६३॥

महापापी दुराचारी । आपण असे वनांतरी । तुझे अंगस्पर्शमात्री । ज्ञान जाहले अखिल जन्मांचे ॥६४॥

कैसा महिमा तुझ्या अंगी । ईश्वर होशील की जगी । आम्हा उद्धारावयालागी । आलासी स्वामी वामदेवा ॥६५॥

ऐसे म्हणता, राक्षसासी । वामदेव सांगे संतोषी । भस्ममहिमा आहे ऐशी । माझे अंगीची परियेसा ॥६६॥

सर्वांग माझे भस्मांकित । तुझे अंगा लागले क्वचित । त्याणे झाले तुज चेत । ज्ञानप्रकाश शत जन्मांतरीचे ॥६७॥

भस्ममहिमा अपरांपर । परि ब्रह्मादिका अगोचर । याचिकारणे कर्पूरगौर । भूषण करी सर्वांगी ॥६८॥

ईश्वरे वंदिल्या वस्तूसी । वर्णिता अशक्य आम्हांसी । तोचि शंकर व्योमकेशी । जाणे भस्ममहिमान ॥६९॥

जरी तू पुससी आम्हांसी । सांगेन दृष्टांत परियेसी । आम्ही देखिले दृष्टीसी । अपार महिमा भस्माचा ॥७०॥

विप्र एक द्रविडदेशी । आचारहीन परियेसी । सदा रत शूद्रिणीसी । कर्मभ्रष्ट वर्तत होता ॥७१॥

समस्त मिळोनि विप्रयाति । तया द्विजा बहिष्कारिती । मातापिता दाईज गोती । त्यजिती त्यासी बंधुवर्ग ॥७२॥

येणेपरी तो ब्राह्मण । प्रख्यात झाला आचारहीन । शूद्रिणीते वरून । होता काळ रमूनिया ॥७३॥

ऐसा पापी दुराचारी । तस्करविद्येने उदर भरी । आणिक स्त्रियांशी व्यभिचारी । उन्मत्तपणे परियेसा ॥७४॥

वर्तता ऐसे एके दिवसी । गेला होता व्यभिचारासी । तस्करविद्या करिता निशी । वधिले त्यासी एके शूद्र ॥७५॥

वधूनिया विप्रासी । ओढोनि नेले तेचि निशी । टाकिले बहिर्ग्रामेसी । अघोर स्थळी परियेसा ॥७६॥

श्वान एक तये नगरी । बैसला होता भस्मावरी । क्षुधाक्रांत अवसरी । गेला हिंडत प्रेतघ्राणी ॥७७॥

देखोनि तया प्रेतासी । गेला श्वान भक्षावयासी । प्रेतावरी बैसून हर्षी । क्षुधानिवारण करीत होता ॥७८॥

भस्म होते श्वानाचे पोटी । लागले प्रेताचे ललाटी । वक्षःस्थळी बाहुवटी । लागले भस्म परियेसा ॥७९॥

प्राण त्यजिता द्विजवर । नेत होते यमकिंकर । नानापरी करीत मार । यमपुरा नेताति ॥८०॥

कैलासपुरीचे शिवदूत । देखोनि आले ते प्रेत । भस्म सर्वांगी उद्धूलित । म्हणती याते कवणे नेले ॥८१॥

याते योग्य शिवपुर । केवी नेले ते यमकिंकर । म्हणोनि धावती वेगवक्त्रे । यमकिंकरा मारावया ॥८२॥

शिवदूत येता देखोनि । यमदूत जाती पळोनि । तया द्विजाते सोडूनि । गेले आपण यमपुरा ॥८३॥

जाऊनि सांगती यमासी । गेलो होतो भूमीसी । आणीत होतो पापियासी । अघोररूपेकरूनिया ॥८४॥

ते देखोनि शिवदूत । धावत आले मारू म्हणत । हिरोनि घेतले प्रेत । वधीत होते आम्हांसी ॥८५॥

आता आम्हा काय गति । कधी न वचो त्या क्षिती । आम्हांसी शिवदूत मारिती । म्हणोनि विनविती यमासी ॥८६॥

ऐकोनि दूतांचे वचन । यम निघाला कोपून । गेला त्वरित ठाकून । शिवदूताजवळी देखा ॥८७॥

यम म्हणे शिवदूतांसी । का मारिले माझ्या किंकरासी । हिरोनि घेतले पापियासी । केवी नेता शिवमंदिरा ॥८८॥

याचे पाप असे प्रबळ । जितकी गंगेत असे वाळू । तयाहूनि अधिक केवळ । अघोररूप असे देखा ॥८९॥

नव्हे योग हा शिवपुरासी । याते बैसवोनि विमानेसी । केवी नेता मूढपणेसी । म्हणोनि कोपे यम देखा ॥९०॥

ऐकोनि यमाचे वचन । शिवदूत सांगती विस्तारून । प्रेतकपाळी लांछन । भस्म होते परियेसा ॥९१॥

वक्षःस्थळी ललाटेसी । बाहुमूळी करकंकणेसी । भस्म लाविले प्रेतासी । केवी आतळती तुझे दूत ॥९२॥

आम्हा आज्ञा ईश्वराची । भस्मांकित तनु मानवाची । जीव आणावा त्या नराचा । कैलासपदी शाश्वत ॥९३॥

भस्म कपाळी असत । केवी आतळती तुझे दूत । तात्काळी होतो वधित । सोडिले आम्हा धर्मासी ॥९४॥

पुढे तरी आपुल्या दूता । बुद्धि सांगा तुम्ही आता । जे नर असती भस्मांकिता । त्याते तुम्ही न आणावे ॥९५॥

भस्मांकित नरासी । दोष न लागती परियेसी । तो योग्य होय स्वर्गासी । म्हणोनि सांगती शिवदूत ॥९६॥

शिवदूत वचन ऐकोन । यमधर्म गेला परतोन । आपुले दूता पाचारून । सांगतसे परियेसा ॥९७॥

यम सांगे आपुले दूता । भूमीवरी जाऊनि आता । जे कोण असतील भस्मांकित । त्याते तुम्ही न आणावे ॥९८॥

अनेकपरी दोष जरी । केले असतील धुरंधरी । त्याते न आणावे आमुचे पुरी । त्रिपुंड टिळक नरासी ॥९९॥

रुद्राक्षमाळा ज्याचे गळा । असेल त्रिपुंड्र टिळा । त्याते तुम्ही नातळा । आज्ञा असे ईश्वराची ॥१००॥

वामदेव म्हणे राक्षसासी । या विभूतीचा महिमा असे ऐशी । आम्ही लावितो भक्तीसी । देवादिका दुर्लभ ॥१॥

पाहे पा ईश्वर प्रीतीसी । सदा लावितो भस्मासी । ईश्वरे वंदिल्या वस्तूसी । कवण वर्णू शके सांग मज ॥२॥

ऐकोनि वामदेवाचे वचन । ब्रह्मराक्षस करी नमन । उद्धारावे जगज्जीवना । ईश्वर तूचि वामदेवा ॥३॥

तुझे चरण मज भेटले । सहस्त्र जन्मीचे ज्ञान जाहाले । काही पुण्य होते केले । त्याणे गुणे भेटलासी ॥४॥

आपण जधी राज्य करिता । केले पुण्य स्मरले आता । तळे बांधविले रानात । दिल्ही वृत्ति ब्राह्मणांसी ॥५॥

इतुके पुण्य आपणासी । घडले होते परियेसी । वरकड केले सर्व दोषी । राज्य करिता स्वामिया ॥६॥

जधी नेले यमपुरासी । यमे पुसिले चित्रगुप्तासी । माझे पुण्य त्या यमासी । चित्रगुप्ते सांगितले ॥७॥

तघी माते यमधर्मे आपण । सांगितले होते हे पुण्य । पंचविशति जन्मी जाण । फळासी येईल म्हणोनि ॥८॥

तया पुण्यापासोन । भेटी जाहली तुझे चरण । करणे स्वामी उद्धारण । जगद्गुरु वामदेवा ॥९॥

या भस्माचे महिमान । कैसे लावावे विघान । कवण मंत्र-उद्धारण । विस्तारूनि सांग मज ॥११०॥

वामदेव म्हणे राक्षसासी । विभूतीचे धारण मज पुससी । सांगेन आता विस्तारेसी । एकचित्ते ऐक पा ॥११॥

पूर्वी मंदरगिरिपर्वती । क्रीडेसी गेले गिरिजापति । कोटि रुद्रादिगणसहिती । बैसले होते वोळगेसी ॥१२॥

तेहतीस कोटी देवांसहित । देवेंद्र आला तेथे त्वरित । अग्नि वरुण यमसहित । कुबेर वायु आला तेथे ॥१३॥

गंध्र्व यक्ष चित्रसेन । खेचर पन्नग विद्याधरण । किंपुरुष सिद्ध साध्य जाण । आले गुह्यक सभेसी ॥१४॥

देवाचार्य बृहस्पति । वसिष्ठ नारद तेथे येती । अर्यमादि पितृसहिती । तया ईश्वर-वोळगेसी ॥१५॥

दक्षादि ब्रह्मा येर सकळ । आले समस्त ऋषिकुळ । उर्वश्यादि अप्सरामेळ । आले त्या ईश्वरसभेसी ॥१६॥

चंडिकासहित शक्तिगण देखा । आदित्यादि द्वादशार्का । अष्ट वसू मिळोन ऐका । आले ईश्वराचे सभेसी ॥१७॥

अश्विनी देवता परियेसी । विश्वेदेव मिळून निर्दोषी । आले ईश्वरसभेसी । ऐके ब्रह्मराक्षसा ॥१८॥

भूतपति महाकाळ । नंदिकेश्वर महानीळ । काठीकर दोघे प्रबळ । उभे पार्श्वी असती देखा ॥१९॥

वीरभद्र शंखकर्ण । मणिभद्र षट्‍कर्ण । वृकोदर देवमान्य । कुंभोदर आले तेथे ॥१२०॥

कुंडोदर मंडोदर । विकटकर्ण कर्णधार । घारकेतु महावीर । भुतनाथ तेथे आला ॥२१॥

भृंगी रिटी भूतनाथ । नानारूपी गण समस्त । नानावर्ण मुखे ख्यात । नानावर्ण-शरीर-अवयवी ॥२२॥

रुद्रगणाची रूपे कैसी । सांगेन ऐका विस्तारेसी । कित्ये कृष्णवर्णैसी । श्वेत-पीत-धूम्रवर्ण ॥२३॥

हिरवे ताम्र सुवर्ण । लोहित चित्रविचित्र वर्ण । म्डूकासारिखे असे वदन । रुद्रगण आले तेथ ॥२४॥

नानाआयुधे-शस्त्रेसी । नाना वाहन भूषणेसी । व्याघ्रमुख कित्येकांसी । किती सूकर-गजमुखी ॥२५॥

कित्येक नक्रमुखी । कित्येक श्वान-मृगमुखी । उष्ट्रवदन कित्येकी । किती शरभ-शार्दूलवदने ॥२६॥

कित्येक भैरुंडमुख । सिंहमुख कित्येक । दोनमुख गण देख । चतुर्मुख गण कितीएक ॥२७॥

चतुर्भुज गण अगणिक । कितीएका नाही मुख । ऐसे गण तेथे येती देख । ऐक राक्षसा एकचित्ते ॥२८॥

एकहस्त द्विहस्तेसी । पाच सहा हस्तकेसी । पाद नाही कितीएकांसी । बहुपादी किती जाणा ॥२९॥

कर्ण नाही कित्येकांसी । एककर्ण अभिनव कैसी । बहुकर्ण परियेसी । ऐसे गुण येती तेथे ॥१३०॥

कित्येकांसी नेत्र एक । कित्येका चारी नेत्र विचित्र । किती स्थूळ कुब्जक । ऐसे गण ईश्वराचे ॥३१॥

ऐशापरीच्या गणांसहित । बैसला शिव मूर्तिमंत । सिंहासन रत्‍नखचित । सप्त प्रभावळीचे ॥३२॥

आरक्त एक प्रभावळी । तयावरी रत्‍ने जडली । अनुपम्य दिसे निर्मळी । सिंहासन परियेसा ॥३३॥

दुसरी एक प्रभावळी । हेमवर्ण पिवळी । मिरवीतसे रत्‍ने बहळी । सिंहासन ईश्वराचे ॥३४॥

तिसरिये प्रभावळीसी । नीलवर्णे रत्‍ने कैसी । जडली असती कुसरीसी । सिंहासन ईश्वराचे ॥३५॥

शुभ्रचतुर्थ प्रभावळी । रत्‍नखचित असे कमळी । आरक्तवर्ण असे जडली । सिंहासन शंकराचे ॥३६॥

वैडूर्यरत्‍नखचित । मोती जडली असती बहुत । पाचवी प्रभावळी ख्यात । सिंहासन ईश्वराचे ॥३७॥

सहावी भूमि नीलवर्ण । भीतरी रेखा सुवर्णवर्ण । रत्‍ने जडली असती गहन । अपूर्व देखा त्रिभुवनांत ॥३८॥

सातवी ऐसी प्रभावळी । अनेक रत६ने असे जडली । जे का विश्वकर्म्याने रचिली । अपूर्व देखा त्रिभुवनांत ॥३९॥

ऐशा सिंहासनावरी । बैसलासे त्रिपुरारि । कोटिसूर्य तेजासरी । भासतसे परियेसा ॥१४०॥

महाप्रळयसमयासी । सप्तार्णव-मिळणी जैसी । तैसिया श्वासोच्छ्‌वासेसी । बैसलासे ईश्वर ॥४१॥

भाळनेत्र ज्वाळमाळा । संवर्ताग्नि जटामंडळा । कपाळी चंद्र षोडशकळा । शोभतसे सदाशिव ॥४२॥

तक्षक देखा वामकर्णी । वासुकी असे कानी दक्षिणी । तया दोघांचे नयन । नीलरत्‍नापरी शोभती ॥४३॥

नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण । सर्पाचेचि करी कंकण । मुद्रिकाही देखा सर्पाचिया ॥४४॥

मेखला तया सर्पाचे । चर्मपरिधान व्याघ्राचे । शोभा घंटी दर्पणाचे । ऐसेपरी दिसतसे ॥४५॥

कर्कोटक-महापद्म । केली नूपुरे पाईंजण । जैसा चंद्र-संपूर्ण । तैसा शुभ्र दिसतसे ॥४६॥

म्हणोनि कर्पूरगौर म्हणती । ध्यानी ध्याईजे पशुपति । ऐसा भोळाचक्रवर्ती । बैसलासे सभेत ॥४७॥

रत्‍नमुकुट असे शिरी । नागेंद्र असे केयूरी । कुंडलांची दीप्ति थोरी । दिसतसे ईश्वर ॥४८॥

कंठी सर्पाचे हार । नीलकंथ मनोहर । सर्वांगी सर्पाचे अलंकार । शोभतसे ईश्वर ॥४९॥

शुभ्र कमळे अर्चिला । की चंदने असे लेपिला । कर्पूरकेळीने पूजिला । ऐसा दिसे ईश्वर ॥१५०॥

दहाभुजा विस्तारेसी । एकेक हाती आयुधेसी । बैसलासे सभेसी । सर्वेश्वर शंकर ॥५१॥

एके हाती त्रिशूळ देखा । दुसरा डमरू सुरेखा । येरे हाती खड्ग तिखा । शोभतसे ईश्वर ॥५२॥

पानपात्र एका हाती । धनुष्य-बाणे कर शोभती । खट्वांग फरश येरे हाती । अंकुश करी मिरवीतसे ॥५३॥

मृग धरिला असे करी देखा । ऐसा तो हा पिनाका । दहाभुजा दिसती निका । बैसलासे सभेत ॥५४॥

पंचवक्त्र सर्वेश्वर । एकेक मुखाचा विस्तार । दिसतसे सालंकार । सांगेन ऐका श्रोतेजन ॥५५॥

कलंकाविणे चंद्र जैसा । किंवा क्षीरफेन ऐसा । भस्मभूषणे रूपे कैसा । दिसे मन्मथाते दाहोनिया ॥५६॥

सूर्य-चंद्र अग्निनेत्र । नागहार कटिसूत्र । दिसे मूर्ति पवित्र । सर्वेश्वर परियेसा ॥५७॥

शुभ्र टिळक कपाळी । बरवा शोभे चंद्रमौळी । हास्यवदन केवळी । अपूर्व देखा श्रीशंकर ॥५८॥

दुसरे मुख उत्तरेसी । शोभतसे विस्तारेसी । ताम्रवर्णाकार कमळेसी । अपूर्व दिसे परियेसा ॥५९॥

जैसे दाडिंबाचे फूल । किंवा प्रातःरविमंडळ । तैसे मिरवे मुखकमळ । ईश्वराचे परियेसा ॥१६०॥

तिसरे मुख पूर्वदिशी । गंगा अर्धचंद्र शिरसी । जटाबंदन केली कैसी । सर्पवेष्टित परियेसा ॥६१॥

चवथे मुख दक्षिणेसी । मिरवे नीलवर्णेसी । विक्राळ दाढा दारुणेसी । दिसतसे तो ईश्वर ॥६२॥

मुखांहूनि ज्वाला निघती । तैसा दिसे तीव्रमूर्ति । रुंडमाळा शोभती । सर्पवेष्टित परियेसा ॥६३॥

पाचवे असे ऐसे वदन । व्यक्ताव्यक्त असे जाण । साकार निराकार सगुण । सगुण निर्गुण ईश्वर ॥६४॥

सलक्षण निर्लक्षण । ऐसे शोभतसे वदन । परब्रह्म वस्तु तो जाण । सर्वेश्वर पंचमुखी ॥६५॥

काळ व्याळ सर्प बहुत । कंठी माळ मिरवे ख्यात । चरण मिरविती आरक्त । कमळापरी ईश्वराचे ॥६६॥

चंद्रासारिखी नखे देखा । मिरवे चरणी पादुका । अळंकार-सर्प ऐका । शोभतसे परमेश्वर ॥६७॥

व्याघ्रांबर पांघरुण । सर्प बांधले असे आपण । गाठी बांधिली असे जाण । नागबंधन करूनिया ॥६८॥

नाभी चंद्रावळी शोभे । ह्रदयी कटाक्ष रोम उभे । परमार्थमूर्ति लाभे । भक्तजना मनोहर ॥६९॥

ऐसा रुद्र महाभोळा । सिंहासनी आरूढला । पार्वतीसहित शोभला । बैसलासे परमेश्वर ॥१७०॥

पार्वतीचे श्रृंगार । नानापरीचे अलंकार । मिरवीतसे अगोचर । सर्वेश्वरी परियेसा ॥७१॥

कनकचाफे गोरटी । मोतियांचा हार कंठी । रत्‍नखचित मुकुटी । नागबंदी दिसतसे ॥७२॥

नानापरीच्या पुष्पजाति । मुकुटावरी शोभती । तेथे भ्रमर आलापिती । परिमळालागी परियेसा ॥७३॥

मोतियांची थोर जाळी । मिरवीतसे मुकुटाजवळी । रत्‍ने असती जडली । शोभायमान दिसतसे ॥७४॥

मुख दिसे पूर्णचंद्र । मिरवतसे हास्य मंद । जगन्माता विश्ववंद्य । दिसतसे परमेश्वरी ॥७५॥

नासिक बरवे सरळ । तेथे म्रिअवे मुक्ताफळ । त्यावरी रत्‍ने सोज्ज्वळ । जडली असती शोभायमान ॥७६॥

अधर पवळवेली दिसे । दंतपंक्ति रत्‍न जैस । ऐसी माता मिरवतसे । जगन्माता परियेसा ॥७७॥

कानी तानवडे भोवरिया । रत्‍नखचित मिरवलिया । अलंकार महामाया । लेइली असे जगन्माता ॥७८॥

पीतवर्ण चोळी देखा । कुच तटतटित शोभे निका । एकावेळी रत्‍ने अनेका । शोभतसे कंठी हार ॥७९॥

कालव्याल सर्प थोर । स्तनपान करिती मनोहर । कैसे भाग्य दैव थोर । त्या सर्पाचे परियेसा ॥१८०॥

आरक्त वस्त्र नेसली । जैसे दाडिंब पुष्पवेली । किंवा कुंकुमे डवरिली । गिरिजा माता परियेसा ॥८१॥

बाहुदंड सुरेखा । करी कंकण मिरवे देखा । रत्‍नखचित मेखळा देखा । लेईली असे अपूर्व जे ॥८२॥

चरण शोभती महा बरवे । असती नेपुरे स्वभावे । ऐसे पार्वती-ध्यान ध्यावे । म्हणती गण समस्त ॥८३॥

अष्टमीच्या चंद्रासारिखा । मिरवे टिळक काअळी कैसा त्रिपुंड्र टिळा शुभ्र जैसा । मोतियांचा परियेसा ॥८४॥

नानापरीचे अलंकार । अनेकपरीचे श्रृंगार । कवण वर्णू शके पार । जगन्माता अंबिकेचा ॥८५॥

ऐसा शंभु उमेसहित । बैसलासे सभेत । तेहतीस कोटि परिवारसहित । इंद्र उभा वोळगेसी ॥८६॥

उभे समस्त सुरवर । देवऋषि सनत्कुमार । आले तेथे वेगवक्त्रे । तया ईश्वरसभेसी ॥८७॥

सनत्कुमार तये वेळी । लागतसे चरणकमळी । साष्टांग नमन बहाळी । विनवीतसे शिवासी ॥८८॥

जय जया उमाकांता । जय जया शंभु विश्वकर्ता । त्रिभुवनी तूचि दाता । चतुर्विध पुरुषार्थ ॥८९॥

समस्त धर्म आपणासी । स्वामी निरोपिले कृपेसी । भवार्णवी तरावयासी । पापक्षयाकारणे ॥१९०॥

आणिक एक आम्हा देणे । मुक्ति होय अल्पपुण्ये । चारी पुरुषार्थ येणे गुणे । अनायासे साधिजे ॥९१॥

एर्‍हवी समस्त पुण्यासी । करावे कष्त असमसहासी । हितार्थ सर्व मानवांसी । निरोपावे स्वामिया ॥९२॥

ऐसे विनवी सनत्कुमा । मनी संतोषोनिया ईश्वर । सांगता झाला कर्पूरगौर । सनत्कुमार मुनीसी ॥९३॥

ईश्वर म्हणे तयेवेळी । ऐका देव ऋषि सकळी । घडे धर्म तात्काळी । ऐसे पुण्य सांगेन ॥९४॥

वेदशास्त्रसंमतेसी । असे धर्म परियेसी । अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी । भस्मांकित परियेसा ॥९५॥

ऐकोनि विनवी सनत्कुमार । कवणे विधी लाविजे नर । कवण ’स्थान’, ’द्रव्य’ परिकर । ’शक्ति’ ’देवता’ कवण असे ॥९६॥

कवण ’कर्तृ’ किं ’प्रमाण’ । कोण ’मंत्रे’ लाविजे आपण । स्वामी सांगा विस्तारून । म्हणोनि चरणी लागला ॥९७॥

ऐसी विनंती ऐकोनि । सांगे शंकर विस्तारोनि । गोमय द्रव्य, देवता-अग्नि । भस्म करणे परियेसा ॥९८॥

पुरातनीचे यज्ञस्थानी । जे का असे मेदिनी । पुण्य बहुत लाविताक्षणी । भस्मांकिता परियेसा ॥९९॥

सद्योजाता’दि मंत्रेसी । घ्यावे भस्म तळहस्तासी । अभिमंत्रावे भस्मासी । ’अग्निरित्या’दि मंत्रेकरोनि ॥२००॥

’मानस्तोके’ ति मंत्रेसी । संमदावे अंगुष्ठेसी । त्र्यंबकादि मंत्रेसी । शिरसी लाविजे परियेसा ॥१॥

’त्र्यायुषे’ ति मंत्रेसी । लाविजे ललाटभुजांसी । त्याणेची मंत्रे परियेसी । स्थानी स्थानी लाविजे ॥२॥

तीनी रेखा एके स्थानी । लावाव्या त्याच मंत्रांनी । अधिक न लाविजे भ्रुवांहुनी । भ्रूसमान लाविजे ॥३॥

मध्यमानामिकांगुळेसी । लाविजे पहिले ललाटेसी । प्रतिलोम-अंगुष्ठेसी । मध्यरेषा काढिजे ॥४॥

त्रिपुंड्र येणेपरी । लाविजे तुम्ही परिकरी । एक एक रेखेच्या विस्तारी । सांगेन ऐका एकचित्ते ॥५॥

नव देवता विख्यातेसी । असती एकेक रेखेसी । ’अ’ कार गार्हपत्यासी । भूरात्मा रजोगुण ॥६॥

ऋग्वेद आणि क्रियाशक्ति । प्रातःसवन असे ख्याति । महादेव-देव म्हणती । प्रथम रेखा येणेपरी ॥७॥

दुसरे रेखेची देवता । सांगेन ऐका विस्तारता । ’उ’ कार दक्षिणाग्नि देवता । नभ सत्त्व जाणावे ॥८॥

यजुर्वेद म्हणिजे त्यासी । मध्यंदिन-सवन परियेसी । इच्छाशक्ति अंतरात्मेसी । महेश्वर-देव जाण ॥९॥

तिसरी रेखा मधिलेसी । ’म’ कार आहवनीय परियेसी । परमात्मा दिव हर्षी । ज्ञानशक्ति तमोगुण ॥२१०॥

तृतीयसवन परियेसी । सामवेद असे त्यासी । शिवदैवत निर्धारेसी । तीनि रेखा येणेविधि ॥११॥

ऐसे नित्य नमस्कारूनि । त्रिपुंड्र लाविजे भस्मेनि । महेश्वराचे व्रत म्हणोनि । वेदशास्त्रे बोलताति ॥१२॥

मुक्तिकामे जे लाविती । त्यासी पुनरावृत्ति । जे जे मनी संकल्पिती । लाधे चारी पुरुषार्थ ॥१३॥

ब्रह्मचारी-गृहस्थासी । वानप्रस्थ-यतीसी । समस्ती लाविजे हर्षी । भस्मांकित त्रिपुंड्र ॥१४॥

महापापी असे आपण । उपपातकी जरी जाण । भस्म लाविता तत्क्षण । पुण्यात्मा तोचि होय ॥१५॥

क्षत्रिय-वैश्य-शूद्र-स्त्रीवध्यासी । गोहत्यादि-पातकासी । वीरहत्या-आत्महत्येसी । शुद्धात्मा करी भस्मांकित ॥१६॥

विधिपूर्वक मंत्रेसी । जे लाविती भक्तीसी । त्यांची महिमा अपारेसी । वंद्य होय देवलोकी ॥१७॥

जरी नेणे मंत्रासी । त्याणे लाविजे भावशुद्धीसी । त्याची महिमा अपारेसी । एकचित्ते परियेसा ॥१८॥

परद्रव्यहारक देखा । परस्त्रीगमन ऐका असेल पापी परनिंदका । तोही पुनीत होईल जाणा ॥१९॥

परक्षेत्रहरण देखा । परपीडक असेल जो का । सस्य आराम तोडी का । ऐसा पातकी पुनीत होई ॥२२०॥

गृहदाहादि केला दोष । असत्यवादी परियेस । पैशून्यपण पापास । वेदविक्रय पाप जाणा ॥२१॥

कूटसाक्षी व्रतत्यागी । कौटिल्य करी पोटालागी । ऐसी पाप सदा भोगी । तोही पुनीत होय जाणा ॥२२॥

गाई-भूमि-हिरण्यदान । म्हैषी-तीळ-कंबळदान । घेतले असेल वस्त्रान्न । तोही पुनीत होय जाणा ॥२३॥

धान्यदान जलादिदान । घेतले असेल नीचापासून । त्याणे करणे भस्मधारण । तोही पुनीत होय जाणा ॥२४॥

दासी-वेश्या-भुजंगीसी । वृषलस्त्री-रजस्वलेसी । केले असती जे का दोषी । तोही पुनीत जाणा ॥२५॥

कन्या विधवा अन्य स्त्रियांशी । घडला असेल संग जयासी । अनुतप्त होऊनि परियेसी । भस्म लाविता पुनीत होईल ॥२६॥

रस-मांस-लवणादिका । केला असेल विक्रय जो का । पुनीत होय भस्मसंपर्का । त्रिपुंड्र लाविता परियेसा ॥२७॥

जाणोनि अथवा अज्ञानता । पाप घडले असंख्याता । भस्म लाविता पुनीता । पुण्यात्मा होय जाणा ॥२८॥

नाशी समस्त पापांसी । भस्ममहिमा आहे ऐशी । शिवनिंदक पापियासी । न करी पुनीत परियेसा ॥२९॥

शिवद्रव्य अपहारकासी । निंदा करी शिवभक्तांसी । न होय निष्कृति त्यासी । पापावेगळा नव्हे जाणा ॥२३०॥

रुद्राक्षमाळा जयाचे गळा । लाविला असेल त्रिपुंड्र टिळा । अन्य पापी होय केवळा । तोही पूज्य तीही लोकी ॥३१॥

जितुकी तीर्थे भूमीवरी । असतील क्षेत्रे नानापरी । स्नान केले पुण्य-सरी । भस्म लाविता परियेसा ॥३२॥

मंत्र असती कोटी सात । पंचाक्षरादि विख्यात । अनंत आगम असे मंत्र । जपिले फळ भस्मांकिता ॥३३॥

पूर्वजन्म-सहस्त्रांती । सहस्त्र जन्म पुढे होती । भस्मधारणे पापे जाती । बेचाळीस वंशादिक ॥३४॥

इहलोकी अखिल सौख्य । होती पुरुष शतायुष्य । व्याधि न होती शरीरास । भस्म लाविता नरासी ॥३५॥

अष्टैश्वर्यै होती त्यासी । दिव्य शरीर परियेसी । अंती ज्ञान होईल निश्चयेसी । देहांती तया नरा ॥३६॥

बैसवोनि दिव्य विमानी । देवस्त्रिया शत येऊनि । सेवा करिती येणे गुणी । घेऊनि जाती स्वर्गभुवना ॥३७॥

विद्याधर सिद्धजन । गंधर्वादि देवगण । इंद्रादि लोकपाळ जाण । वंदिती समस्त तयासी ॥३८॥

अनंतकाळ तया स्थानी । सुखे असती संतोषोनि । मग जाती तेथोनि । ब्रह्मलोकी शाश्वत ॥३९॥

एकशत कल्पवरी । रहाती ब्रह्मलोकी स्थिरी । तेथोनि जाती वैकुंठपुरी । विष्णुलोकी परियेसा ॥२४०॥

ब्रह्मकल्प तीनवरी । रहाती नर वैकुंठपुरी । मग पावती कैलासपुरी । अक्षय काळ तेथे रहाती ॥४१॥

शिवसायुज्य होय त्यासी । संदेह सोडोनिया मानसी । लावा त्रिपुंड्र भक्तीसी । सनत्कुमारादि सकळिक हो ॥४२॥

वेदशास्त्रदि उपनिषदार्थ । सार पाहिले मी अवलोकित । चतुर्विध पुरुषार्थ । भस्मधारणे होय जाणा ॥४३॥

ऐसे त्रिपुंड्रमहिमान । सांगितले ईश्वरे विस्तारून । लावा तुम्ही सकळ जन । सनत्कुमारादि ऋषीश्वर हो ॥४४॥

सांगोनि सनत्कुमारासी । गेला ईश्वर कैलासासी । सनत्कुमार महाहर्षी । गेला ब्रह्मलोकाप्रती ॥४५॥

वामदेव महामुनि । सांगती ऐसे विस्तारोनि । ब्रह्मराक्षसे संतोषोनि । नमन केले चरणकमलासी ॥४६॥

वामदे म्हणे राक्षसासी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी । माझे अंगस्पर्शेसी । ज्ञान तुज प्रकाशिले ॥४७॥

ऐसे म्हणोनि संतोषी अभिमंत्रोनि भस्मासी । देता झाला राक्षसासी । वामदेव तया वेळी ॥४८॥

ब्रह्मराक्षस तया वेळी । लाविता त्रिपुंड्र कपाळी । दिव्यदेह तात्काळी । तेजोमूर्ति जाहला परियेसा ॥४९॥

दिव्य अवयव झाले त्यासी । जैसा सूर्यसंकाशी । झाला आनंदरूप कैसी । ब्रह्मराक्षस तया वेळी ॥२५०॥

नमन करूनि योगीश्वरासी । केली प्रदक्षिणा भक्तीसी । विमान आले तत्‌क्षणेसी । सूर्यसंकाश परियेसा ॥५१॥

दिव्य विमानी बैसोनि । गेला स्वर्गासी तत्क्षणी । वामदेव महामुनी । दिधला तयासी परलोक ॥५२॥

वामदेव महादेव । मनुष्यरूप दिसतो स्वभाव । प्रत्यक्ष जाणा तो शांभव । हिंडे भक्त तारावया ॥५३॥

त्रयमूर्तीचा अवतारु । वामदेव तोचि गुरु । करावया जगदोद्धारु । हिंडत होता भूमीवरी ॥५४॥

भस्ममाहात्म्य असे थोरु । विशेष हस्तस्पर्श गुरु । ब्रह्मराक्षसासी दिधला वरु । उद्धार गति परियेसा ॥५५॥

समस्त मंत्र असती । गुरूविणे साध्य नव्हती । वेदशास्त्रे वाखाणिती । ’नास्ति तत्त्वं गुरोः परम’ ॥५६॥

सूत म्हणे ऋषेश्वरांसी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी । गुरुहस्ते असे विशेषी । तस्माद्‍ गुरुचि कारण ॥५७॥

येणेपरी त्रिविक्रमासी । सांगती श्रीगुरु विस्तारेसी । त्रिविक्रमभारती हर्षी । चरणांवरी माथा ठेवित ॥५८॥

नमन करूनि श्रीगुरूसी । निघाला आपुले स्थानासी । झाले ज्ञान समस्तांसी । श्रीगुरूच्या उपदेशे ॥५९॥

येणेपरी सिद्धमुनि । सांगते झाले विस्तारूनि । ऐकतो शिष्य नामकरणी । भक्तिभावेकरूनिया ॥२६०॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । भक्तिभावे ऐकती नर । लाघे चारी पुरुषार्थ ॥२६१॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे भस्ममहिमावर्णन नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥२९॥

ओवीसंख्या २६१

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


1 comment:

  1. www.godstalks.com

    please visit on my blog i need a support from you

    ReplyDelete