Thursday, January 13, 2011

Gurucharitra - Adhyay 21

Chapter 21 The women brings the dead-child to Shri Guru. He revives the child and blesses the child with long life.


CHAPTER 21
The Dead Child Became Alive.

The Sanyasi said, `You are mourning in vain. He who has come to birth, in this world has to die. How long can last the foam or a bubble in the water. This body is made of five principles and when they are separated, the body also perishes. Satwa, Raj and Tam are the three qualities of those principles. Satwa begets god, Raj begets human being and Tam begets demon. Man does good and bad actions and accordingly he gets enjoyment or suffering in the next birth.

Being deluded by affection and agreed, men have pleasures or miseries. They are dependent on the actions of the previous birth. Even Gods and Rishis have to suffer. Only is not grieved at death.

When a female is preganant, in the beginning the foetus has no shape; but it develops and comes to birth and it is theirefore evident that it will perish one day. A body is like a bubble in the water. Some die in childhood, some in youth and some in old age as per actions of the past life. But due to affection, it is said that she is the mother. He is the father, son, wife, friend and so on. The body appears to be clean; but it is full of flesh, blood, urine, filth etc.

As one comes to birth one's enjoyment and suffering are destined. No one has won victory over death. One sees treasure in dream but of what use can it be in practical life? You had many lives in different yoins i.e. species e.g. animals, birds, worms, human being etc; but how many of these can you recollect? If you had been a human being can you tell me whose wife or daughter you had been? If you cannot know this, why do you mourn saying `my son.'? You give the corpse to the brahmins for funeral.'

Hearing the advice of the Sanyasi, the Brahmani said, `You have advised me but I am not satisfied and if the fate is unchangable, why one should adore God? If iron is not transformed into gold by the touch of Paris (Philosopher's stone) what is its significance? Being unfortunate, I adored Shri Guru. If one has fever, one goes to a physician and seeks relief by his medicine.

Shri Narsinh Saraswati is the incarnation of Tri-Murti (Three Gods). He blessed us by giving us sons with long lives. How can it be untru? In the circumstances, why this calamity should befall me? Therefore I have decided to give up my life.'

Hearing her decision, the Sanyasi said, `Shri Guru has blessed you to have sons having long lives and still your son has died, then you should better go to the place of audumbar with your dead child.'

Being encouraged in this fashion, she tied the body of her son at her back and came to Audumbar. She dashed her head on the padukas and began to mourn. As the night was approaching the brahmins again asked for the dead body, but she refused to give. The brahmins said `the body will emanate foul odour tomorrow and then she will have to give it.' Saying this, they went home. Only the parents remained there. Later on after midnight the parents fell drowsy and got a nap due to exertion.

In her dream she saw a person with vibhuti marks on the body, a wreath of rudraksha round the neck, a Trishul in the hand and a tiger skin on the body. He said to her, `Why are you blaming me and mourning? What ails your son? Saying so he applied bhasma or vibhuti to the forehead of the son, opened his mouth and blew air into it by his mouth. Thus oxygen was infused in his body. The result was that the boy began to move his limbs and came to life.

At first sight she was frightened. She thought that one sees in one's dream whatever is in one's mind. But as she awoke she found that the boy was making movement and his body was warm. At first she placed the boy away out of fear but the boy sat and asked for something to eat as he wus hungry. She took him to her breast. Milk came out profusely from the paps. Then she gave up fear and was delighted. She aroused her husband. Both bowed to the Padukus of shri Guru and prayed, `Kindly forgive us for our harsh words.' They took rounds of the tree and went for bath.

After bath they washed the blood on the Padukas and wworshipped them with great devotion. By this time it was morning. The brahmins came there again for the funeral, but they were wonderstruck to see the child alive. All were glad to see this miracle and praised the greatness of Shri Guru.

Contd....

श्रीगणेशाय नमः ।

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका । उपदेशी ज्ञान निका । तये प्रेतजननीसी ॥१॥

ब्रह्मचारी म्हणे नारीसी । मूढपणे दुःख करिसी । कोण वाचला धरणीसी । या संसारी सांग मज ॥२॥

उपजला कोण मेला कोण । उत्पत्ति झाली कोठोन । जळात उपजे जैसा फेण । बुदबुद राहे कोठे स्थिर ॥३॥

जैसा देह पंचभूती । मिळोनि होय आकृति । वेगळी होता पंचभूती । अव्यक्त होय देह जाण ॥४॥

तया पंचभूतांचे गुण । मायापाशी वेष्टोन । भ्रांति लाविली मी देह म्हणोन । पुत्रमित्रकलत्रमिषे ॥५॥

सत्त्व रज तमोगुण । तया भूतांपासोन । वेगळाली केली लक्षण । होती ऐका एकचित्ते ॥६॥

देवत्व होय सत्त्वगुण । रजोगुण मनुष्य जाण । दैत्यांसी तमोगुण । गुणानुसारे कर्मे घडती ॥७॥

जेणे कर्मे आचरती । सुकृत अथवा दुष्कृति । तैशीच होय फळप्राप्ति । आपुले आपण भोगावे ॥८॥

जैसी गुणाची वासना । इंदिये तयाधीन जाणा । मायापाशी वेष्टोनि गहना । सुखदुःखे लिप्त करिती ॥९॥

या संसारवर्तमानी । उपजती जंतु कर्मानुगुणी । आपल्या आर्जवापासोनि । सुखदुःखादि भोगिती ॥१०॥

कल्पकोटी वरुषे ज्यांसी । असती आयुष्ये देवऋषि । न सुटे कर्म तयासी । मनुष्याचा कवण पाड ॥११॥

एखादा नर देहाधीन । काळ करी आपुले गुण । कर्म होय अनेक गुण । देहधारी येणेपरी ॥१२॥

जो असे देहधारी । तयासी विकार नानापरी । स्थिर नव्हे तो निर्धारी । आपुले पाप म्हणावया ॥१३॥

या कारणे ज्ञानवंत । संतोष न करी उपजत । अथवा नरा होय मृत्यु । दुःख आपण करू नये ॥१४॥

जधी गर्भसंभव होता । काय दिसे आकारता । अव्यक्त दिसे व्यक्तता । सवेचि होय अव्यक्त पै ॥१५॥

बुदबुद निघती जैसे जळी । सवेचि नष्ट तात्काळी । तैसा देह सर्वकाळी । स्थिर नव्हे सर्वथा ॥१६॥

जधी गर्भप्रसव झाले । विनाशी म्हणोनि जाणिले । कर्मानुबंधे जैसी फळे । तैसे भोगणे देहासी ॥१७॥

कोणी मरती पूर्ववयेसी । अथवा मरती वृद्धपणेसी । आपुले अर्जिती असती जैशी । तेणेपरी घडे जाण ॥१८॥

मायापाशी वेष्टोनि । म्हणती पिता सुत जननी । कलत्र मित्र तेणे गुणी । आपुले आपुले म्हणती मूढ ॥१९॥

निर्मळ देह म्हणो जरी । उत्पत्ति मांसरुधिरी । मळमूत्रांत अघोरी । उद्‌भव झाला परियेसा ॥२०॥

कर्मानुसार उपजतांची । ललाटी लिहितो विरंची । सुकृत अथवा दुष्कृतेची । भोग भोगणे म्हणोनि ॥२१॥

ऐसे कर्म काळासी । जिंकिले नाही परियेसी । या कारणे देहासी । नित्यत्व नाही परियेसा ॥२२॥

स्वप्नी निधान दिसे जैसे । कोणी धरावे भरवसे । इंद्रजाल गारूड जैसे । स्थिर केवी मानिजे ॥२३॥

तुझे तूचि सांग वहिले । कोटी वेळा जन्म झाले । मनुष्य किंवा पशुत्व लाधले । पक्षी अथवा कृमिरूप ॥२४॥

जरी होतीस मनुष्ययोनी । कोण कोणाची होतीस जननी । कोण कोणाची होतीस गृहिणी । सांग तुझे त्वा निश्चये ॥२५॥

कवण तुझी मातापिता । जन्मांतरींची सांग आता । वाया दुःख करिसी वृथा । पुत्र आपुला म्हणोनि ॥२६॥

पंचभूतात्मक देह । चर्ममांस-अस्थि-मज्जा -समूह । वेष्टोनिया नव देह । मळबद्ध शरीर नावे ॥२७॥

कैचा पुत्र कोठे मृत्यु । वाया भ्रमोनि का रडत । सांडोनि द्यावे कैचे प्रेत । संस्कारिती लौकिकार्थ ॥२८॥

येणेपरी ब्रह्मचारी । सांगे तत्त्व विस्तारी । परिसोनिया विप्रनारी । विनवितसे तयासी ॥२९॥

विप्रवनिता तये वेळी । विनवीतसे करुणा बहाळी । स्वामी निरोपिले धर्म सकळी । परी स्थिर नव्हे अंतःकरण ॥३०॥

प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी । तरी का भजावा श्रीहरी । परीस संपर्क लोह जरी । सुवर्ण न होय कोण बोले ॥३१॥

आम्ही पहिले दैवहीन । म्हणोनि धरिले श्रीगुरुचरण । अभय दिधले नाही मरण । म्हणोनि विश्वासलो आम्ही ॥३२॥

एखाद्या नरा येता ज्वर । धुंडीत जाय वैद्यघर । औषध घेवोनि प्रतिकार । सवेचि करिती आरोग्यता ॥३३॥

एके समयी मनुष्यासी । आश्रय करिती करुणेसी । साह्य होय भरंवसी । आली आपदा परिहारी ॥३४॥

त्रयमूतीचा अवतार । श्रीनृसिंहसरस्वती असे नर । तेणे दिधला असे वर । केवी असत्य होय सांगे ॥३५॥

आराधिले म्या तयासी । वर दिधला गा मजसी । त्याचा भरवसा मानसी । धरोनि होते स्वस्थचित्त ॥३६॥

विश्वासुनी असता आपण । केवी केले निर्माण । कैसे झाले माझे मूर्खपण । म्हणोनि स्वामी निरोपिसी ॥३७॥

याकारणे आपण आता । प्राण त्यजीन तत्त्वता । देह समर्पीन श्रीगुरुनाथा । वाढो कीर्ति तयाची ॥३८॥

ऐकोनि तियेचे वचन । ओळखून भाव मन । सांगे बुद्धि तीस ज्ञान । उपाय यासी करी आता ॥३९॥

विश्वास केला श्रीगुरूसी । पुत्र लाधला पूर्णायुषी । जरी आला मृत्यु त्यासी । घेवोनि जाय गुरुस्थाना ॥४०॥

जेथे लाधला तुज वर । तेथे ठेवी कलेवर । पंचगंगाकृष्णातीर । औदुंबरवृक्षातळी ॥४१॥

ऐसे वचन ऐकोनि । विश्वास झाला तिचे मनी । पाठी शव बांधोनि । घेवोनि गेली औदुंबरा ॥४२॥

जेथे होत्या गुरुपादुका । आफळी शिर ते बालिका । रुधिरे भरल्या त्या पादुका । आक्रोशे रडे ती नारी ॥४३॥

समस्त शोकाहुनी अधिक । साहवेना पुत्रशोक । क्षयरोग तोचि एक । मातापितया मृत्युमूळ ॥४४॥

ऐसे करिता झाली निशी । विप्र मागती प्रेतासी । म्हणती आक्रोश का हो करिसी । संस्कारोनि जाऊ आता ॥४५॥

मनुष्य नाही अरण्यात । केवी राहू जाऊ म्हणत । जळू दे वो आता प्रेत । अहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती ॥४६॥

काही केलिया नेदी प्रेत । आपणासवे जाळा म्हणत । पोटी बांधोनिया प्रेत । लोळतसे पादुकांवरी ॥४७॥

म्हणती विप्र ज्ञाती लोक । राहो नये रानी ऐक । तस्करबाधा होईल देख । जाऊ आता घरासी ॥४८॥

जाऊ स्नान करूनि । उपवास होय आजच्या दिनी । प्रातःकाळी येवोनि । दहन करू म्हणताती ॥४९॥

आजिचे रात्री प्रेतासी । सुटेल वास दुर्गंधीसी । देईल आपोआप दहनासी । त्रासून जाणा कर्कशा ॥५०॥

म्हणोनि निघती सकळ लोक । राहिले तेथे जननीजनक । प्रेत देखोनि करिती शोक । झाली रात्री परियेसा ॥५१॥

निद्रा नाही दिवस दोन्ही । शोक करिती जनकजननी । तीन याम होता रजनी । झोप आली तियेसी ॥५२॥

देखतसे सुषुप्तीत । जटाधारी भस्मोध्दूलित । व्याघ्रचर्मे परिधानित । रुद्राक्षमाळा सर्वांगी ॥५३॥

योगदंड त्रिशूळ हाती । आले औदुंबराप्रति । का हो शोक करिसी सती । आक्रोशोनि आम्हांवरी ॥५४॥

काय झाले तुझिया कुमारा । करू त्यासी प्रतिकारा । म्हणोनि दे तो अभय करा । भक्तवत्सला श्रीगुरु ॥५५॥

भस्म काढोनि प्रेतासी । लावीतसे सर्वांगासी । मुख पसरी म्हणे तिसी । वायुपूर करू म्हणे ॥५६॥

प्राण म्हणे वायु जाण । बाहेर गेला निघोन । घातला मागुती आणून । पुत्र तुझा जीवंत होय ॥५७॥

इतुके देखोनि भयचकित । झाली नारी जागृत । म्हणे आपणा कैसी भ्रांत । पडिली असे प्रेतावरी ॥५८॥

जे का वसे आपुले मनी । तैसेचि दिसे निद्रास्वप्नी । कैचा देव नृसिंहमुनि । भ्रांति आपणा लागलि असे ॥५९॥

आमुचे प्रारब्ध असे उणे । देवावरी बोल काय ठेवणे । अज्ञान आम्ही मूर्खपणे । श्रीगुरूवरी बोल काय ॥६०॥

येणेपरी चिंता करीत । तव प्रेतासी झाले चेत। सर्वांगही उष्ण होत । सर्वसंधी जीव आला ॥६१॥

म्हणे प्रेता काय झाले । किंवा भूत संचारले । मनी भय उपजले । ठेवी काढोनि दूर परते ॥६२॥

सर्व संधीसी जीव आला । बाळ उठोनि बैसला । म्हणे क्षुधा लागली मला । अन्न दे की म्हणे माते ॥६३॥

रुदन करीतसे तये वेळी । आला कुमार मातेजवळी । स्तन घालिता मुखकमळी । क्षीर निघे बत्तीस धारा ॥६४॥

संतोश भय होऊनि तिसी । संदेह वाटे मानसी । कडे घेऊनि बाळकासी । गेली आपुल्या पतीजवळी ॥६५॥

जागृत करूनि पतीसी । सांगे वृत्तान्त तयासी । पति म्हणे तियेसी । ऐसे चरित्र श्रीगुरूचे ॥६६॥

म्हणोनि दंपत्य दोघे जाणा । करोनि औदुंबरी प्रदक्षिणा । साष्टांग नमुनी चरणा । नानापरी स्तोत्रे करिती ॥६७॥

जय जयाजी वरदमूर्ति । ब्रह्मा विष्णु शिवयती । भक्तवत्सला तुझी ख्याति । वासना पहासी भक्तांची ॥६८॥

तू तारक विश्वासी । म्हणोनि भूमी अवतरलासी । अशक्य तूते वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया ॥६९॥

बाळ जैसे कोपेसी । निष्ठुर बोले मातेसी । तैसे अविद्यामायापाशी । तुम्हा निष्ठुर बोलिलो ॥७०॥

सर्वस्वी आम्हा क्षमा करणे । म्हणोनि घालिती लोटांगणे । विनवोनिया करुणावचने । गेली स्नानासी गंगेत ॥७१॥

स्नान करोनि बाळकासहित । धुती झाली पादुकांचे रक्त । औदुंबरा स्नपन करीत । लाविती दीप तये वेळी ॥७२॥

पूजा करिती भक्तीसी । मंत्रपूर्वक विधींसी । शमीपत्र कुसुमेसी । पूजा करिती परियेसा ॥७३॥

नीरांजन तये वेळा । करिती गायन परिबळा । अतिसंतोषी ती अबला । भक्तिभावे स्तुति करीत ॥७४॥

इतुके होय तो गेली निशी । उदय झाला दिनकरासी । संस्कारू म्हणोनि प्रेतासी । आले विप्र ज्ञाती सकळ ॥७५॥

तव देखती कुमारासी । विस्मय झाला सकळिकांसी । समाधान करिती हर्षी । महा आनंद वर्तला ॥७६॥

ऐसा श्रीगुरुस्थानमहिमा । अखिल लोक लाधले कामा । एकेकाची सांगता महिमा । विस्तार होईल बहु कथा ॥७७॥

पुत्रप्राप्ति वांझेसी । श्रीप्राप्ति दारिद्र्यासी । आरोग्य होईल रोगियासी । अपमृत्यु न ये जाणा ॥७८॥

सिद्ध म्हणे नामधारका । स्थानमहिमा ऐशी ऐका । अपार असे सांगता देखा । साधारण निरोपिले ॥७९॥

तया औदुंबरातळी । श्रीगुरु वसे सर्वकाळी । काम्य होत तात्काळी । आराधिता नरहरीसी ॥८०॥

भाव असावा आपुले मनी । पूजा करावी श्रीगुरुचरणी । जी जी वासना ज्याचे मनी । त्वरित होय परियेसा ॥८१॥

ह्रदयशूळ गंडमाळ । अपस्मार रोग सकळ । परिहरती तात्काळ । श्रीगुरुपादुका अर्चिता ॥८२॥

जो असेल मंदमति । बधिर मुका चरण नसती । औदुंबरी सेवा करिती । सुदेह होय सत्य माना ॥८३॥

चतुर्विध पुरुषार्थ । तेथे होय निश्चित । प्रत्यक्ष वसे श्रीगुरुनाथ । औदुंबरी सनातन ॥८४॥

तया नाव कल्पतरू । प्रत्यक्ष झाणा औदुंबरू । जे जे मनी इच्छिती नरू । साध्य होय परियेसा ॥८५॥

किती वर्णू तेथील महिमा । सांगता अशक्य असे आम्हा । श्रीगुरुसरस्वती नामा । प्रख्यात असे परियेसा ॥८६॥

गंगाधराचा नंदन । सांगे गुरुचरित्र विस्तारोन । भक्तिपूर्वक ऐकती जे जन । सकलाभीष्टे पावती ॥८७॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सदा श्रीगुरुचरणी स्थिर । उतरवी पैलपार । इहसौख्य परगति ॥८८॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । गुरुमाहात्म्यपरमामृत । विप्रपुत्रसंजीवनामृत । निरोपिले असे येथे ॥८९॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे बालसंजीवन नाम एकविंशोऽध्यायः ॥२१॥

ओवीसंख्या ८९
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमशः

No comments:

Post a Comment