Monday, January 10, 2011

Karangali Marangali

आपल्या बाळराजाला अवयवांची ओळख करून देण्यासाठी रचलेले हे मधुर गीत...

करंगळी मरंगळी
मधलं बोट चाफेकळी

तळहात- मळहात
मनगट- कोपर
खांदा-गळगुट-हनुवटी ॥

भाताचं बोळकं
वासाचं नळकं

काजळाच्या डब्या
देवाजीचा पाट

देवाजीच्या पाटावर
चिमण्यांचा किलबिलाट ॥No comments:

Post a Comment