Sunday, January 16, 2011

Gurucharitra - Adhyay 24

Chapter 24 Guru meets Trivikram Bharati and the later becomes Guru's disciple.

CHAPTER 24
Trivikram bharati Sees Vishwaroop of Shri Guru.

Kumasi is a village near ganagapur. Here lived Trivikram Bharati, who had studied three Vedas. He was a devotee of Shri Narahari, Hearing the name of Shri Guru, he said, "Such kind of high living does not become a Sanyasi.' He criticised Shri Guru in this way.

Shri Guru asked Gramadhipati to arrange for going to Kumasi. Elephant, horses, pageantry and musicians were gathered. Shri guru was seated in a palkhi and a grand procession started towards Kumasi.

As usual trivikram was worshipping Narahari in his mind. But he could not see the shrine of Narahari in mediation. He saw all the persons were sanyasis with sticks in hand and having the appearance of Shri Narahari. He was amazed. He fell flat before the procession praying 'You are Trimurti God, Guru of the universe. I could not know you due to my ignorance. Kindly disclose yourself in your real form. You are all-pervading Narsinha Saraswati. I see here that all are yatis having the same appearance. I cannot recognise you and bow to you. I have committed many sins but I have been doing you `manaspuja' daily. It seems that it is bearing fruit today, and I have the pleasure to see thyself. You have descended for the liberation of the ignorant persons like us. So kindly show me your real hallowed form.'

Being praised by Trivikram in this way, Shri Guru appeared before him in his real form in the procession. Shri Guru said to him, `You have been criticising me and have called me a pretender. Just tell me who is a pretender.'

Trivikram said, `Kindly pardon me. Wipe off my ignorance. I am sinking in the sea of ignorance. Give me a lift in the boat of knowledge and take me with you. Shri Krishna showed Vishwaroop to Arjuna. Similarly you have favoured me by showing your universal form. Oh guru of the Universe, your greatness cannot be fully described by people like me.'

Shri Guru: `You have known the Paramartha. You will not have any birth hereafter.' Blessing Trivikram Shri Guru returned back to Ganagapur.

Contd.....

श्रीगणेशाय नमः ।

सिद्ध म्हणे नामधारका । पुढे अपूर्व वर्तले देखा । विस्तारे कथाकौतुका । निरोपीन तुज आता ॥१॥
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारोनि आम्हांसी । निरोपावी दातारा ॥२॥
शिष्यवचन परिसोनि । सांगता झाला सिद्ध मुनि । ऐक तू वत्सा नामकरणी । गुरुचरित्र अभिनव ॥३॥
ऐसा त्रिविक्रम महामुनि । जो का होता कुमसीस्थानी । निंदा करी सर्व जनी । दांभिक संन्यासी म्हणोनि ॥४॥
ज्ञानवंत श्रीगुरुमूर्ति । विश्वाच्या मनीचे ओळखती । नसधिपासी सांगती । निंदा करितो म्हणोनि ॥५॥
श्रीगुरु म्हणती तये वेळी । आजची निघावे तात्काळी । त्रिविक्रमभारतीजवळी । जाणे असे कुमसीस ॥६॥
ऐकोनि राजा संतोषला । नानालंकार करिता जाहला । हत्ती अश्वपायदळा । श्रृंगार केला तये वेळी ॥७॥
समारंभ केला थोरु । आंदोळी बैसले श्रीगुरु । नानापरी वाद्यगजरु । करूनिया निघाले ॥८॥
ऐसेपरी श्रीगुरुमूर्ति । तया कुमसी ग्रामा येती । त्रिविक्रमभारती । करीत होता मानसपूजा ॥९॥
मानसपूजा नरहरीसी । नित्य करी भावेसी । स्थिर न होय तया दिवसी । मानसमूर्ति नरकेसरी ॥१०॥
मनी चिंता करी यति । का पा न ये मूर्ति चित्ती । वृथा झाली तपोवृत्ति । काय कारण म्हणतसे ॥११॥
बहुत काळ आराधिले । का पा नरसिंहे उपेक्षिले । तपफळ वृथा गेले । म्हणोनि चिंता करीतसे ॥१२॥
इतुके होता त्या अवसरी । श्रीगुरुते देखिले दूरी । येत होते नदीतीरी । मानसपूजेच्या मूर्तिरूपे ॥१३॥
सर्व दळ दंडधारी । तयांत एकरूप हरी । भारती देखोनि विस्मय करी । नमन करीत निघाला ॥१४॥
साष्टांग नमन करोनि । जावोनि लागे श्रीगुरुचरणी । सर्वचि रूपे झाला प्राणी । दंडधारी यतिरूप ॥१५॥
समस्तरूप एकसरी । दिसताती दंडधारी । कवण लघु कवण थोरी । न कळे तया त्रिविक्रमा ॥१६॥
भ्रांत झाला तये वेळी । पुनरपि लागे चरण कमळी । ब्रह्मा विष्णु चंद्रमौळी । त्रिमूर्ति तू जगद्गुरु ॥१७॥
तुझे न कळे स्वरूपज्ञान । अविद्यामाया वेष्टोन । निजरूप होऊन । कृपा करणे दातारा ॥१८॥
तुझे स्वरूप अवलोकिता । आम्हा अशक्य गुरुनाथा । चर्मचक्षूकरूनि आता । पाहू न शके म्हणतसे ॥१९॥
तू व्यापक सर्वा भूती । नरसिंहमूर्ति झालासी यति । प्रगट नरसिंहसरस्वती । समस्त दिसती यतिरूप ॥२०॥
नमू आता सांग कवणा । कवणापुढे दाखवू करुणा । त्रिमूर्ति तू ओळखसी खुणा । निजरूपे रहावे स्वामिया ॥२१॥
तप केले बहुत दिवस । पूजा केली तुझी मानस । आजि आलि गा फळास । मूर्ति साक्षात भेटली ॥२२॥
तू तारक विश्वासी । उद्धराया आम्हांसी । म्हणोनि भूमी अवतरलासी । दावी स्वरूप चिन्मय ॥२३॥
ऐसेपरी श्रीगुरूसी । स्तुति केली भक्तीसी । श्रीगुरुमूर्ति संतोषी । झाली निजमूर्ति एक ॥२४॥
व्यक्त पाहे तये वेळी । दिसो लागले सैन्य सकळी । तयामध्ये चंद्रमौळी । दिसे श्रीगुरु भक्तवरद ॥२५॥
श्रीगुरु म्हणती तयासी । नित्य आमुची निंदा करिसी । दांभिक नावे आमहंसी । पाचारिसी मंदमती ॥२६॥
या कारणे तुजपासी । आलो तुझ्या परीक्षेसी । पूजा करिसी तू मानसी । श्रीनृसिंहमूर्तीची ॥२७॥
दांभिक म्हणजे कवण परी । सांग आता विस्तारी । तुझे मनी वसे हरी । तोचि तुज निरोपी ॥२८॥
ऐकोनि श्रीगुरुचे वचन । यतीश्वर करी नमन । सद्गुरु स्वामी कृपा करून । अविद्यारूप नासावे ॥२९॥
तू तारक विश्वासी । त्रयमूर्ति-अवतार तूचि होसी । मी वेष्टोन । मायापाशी । अज्ञानपणे वर्ततो ॥३०॥
मायामोह-अंधकरी । बुडालो अज्ञानसागरी । न ओळखे परमार्थ विचारी । दिवांध झालो स्वामिया ॥३१॥
ज्योतिःस्वरूप तू प्रकाशी । स्वामी माते भेटलासी । क्षमा करावी बाळकासी । उद्धारावे दातारा ॥३२॥
अविद्यारूप-समुद्रात । होतो आपण वहात । न दिसे पैल अंत । बुडतसो स्वामिया ॥३३॥
ज्ञानतारवी बैसवोनि करुणावायु प्रेरूनि । पैलथडी निजस्थानी । पाववी स्वामी कृपासिंधु ॥३४॥
तुझी कृपा होय ज्यासी । दुःखदैन्ये कैचे त्यासी । तोचि जिंकील कळीकाळासी । परमार्थी ऐक्य होय ॥३५॥
पूर्वी कथा ऐकिली श्रवणी । महाभारत पुराणी । दाविले रूप अर्जुना नयनी । प्रसन्न होवोनि तयासी ॥३६॥
तैसे तुम्ही मजला आज । दाविले स्वरूप निज । अनंत महिमा तुझी चोज । भक्तवत्सला गुरुनाथा ॥३७॥
जय जयाजी जगद्गुरु । तू तारक भवसागरु । त्रयमूर्तीचा अवतारु । नरसिंहसरस्वती ॥३८॥
कृतार्थ झालो जी आपण । देखिले आजि तुमचे चरण । न करिता प्रयत्‍न । भेटला रत्‍नचिंतामणी ॥३९॥
जैसी गंगा सगरांवरी । कडे केले भवसागरी । जैसा विष्णु विदुराघरी । आला आपण कृपावंत ॥४०॥
भक्तवत्सला तुझी कीर्ति । आम्हा दाविली प्रचीति । वर्णावया नाही मति । अनंतमहिमा जगद्गुरु ॥४१॥
येणेपरी श्रीगुरूसी । करी स्तोत्र बहुवसी । श्रीगुरुमूर्ती संतोषी । दिधला वर तये वेळी ॥४२॥
वर दे तो त्रिविक्रमासी । तुष्टलो तुझ्या भक्तीसी । सद्‌गति होय भरवसी । पुनरावृत्ति नाही तुज ॥४३॥
तुज साधला परमार्थ । होईल ईश्वरी ऐक्यार्थ । ऐसे म्हणोनि गुरुनाथ । निघाले आपुल्या निजस्थाना ॥४४॥
वर देवोनि भारतीसी । राहविले तेथे कुमसीसी । क्षण न लागता परियेसी । आले गाणगापुरासी ॥४५॥
सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरुमहिमा ऐसा निका । त्रिमूर्ति तोचि ऐका । नररूपे वर्ततसे ॥४६॥
ऐसा परमपुरुष गुरु । त्याते जे कोणी म्हणती नरु । तेचि पावती यमपुरु । सप्तजन्मपर्यंत ॥४७॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु । गुरुचि होय गिरिजारमणु । वेदशास्त्रपुराणू । बोलती हे प्रसिद्ध ॥४८॥
या कारणे श्रीगुरूसी । शरण जावे निश्चयेसी । विश्वासावे माझ्या बोलासी । लीन व्हावे श्रीगुरुचरणी ॥४९॥
अमृताची आरवटी । घातली असे गोमटी । ज्ञानी जन प्राशिती घोटी । गुरुचरित्रकामधेनु ॥५०॥
गंगाधराचा नंदन । सांगे गुरुचरित्र विस्तारोन । भक्तिपूर्वक ऐकती जन । लाधती पुरुषार्थ चतुर्विध ॥५१॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे त्रिविक्रमभारती विश्वरूपदर्शनं नाम तुर्विशोऽध्यायः ॥२४॥

ओवीसंख्या ५१
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमशः

No comments:

Post a Comment