Friday, March 4, 2011

Geetai - Adhyay 2

Chapter - II : Self-Knowledge And Equanimity.

The chapter deals with non-conventional definition of Performance of duty - Swadharma. This concept of Swadharma in India of 1932 was largely interpreted as Hindu dharma or its sects and sub-sects along with the rituals and signs on the forehead, a mala or a rosary, a particular type of dress or the naming, caste and sex. Vinoba's contribution to the interpretation of Swadharma is unique when he says that our Swadharma comes to us with such ease and naturalness that we should cherish it without effort. But because of many kinds of illusion, this does not happen; or else, it is performed with great difficulty; or even if it is practiced, it gets corrupted with many sorts of faults.

There are many external forms assumed by the illusion but, if we examine them, only one thing is at the bottom of it all, namely, a restricted and shallow identification of one self with the body. Myself, and those related to me through the body, sets the limits of my expansion. Anyone outside this circle is to me a stranger or an enemy. This identification with the body builds a wall around me and cuts me off, and I regard only the bodies as "me" and "mine".

Falling into this double trap of identification of oneself and one's people with the body we start putting up all sorts of little walls. Almost everybody is busy doing this. One man puts up an enclosure called ""attachment to family" and lives in it; another builds and lives in an enclosure called ""attachment to nation"". But what is the result of this? Only one thing: the germs of base thoughts multiply, and the health which is swadharma is destroyed.

The practice of swadharma or the duty towards oneself, family, society and nation is to be progressively achieved by converting the intelligence or buddhi to discriminating intelligence (vivekbuddhi) which is also called Wisdom or Pragna.

Towards the end of this long chapter in the Gita are described the qualities of the man of steadfast mind (sthitaprajna) the embodiment of self-control i.e. controlling the organs of perception and action (indriyas). This control is not easy. But to do as the tortoise does, drawing in its limbs in times of danger, and using them when it is safe; to draw the senses away from objects, and to use them for higher services - this discipline is difficult but can be achieved by effort. A person established in 'Pragna' or 'Wisdom' becomes more balanced or equanimity and experiences his higher self which is beyond passion, greed and arrogance.

अध्याय 2
संजय म्हणाला

असा तो करुणा-ग्रस्त घाबरा अश्रु गाळित ।
करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

कोठूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज ।
असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ति दुर्गति ॥ २ ॥

निर्वीर्य तू नको होऊ न शोभे हे मुळी तुज ।
भिकार दुबळी वृत्ति सोडुनी ऊठ तू कसा ॥ ३ ॥

अर्जुन म्हणाला

कसा रणांगणी झुंजू भीष्म-द्रोणांविरुद्ध मी ।
ह्यांस बाण कसे मारू आम्हा हे पूजनीय की ॥ ४ ॥

न मारिता थोर गुरूंस येथे ।
भिक्षा हि मागूनि भले जगावे ॥
हितेच्छु हे ह्यांस वधून भोग ।
भोगू कसे भंगुर रक्त-मिश्र ॥ ५ ॥

ह्यांचा चि व्हावा जय आमुचा की ।
कशात कल्याण असे न जाणो ॥
मारूनि ज्यांते जगणे न इच्छू ।
झुंजावया ते चि उभे समोर ॥ ६ ॥

दैन्याने ती मारिली वृत्ति माझी ।
धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे ॥
कैसे माझे श्रेय होईल सांगा ।
पायांपाशी पातलो शिष्य-भावे ॥ ७ ॥

मिळेल निष्कंटक राज्य येथे ।
लाभेल इंद्रासन देव-लोकी ॥
शमेल त्याने न तथापि शोक ।
जो इंद्रियांते सुकवीत माझ्या ॥ ८ ॥

संजय म्हणाला

असे अर्जुन तो वीर हृषीकेशास बोलुनी ।
शेवटी मी न झुंजे चि ह्या शब्दे स्तब्ध राहिला ॥ ९ ॥

मग त्यास हृषीकेश जणू हसत बोलिला ।
करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा ॥ १०॥

[४]

श्री भगवान् म्हणाले

करिसी भलता शोक वरी ज्ञान हि सांगसी ।
मेल्या-जित्यावीषी शोक ज्ञानवंत न जाणती ॥ ११ ॥

मी तू आणिक हे राजे न मागे नव्हतो कधी ।
तसे चि सगळे आम्ही न पुढे हि नसू कधी ॥ १२ ॥

ह्या देही बाल्य तारूण्य जरा वा लाभते जशी ।
तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ॥ १३ ॥

शीतोष्ण विषय-स्पर्श सुख-दुःखात घालिती ।
करी सहन तू सारे येती जाती अनित्य ते ॥ १४ ॥

ह्यांची मात्रा न चाले चि ज्या धीर पुरूषा वरी ।
सम देखे सुखे दुःखे मोक्ष-लाभास योग्य तो ॥ १५ ॥

नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाश हि ।
निवाडा देखिला संती ह्या दोहींचा अशापरी ॥ १६ ॥

ज्याने हे व्यापिले सर्व ते जाण अविनाश तू ।
नाश त्या नित्य-तत्त्वाचा कोणी हि न करू शके ॥ १७ ॥

विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत ।
नित्य निःस्सीम तो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव ॥ १८ ॥

जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे ।
दोघे न जाणती काही न मारी न मरे चि हा ॥ १९ ॥

न जन्म पावे न कदापि मृत्यु ।
होऊनी मागे न पुढे न होय ॥
आला न गेला स्थिर हा पुराण ।
मारोत देहास परी मरे ना ॥ २० ॥

निर्विकार चि हा नित्य जन्म-मृत्यूहुनी पर ।
जाणे हे तत्त्व तो कैसा मारी वा मारवी कुणा ॥ २१ ॥

सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे ।
मनुष्य घेतो दुसरी नवीन ॥
तशी चि टाकूनि जुनी शरीरे ।
आत्मा हि घेतो दुसरी निराळी ॥ २२ ॥

शस्त्रे न चिरिती ह्यास ह्यास अग्नि न जाळितो ॥
पाणी न भिजवी ह्यास ह्यास वारा न वाळवी ॥ २३ ॥

चिरवे जाळवे ना हा भिजवे वाळवे हि ना ॥
स्थिर निश्चळ हा नित्य सर्व-व्यापी सनातन ॥ २४ ॥

न देखू ये न चिंतू ये बोलिला निर्विकार हा ॥
जाणूनि ह्यापरी आत्मा शोक योग्य नसे तुज ॥ २५ ॥

अथवा पाहसी तू हा मरे जन्मे प्रति-क्षणी ॥
तरी तुज कुठे येथे नसे शोकास कारण ॥ २६ ॥

जन्मता निश्चये मृत्यु मरता जन्म निश्चये ॥
म्हणूनि न टळे त्याचा व्यर्थ शोक करू नको ॥ २७ ॥

भूतांचे मूळ अव्यक्ती मध्य तो व्यक्त भासतो ॥
पुन्हा शेवट अव्यक्ती त्यामधे शोक कायसा ॥ २८ ॥

आश्चर्य जो साच चि ह्यास देखे ।
आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी ॥
आश्चर्य जो वर्णन ते हि ऐके ।
ऐके तरी शून्य चि जाणण्याचे ॥ २९ ॥

वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा ।
म्हणूनि भूत-मात्री तू नको शोक करू कधी ॥ ३० ॥

[५]

स्वधर्म तो हि पाहूनि न योग्य डगणे तुज ।
धर्म-युद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले ॥ ३१ ॥

प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे ।
क्षत्रियास महा-भाग्ये लाभते युद्ध हे असे ॥ ३२ ॥

हे धर्म-युद्ध टाळूनि पापात पडशील तू ।
स्वधर्मासह कीर्तीस दूर सारूनिया स्वये ॥ ३३ ॥

अखंड लोक गातील दुष्कीर्ति जगती तुझी ।
मानवंतास दुष्कीर्ति मरणाहूनि आगळी ॥ ३४ ॥

भिऊनि टाळिले युद्ध मानितील महा-रथी ।
असूनि मान्य तू ह्यास तुच्छता पावशील की ॥ ३५ ॥

बोलितील तुझे शत्रु भलते भलते बहु ।
निंदितील तुझे शौर्य काय त्याहूनि दुःखद ॥ ३६ ॥

मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने मही-तळ ।
म्हणूनि अर्जुना उठ युद्धास दृढ-निश्चये ॥ ३७ ॥

हानि लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम ।
मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुज ॥ ३८ ॥

[६]

सांख्य-बुद्धि अशी जाण ऐक ती योग-बुद्धि तू ।
तोडिशील जिने सारी कर्माची बंधने जगी ॥ ३९ ॥

न बुडे येथ आरंभ न घडे विपरीत हि ।
जोडा स्वल्प हि हा धर्म तारी मोठ्या भयातुनी ॥ ४० ॥

ह्यात निश्चय लाभूनि बुद्धि एकाग्र राहते ।
निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपती चि ना ॥ ४१ ॥

अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया ।
वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे ॥ ४२ ॥

जन्मूनिया करा कर्मे मिळवा भोग-वैभव ।
भोगा कर्म-फळे गोड सांगती स्वर्ग-कामुक ॥ ४३ ॥

त्यामुळे भुलली बुद्धि गुंतली भोग-वैभवी ।
ती निश्चय न लाभूनि समाधीत नव्हे स्थिर ॥ ४४ ॥

तिन्ही गुण वदे वेद त्यात राहे अलिप्त तू ।
सत्त्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध ॥ ४५ ॥

सर्वत्र भरले पाणी तेंव्हा आडात अर्थ जो ।
विज्ञानी ब्रम्ह-वेत्त्यास सर्व वेदात अर्थ तो ॥ ४६ ॥

कर्मात चि तुझा भाग तो फळात नसो कधी ।
नको कर्म-फळी हेतु अकर्मी वासना नको ॥ ४७ ॥

फळ लाभो न लाभो तू निःसंग सम होऊनी ।
योग-युक्त करी कर्मे योग-सार समत्व चि ॥ ४८ ॥

समत्व-बुद्धि ही थोर कर्म तिहूनि हीन चि ।
बुद्धीचा आसरा घे तू मागती फळा दीन ते ॥ ४९ ॥

येथे समत्व-बुद्धीने टळे सुकृत-दुष्कृत ।
समत्व जोड ह्यासाठी ते चि कर्मात कौशल ॥ ५० ॥

ज्ञानी समत्व-बुद्धीने कर्माचे फळ सोडुनी ।
जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत ॥ ५१ ॥

लंघूनि बुद्धि जाईल जेंव्हा हा मोह-कर्दम ।
आले येईल जे कानी तेंव्हा जिरविशील तू ॥ ५२ ॥

श्रवणे भ्रमली बुद्धि तुझी लाभूनि निश्चय ।
स्थिरावेल समाधीत तेंव्हा भेटेल योग तो ॥ ५३ ॥

[७]

अर्जुन म्हणाला

स्थिरावला समाधीत स्थित-प्रज्ञ कसा असे ।
कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा ॥ ५४ ॥

श्री भगवान् म्हणाले

कामना अंतरातील सर्व सोडूनि जो स्वये ।
आत्म्यात चि असे तुष्ट तो स्थित-प्रज्ञ बोलिला ॥ ५५ ॥

नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे ।
नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित-प्रज्ञ संयमी ॥ ५६ ॥

सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता ।
न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ५७ ॥

घेई ओढूनि संपूर्ण विषयातूनि इंद्रिये ।
जसा कासव तो अंगे तेंव्हा प्रज्ञा स्थिरावली ॥ ५८ ॥

निराहार-बळे बाह्य सोडी विषय साधक ।
आंतील न सुटे गोडी ती जळे आत्म-दर्शने ॥ ५९ ॥

करीत असता यत्न ज्ञात्याच्या हि मनास ही ।
नेती खेचूनि वेगाने इंद्रिये दांडगी चि की ॥ ६० ॥

त्यास रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ।
इंद्रिये जिंकिली ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ६१ ॥

विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला ।
संगांतूनि फुटे काम क्रोध कामात ठेविला ॥ ६२ ॥

क्रोधातूनि जडे मोह मोहाने स्मृति लोपली ।
स्मृति लोपे बुद्धि-नाश म्हणजे आत्म-नाश चि ॥ ६३ ॥

राग-द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये ।
स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता ॥ ६४ ॥

प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडूनिया ।
प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे ॥ ६५ ॥

अयुक्तास नसे बुद्धि त्यामुळे भावना नसे ।
म्हणूनि नमिळे शांति शांतीविण कसे सुख ॥ ६६ ॥

इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जाय जे ।
त्याने प्रज्ञा जशी नौका वार्‍याने खेचली जळी ॥ ६७ ॥

म्हणूनि इंद्रिये ज्याने विषयातूनि सर्वथा ।
ओढूनि घेतली आंत त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ६८ ॥

सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे ।
सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती ॥ ६९ ॥

न भंग पावे भरता हि नित्य ।
समुद्र घेतो जिरवूनि पाणी ॥
जाती तसे ज्यात जिरूनि भोग ।
तो पावला शांति न भोग-लुब्ध ॥ ७० ॥

सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि निःस्पृह ।
अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि ॥ ७१ ॥

अर्जुना स्थिति ही ब्राम्ही पावता न चळे पुन्हा ।
टिकूनि अंत-काळी हि ब्रम्ह-निर्वाण मेळवी ॥ ७२ ॥

दुसरा अध्याय संपूर्ण

No comments:

Post a Comment