Saturday, March 5, 2011

Geetai - Adhyay 3

Chapter - III : Yoga of Action

The third chapter on 'Karma-Yoga' or 'Yoga of Action' was interpreted in context of then prevailing life in India People in towns and villages were in high state of inactivity. Many of them had taken to addiction to tobacco opium or country liquor. Men were most of the time gossiping, and most of the manual work was thrust upon women. In the name of religion high class Hindus had developed a strong dislike towards poor members of society and were treating women as second class citizens. In large cities, men had taken to English education and life style as the highest aim of life. Manual work was to be avoided and white collar generation came into significant existence. People became 'intellectuals' rather than intelligent. There was 'inactivity' in villages and 'fruitless activity in cities'.

In this context, Vinoba like his predecessor Tilak once again draws the attention of Hindu society that Gita is not for Sanyasis but for House-holders and swadharma is to act. Dignity of labour and maintaining health by simple natural means was already established by his mentor Gandhi as a part of swadharma. Vinoba adds to the list the concept of 'bhavana' or 'love' as important ingredients of work.

Work has to be done for maintaining health, tilling and harvesting of land or craftsmanship of an artisan or merchandising of goods by merchants etc. All this should be directed towards growth of soul by adding love and earning money by fair means in return for work as a house-holder is expected to do.

As he illustrates this chapter, he says that 'result of karma-yogi's (skillful worker) action is that while his life goes on smoothly, his body and mind are radiant; and society too prospers. Besides these two benefits, he also receives the great gift of 'chitta-shudhi' or purity of mind.. ..,The Karma Yogi's work is a form of prayer (japa). His mind is purified by it, and the clear mind receives the image of 'Jnana' or 'true knowledge'.

Illustrating this concept further, he gives example of Sena the barber. As he cleaned other people's heads wisdom came to him, 'Look, I remove the dirt from others heads, but have I ever removed the dirt from my own head, from my own mind?' The language of the spirit came to him through his work. Again he says that as we weed the field, the karma-yogi (skillful worker) gets the idea of removing the weeds of habit and passion from his heart. He concludes that karma-yogi acting thus, through the terms of his own trade or occupation gains knowledge of perfection.
अध्याय - 3
अर्जुन म्हणाला

बुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना ।
मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥

मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।
ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥

श्री भगवान् म्हणाले

दुहेरी ह्या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे ।
ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करूनिया ॥ ३ ॥

न कर्मारंभ टाळूनि लाभे नैष्कर्म्य ते कधी ।
संन्यासाच्या क्रियेने चि कोणी सिद्धि न मेळवी ॥ ४ ॥

कर्माविण कधी कोणी न राहे क्षण-मात्र हि ।
प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितात चि ॥ ५ ॥

इंद्रिये करिती कर्म मूढ त्यास चि रोधुनी ।
राहतो भोग चिंतूनि तो मिथ्याचार बोलिला ॥ ६ ॥

जो इंद्रिये मनाने ती नेमुनी त्यास राबवी ।
कर्म-योगात निःसंग तो विशेष चि मानिला ॥ ७ ॥

नेमिले तू करी कर्म करणे हे चि थोर की ।
तुझी शरीर-यात्रा ही कर्माविण घडे चि ना ॥ ८ ॥

[९]

यज्ञार्थ कर्म सोडूनि लोक हा बांधिला असे ।
यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त-संग तू ॥ ९ ॥

पूर्वी प्रजेसवे ब्रम्हा यज्ञ निर्मूनि बोलिला ।
पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा काम-धेनु चि ॥ १० ॥

रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देव ते ।
एकमेकास रक्षूनि पावा कल्याण सर्व हि ॥ ११ ॥

यज्ञ-तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित ।
त्यांचे त्यांस न देता जो खाय तो एक चोर चि ॥ १२ ॥

यज्ञात उरले खाती संत ते दोष जाळिती ।
रांधिती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती ॥ १३ ॥

अन्नापासूनि ही भूते पर्जन्यातूनि अन्न ते ।
यज्ञे पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे ॥ १४ ॥

प्रकृतीपासुनी कर्म ब्रम्ही प्रकृति राहिली ।
ऐसे व्यापक ते ब्रम्ह यज्ञात भरले सदा ॥ १५ ॥

प्रेरिले हे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी ।
इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी ॥ १६ ॥

परी आत्म्यात जो खेळे आत्मा भोगूनि तृप्त जो ।
आत्म्यामध्ये चि संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले ॥ १७ ॥

केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा ।
कोणामधे कुठे त्याचा न काही लोभ गुंतला ॥ १८ ॥

म्हणूनि नित्य निःसंग करी कर्तव्य कर्म तू ।
निःसंग करिता कर्म कैवल्य-पद पावतो ॥ १९ ॥

[१०]

कर्म-द्वारा चि सिद्धीस पावले जनकादिक ।
करी तू कर्म लक्षूनि लोक-संग्रह-धर्म हि ॥ २० ॥

जे जे आचरितो श्रेष्ठ ते ते चि दुसरे जन ।
तो मान्य करितो जे जे लोक चालवितात ते ॥ २१ ॥

करावे-मिळवावेसे नसे काही जरी मज ।
तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चि की ॥ २२ ॥

मी चि कर्मी न वागेन जरी आळस झाडुनी ।
सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग ॥ २३ ॥

सोडिन मी जरी कर्म नष्ट होतिल लोक हे ।
होईन संकर-द्वारा मी चि घातास कारण ॥ २४ ॥

गुंतूनि करिती अज्ञ ज्ञात्याचे मोकळेपणे ।
करावे कर्म तैसे चि इच्छुनी लोक-संग्रह ॥ २५ ॥

नेणत्या कर्म-निष्ठांचा बुद्धि-भेद करू नये ।
गोडी कर्मात लावावी समत्वे आचरूनि ती ॥ २६ ॥

कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणामुळे ।
अहंकार-बळे मूढ कर्ता मी हे चि घेतसे ॥ २७ ॥

गुण हे आणि ही कर्मे ह्यांहुनी वेगळा चि मी ।
जाणे तत्त्व-ज्ञ गुंते ना गुणात गुण वागता ॥ २८ ॥

गुंतले गुण-कर्मी जे भुलले प्रकृती-गुणे ।
त्या अल्प जाणणारांस सर्व-ज्ञे चाळवू नये ॥ २९ ॥

[११]

मज अध्यात्म-वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी ।
फलाशा ममता सर्व सोडुनी झुंज तू सुखे ॥ ३० ॥

माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळिती ।
श्रद्धेने नेणते ते हि तोडिती कर्म-बंधने ॥ ३१ ॥

परी मत्सर-बुद्धीने जे हे शासन मोडिती ।
ज्ञान-शून्य चि ते मूढ पावले नाश जाण तू ॥ ३२ ॥

ज्ञानी हि वागतो त्याच्या स्वभावास धरूनिया ।
स्वभाव-वश ही भूते बलात्कार निरर्थक ॥ ३३ ॥

इंद्रियी सेविता अर्थ राग-द्वेष उभे तिथे ।
वश होऊ नये त्यांस ते मार्गातील चोर चि ॥ ३४ ॥

उणा हि आपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्व-धर्मात भला मृत्यु पर-धर्म भयंकर ॥ ३५ ॥

[१२]

अर्जुन म्हणाला

मनुष्य करितो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे ।
आपुली नसता इच्छा वेठीस धरिला जसा ॥ ३६ ॥

श्री भगवान् म्हणाले

काम हा आणि हा क्रोध घडिला जो रजोगुणे ।
मोठा खादाड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे ॥ ३७ ॥

धुराने झाकिला अग्नि धुळीने आरसा जसा ।
वारेने वेष्टिला गर्भ कामाने ज्ञान हे तसे ॥ ३८ ॥

काम-रूप-महा-अग्नि नव्हे तृप्त कधी चि जो ।
जाणत्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले ॥ ३९ ॥

घेऊनि आसर्‍यासाठी इंद्रिये मन बुद्धि तो ।
मोह पाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गुंडुनी ॥ ४० ॥

म्हणूनि पहिला थारा इंद्रिये ती चि जिंकुनी ।
टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्व हि ॥ ४१ ॥

इंद्रिये बोलिली थोर मन त्याहूनि थोर ते ।
बुद्धि थोर मनाहूनि थोर तीहूनि तो प्रभु ॥ ४२ ॥

असा तो प्रभु जाणूनि आवरी आप आपणा ।
संहारी काम हा वैरी तू गाठूनि परोपरी ॥ ४३ ॥

अध्याय तिसरा संपूर्ण

No comments:

Post a Comment